(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?
जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
जयपूर अपघात
पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही अरेरे मदतीसाठी थांबत नाही.
अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं. अपघात नुसत्या पहाणार्या लोकांना कमीत कमी काय करता आलं असतं.
आपल्या देशात, माणसात, समाजात खरचं इतकी नकारात्मकता आली आहे का. की काहीही करायला माणूस घाबरतो आहे. का घाबरतो आहे आपण काही अॅक्शन घ्यायला, पोलिंसाची इतकी भीती आहे का जनमानसात की मदत करायला कोणीचं तयार नाही. पोलिस जे जनतेचे मित्र हवेत, त्यांची का अशी प्रतिमा झाली आहे.
या प्रसंगात जवळच्या हॉस्पिटलला पण कोणीच कळवलं नसेल का. असे प्रसंग आसपास घडले तर काय करता येइल याबद्दल काही उपाय सुचताहेत का.
मला सुचणारे उपायः
शॉर्ट टर्म उपायः
१) अॅट लिस्ट जवळच्या हॉस्पिटलला कळवायला हवं. पोलिसांना कळवायला हवं.
२) हा अपघात पाहून ज्या लोकांना मदत करावीशी वाटली, पण पोलिसांची भीती वाटते आहे, त्यांनी त्या माणसाजवळ थांबून बाकी बघणार्या लोकांना आवाहन करायचं की मला याला मदत करायची आहे, आणखी कोणाकोणाला मदत करायची आहे त्यांनी कृपया या. प्लीज लवकर या. मग असे ४-५ जण आले तरी सगळ्यांनी मिळून पटापटा स्टेप्स घेता येतील.
३) सर्वांनी प्रमुख पोलिस स्टेशन्सचे, ओळखीच्या पोलिसांचे, अॅम्ब्यूलन्सचे, अक्सिडेंट हॉस्पिटल्सचे नंबर जवळ बाळगावेत. म्हणजे ऐनवेळी कॉल करायला हे नंबर हाताशी असतील.
लाँग टर्म उपायः
पोलिसमित्र असा काहीतरी उपक्रम हवा असं वाटतं आहे, ज्यायोगे आपल्यासमोर अपघात घडला तर मला मदत करायची आहे अशा लोकांना विनासायास मदत करता आली पाहिजे. त्यासाठी एक प्रोसेस हवी. अशा लोकांनी आपल्या जवळच्या पोलिस चौकीमध्ये आपलं नाव रेजिस्टर करावं, त्यांना १ आय-डी कार्ड मिळावे लायसन्सच्या आकाराचे. अशा लोकांना थोडं फर्स्ट एडचं ट्रेनिंग मिळावं. या लोकांना आपण पोलिस मित्र म्हणू.
तर अशा लोकांकडे एक प्रिंटेड डायरी असावी ज्यामध्ये शहरातल्या काही प्रमुख पोलिस स्टेशनचे नंबर्स, हॉस्पिटल्सचे नंबर्स असावेत. या पोलिस मित्रांनी आपल्या ओळखीच्या १-२ अन्य पोलिस मित्रांचे नंबर जवळ बाळगावेत. अशी जर मदत करू इच्छिणार्या लोकांची चेन आपण बांधली तर अपघातग्रस्तांना मदत करायला लोकांना भय रहाणार नाही असं वाटतं. या प्रोसेससाठी इच्छूकांना माफक शुल्क आकारले जावे. उदा. ५० रू. इ.
यासंबंधी अजून काही प्रश्न ज्याची उत्तरे मला सुचत नाहियेत ते असे की,
१) या प्रोसेसचा पोलिसांवर जास्त भार येऊ नये म्हणून काय करावे.
२) ही प्रोसेस राबवण्यासाठी जो काही खर्च येइल, ट्र्निंगसाठी जो खर्च येइल त्याची अॅरेंजमेंट कशी असावी? त्या परिसरात काम करणार्या सामाजिक संस्थेने हा भार हलका करावा का. की स्थानिक नगरसेवकाने वॉर्ड निधी वगैरे असे काही असल्यास त्यातून हा खर्च करावा.
३) या लोकांची यादी मेंटेन करणे, अपडेट करणे हे कसं साधायचं, कोणाची जबाबदारी.
४) या पोलिस मित्रांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत मदत करायचे. पण त्यांच्यावर सक्ती असता कामा नये. नाहीतर मदत करणार्यांवर परत कायद्याचा बडगा नको.
तुम्हाला यावर उपाय सुचताहेत का, वरील योजनेसंबंधी प्रश्नांची काही उत्तरे मिळताहेत का? ही योजना कदाचित फिजिबल नसेलही, तर अजून दुसर्या काही योजना सुचताहेत का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
ज्या लोकांनी अशी अपघातात सापडलेल्या लोकांची मदत केली आहे त्यांचे पॉसिटीव्ह, निगेटीव्ह अनुभव त्यांनी शेअर करा, त्यांनी अनुभवाच्या चार गोष्टी सांगा ज्या इतरांना उपयोगी ठरतील. जे स्वत: दुर्दैवाने अपघाताच्या अनुभवातून गेले आहेत, त्यांनी त्यांना त्यावेळी काय आधार/मदत हवा होता हे सांगा ज्याचा मदत करू इच्छिणार्या लोकांना फायदा होईल.
प्रतिक्रिया
खरे तर
संवेदनशीलतेला दाद
@पैसा,
किस्सा !
बघे कैदी
नंबर बाबत