Skip to main content

केकचे फोटो

लेखक चेरी यांनी शनिवार, 11/05/2013 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे. चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो. प्रत्येक पायरीचे नाही आहेत, पुढील वेळेस आठवणीने काढेन. आशा करते की आपणास आवडतील. . . . . .
लेखनविषय:

वाचने 43547
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

आहा!

In reply to by आदूबाळ

+१ थोडं करेक्शन, टॉपिंग मध्ये स्ट्रॉबेरी पानांसकट ठेवल्या आहेत. पाने काढून ठेवायला हवी. बाकी केक तोंपासु.

मस्त आहेत फोटो! हे सगळे कसे केले त्याबद्दल काही माहिती द्याल का?

In reply to by पैसा

पैसा ताईंशी सहमत

सुपर्ब! शेवटचा केक कसला मस्त आहे! तू कोर्स केला आहेस?

सुंदर छायाचित्रं. वरून तिसर्‍या केकला अर्थात सर्वाधिक पसंती. एखादी केक पाककृती मिसळपाववर टाकून आम्हांस उपकृत करावे, ही विनंती.

नं४ ला थोड झुकत माप देऊन सगळेच फोटो आवडले असे जाहीर कारतो.

सगळे फोटोज खूपचं सुरेख आहेत...लवकरच एखाद्या केकची पाकृ पण येऊद्या :)

देवा! हे असल फक्त दुकानात असत की हो! तुमी दुकानवाल्या/वाले आहात का? मग ठिक आहे. मला तो पांढरा शुभ्र अन किवी स्ट्रॉबेरी लावलेला केक आत्ता हवाय!

सगळेच केक छान दिसत आहेत. शेवटचे दोन केक विशेष आवडले. शेवटच्या केकवरील दोन पक्षी कसे बनवले?

़केकचे फोटो आवडल्याबद्द्ल धन्यवाद! लेकीसाठी केक बनवायला सुरूवात केली आणि माझ्या अहोना खूप आवडतात, त्याचेच प्रोस्ताहन आहे. मी बेसिक कोर्स केला आहे बाकी कल्पनाशक्ती..... स्ट्रॉबेरीची पाने खूप मस्त कलर कॉनट्रास्ट देत होते. शेवटचे २ केक फॉनड्ण्ट केक आहेत. पक्षी हाताने ड्रॉ करून मग कट केला. लवकरच केकॄ टाकेन.

मस्त आहेत सगळेच केक आवडले.!!

केक आवडले. केक म्हणजे जीव की प्राण. आयता विकत आणावा लागेलसे दिसतेय. तुम्ही फक्त तिसर्‍या फोटोतच दिसत आहात.;)

मस्त

केकचे फोटो कसे बनवले. कृपया फोटोची रेसिपी द्यावी (एक्सिफ डेटा, किती वेळ एक्सपोज केले वगैरे)

केकपेक्षा आईसिंग भारी..;-) जबराट आहेत केक्स, ताई.. सगळेच सुंदर आहेत, तरी चौथा सगळ्यात जास्त आवडला..