'मटण रोगनजोश' ही एक पारंपारीक काश्मिरी पाककृती आहे.
'रोगनजोश' असल्याकारणाने 'रोगन'चा 'जोश' जास्त असणं स्वाभाविक आणि अपेक्षित आहे. काश्मिरातील थंडी पाहता शरीरात उब निर्माण होण्यासाठी अशा पाककृतींचा फायदा होतो.
आजच्या आहार आणि उष्मांक नियंत्रणाच्या निकषांवर ही पाककृती 'वजनदार व्यक्तिमत्त्वांसाठी' अयोग्य ठरू शकते परंतु चवीच्या निकषांवर ती पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटेल अशीच आहे.
साहित्यः
मटण :२५० ग्रॅम्स.
वनस्पती घी :८० ग्रॅम्स. (एक कप)
हिंग :चिमुटभर
आलं : १ इंच. (पेस्ट करून घ्या)
दही : दोन कप
काश्मिरी तिखट :१ लहान चमचा (टी स्पून)
धणे पावडर :२ लहान चमचे.
केशर : थोडंसं.
मीठ : चवीनुसार.
गरम मसाला:
काळी वेलची(मसाला वेलची) : अर्धी.
हिरवी वेलची :५ नग
लवंग :३ नग
दालचिनी : ३ इंच
काळी मिरी :३ नग
कृती:
सर्व गरम मसाल्याची पावडर करून घ्यावी.
दोन मोठे चमचे (टेबलस्पून)पाण्यात हिंग विरघळवून घ्या.
केशर चुरडून पाण्यात मिसळून ठेवावं.
एका मोठ्या बाऊलमद्ये पाणी घेऊन ठेवावे.
कढईत वनस्पती तुप तापवा. तुप तापले की त्यात पाण्यात विरघळवलेला हिंग घालून मिसळावा.
पाठोपाठ मटण घालून मिसळावं आणि थोडा वेळ झाकण ठेवून मंद आंचेवर शिजवावं.
मटणातील पाणी जरा आटलं की त्यात दही आणि आल्याची पेस्ट घालून मोठ्या आंचेवर परतत राहा. जसे दह्यातील पाणी कमी होईल तसे पाण्याच्या बाऊल मधील २-३ मोठे चमचे (टेबलस्पून) पाणी त्यात टाकावे आणि परतत राहावे. असे तीन वेळा करावे.
आता त्यात तिखट, धणे पावडर आणि मीठ घालावे. परतत राहावे. पुन्हा २-३ मोठे चमचे पाणी घालून परतावे. ही कृती २-३ वेळा करावी.
आंच मध्यम करून मटण परतत राहावे. आता, मटण पूर्ण शिजेल तेंव्हा त्यात पाणी राहणार नाही अशा बेताने पाणी घालावे. (२ ते ३ कप) आणि मटण, झाकण ठेवून, मध्यमपेक्षा थोड्या कमी आंचेवर पूर्ण शिजवून घ्यावे. मध्ये-मध्ये झाकण काढून मटण वरखाली करावं आणि पाण्याची पातळी तपासावी.
मटण पूर्ण शिजले की गरम मसाला, केशर घालावे.
शेवटी मटण मंद आंचेवर ठेवून सर्व पाणी आटवून टाकावे. उतरविताना सर्व पाणी आटून नुसते तुप राहिले पाहिजे.
वाफाळणार्या भाताबरोबर किंवा रोटी, परोठा, नान वगैरे बरोबर मस्त लागते.
टीपः कमी प्रमाणात गरम मसाल्याची वस्त्रगाळपूड करणे जमत नाही. तेंव्हा त्याच प्रमाणात जास्त मसाले घेऊन वस्त्रगाळ पूड करावी आणि हा मसाला एक 'सपाट लहान चमचा' वरील पाककृतीत वापरावा.
हीच पाककृती उकडलेले बटाटे किंवा पनीर वगैरे वापरून शाकाहारी करता येईल. फक्त बटाटे शिजलेले असल्या कारणाने रस्सा पूर्ण शिजवून घ्यावा आणि शेवटी बटाटा मिसळावा.
