तारेक फ़तह फाळणीच्या वेळी भारतातून यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर पत्रकार म्हणून काम करण्यास सुरवात केली परंतु त्यांच्या सेक्युलर दृष्टीकोना मुळे आणि धर्मांध प्रवृत्तींना विरोध केल्यामुळे त्यांना आधी सौदी अरेबिया आणि नंतर कॅनडा मध्ये स्थलांतरित होणे भाग पडले
त्यांची Chasing a Mirage: The Tragic Illusion of an Islamic State आणि
The Jew Is Not My Enemy: Unveiling the Myths that Fuel Muslim Anti-Semitism
हि पुस्तके प्रसिद्ध आहेत.या पुस्तकांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
याच कारणांमुळे पाकिस्तान मधून कॅनडा मध्ये स्थलांतरित झालेले जे अनेक विचारवंत जसे डॉ बलंद इक़्बाल ,ताहीर गोरा आदि.कॅनडामधून पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील घडामोडींवर भाष्य ,चर्चा करणारी Rawal TV नावाची वृत्तवाहिनी आहे.त्या वाहिनीवरील bilatakalluf(ताहीर गोरा )आणि password(डॉ बलंद इक़्बाल)या कार्यक्रमामध्ये will pakistan survive विषयावर तारेक फतह यांनी जे विचार मांडले आहेत त्यांची काही झलक
>>>पाकिस्तानचा जन्म ज्या द्विराष्ट्र सिद्धांत (two nation theory) मुळे झाली तो सिद्धांतच कमकुवत आणि खोट्या पायावर उभा आहे ,हिंदुस्ताना शिवाय जगात मुसलमानांसाठी जगात चांगली भूमी नाही(फाळणीपूर्व अखंड भारत),इराण ,तुर्कीस्थान आणि अरब देश पाकिस्तान आणि तेथील मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे लेखतात.
>>>G.M Sayyad आणि इतर अनेक नेते ज्यांच्या मुळे पाकिस्तान बनला त्यांनीच कबुल केले कि हि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती .
>>>पाकिस्तानामुळेच अल कायदा आणि तालिबान चा जन्म झाला ,9-11 चे हल्ले झाले ,भारतात 26-11 झाले. 1971 च्या लढाईमध्ये पाकिस्तान नावाचा देश समाप्त झाला,हा आत्ता कोणतातरी दुसरा प्रदेश आहे ज्याला पाकिस्तान हे नाव दिले गेले .
>>>इम्रान खान facist प्रकारच्या मनोवृत्तीचा आहे त्याला तेथील मूलतत्ववाद्याचा पाठींबा आहे
cult worship प्रकारची प्रवृत्ती भयानक आहे तो त्याचा पद्धतीने वागत आहे ज्या प्रमाणे हिटलर,मुसोलिनी वागले.खोटारडेपणा यांच्या रक्तातच आहे त्यांना आपण खोटे कधी बोलतोय हे पण कळत नाही.
>>>मुशर्रफ हा तर comedian आहे
>>>पाकिस्तानात कोणतीही विधायक संस्था नाही ज्या आहेत त्यांचा उद्देश एकच,कमी वेळात जास्तीत जास्त पैसा मिळवायचा आणि कॅनडा मध्ये पासपोर्ट(विकत घेऊन)स्थायिक व्हायचे,१ कोटी रुपयामध्ये पाकिस्तानात तुम्ही कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकता अगदी अणुबॉम्ब सुद्धा.
>>> हुसेन शहीद सुऱ्हावर्दी (त्या वेळचे बंगाल चे मुख्यमंत्री)जे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यास योग्य होते (कारण पाकिस्तानमध्ये बंगाल सर्वात मोठा प्रांत होता )त्यांना पाकिस्तानात येण्यास बंदी घातली. मोहम्मद अली जीनांना या फुटीरतावादा साठी हैद्राबाद संस्थांन च्या माध्यमातून इंग्रज सुमारे सहा लाख रुपये महिना देत होते,नंतर या लोकांनी मोहम्मद अली जीनांना आजारपणात अशा ठिकाणी पाठवले जिथे डॉक्टर उपलब्ध नाही,अर्थातच मरण्यासाठी.
>>>डरपोक पाकिस्तान आर्मी जनरल फक्त आपल्या बायकांना आणि सैन्याला,निष्पाप बलोच,बंगाली मारू शकतात भारतीय सैन्यापुढे नेभळटपणे शरण येतात.जो पाकिस्तानात ठीकठाक उर्दू,इंग्लिश बोलू शकतो लोक त्याला सुशिक्षित समजतात.
>>>मी एक भारतीय आहे ज्याचा जन्म पाकिस्तानात झाला माझे सर्व पूर्वज भारतीय आहेत.
