कर्करोग स्तनांचा
मध्य वयातील वादळ
मध्यवयातील वादळ- पुढे
-----------------
काही गोष्टीत आपल्या मित्रांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण पुढे जात आहोत.
चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होते
१ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात.
२)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते. आणि ती अशी त्वरित आल्यामुळे त्यांचे भावविश्व सैरभैर होते.
अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते. परंतु त्याला जगापुढे आपले असे स्वरूप दाखवता येत नाही त्यामुळे पुरुषांचा असा कोंडमारा होतो
असो
स्त्रियांमध्ये हे शारीरिक बदल होतात त्याबरोबर त्यांच्या लैंगिक आयुष्यात फार मोठे बदल होतात. त्यांच्या संप्रेरकांमुळे मेंदूतील कामजीवनाची केंद्रे कमी काम करू लागतात त्याचा परिणाम पाच बाबतीत होतो. १.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm
यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते. या कारणा मुळे स्त्रीया कामसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. याचवेळी नवर्याकडून मानसिक आधाराची गरज असल्यामुळे त्या जवळीक( intimacy) करण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्ष शरीरसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो. त्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरणात भर पडते.
स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही. कोरडे पणामुळे योनीला जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे खाज येणे जळजळ होणे पांढरे पाणी जाणे हे प्रकार सुद्धा वाढतात. याचा वेळेत इलाज करणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने स्नेहन(lubrication) साठी क्रीम वापरणे आणि जन्तुसंसार्गासाठी प्रतिजैविक घेणे हे त्यांच्या संबंधाना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते. शेवटी कामसुख हे एक असे सुख आहे कि ज्यासाठी दोन्ही साथीदारांचा सहभाग आवश्यक आहे. जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा दुरावलेले संबंध पुनर्प्रस्थापित करणे फार कठीण जाते. कारण हे सुख मिळवण्यासाठी बाहेर जाणे हे कोणाच्या हि हिताचे नाही.
मानसिक आजार -२० टक्के स्त्रियांना या काळात नैराश्य येते( मेंदूत होणारा केमिकल लोच्या) हे असे का होते आहे हे स्त्रियांना काळात नाही आणि ती नाटके करीत आहे असे पुरुषांना वाटत असते. दुर्दैवाने हे नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जाते. यासाठी पुरुषांना फार धैर्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असते. पण हाच काळ त्यांच्या कर्तृत्वाचा असल्याने त्यांना आपल्या बायकोला तेवढा वेळ देत येतोच असे नाही आणि ती स्त्री एकटी पडते.
४० -५० टक्के स्त्रियांना निद्रानाशाचा त्रास होतो. त्या बोलत असताना नवरा घोरू लागला हे हटकून दिसणारे चित्र आहे. मग यातून बायका नाही नाही ते अर्थ काढू लागतात. नवर्याचे माझ्याकडे लक्ष नाही मी आता तेवढी सुंदर नाही पासून त्याचे बाहेर बहुतेक लफडे असावे इथपर्यंत.
यावर उपाय काय?
१) आपली शरीर प्रणाली मंद होत आहे आणि पाळी अनियमित होत आहे हे जाणवल्यावर स्त्रियांनी स्त्री रोग तज्ञाकडून तपासणी करणे आवश्यक आहे हे रजोनिवृत्ती मुले आहे हे नक्की झाले म्हणजे पुढच्या उपाया कडे वळता येते.
२) पहिली गोष्ट म्हणजे आपली शरीर प्रणाली मंद होत आहे तर ती परत वेगवान करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे. रोज ३५ ते ४० मिनिटे वेगाने ( गाडी पकडण्यासाठी चालतो त्या वेगाने) चालायला सुरुवात करा. रिक्षा/ दुचाकीचा वापर अत्यावश्यक असेल तरच करा. याने आपल्या स्नायुंना व्यायाम मिळून मेंदूत इंडोर्फिन नावाची संप्रेरके तयार होतात( रजोनिवृत्तीमुळे हि संप्रेरके कमी झाली असल्याने स्त्रीला उदास/ निरुत्साही वाटत असते ते नक्कीच कमी होते. शरीर थकल्यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी उठल्यावर जो निरुत्साह वाटतो तो कमी होतो.