तसेच, उकडलेली अंडीही वापरता येतील.
शुभेच्छा....!
वाचने
90112
प्रतिक्रिया
64
मिसळपाव

प्रतिक्रिया
हाय!
+१
In reply to हाय! by नंदन
+२
In reply to +१ by सानिकास्वप्निल
आयला!!!
In reply to +२ by गणपा
दहिसर
In reply to आयला!!! by सानिकास्वप्निल
+३
In reply to +२ by गणपा
अहो काय हे !
खल्लास रंग आला आहे!
अश्शीच
मटण रोगनजोश
अनेक पाककृती...
In reply to मटण रोगनजोश by सानिकास्वप्निल
स्स्स्सप्प्प्प्प्प्प्प....
अहाहा... काय तर्री आहे. आणि
_/\_ _/\_ _/\_
In reply to अहाहा... काय तर्री आहे. आणि by गवि
शाकाहारी किंवा अंड्याच्यावेळी
पाककृतीच्या शेवटी.
In reply to शाकाहारी किंवा अंड्याच्यावेळी by ऋषिकेश
आभार! नक्की करून बघेन
In reply to पाककृतीच्या शेवटी. by प्रभाकर पेठकर
>>हीच पाककृती उकडलेले बटाटे
यकदम खंगरी डीश
सुभान अल्लाह!!!
दही.
In reply to सुभान अल्लाह!!! by दिपक.कुवेत
ओ धन्यु काका...
In reply to दही. by प्रभाकर पेठकर
मी पण
In reply to ओ धन्यु काका... by दिपक.कुवेत
अप्रतिम... ते मटण बघुनच मेले.
छान पाककृती. मास-मटन खात
'रोगन' म्हणजे 'तर्री' हे
In reply to छान पाककृती. मास-मटन खात by उदय के'सागर
कातिल फोटो.
लाहौलविलाकुवत! सुंदर दिसतंय.
सुंदर रंग आलाय पाकृचा!
कधीतरी करुन पाहीन. फोटो
काऽऽकाऽऽ वाचवाऽऽ!!
काय मस्त फोटो आहे.
स्टेप वाईज
In reply to काय मस्त फोटो आहे. by ढालगज भवानी
अप्रतिम..........
क्या बात है.
वल्ला!
हेच का ते रेस्टॉरंट?
In reply to वल्ला! by पिवळा डांबिस
असू शकेल
In reply to हेच का ते रेस्टॉरंट? by विंजिनेर
जबरदस्त!
आई ग्ग्गं!
मस्त
फोटो जीवघेना एकदम !!!!
झक्कास !!
धन्यवाद.
>>>>चला एकमेकांच्या खांद्यावर
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
आपले आशिर्वाद असू द्यात.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to आपले आशिर्वाद असू द्यात. by गणपा
काय बोलू..........?!
पेठकर सर,
प्रेरणा
ऑस्ट्रेलियन मटण.
In reply to प्रेरणा by पिवळा डांबिस
ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड
In reply to ऑस्ट्रेलियन मटण. by प्रभाकर पेठकर
केलं आणि खाल्लं!!!
In reply to प्रेरणा by पिवळा डांबिस
एकपण फोटो दिसत नै!
In reply to केलं आणि खाल्लं!!! by पिवळा डांबिस
मित्रप्रेमाचे 'टोकन'.
In reply to केलं आणि खाल्लं!!! by पिवळा डांबिस
या खुदाऽऽ......
In reply to केलं आणि खाल्लं!!! by पिवळा डांबिस
बायको माहेरी गेली आहे व आई
=))
In reply to बायको माहेरी गेली आहे व आई by दशानन
'जोश'
In reply to =)) by पैसा
दशाननरावांना काहीही फरक पडणार
In reply to 'जोश' by प्रभाकर पेठकर
झकास
फोटो पाहुन तोंडाला पाणि सुटला..
धन्यवाद.
अगगगगगग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...............