Skip to main content

नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 07/05/2013 10:26 या दिवशी प्रकाशित केले.

नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत
नाच रे सुब्रा नाच !

सेबीशि वेडा झुंजला रे
काळा काळा पैसा भिजला रे
आता तुझी पाळी, वीज पडे भाळी
वाचव सहारा नाच !

भरभर धाड पडली रे
रायांचि भरली शंभरी रे
पेपरात लिहू, जहिराती देऊ
करुन ठणाणा नाच !

नवनव्या योजना(स्कीम) काढूया रे
गुंतवणूकदारांस नाडूया रे
करोडोंच्या नोटांत, केस लढु कोर्टात
नवाबी लखनव्या नाच !

मिडीयाची गडबड थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
जनपथी छान छान, श्वेत रंगी (हाय)कमांड
कमांडीखाली त्या नाच !

चु भू द्या घ्या

____________________

मूळ अजरामर गाणे:

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - देवबाप्पा

लेखनविषय:

वाचने 2872
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

झकास
. मूळ गीत दिलेत हे फारच योग्य . छोटेसे इडंबन गाणे पाच पानी खरडीपेक्षा
भारी हाय .आपलं एरंडाचं गुऱ्हाळ असंच चालू ठिवा खुळुम खुळुम . रायांनी
क्रिकेटवीरांना दोन कोटिँचे बंगले अॅंबिवहैलीत दहा वर्षांपूर्वी फुकट दिले
होते (असेपण ते विकत घेऊ शकत होते) .सुयेशदादा ,भाई ठाकूर ,कलमाडी यांनी
वरपर्यंत प्रामाणिकपणे माल पोहोचवला पण हेचि फळ काय मम तपाला होऊन रडत बसले
.काळे मेघ पांगले नि भर उन्हात नाचायची पाळी आली .


मस्त विडंबन. आर्थिक गैरव्यवहार करणारी सुब्रतो रॉय, किंगफिशर, चिट फंड चालवणाऱ्या वगैरे धेंडांना सामाजिक प्रतिष्ठा मिळू नये असे मनापासून वाटते. दुर्दैवाने तसे होत नाही.