डॉ.कुमार विश्वास.
गेल्या वर्षी लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं दिल्लीत मोठं आंदोलन सुरु होतं. श्री अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल,किरण बेदी आणि अन्य मंडळींच्या आंदोलनाला लोकांनी प्रचंड अशा संखेनं पाठींबा दिला. एक प्रचंड उत्साह त्यावेळेस दिसला होता. अगदी स्वांतंत्र्याचा लढा आम्हाला प्रत्यक्ष पाहता आला नाही, पण तसंच वाटावं असं भारावून गेलेलं वातावरण होतं, असं अनेक लोक बोलत होते. माध्यमांची दिवसभर क्षणाक्षणाची रिपोर्टींग सुरु असायची. नेत्यांच्या भेटीगाठी स्टेटमेंट्स यांची ब्रेकींग न्युज चाललेली असायची. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं एक चेहरा विविध वाहिन्यांवर झळकत असायचा. दुपारच्या वेळी मुख्य आंदोलनकर्ते जेव्हा आराम करत असायचे तेव्हा एक तरुण त्या माईकचा ताबा घ्यायचा आणि त्या गर्दीला सांभाळायचा ते मला आवडायचे ते नाव म्हणजे डॉ.कुमार विश्वास.
कुमार विश्वास या माणसाला मी कधी भेटलो नाही पण भेटण्याची संधी मिळाली तर नक्कीच भेटेन. काही माणसं आपल्याला उगाच आवडत असतात. आपल्याला त्यांच बोलणं आवडतं, त्यांचं नुसतं दिसणं आवडतं आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. प्रेम कोणतंही असो, ते आंधळं असतं आपली फसगत होते तरीही आपल्याला अक्कल येत नाही. आपण पुन्हा तिच्या/त्याच्या आठवणीत गुंतून जातो. लोक काय म्हणतात त्याचा विचार करत नाही. कुमार विश्वास यांचे मी अनेक व्हिडियो आज दिवसभर पाहिले प्रत्येक कार्यक्रमात तो आपली आवडती कविता म्हणतो आणि रसिकांच्या काळजांचा ठाव घेतो. अतिशय गोड वाटतं त्याची कविता ऐकतांना. आपण कधी प्रेम केलं असेल, आपण प्रेमात पडला असाल, रडला असाल तर तुम्हाला कुमार विश्वास यांच्या आवाजातील ही गोड कविता नक्कीच आवडेल. असं वाटतं ( इथे ऐका )
कोयी दिवाना कहता है, कोयी पागल समजता है,
मगर धरती की बेचैनी को, पागल समजता है
मै तुझसे दूर कैसा हू, तू मूझसे दूर कैसी है
ये तेरा दिल समजता है, या मेरा दिल समजता है
के मोहबत एक एहसान की पावनसी कहानी है,
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है
यहा सब लोक कहते है, मेरी आखो मे आसू है
जो तु समजे तो मोती है, जो ना समझे तो पानी है
समंदर पीर का अन्दर है लेकीन रो नही सकता
ये आसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता.
मेरी चाहत को अपणा तु बना लेना मगर सून ले
जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता
भवर कोयी कुमदनी पर मचल बैठा तो हंगामा
हमारे दिल मे कोयी ख्वाब पल बैठा तो हंगामा
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का
मै किस्से को हकिकत मे बदल बैठा तो हंगामा.
कुमार विश्वास यांच्या बद्दल मला फारशी माहिती नाही. तुनळीवर (कोणी लावला राव या शब्दाचा शोध) काही व्हिडियोंमधे हास्य कवी संमेलनात ते कविता म्हणतांना दिसतात. अभियंता आणि विद्यापीठात शिक्षक असल्याचे वाटते. विविध ठिकाणी त्यांचे स्टेज शो झालेले दिसतात. दिल्लीतल्या आंदोलनापूर्वीही त्यांचे आपले काही चाहते आहेत असेही दिसते. आपल्याकडून त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर वाचायला आवडेलच. एका व्हिडियोवरच्या दुव्यात ते असं म्हणतात की मला लोक विचारतात की तुम्ही आंदोलनात का सहभागी झालात तर ते म्हणतात जेव्हा माझी येणारी पिढी आणखी काही वर्षांनी विचारेल की माणसांना सामाजिक विषयावर जोडणारं एक आंदोलन झालं होतं, त्यात तुम्ही सहभागी होता का तर मी ताठ मानेनं म्हणेन की माझा सहभाग त्यात होता. अशा आशयाचं ते बोलतात. मला त्याची कविता आवडते, त्यांचं बोलणं आवडतं, एक भूमिका आवडते. हं आता काही कार्यक्रमात ते थोडा पांचटपणाही करतांना दिसतात. पण, एवढं तेवढं चालायचंच. आपल्याला त्याच्या आवाजातील कविता आवडेल असं वाटलं म्हणून हा नसता प्रपंच. :)
वाचने
12769
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
के मोहबत एक एहसान की पावनसी
धन्यवाद
In reply to के मोहबत एक एहसान की पावनसी by यशोधरा
सहमत
सहमत.
In reply to सहमत by चाणक्य
पीठावरुन काहीही बोलल्या जातं.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारि आहे हा माणुस आणि त्याचं
छान.
असेच म्हणते.
In reply to छान. by कवितानागेश
वा! वा!! सर तुम्हीपण लिहीते
+१
In reply to वा! वा!! सर तुम्हीपण लिहीते by स्पंदना
वा!
छान ओळ्ख.....!
मिपावर येत चला. लिहित चला.
In reply to छान ओळ्ख.....! by रुमानी
बरोबर..
In reply to मिपावर येत चला. लिहित चला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, छान लिहिलंय...
कुमार विश्वासबद्दल ऐकून होतो
कॉमेडी + कविता
In reply to कुमार विश्वासबद्दल ऐकून होतो by बॅटमॅन
+११११
In reply to कॉमेडी + कविता by सहज
इंट्रेष्टिंग! इकडे लक्ष दिले
In reply to कॉमेडी + कविता by सहज
छान ओळख करून दिलीत..
चांगला लेख आहे. सदर
आवडली
त्यांचे रनटाईम जोक जाम मस्त
वाह
आभार दोस्त हो....
अतिशय छान...
In reply to आभार दोस्त हो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख बिरुटे साहेब
कुमार विश्वास
डॉ. कुमार विश्वासची काय पोझीशन आहे.
तुमच्या कवीमित्राच्या कवितेचा
In reply to डॉ. कुमार विश्वासची काय पोझीशन आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी जमलंय..
In reply to तुमच्या कवीमित्राच्या कवितेचा by धन्या
वाहवत जात असेलही, पण कुमार
काही दिवसांपुर्वी ऐकलेली त्यांचिच कविता
मस्त !
In reply to काही दिवसांपुर्वी ऐकलेली त्यांचिच कविता by अनिरुद्ध प्रभू
.
In reply to काही दिवसांपुर्वी ऐकलेली त्यांचिच कविता by अनिरुद्ध प्रभू
कवि प्रदीप ना?
In reply to काही दिवसांपुर्वी ऐकलेली त्यांचिच कविता by अनिरुद्ध प्रभू
माफ करा चुकुन चुक झाली....
In reply to कवि प्रदीप ना? by रघुनाथ.केरकर
आपण तर बुव पंखे आहोत