भासला माझा बाप मज वटवृक्षासमान
देई आम्हास सावली,सोसुनी तप्त ऊन
नाही आम्हास लागू दिली, दुखाची झळ
लेकरे सुखात राहावी हीच त्याची तळमळ
झिजला, कष्टला,राबला अपार
धैर्याने रोखले संकटांचे डोंगर
आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक
गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4854
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाउनी अभंग संतांचे मार्ग
अडखळलो !
बापावर कविता लिहिणारे खुप कमी
छान लिहिलंय...
छान भावना!
सर्वांचे आभार