साहित्यः तांदुळ, काश्मिरी लाल मिरच्या, तिखट लाल मिरच्या (दोन्ही मिरच्या मिळून १०० ग्राम) , मिठ., बारीक चिरलेला कांदा.
तीन वाट्या तांदुळ स्वच्छ धुवुन दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. पाणि बदलण्याची गरज नाही. तिसर्या दिवशी तांदुळातील पाणी ओतून टाकून तांदूळ बारिक वाटून घ्या. दोन्ही प्रकारच्या मिरच्या पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या.
आता वाटलेल्या तांदुळात तेवढेच पाणी, चिरलेला कांदा, मिरच्यांची पेस्ट, मिठ (जरा जास्तच) घालून गॅसवर ठेवा. उकड काढतो तसे. मधुन मधुन हलवत रहा पिठाची गुठळी होऊ नये. दोन तीन वाफा आल्यावर खाली उतरवणे जरा थंड झाले की बोराच्या आकाराचे गोळे करून सांडगे घालतो तसे उन्हात सुकवावे. चांगले वाळले की डब्यात भरून ठेवावे.
पिठ
सुकताना
पाहिजे तेंव्हा डिप फ्राय करून सर्व करावे. क्रिस्पी लागतात. खाताना तिखटाचा ठसका उठतो. लहान मुलांना देऊ नयेत. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
चसका रेडी
आमच्याकडे मुलांत नातवंडातही हा प्रकार हिट आहे कारण ड्रिंक्स बरोबर कुरकुरीत चविष्ठ तोंडिलावणे म्हणून. बाकी आम्ही जेवणात तळून खातोच.

वाचने
6792
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईंग्लिश नाव देशी प्रकार... पण
अरे वा!
मस्त.
मस्त आहे!
वाटीत च्स्क्यावर मोहरी दिसते
होय ग
In reply to वाटीत च्स्क्यावर मोहरी दिसते by त्रिवेणी
वाह वाह !
आई ग! मी तांदळाच्या सांडग्यात