आज मी जी recipe इथे share करत्ये तो खास कोकणातला पदार्थ आहे. तांदळापासून बनणारा हा पदार्थ अतिशय साधा आणि कमीत कमी साहित्य वापरून तयार होतो. मात्र खावासा वाटला आणि करून खाल्ला असा मात्र नाही. याच्या तयारीला थोडा वेळ द्यावा लागतो. याला कोकणामध्ये ओल्या फेण्या म्हणतात. काहीजण त्यांना पापड्या देखील म्हणतात. या फेण्या वाळवल्या कि तळायच्या फेण्या तयार होतात. अतिशय हलक्या आणि कुरकुरीत तळलेल्या फेण्या जिभेवर अक्षरश: विरघळतात.
चला तर मग वळूया या आगळ्या recipe कडे.
साहित्य:
१ वाटी तांदूळ
१ Tb sp खसखस
चवीनुसार मीठ
दही
कृती:
१) तांदूळ धुवून घ्यावे. दुप्पट पाणी घालून भिजवावे व झाकून ठेवावे. ३ दिवस हे तांदूळ तसेच ठेवावे. पाणी बदलू नये.
साधारण तिसऱ्या दिवशी त्याला आंबूस वास येतो.
२) ही fermantation process झाली कि चौथ्या दिवशी तांदूळ धुवावे. धुतलेले तांदूळ mixer वर वाटून घ्यावेत. वाटताना त्यात अजिबात पाणी घालू नये. ते घट्टच वाटावेत. हे batter इडलीच्या पिठाइतके घट्ट असावे.
३) नंतर त्यात खसखस आणि मीठ घालून नीट mix करावे. हे झाले फेण्यांचे batter तयार.
४) फेण्या करायच्या वेळी प्रथम stand मधील ताटल्यांना थोडसे दही लावावे. नंतर त्यावर batter डावेने घालून घ्यावे. एका stand मध्ये ६ ताटल्या मावतात. ताट्ल्यांवर घातलेले batter खूप जाड अथवा पांतळ असू नये.
५) ढोकळ्याच्या cooker मध्ये किंवा मोठ्या पातेली मध्ये तळाशी पाणी घ्यावे व gas वरती उकळण्यास ठेवावे.
६) पाणी उकळले कि फेण्यांचा stand त्यात ठेवावा व झाकण लावावे. साधारण १० - १५ मिनिटांनी झाकण काढावे व गरम गरम फेण्या दह्याबरोबर serve कराव्यात.
काही महत्वाचे:
१) फ़ेण्या करण्यासाठी तांदूळ आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या batter ला तुम्ही मिरची कोथिंबीरही वाटून लावू शकता.
३) फ़ेण्यांचा stand तुळशीबाग पुणे येथे नक्की मिळेल. जर stand नसेलच तर stand ऐवजी मोठ्या पानांवर फ़ेण्या लिहू शकता जसे की केळीची पाने.
मूळ प्रेषकः रेश्मा ओक.
ब्लॉग लिंकः http://www.takkuuu.blogspot.in/
प्रतिक्रिया सदर लिंक वर दिल्या तरी चालेल.
काही महत्वाचे:
१) फ़ेण्या करण्यासाठी तांदूळ आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या batter ला तुम्ही मिरची कोथिंबीरही वाटून लावू शकता.
३) फ़ेण्यांचा stand तुळशीबाग पुणे येथे नक्की मिळेल. जर stand नसेलच तर stand ऐवजी मोठ्या पानांवर फ़ेण्या लिहू शकता जसे की केळीची पाने.
मूळ प्रेषकः रेश्मा ओक.
ब्लॉग लिंकः http://www.takkuuu.blogspot.in/
प्रतिक्रिया सदर लिंक वर दिल्या तरी चालेल.
वाचने
11322
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव पाकॄ मस्तच आणि....
शीवाय
किती
पण
In reply to किती by चाणक्य
पण... काय झालं राव?
In reply to पण by चाणक्य
अहो
In reply to पण... काय झालं राव? by वेल्लाभट
ह्म्म
In reply to अहो by चाणक्य
हा प्रकार भयानक आवडतो.
छान.
तांदूळाच्या पापड्या.
सहमत
In reply to तांदूळाच्या पापड्या. by प्रभाकर पेठकर
मस्त !!
अहाहा....... आम्ही लहानपणी या
पाकृ मस्त आहे पण ते पापड्या
लै भारी..
वाह!
भारीच..... फोटो तर जबरीच !!!
मस्तच!
हा स्टँड कुठे मिळेल..?
स्टँडची गरज पण नसते रे तशी.
In reply to हा स्टँड कुठे मिळेल..? by मोदक
तू म्हणतोस त्या पद्धतीने
In reply to स्टँडची गरज पण नसते रे तशी. by सूड
आम्ही कधी शिकणार हे फेण्या,
मस्त !!
नविन
मस्तच पाकॄ.. आमच्याकडे पण
कालच खाल्ल्या
भारी.
मस्त!