नमस्कार मंडळी,
आज आवताण घेऊन आलोय. गावच्या जत्रेचं. सालाबादप्रमाणे याहि वर्षी वज्रेश्वरी (मौजे वडवली) यात्रा सुरु होतेय. यात्रा दोन दिवसांचि आहे. ९ मे ते १० मे. शनिवारी (११ मे) सकाळि बाजार ऊठायला लागतो. आम्हि त्याला फुटकी जत्रा म्हणतो. या फुटक्या जत्रेची एक न्यारीच बात आहे. कमी पैशात फिट्ट मजा म्हणजे फुटकी जत्रा. आदल्या दिवशी १०० रुपड्यांत मिळणारी गोष्ट अगदि ३०-४० रुपयांत. हां आता काल-परवा पर्यंत आमचे हिशेब (यात्रेचे बजेट) १०-२० रुपयांपुढे जात नव्हते म्हणा. तीन चार महिने खाऊचे पैसे टिनपाटाच्या गल्ल्यात साठऊन यात्रेदिवशी ऐटित फोडला जाई. (हो! आमच्या कडे self manufactured पावडरिच्या वा तत्सम डब्ब्यांचे गल्ले बनत असत ... काश पेटंट घेतले असते ... आणि हो गल्लेच बनत, पिगि बैंक नाहि.) मग जायदादीची मोजदाद होई. भावंडात त्यावरुन भांडणेहि होत. अर्रर्रर्र ... विषयांतर ... हे हे असं होतं बघा. गावचा विषय निघाला कि विषयांतर आलेच.
तर मी काय सांगत होतो, हां तर येत्या शुक्रवारी दि. १० मे रोजी रात्री बाराच्या ठोक्याला पालखी सोहळा सुरु होईल. दुसर्या दिवशी पहाटे पाचपर्यंत पालखी परत घरात जाईल. मग पुढिल दोन दिवस देविच्या विश्रांतीचे. दोन दिवस दर्शन बंद. मग काय म्हणताय मंडळि. येताय न? शक्य असल्यास देवी दर्शनाचा लाभ आणि यात्रेचा आनंद घ्यावा. आग्रहाचे निमंत्रण म्हणा हवे तर. बाकि रहाण्याची अन खाण्यापिण्याची सोय आमची.
अवांतरः लहान असतांना आज्जी तिच्या काळच्या यात्रेच्या गमति-जमति सांगायची. सांगतांना जोडिला यात्रेतील मिठाई असायचिच. मग हळुच तिच्या पानातला एखादा मिठाईचा तुकडा माझ्या पानात यायचा. ती सांगायचि कि तीला तो मिठाईतला रंगीत-मऊ पदार्थ आणि खाजा आवडत नाहि, म्हणुन तुला देतेय. मला काहि केल्या कळायचे नाहि कि मला जे-जे पदार्थ आवडायचे ते तिला का नाहि आवडायचे! असो ... तर आज्जीच्या म्हणण्याप्रमाणे यात्रेत तिन प्रकारचे लोक येतात, हौशे-गवशे-नवशे. आमच्यासाठि मात्र क़ोणत्याहि प्रकारचे लोक असुदेत, यात्रा मात्र असाविच. नव्हे दरवर्षीपेक्षाहि अधिक जोरकस अन मजेदार. त्या निमित्ताने चार दिवस थोडि करमणुक होई. गोडधोड खाऊ मिळे. पुर्वी यात्रेत तमाशे यायचे, जादुचे प्रयोग असायचे, अजुन कसले-कसले खेळ यायचे. जाम मज्जा यायचि. खुप सार्या बैलगाड्या भरुन माणसे यायचि. मग यात्रा पाच-सात दिवस सरायचिच नाहि. आता वाहाने खुप झालित आणि वेळ झालाय कमी. पब्लिक आलं कि चार-पाच तासांत परतण्याची भाषा चालु होते. पण तुम्हि रहायचा बेत आखुनच या. खरंच खुप मजा येईल.
माझा पत्ता: विकास, मु. अकलोली, पो. वज्रेश्वरी, ९२२२४१७२६९/०२५२२२६१२८२
(भटकंती सदरात असला लेख वजा आमंत्रण चालेल का? नसल्यास कोणत्या सदरात असावे?)
वाचने
4269
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोंबिवली हून कसे यायचे?
स्वतःचे वाहन असल्यास
In reply to डोंबिवली हून कसे यायचे? by मुक्त विहारि
ओ.के.
In reply to स्वतःचे वाहन असल्यास by वसईचे किल्लेदार
देवीला नमस्कार कळवा. जमल्यास
आमच्या इकडे ताजी आणि शिळी
धन्यवाद
किती मनापासुन आवतन आहे
>>>>आपल्या मिपासाठी साकड घाला
In reply to किती मनापासुन आवतन आहे by स्पंदना
तुळशीपत्रं !!
In reply to किती मनापासुन आवतन आहे by स्पंदना
मस्त आमंत्रण!
ती सांगायचि कि तीला तो
+१
In reply to ती सांगायचि कि तीला तो by ढालगज भवानी