माझ्या पूण्याच्या भूमीत
कविवर्य बा.भ.बोरकर यांची माफी मागून,
माझ्या पूण्याच्या भूमीत, गड्या प्रदूषणाचे ढग |
कड्या कपारी मधोनी, धूर निघे भकाभक ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, उन्हाळ्यात घामाच्या धारा |
पावसाळ्यात दारापूढे, बनती रस्त्यांच्या नद्या ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, काळी माती काळे पाणी |
एके काळी या मातीत, सुवर्ण नांगर फिरवला जाइ ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, इतिहासाची पाळेमूळे |
आणि अडकतात वादात, आमच्या इथले पुतळे ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, परप्रांतीयांची रे रास |
'भाऊ', 'दादा' शब्द गेले, बनले भैया सगळेच ||
माझ्या पूण्याची भूमीही, असे विद्येचे माहेरघर |
विद्वत्तांची परंपरा, आहे इथुनच थोर ||
माझ्या पूण्याच्या भूमीत गणेशपूजा दिन-रात |
भोळ्या भाबड्या भक्तांचे येथे होइ चित्त शांत ||
माझ्या पूण्याच्या भूमीत, अशी सरमिसळ आढळे |
अन् प्रत्येकाच्या मनी असे, पुणे तिथे काय उणे ||
काव्य ठीक
जस दिसत, तस नसतं..
:)
'भाऊ', 'दादा' शब्द गेले
तुम्ही पुणं जगला नाहीत
सर ,
सगळं लिहीलंय ते आजच्याला चालू आहे
परफेक्शन को इम्प्रूव्ह करना
आभिमाने हं
सुंदर.
धन्यवाद
पुणं असंच आहे आणि असंच राहिल
अरे बापरे
चुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
जाहिरात करावी लागत नाही
अगदि समते एकेक शब्दाशी ...
ठ्यांक्स् "पू" तै
मूळ कविता
http://marathikavitaa.wordpress.com/2008/09/25/%E0%A4%AE%E0%A4%B
धन्यवाद आदुबाळ
बाकी सगळं छान, पण पुण्यातला
दीर्घ "पू" बहुदा वृत्ताचा तोल
छान कविता...!
पुण्याला पूणे
शहरांवर बेतलेली गाणी या
तुमचा प्रतिसाद आला, कवितेचे
+१