तुम्ही जरी आत्ता पाकिस्तानी,बांगलादेशी,श्रीलंकन किवा नेपाली असा परतू आपण सगळे अशोका च्याच भूमी चे पुत्र आहोत,आम्ही दारा-शुकोह चे वंशज आहोत.आपली मुळे अशा पंजाब मध्ये आहेत जिथल्या सर्वात मोठ्या नेत्याला (रणजितसिंह) ला एका पाताळयंत्री माणसाने औरंजेबाने मारले.भारतातील मुसलमानांना हे सांगण्याचा पर्याय आहे कि आपण दारा-शुकोह चे नाही तर औरंगजेबाचे वंशज आहोत.ज़े औरंगजेबाला मानतात ते पाकिस्तान या कल्पनेवर विश्वास ठेवतात.आम्ही दारा-शुकोह चे वंशज मानतात आहोत जे माणुसकी,इस्लामी विचारधारा,बुले शाह,अमीर खुस्रो यांना मानतात.
>>>मी स्वतः कसूर (पाकिस्तानातील एक शहर ) मधील एक जमीनदार आहे पण असे मानतो कि लाहोर आणि कसूर हि रामाच्या लव आणि कुश मुलांची शहरे आहेत,ज्यातून पाकिस्तान्यांनी हिंदूंना हुसकावून लावले.
>>>ब्रिटन आणि अमेरिका यांच्या सोव्हिएत रश्या आणि कम्युनिस्टांना ला रोखण्याच्या (भीतीच्या) धोरणातून पाकिस्तानचा जन्म झाला आहे.इस्लाम च्या हक्काची भूमी म्हणून नाही.
>>>पाकिस्तानला शिव्या देणारे त्यांच्याच लष्कराच्या अधिकाऱ्यांची मुले आहेत जे कॅनडा आणि अमेरिका च्या विसा साठी प्रयत्न करतात.
>>>( अशा विचारसरणीचे) भारत आणि पाकिस्तानमधील मुसलमान अशा अरबस्तानाच्या शोधात आहेत जिथला अरब म्हणतो आमच्याकडे येऊ नको.जो त्यांच्यावर (थुंकतो)हाकलतो ते त्याच्या मागे जातात आणि जे त्यांच्याकडे प्रेमाचा हात देतात त्यांना ते शत्रू म्हणतात.
>>>ज्या प्रांतात मुसलमानांना स्वातंत्र्य (भारत)आहे ते यांचे दुश्मन आहेत आणि जिथे त्यांना स्वातंत्र्य नाही(चीन आणि अमेरिका) हे यांचे दोस्त आहे.
>>>पाकिस्तानला वाचवण्याचा एकच मार्ग आहे लष्कराला पूर्णतः कमी करणे कॅनडा सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या कितीतरी पट आहे तरीही या देशांकडे लष्कर नाही,भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करणार नाही,त्यांना असे काही करायचे असते तर त्यांनी १९७१ च्या युद्धातच तसे केले असते.
पूर्ण मुलाखतीची लिंक
आणि password या डॉ बलंद इक़्बाल host असणाऱ्या कार्यक्रमाची लिंक
आणि Ex-Pakistan Air Force Air Vice Marshal अबिद राव यांच्या मते पाकिस्तानने विनंती जरी केली भारताला कि आमच्या वर ताबा मिळवा तरी भारत त्याला नकार देणार.
पाकिस्तानमधील सामान्य जनता भारता बद्द्ल काय विचार आणि का करते ते या मुलीच्या बोलण्यातून समजेल. विषेतः शेवटपर्यंत पाहिल्यावर.
पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि सामान्य जनता कशी भारताच्या विचाराने पछाडलेली आहे ते या दुव्यावरून कळेल कार्यक्रमात नेहमी भारताच्या बद्दल चर्चा असते
अवांतर:जर व्हिडीओ उतरवून घ्यायचे असतील तर हे त्यासाठी उत्तम आहे
वाचने
4038
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
विदारक सत्य....
हम्म! विचारवंत दिसतोय.
लेख आवडला
१ कोटी रुपयामध्ये पाकिस्तानात
सद्य स्थिति विदारक
जरा अतिशयोक्त
दोन्ही देश एकच माळेचे मनी म्हणणे जरा अतिशयोक्त वाटत नाही का ?
In reply to जरा अतिशयोक्त by lakhu risbud
भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला
इतिहास हेच सांगतो
In reply to भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला by ऋषिकेश
अहो मग वाक्य आतापर्यंत केला
In reply to इतिहास हेच सांगतो by lakhu risbud
+११११११११ आपल्याला ऐकायला
हा लेख कोणी संघीय/सेना
In reply to +११११११११ आपल्याला ऐकायला by पिंपातला उंदीर
.
In reply to हा लेख कोणी संघीय/सेना by lakhu risbud
लेख कोणी संघीय/सेना कार्यकर्त्याने लिहिलेला नाहीयेउगाच सेना कार्यकर्त्याला संघाच्या बरोबर बसवू नका... सेना हा राजकीय पक्ष आहे. म्हणूनच त्यात अनेक दुर्गुण आहेत. ती चर्चा आत्ता नाही करत.सारख्याच तीव्रतेचा मुद्दा
.
अभूतपूर्व असे मतदान