गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग... हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो पण ते सावरतात.
समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऒर्कुट फ़ेस्बुक समाजसेवा करायची सवय अस्ते. मुलाचं नाव श्याम.श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉअ पील सोस्टे नोनॉ अस्तातच.
मुलगा यांच्या जातीचा फ़ेस्बुक ग्रुप चालवत असतो.हे तो आईला सांगतानाएक फोनवरचा संवाद...
“ जात म्हणू नये. जात शब्द फ़ार जातीय वाटतो श्याम.. समाज म्हणावं.” श्यामची आई.
“पण जातीय म्हणजे काय?”
“ जातीय म्हणजे अश्लील”
“ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन ”
असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो.“आपण्न्क्कीकुठूनआलो?” या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉअ पील सोस्टे नोनॉ) मुलीच्या प्रेमात पडतो. “आपणएव्ढेहुशार्कसे?” या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर माय्देशी परततो.
दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात.तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात .. या खुनांचं खापर की काय ते श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. गोखले विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळींकडे संसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात... अर्ज विनन्त्या करतात पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीसस्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत...
मध्यंतर
त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे... त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते... काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं...
मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडतं, त्यात त्यांचे बाबा आठवतात...शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. “ताठ कणा हाच बाणा “ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना आठवतं...
मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत "माज आहे मला माज आहे मला" असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात . डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तरी गोखले मात्र “ मेलो तरी बेहत्तर पण लढाई माझी आहे” असं सांगतात. मग मागे झान्जा वाजायला लागतात."कोकणस्थ " अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते.. हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता "एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते.
मग वाटेत येणारे सारे "अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स" गुंड दंडाचा प्रसाद खातात , ताठ कण्याच्या लाथा खातात , , गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात “ आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत”... आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्यात साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो . मग डी एस पी आणि जज साहेब “हाच खरा शूर “ असं म्हणत गोखल्यांचं अभिनन्दन करतात.. मग परत भाषण, “ मी कोकणस्थ आहे पण मी जातीय नाही, मी संघात जायचो पण मी पोलिटिकल नाही, मी रस्त्यात मारामारी करतो पण मी गुंड नाही... “ वगैरे वगैरे ... असे हा आहे पण तो नाही असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर “कोकणस्थ” असा जोरात आवाज काढून आरती संपते. सिनेमाही संपतो.
मग नावं येताना ----
श्याम घरी येतो आणि त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ... त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो...पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्या शर्टात जातात.
वाचने
64915
प्रतिक्रिया
154
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा खरय खरय शीकेपी मुली
In reply to सीकेपी मुली दिसायला सॉलिड by विश्वनाथ मेहेंदळे
हाहाहा खरय खरय शीकेपी मुली
In reply to हाहाहा खरय खरय शीकेपी मुली by ढालगज भवानी
आणि ते मंडळाचे सांगा की.
In reply to हाहाहा खरय खरय शीकेपी मुली by ढालगज भवानी
बगल नका देऊ, काख द्या
In reply to आणि ते मंडळाचे सांगा की. by विश्वनाथ मेहेंदळे
सहमत !!
In reply to बगल नका देऊ, काख द्या by ढालगज भवानी
(No subject)
In reply to सहमत !! by सूड
जोशींनी जितके विचारले तितके
In reply to सहमत !! by सूड
आहेत ना!! सूड, माझी सासू
In reply to सहमत !! by सूड
सोनार हा व्यवसाय झाला मला
In reply to आहेत ना!! सूड, माझी सासू by ढालगज भवानी
ओक्के
In reply to आहेत ना!! सूड, माझी सासू by ढालगज भवानी
अरे जरूर. मी आईंना विचारून
In reply to ओक्के by सूड
देशस्थ व सी के पी मुलींचे
In reply to सीकेपी मुली दिसायला सॉलिड by विश्वनाथ मेहेंदळे
च्यायला, कॉपीराईट घेऊन
In reply to हम्म by बॅटमॅन
ओ सारस्वत गपा
In reply to च्यायला, कॉपीराईट घेऊन by विश्वनाथ मेहेंदळे
ते हेच ना
In reply to ओ सारस्वत गपा by ढालगज भवानी
आयला विमेंनी कॉपी राईटचा
In reply to ते हेच ना by अभ्या..
हीहीही
In reply to आयला विमेंनी कॉपी राईटचा by ढालगज भवानी
अब्याडब्या, आमचा मास्क असतो
In reply to हीहीही by अभ्या..