३) आहार दहा टक्क्यांनी कमी करा यात तेलकट मसालेदार गोष्टी कमी करून फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे.(तोच वापरून दोन्ही बाजूनि गुळगुळीत झालेला सल्ला)ज्यांना वाताचा त्रास आहे अशा भगिनींनी (जवळ जवळ ६० टक्के ना हा त्रास होतो ) सकाळी उठल्यावर दात घासल्यावर अंशे पोटी एक लिटर कोमट पाणी प्यावे या पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घालावा याने आपले पोट साफ होईल रात्रभर शरीरात साठलेली दुषित द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडाला मदत होईल आणि स्वस्तात निपटेल (काहीच नाही तर अपाय नक्कीच होणार नाही)
४) एखादा छंद लावून घ्या --(परत तेच -छंद असा सहज लावून लागत नाही) म्हणून साधारण चाळीशीनंतर स्त्रियांनी आपल्याला काय आवडते आणि काय करायचे होते जे राहून गेले याची यादी करायला घ्या आणि त्यातील एक एक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यातील एखादी गोष्ट आपल्याला जमू शकेल. आता जी जमू शकली आहे ती गोष्ट रजोनिवृत्ती नंतर पूर्ण झोकून देऊन करत येईल.
५) इतर आजार -चक्कर येणे गरम वाटणे (hot flushes) यासठी तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे HRT (hormone replacement therapy) घेत येईल. हि घ्यावी किं घ्यावी याबद्दल जगभर मोठी चर्चा चालू आहे आणि मी वादात न पडता एकच सांगतो तुमच्या स्त्री रोग तज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे करा. HRT ने रजोनिवृत्तीचे बरेचसे परिणाम काही काळा पुरते दूर करता येतात. एकदा तुम्ही त्या मानसिक स्थिती शी जुळवून घेतले कि हि औषधे बंद करता येतात.
६) नैराश्य यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मनोविकार तज्ञाकडे जाऊन उपाय करता येईल. पण हा आजार आहे हे घरच्यांनी/ नवर्याने जाणून घेणे आवश्यक आहे.
बाकी अदिती ताईनी दिलेल्या दुव्यांमध्ये शारीरिक आजाराची माहिती सुरेख तर्हेने दिलेली आहेच.
घरच्यांसाठी-आपल्या बायकोला/ आईला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. कदाचित एवढ्यावरच काम भागेल. तिच्या अशा काळात तिला आपल्या मदतीची अतिशय जास्त गरज आहे. ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ? बरेच लोक हेच म्हणतील कि ऑफिसात डोके पिकवून आलो तर घरी तेच मग फरक काय?
स्त्रियांसाठी -- आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?
वाचने
53621
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
केमिकल लोच्या
दोन्ही भागा मधिल साद
हा लेख जास्त आवडला आहे.
अरे हो मला एक प्रश्न
योगा सोडुन बाकी कुठलाहि
In reply to अरे हो मला एक प्रश्न by ढालगज भवानी
धन्यवाद.
In reply to योगा सोडुन बाकी कुठलाहि by जेनी...
काही काय?
In reply to योगा सोडुन बाकी कुठलाहि by जेनी...
योगा नाहि चालत मासिक पाळी
In reply to काही काय? by मैत्र
तुम्हाला कोणी सांगितलं? जो
In reply to योगा नाहि चालत मासिक पाळी by जेनी...
आम्हाला आमच्या योगाच्या बाइनी
In reply to तुम्हाला कोणी सांगितलं? जो by शिल्पा ब
टँपॉन सङळ्यानाच सुट होत नाहि
In reply to तुम्हाला कोणी सांगितलं? जो by शिल्पा ब
थोडक्यात जे झेपेल तेच करा
In reply to तुम्हाला कोणी सांगितलं? जो by शिल्पा ब
इगो??
In reply to थोडक्यात जे झेपेल तेच करा by सुबोध खरे
आणि आधाराचं म्हणाल तं
In reply to काही काय? by मैत्र
मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम
In reply to अरे हो मला एक प्रश्न by ढालगज भवानी
जे ब्बात!
In reply to मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम by सुबोध खरे
छान लेख
एच आर टी चे साइड इफेक्ट्स खुप
हार्मोन्स प्रॉब्लेम्सवर रामबाण उपाय
नैराश्य( depression) आहे कि
बयो...
