मी लहानपणी दूरदर्शनवर रंगोली नेमाने बघायचो. तेव्हा केबल TV हा प्रकार अस्तित्वात नव्हता. नंतर तो कार्यक्रम रटाळ व्हायला लागला (छायागीत आणि चित्रगीत प्रमाणेच). आणि दरम्यान केबल TV चे आगमन झाले. केबलचे आगमन झाल्यावर रविवारचे रंगोली पूर्णपणे सुटले..
(एक अरसे बाद ) ऐन (गद्धे) पंचविशीत माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. गर्लफ्रेंड का काय म्हणतात तशी. त्यांच्या घरी केबल नव्हते. ती रंगोली नेमाने बघायची आणि तिचा तो favorite कार्यक्रम होता. (तोवर गुणवत्ता परत सुधारली होती कार्यक्रमाची - चांगली गाणी, आपकी फर्माईष,वैगेरे). तिच्या नादाने मी रंगोली परत बघायला लागलो. एकदा योगायोगाने रविवारी सकाळी तिच्या घरी गेलो (तिच्या घरचे पण आमच्या चांगल्या परिचयाचे होते) तर ती एकटीच घरी, मग काय.. कार्यक्रमाची मजा द्विगुणीत झाली..
(और एक आरसे बाद).. आता ती मुलगी माझ्या आयुष्यात नाही पण रंगोली (हो हो - दूरदर्शनवरचे रंगोली ) नित्त्य नेमाने बघतो. झोपेत असलो तरी LCD समोर येउन पसरतो पण कार्यक्रम miss करत नाही. असे करून जुन्या गोड आठवणीना उजाळा देण्याचा माझ्या बापड्या मनाचा प्रयत्न असतो कि काय कुणास ठाऊक..
वाचने
2918
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान रे सचिनमामा...
हे विडंबन आहे असं का वाटतंय..
+१.
In reply to हे विडंबन आहे असं का वाटतंय.. by इनिगोय
तर ती एकटीच घरी, मग काय..
त्या रविवारी काय घडले असावे
मित्रानो
प्यारे१
खरड केली आहे.
In reply to प्यारे१ by सचिन कुलकर्णी
वोक्के..
In reply to खरड केली आहे. by प्यारे१
असो.
In reply to वोक्के.. by सचिन कुलकर्णी
धन्यवाद साहेब.
In reply to असो. by प्यारे१
>>>पण आपण सुज्ञ आहात
In reply to धन्यवाद साहेब. by सचिन कुलकर्णी