सानुनासिक
In reply to ओह ओक्के. पण जुनी मराठी, by बॅटमॅन
महेश चा विरुद्ध सिनेमाचा
In reply to ओढून ताणून कोकणस्थ by तिमा
सिनेमाची गोष्ट खरी नाही.. मी
शांत व्हा तै. कुठे त्या
In reply to सिनेमाची गोष्ट खरी नाही.. मी by शरदिनी
आत्मक्लेष??
In reply to शांत व्हा तै. कुठे त्या by प्यारे१
नाही शरदिनीताई तुम्ही शांत
In reply to सिनेमाची गोष्ट खरी नाही.. मी by शरदिनी
अरेरे !!!! कस्ल्या कस्ल्या
In reply to नाही शरदिनीताई तुम्ही शांत by स्पंदना
बाप रे.........!!! इतका भयावह
हैला! असा सिनेमा खरच आहे हे
झी टिव्हीचे सगळे पुरस्कार
व्वा मास्तर..वा.
आय्ला
आमचे २ कोंकणीं
कोण रे?
In reply to आमचे २ कोंकणीं by कुंदन
सी . के . पी . भोजन !
माणूसपणाच्या जातीचं आहे का हो
माणूसपणाची जात - ज्या जातीचे
In reply to माणूसपणाच्या जातीचं आहे का हो by यशोधरा
माणूसपणाची जात - ज्या जातीचे
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by गवि
आयला पेटलाय पेटलाय धागा
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by बॅटमॅन
सहमत आहे भवानीतै
In reply to आयला पेटलाय पेटलाय धागा by ढालगज भवानी
च्यायला, बॅट्या "मी सुंदर
In reply to सहमत आहे भवानीतै by बॅटमॅन
हाहाहा
In reply to च्यायला, बॅट्या "मी सुंदर by ढालगज भवानी
जिथेतिथे शब्दांच्या नुस्त्या
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by बॅटमॅन
फुकाचा उपदेश करण्यापेक्षा
In reply to जिथेतिथे शब्दांच्या नुस्त्या by यशोधरा
प्रतिसादाला उद्देशून लिहिले
In reply to फुकाचा उपदेश करण्यापेक्षा by बॅटमॅन
की फक्त जिथे तिथे बोलायचा
In reply to प्रतिसादाला उद्देशून लिहिले by यशोधरा
यशोधरा अगं नावं नाही ठेवली.
In reply to जिथेतिथे शब्दांच्या नुस्त्या by यशोधरा
शुचि, मी तुला तर काहीच नाही
In reply to यशोधरा अगं नावं नाही ठेवली. by ढालगज भवानी
वा.... गवि !!
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by गवि
माणूसपणाची जात - ज्या जातीचे
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by गवि
काहीतरी मिसइण्टरप्रिटेशन झालं
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by यशोधरा
हे खूप सरसकटीकरण झालं गवि,
In reply to काहीतरी मिसइण्टरप्रिटेशन झालं by गवि
सावकाश मांडा तुमचं म्हणणं,
In reply to हे खूप सरसकटीकरण झालं गवि, by यशोधरा
चिरडीला जाऊन वाद घालायचा
In reply to सावकाश मांडा तुमचं म्हणणं, by गवि
गविंच्या डोळ्यापुढे बहुदा
In reply to चिरडीला जाऊन वाद घालायचा by यशोधरा
त्य मघासनच सुटलं हो दादा, पण
In reply to गविंच्या डोळ्यापुढे बहुदा by प्यारे१
चिरडीला जाऊन वाद घालण्याचा
In reply to चिरडीला जाऊन वाद घालायचा by यशोधरा
बाकी ते चांगदेवी अहंकारीवगैरे
In reply to चिरडीला जाऊन वाद घालण्याचा by गवि
जात रद्द व्हायला नकोय.. तिची
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by गवि
व्हायला हवं वगैरे ठीकच पण
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by गवि
खरं आहे. एकदा का लेबलं लावली
In reply to व्हायला हवं वगैरे ठीकच पण by प्यारे१
आयला,
हाहाहा मस्त रे प्यारे.
In reply to आयला, by प्यारे१
सिद्धार्थ जाधव आहे क हो य
कोंकणस्थ =
जातीच्या नावाने उलट्या
..
माणूसपणाची जात - ज्या जातीचे
In reply to .. by चंपाबाई
...
In reply to माणूसपणाची जात - ज्या जातीचे by सुबोध खरे
आम्ही "पण" तो ल्हानपणापासून
In reply to ... by चंपाबाई
झक्कास....
+10000
In reply to झक्कास.... by मन१