In reply to नैराश्य( depression) आहे कि by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती -
In reply to नैराश्य( depression) आहे कि by ३_१४ विक्षिप्त अदिती
लक्ष वेधून घेणे(attention
In reply to अदिती - by सुबोध खरे
hot flashes याऐवजी hot
In reply to नैराश्य( depression) आहे कि by ३_१४ विक्षिप्त अदिती
जब्री माहिती....
एकमेका साहाय्य करू....
छान प्रतिसाद..
In reply to एकमेका साहाय्य करू.... by प्रभाकर पेठकर
पेठकरांचा प्रतिसाद विषयाकडे अत्यंत समग्र आणि योग्य दिशेने पाहतो
In reply to एकमेका साहाय्य करू.... by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to पेठकरांचा प्रतिसाद विषयाकडे अत्यंत समग्र आणि योग्य दिशेने पाहतो by संजय क्षीरसागर
वाचतो आहे. समजून घेतो आहे.
खरे डॉक्टरसाहेबांना अनाहिता
In reply to वाचतो आहे. समजून घेतो आहे. by प्यारे१
खरे डॉक्टरसाहेबांना अनाहिता विभागाचे मानद सभासदत्व मिळावेआता हा कोणता नवीन विभाग..??हा भाग व प्रतिसाद वाचनिय.
छान लेख आणि चर्चा
ऋतुप्राप्ती
सुबोधजी
स्री देह पुरूष देहाला आकर्षित
In reply to सुबोधजी by संजय क्षीरसागर
तु यांचे प्रतिसाद वाचतेस
In reply to स्री देह पुरूष देहाला आकर्षित by ३_१४ विक्षिप्त अदिती
शिल्पा, मयत रि कर्न्र क?
In reply to तु यांचे प्रतिसाद वाचतेस by शिल्पा ब
हा हा
In reply to स्री देह पुरूष देहाला आकर्षित by ३_१४ विक्षिप्त अदिती
HRT HORMONE REPLACEMENT THERAPY
अकाली रजोनिवृत्ती
भाषेतली पुरुषप्रधानता
In reply to अकाली रजोनिवृत्ती by सुबोध खरे
डॉक्टरंनी उत्तर दिले आहे
In reply to भाषेतली पुरुषप्रधानता by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न
In reply to अकाली रजोनिवृत्ती by सुबोध खरे
मुलगी जन्माला येतानाच तिच्या
In reply to प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहितीपूर्ण पोस्ट.
In reply to मुलगी जन्माला येतानाच तिच्या by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to मुलगी जन्माला येतानाच तिच्या by सुबोध खरे
अदिती ताई
In reply to धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to अदिती ताई by सुबोध खरे
एक शंका
In reply to मुलगी जन्माला येतानाच तिच्या by सुबोध खरे
जुळे अवयव
In reply to एक शंका by सेरेपी
धन्यवाद
In reply to जुळे अवयव by सुबोध खरे
लेख आवडला.
अस्तित्वाची संरचना
निसर्गाचा उद्देश स्वतःची
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
निसर्गाने स्वतःच दोन पोलॅरिटिची बंधने का घालून घेतली
In reply to निसर्गाचा उद्देश स्वतःची by मराठी_माणूस
ठ्ठो ...
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
तुमच्या बुद्धीबद्दल इतका
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
दोन धृवांचे आकर्षण हा
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
कॅथलिक?
In reply to दोन धृवांचे आकर्षण हा by सुबोध खरे
कॅथलिक किंवा अन्य ख्रिश्चन पंथाचं
In reply to कॅथलिक? by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे आणखीनच मजेशीर.
In reply to कॅथलिक किंवा अन्य ख्रिश्चन पंथाचं by सुबोध खरे
अदिती -ताई
In reply to हे आणखीनच मजेशीर. by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल?
In reply to अदिती -ताई by सुबोध खरे
कांहीसा असहमत.
In reply to अदिती -ताई by सुबोध खरे
अन्य प्राणिमात्रांमध्ये एका
In reply to कांहीसा असहमत. by प्रभाकर पेठकर
नैसर्गिक प्रेरणा..
In reply to अन्य प्राणिमात्रांमध्ये एका by सुबोध खरे
माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे
In reply to नैसर्गिक प्रेरणा.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे by सुबोध खरे
याचा प्रेमाशी काय संबंध आहे
In reply to माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे by सुबोध खरे