णमस्कार लोक्स,
कसं चाललय? चाट हा बहुतेकांच्या आवडिचा प्रकार. ह्या प्रकारात जरा नविन काय हे बघण्यासाठि जालमोहिम हाती घेतल्यावर 'कटोरी चाट' हा जरा वेगळा प्रकार पाहिला. फोटो पाहिल्यावर करुन बघायची खुमखुमी काय स्वस्थ बसुन देत नव्हती. पण मुळ पाककॄतीमधे बटाट्याच्या कच्च्या किसाची कटोरी दिली होती आणि ती करणं जsssssरा तापदायक आहे. शिवाय त्यात चटण्या/दहि पडल्यावर खाताना कदाचीत सगळा लगदा होउ शकतो म्हणुन हि शक्कल लढवली. अशीच मैद्याची सुद्धा कटोरी करु शकतो पण मैद्या पेक्षा हेल्दि ओट्स केव्हाहि चांगले नाहि का? ह्या शिवाय नाचणी, ज्वारी-बाजरीच्या पीठाची पण कटोरी करु शकता. बघा तर मग....
तयार कटोर्या:
कटोरी चाट:
साहित्यः
अ. कटोर्यांसाठि:
१. ओट्स/ओटॅमील - १.५ कप
२. पालक प्युरी - १/२ कप
३. हिरवी मिरची/कोथिंबीर पेस्ट - २ चमचे (लहांनासाठि मिरच्यांच प्रमाण कमी ठेवा)
४. चवीनुसार मीठ
५. तळण्यासाठि तेल
६. नैवेद्याच्या छोट्या वाट्या - ३ ते ४. नसतील तर आता कसं करु? हि चींता मनातुन काढुन टाका. बिनधास्त मिसळणाच्या डब्यातील वाटया वापरा (फक्त त्या स्टीलच्या असतील हि काळजी घ्या)
ब. चटण्या:
१. आंबट/गोड चटणी साठि: चिंच, खजुर, चवीनुसार मीठ/गुळ - चींचेचा कोळ, वाफवलेले खजुर मिक्सर मधे मुलायम वाटुन घ्या. त्यात चवीप्रमणे गुळ/मीठ घालुन गोड चटणी तयार करा
२. तिखट हिरव्या चटणी साठि: मुठभर कोथिंबीर/पुदिना, २-३ हिरवी मिरची आणि पेरभर आलं घेउन मिक्सर मधे गरजेपुरतं पाणी टाकुन मुलायम वाटुन घ्या
३. तिखट लाल चटणी साठि: सुख्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजत ठेवा. थोड्या वेळाने मिक्सर मधे गरजेपुरतं पाणी टाकुन मुलायम वाटुन घ्या. मी हि चटणी केली नाहि कारण मला वरील दोन चटण्या पुरल्या.
क. सारण/स्टफिंगः
१. उकडलेले बटाटे चौकोनी चीरुन - २ मध्यम
२. बारीक चीरलेला कांदा / टोमॅटो - १ प्रत्येकि
३. मोड आलेले वाफवलेले मुग - १/२ कप
४. कच्ची कैरी - १/२ बारीक चीरलेली
ड. ईतर पण महत्वाचे:
१. फेटलेलं दहि
२. बारीक नॉयलान शेव
३. चाट मसाला
४. डाळिंबाचे दाणे - मुठभर (ऑप्शनल; नसले तरी चालतील)
कॄती:
अ. कटोर्यांसाठि:
१. ओट्स/ओटॅमील मिक्सर मधे भरडसर वाटुन घ्या.
२. पालकाची पाने स्वच्छ धुवुन एक ५ मि. पाण्यात उकळा व नंतर लगेच गार पाण्यात घाला. थोड्या वेळाने गरजेपुरतं पाणी घेउन मिक्सर मधे मुलायम प्युरी बनवुन घ्या.
३. आता एका बाउल मधे वाटलेले ओट्स, पालक प्युरे, हिरवी मिरची/कोथिंबीर पेस्ट, १ पळि तेल आणि चवीनुसार मीठ घाला. गरजेप्रमाणे पाणी घालुन गोळा मळा (जास्त घट्ट अथवा सैल नको). हे पीठ लवकर सुकतं म्हणुन प्रत्येक वेळि लाटि घेताना जरा तेलाचा हात लावुन मळुन घ्या.
