नमस्कार मंडळी,
शाळेत (काही अपवादात्मक कॉलेजातसुद्धा) जाणार्या विद्यार्थ्यांना गणवेष असावा का? असा माझा प्रश्न आहे.
गणवेषाची गरज नक्की काय असते? समुहभावना ही गणवेषामुळे तयार होते असे काही जण म्हणतात तर ते आपल्याला कितपत योग्य वाटते? मुले घरात असताना, इतर वेळी मित्रांसोबत खेळताना वेगवेगळ्या कपड्यात असूनही समुहभावात असतात. तसेच कुठे सहलीला गेली (शाळेबाहेरील मित्रांसोबत तर तेव्हा सुद्धा समुहभावानेच असतात. मग शालेय जीवनात गणवेषाला महत्व द्यावे का? समुहभाव हा मुद्दा असेल तर तो कसा तयार होतो हा सुद्धा उहापोहाचा चांगला आयाम ठरेल.
(खेळाडु, कंपनीतले कामगार, सैनिक यांचे सुद्धा गणवेष असतात. पण मला प्रामुख्याने लहान मुले आणि त्यांची मानसिकता याबद्दल बोलायचे आहे.)
गणवेषामुळे एक तर्हेची बांधिलकी मुलावर येते असे मला वाटते. लहानवयापासून एका चाकोरित राहण्याची, चौकटीमध्येच वावरण्याची वृत्ती तयार करायला गणवेष हातभार लावतो असे मला वाटते. महाविद्यालयात गेल्यावर गणवेष नसतो (अपवाद वगळुन) तर तेव्हा आपण स्वतंत्र आहोत अशी भावना माझ्या तरी मनात येत असे. शाळेत त्या एकसारख्या कपड्यात सर्वांना रोज पाहून मला तरी आपण कोंडवाड्यात सक्तीने आहोत असेच वाटत असे. कपड्यांचा आणि अश्या स्वतंत्र-परतंत्र वाटण्याचा संबंध आहे असे तुम्हास वाटते का?
गणवेष संबंधी आपले मत काय? का? ते जरूर लिहा.
शाळेच्या सहलीत हरवलेले मुल शोधणे आणि दहावीतली शाळेतून पळून जाणारी मुले टिपणे या व्यतिरिक्त गणवेषाचा उपयोग काय ! :)
--लिखाळ.
या आधी वरील प्रस्तावात गणवेष शेंडीफोड्या श वापरुन लिहिले होते. ते चूक आहे हे काहिंनी लक्षात आणुन दिले त्यानुसार संपादन केले आहे. आभार -लिखाळ.
वाचने
14362
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
असावा
मला वाटतं
अनामिक
डिपेंड्स
टोप्या
In reply to डिपेंड्स by प्रियाली
कपडे.
माझ्या मते
लक्ष भरकटू नये व समानता
गणवेश
गणवेष असावा..
असावा
उदाहरण
In reply to असावा by वैशाली हसमनीस
असावाच
हो..
शाळेत
गणवेश
काही मुद्दे
असावा
ह्म्म
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार
आपण सारे एका गणाचे (संचाचे/ग्रुपचे) आहोत ही जाणीव देणारा वेष
विडंबनकाराला
In reply to आपण सारे एका गणाचे (संचाचे/ग्रुपचे) आहोत ही जाणीव देणारा वेष by चतुरंग
प्राडॉ
In reply to विडंबनकाराला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा वा
In reply to आपण सारे एका गणाचे (संचाचे/ग्रुपचे) आहोत ही जाणीव देणारा वेष by चतुरंग
शाळेतच काय
हम्म