विक्रांत वरील आयुष्य ३
विक्रांत वर असताना एक दिवस एक परमजीत सिंघ अमर नावाचा साधारण पंचे चाळीशीचा सरदारजी अधिकारी माझ्याकडे आला त्याच्या हातात एक कोणता तरी फॉर्म चा कागद होता. आणी तो मला विचारु लागला कि डॉक्टर तुम्हाला वेळ केंव्हा आहे? मी विचारले कशासाठी? त्यावर तो म्हणाला कि माझ्या मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र हवे आहे. मी परत विचारले कशासाठी? त्यावर तो म्हणाला कि वाराणसी पासून पाटण्या पर्यंत दोनशे किमी गंगा नदीत पोहण्याची स्पर्धा आहे त्यात भाग घेण्यासाठी त्याला स्वास्थ प्रमाणपत्र हवे आहे. मी परमजीत सिंघ न विचारले तो आपला स्वतःचा मुलगा आहे का? त्यावर ते होय म्हणाले. मी एकही शब्द न बोलता तो फॉर्म घेतला त्यावरचे नाव वाचले मनदीप सिंघ अमर. त्याच्यावरच्या डॉक्टर च्या रकान्यात सही केली माझा शिक्का मारला आणी तो फॉर्म त्यांच्या हातात दिला. त्यवर ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले कि डॉक्टर तुम्ही त्याला पाहिलेसुद्धा नाही. मी शांतपणे त्यांना म्हटले कि कोण बाप इतका मूर्ख असेल कि मुलगा निरोगी आणी लायक नसताना त्याला अशा स्पर्धेसाठी दोनशे किमी पोहायला पाठवेल?ज्याअर्थी तुम्ही त्याला पाठवता आहात त्या अर्थी तो १०० टक्के स्वस्थ असणारच. यावर त्यांनी मला जवळजवळ मिठीच मारली आणी म्हणाला डॉक्टर असा सकारात्मक माणूस फार कमी वेळा दिसतो.
विक्रांतवर असे अनेक तरुण आणी सकारात्मक अधिकारी माझे मित्र होते आमचा एक असा गट तयार झाला होता. आम्ही सात आठ जण लग्न न झालेले बेफिकीर असे नेहेमी एकत्र जेवत होतो पत्ते खेळायचो गप्पा मारायचो विडीयो वर सिनेमे पाहायचो उड्डाण तळावर संध्याकाळी फिरायचो. अमर सर सुद्धा त्यात सामील होते. एकदा आम्ही त्यावेळी हिट झालेला सलमान खान आणी भाग्यश्री यांचा मैने प्यार किया हा सिनेमा पाहत होतो त्यात एक दुसरा अधिकारी गुरविंदर सिंग खेरा मला म्हणाला कि सर पहा भाग्यश्री किती सुंदर दिसते. यावर अमर सर म्हणाले कि भाग्यश्री सोडा तिची आई (रीमा लागू) पहा किती सुंदर दिसते? खेरा म्हणाला काय सर तुम्ही पण त्यावर अमर सर म्हणाले कि भाग्यश्री तो मेरी बेटी जैसी है उसकी मा देखो. यावर आम्ही सगळे इतके हसलो होतो.
नौदलातील सैनिक सुद्धा असे डांबरट असतात कि त्यांच्या कारवाया पाहून थक्क व्हायला होते. विक्रांतवर प्रत्येक सैनिकाला सुट्टीच्या अर्जावर डॉक्टरची सही आवश्यक असे. कारण एखादा संसर्गजन्य आणी लैंगिक रोग घेऊन तो घरी जाऊ नये म्हणून.
त्यावेळी काही सैनिक सुट्टी मिळवण्यासाठी वेगवेगळे बहाणे करीत. असाच एका तोफखान्याच्या(GUNNARY) सैनिकाला सुट्टीवर जायचे होते तेंव्हा तो एक तार घेऊन आला होता MOTHER SERIOUS ( आई अत्यवस्थ). मी त्याच्या सुट्टीच्या अर्जावर सही केली आणी तो गेला साधारण वीस दिवसांनी तो परत रुजू झाला तेंव्हा एकदा फिरता फिरता तोदिसला तेंव्हा मी त्याला विचारले काय रे कसा आहेस? तो म्हणाला सर मी लग्न करून आलो मी विचारले आई कशी आहे? म्हणाल आई ठणठणीत आहे मी विचारले कि मग ती तर काय होती MOTHER SERIOUS. तो म्हणाला MOTHER SERIOUS ABOUT MARRIAGE. मला हसूच आले.