४. कढईत तेल तापत ठेवा.
५. आता मळलेल्या पिठामधुन लिंबाएवढा गोळा घेउन पुरी सारखा लाटा. लाटलेल्या पुरीला फोर्कने/सुरीने हलकेसे टोचे मारा जेणेकरुन नंतर कटोर्या तळताना पुरीसारख्या फुगणार नाहित.
६. आता लाटलेल्या पुरी मधे नैवेद्याची वाटि ठेवुन बाजुच्या सर्व कडा एकत्र करा. अतिरिक्त पीठ आतल्या बाजुला जमा होईल ते हाताने किंवा सुरीने कापुन घ्या. अशा सर्व वाट्या तयार करुन घ्या.
७. तापलेल्या तेलात पीठ ज्या बाजुने लावलय त्या बाजुने सर्व वाट्या एक एक करुन तळुन घ्या. एका वेळि एकच तळा आणि आच अगदि मंद असु द्या म्हणजे कटोर्या आतपर्यत तळल्या जातील आणि कच्च्या राहणार नाहित.
८. तळताना हलक्या हाताने तेल गोलाकार फिरवा म्हणजे कटोर्या सर्व बाजुने सारख्या तळल्या जातील.
९. हलकासा गोल्डन कलर आला कि वाट्या काढुन टिश्यु पेपर वर काढा जेणेकरुन अतिरिक्त तेल शोषलं जाईल. कटोर्या काढायची घाई करु नका. वाट्या पुर्ण थंड झाल्या कि कटोर्या अलगद सुटतील.
१०. कटोर्या पुर्ण थंड झाल्या कि हवाबंद डब्यात भरुन ठेवा. ह्या नुसत्याहि चहाबरोबर छान लागतात. वरील तळण प्रकरण नको असेल तर ओव्हन मधे बेक करुन घ्या.
चाटसाठि:
११. स्टफिंगसाठिचं दिलेलं सर्व साहित्य एका बाउल मधे एकत्र करा.
१२. सर्विंग डिश/प्लेट मधे तयार कटोर्या ठेवा. त्यात एक ते दिड चमचा तयार स्टफिंग भरा.
१३. आता वरुन चिमुटभर चाट मसाला भुरभुरा.
१४. आता अनुक्रमे त्यावर गोड, दोन्हि तिखट चटण्या, फेटलेलं दहि घाला.
१५. वरुन नायलॉन शेव आणि डाळिंबाचे दाणे घालुन चाट कटोर्या सर्व करा.

वाचने
16319
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त प्रेझेन्टेशन,
हायक्लास!!!!!!!!!!!!!!
भारी!!!!!
In reply to हायक्लास!!!!!!!!!!!!!! by प्रचेतस
बोपोडीला आहे. खडकीबाजारच्या
In reply to भारी!!!!! by मोदक
मस्त
अरे.... छानच. (इनो, इनो)
जबरदस्त..... प्रचंड भारी. चाट
मी पण चाट पडले.
In reply to जबरदस्त..... प्रचंड भारी. चाट by सुहास झेले
अय्यो अम्मा....
In reply to मी पण चाट पडले. by स्पंदना
चटपटा चाट....
............!!!!!!!!!!!!!!!!!
तोंपासु
सहिच... करुन बघायला पाहिजे..
पौष्टीक आणि देखणी पाककॄती !!
कटोर्या भारीच आहेत. आयडिया
सह्ही!!
लै भारी!
भारी प्रयोग आहे.
आहाहा!!
येप्प
In reply to आहाहा!! by जुइ
कटोर्या भारी झाल्यात
मस्त
जबरा...!!
क्या बात !!
धन्यवाद लोक्स
सुपर डुपर
भन्नाट फोटो आणि रेसिपी...
फोटू क्र-१ >>> लग्नातलं
बाब्बो ! जीभ चाटवली गेली आहे
नमस्कार!