अभियांत्रिकी विभागातील लोक बॉयलर सूट( डांगरी) घालत असत. त्यात सैनिक खाकी किंवा गडद निळ्या रंगाची डांगरी घालत आणी अधिकारी वर्गाची डांगरी पांढर्या रंगाची असते. या डांगरी वर छातीवर उजवीकडे नाव आणी त्याच्या खाली हुद्दा लिहिलेला असतो आणी डाव्या बाजूला रक्त गट.विक्रांत मध्ये आपल्या पाहुण्याला आणायचे असेल तर तुम्हाला गणवेशात राहावे लागे. कारण पाहुणे कोणाचे आहेत हे स्पष्ट पणॅ कळले पाहिजे
एकदा एक ME I म्हणजे MECHANIC ENGINEROOM FIRST CLASS तंत्रज्ञ प्रथम वर्ग आपल्या मैत्रिणीला विक्रांत दाखवायला घेऊन आला होता.तो तिला DG डीझेल जनरेटर रूम दाखवायला घेऊन गेला तो तिने विचारल्यावर सांगत होता कि मी मेकानिकल इंजिनियर फर्स्ट क्लास आहे. तेवढ्यात तेथे त्याचा कनिष्ठ आला ME II तर हा म्हणाला हा अजून कच्चा आहे मेकानिकल इंजिनियर सेकंड क्लास. नंतर तेथे एक LME LEADING MECHANIC ENGINEROOM आला तर याने सांगितले कि हा माझा वरिष्ठ आहे. थोड्यावेळाने त्या खोलीत एक अधिकारी पांढरी डांगरी घालून आला यावर मैत्रिणीने विचारले कि हा पांढर्या कपड्यात का आहे? त्यावर हा पठ्ठ्या म्हणाला कि आज तो आजारी आहे म्हणून पांढरी डांगरी घातली आहे.
जहाजात प्रवेश करण्यासाठी जी शिडी (GANGWAY) असते तेथे ड्युटी करणार्याला क्वार्टर मास्टर म्हणतात.( हा हुद्दा नसून तेथे काम करणाऱ्या सैनिकाला म्हणण्याचे नाव आहे) एकदा एक सैनिक आपल्या मैत्रिणीला सांगत होता कि तू विक्रांतवर फोन केलास तर क्वार्टर मास्टर बी सिंघ कुठे आहे म्हणून विचार ते मला बोलावतील.आत्ता मी क्वार्टर मास्टर आहे पुढच्या वर्षी हाफ मास्टर होईन आणी त्याच्या पुढच्या वर्षी फुल मास्टर.
आश्विनी च्या मनोविकार विभागात काम करीत असताना एक सैनिक (PETTY OFFICER) नैराश्य आणी लिंग शैथिल्य साठी भरती झाला होता. हा अतिशय रुबाबदार होता आणी अस्खलित पणे इंग्रजी बोलत असे. त्याने एम ए केले होते आणी एल एल बी चे एक वर्ष पण केले होते. हा बिहार मध्ये जाऊन एका आमदाराच्या मुलीशी लग्न करून आला होता. त्यांना राष्ट्रपतींचे परिपत्रक दाखवले कि मी भारत का राष्ट्रपती आपको पेटी अफसर का पद प्रदान करता हुं I ते पर्पत्रक सत्य होते पण पेटी ऑफिसर हा सैनिकात मोडतो अधिकार्यात नाही. त्याने पहिले काही दिवस बायकोला हॉटेलात ठेवले पण नंतर खर्च परवडेना म्हणून त्याने एक घर भागीत घेतले पण बायकोच्या इतमामाला ते साजेसे नव्हते त्यामुळे त्यांच्या वैवाहिक संबंधात बेबनाव निर्माण झाला आणी त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणी या सर्व तणावातून तो आमच्या वार्डात भरती झाला होता. पेठे सरानी त्याला पंधरा वर्षे झाल्यावर नौदल सोड किंवा खात्यांतर्गत परीक्षा देऊन अधिकारी हो असा सल्ला दिला.
Book traversal links for विक्रांत वरील आयुष्य ३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा पण भाग मस्त झाला आहे.
हा हा हा !!!
कशी असते फिटनेस टेस्ट.
साहेब २०० किमी एका दिवसात
राग नसावा.
म्हणूनच मी जास्त कटकट न करता
ह्म्म,
चूकच
खुलासा
एक्स रे काढून संसर्गजन्य
होय
खाली पेठकरकाकांनी
डॉक्टरनी सांगितल आहेच तरीही,
संसर्गजन्य रोग चाचणी.
खरे काका.. सगळच काही खर लिहु नका...
बाबा पाटलांशी संपूर्ण सहमत
चर्चा चांगल्या मार्गावरच राहू द्या.
सर्वश्री सुबोध खरे आणि बाबा
व्यावहारीक जगातही 'सेकंड ओपिनियन' घेणे सर्वश्रुत आहे.
त्यांना बोलू द्या.
तुम्ही का वकीलपत्र घेताय?
कॉर्नर? ब्वॉर्र!
अनावश्यक उल्लेख.
सदस्यांनी त्यांच्या डॉक्टर असण्याचा अनावश्यक उल्लेख इथे करू नये
कृपया त्यांना बोलू द्या.
बाबा पाटलांच्या `भाषेचा' मुद्दा तुम्ही त्यांच्याशी डिल करावा
आधीच आपल्या वैद्यकीय
लेखन आवडले
सोनालीशी सहमत..
सहमत
गमतीजमती
पण हे रजेसाठी नव्हते ना
प्रतीसाद
माझे प्रत्युत्तर..
गैरसमज