✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फोडणे-वाढवणे

अ
अन्या दातार यांनी
गुरुवार, 05/22/2008 - 17:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12548 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

बांगडी

ऋचा
गुरुवार, 05/22/2008 - 17:13 नवीन
बांगडी वाढली असे म्हणतात कारण पुर्वी च्या काळी बांगडी फुटणे अशुभ मानले जात असे. मग अश्यावेळी बांगडी वाढते म्हणजे नविन बांगड्या घेतल्या जातात कारण बांगड्या हे सौभाग्याचे लक्षण आहे. असे मला वाटते. :B
  • Log in or register to post comments

बरोबरे गं ऋचा

वरदा
गुरुवार, 05/22/2008 - 17:55 नवीन
नारळ वाढवतात हे मला माहित नव्हतं मी तरी नारळ फोडायचा असंच ऐकलंय...
  • Log in or register to post comments

प्रथा

हर्षद बर्वे
गुरुवार, 05/22/2008 - 18:03 नवीन
पूर्वी स्त्री विधवा झाली की ती बांगड्या फ़ोडत असे.त्यानंतर बांगड्या वापरत नसे. बांगड्या(हिरव्या काचेच्या) सऊभाग्य-अलंकारामध्ये मोडतात. म्ह्णून चुकीने जरी बांगडी फ़ुटली तरी अशुभ...म्हणून वाढवली असे म्हणण्याचा प्रघात पडला. आपला हर्षद
  • Log in or register to post comments

बांगडी

मनिष
गुरुवार, 05/22/2008 - 18:15 नवीन
बांगडी वाढवली म्हणजे "नवरे वाढवले" असे तर नव्हते ना? ह. घ्या. ;) मला हे वाक्प्रचार माहित नव्हते. नारळ फुटला, बांगडी फुटली असेच आजीसकट सगळे लहानपणापासून म्हणायचे. 'बळी चढवला' हे मात्र ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद बर्वे

अरे पण

धमाल मुलगा
गुरुवार, 05/22/2008 - 18:21 नवीन
अरे पण अजुन नारळाचा मुद्दा तसाच राहिला की. मी एकदाच म्हणालो होतो घरी, "मी फोडतो नारळ" आजीनं इतकं सुनावलं..."आजकालची कार्टी तुम्ही जळ्ळी अक्कल म्हणून नाही..आपण काय बोलतो, काय शब्द वापरतो जरा नीट विचार करुन बोलावं" अजुनपर्यंत मला माझं काय चुकलं हेच कळलं नाहीय्ये! का बुवा "नारळ वाढवणे" म्हणत असावेत?
  • Log in or register to post comments

अरे वा...

मन
गुरुवार, 05/22/2008 - 18:25 नवीन
छान माहिती मिळतिये. चालु द्या. आपलाच, (शाळेतील भांडणात कित्येकांचे डोके,कित्येकांच्या पाट्या,कित्येक खिडक्या "वाढवलेला") मनोबा
  • Log in or register to post comments

नारळ हे नरमुंडाचे

विजुभाऊ
गुरुवार, 05/22/2008 - 18:31 नवीन
शेंडी डोळे असतात म्हणुन नारळ हे नरमुंडाचे प्रतीक म्हणुन वापरले जाते. नारळ फोडतो म्हणजे आपण लौकिक अर्थाने नरबळी देत असतो. उद्घाटन करताना / शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात
  • Log in or register to post comments

सांगताय काय ??

अत्रन्गि पाउस
Mon, 05/06/2013 - 09:59 नवीन
हे खरय???? बापरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

माणुस

ऋचा
गुरुवार, 05/22/2008 - 18:31 नवीन
माणुस मेल्यावर जेंव्हा त्याला जाळतात तेंव्हा चितेवर त्याच्याबरोबर सोबत म्हणुन नारळ पाठवतात. त्याला नारळ फुटणे असे म्हणतात. म्हणुन आजी ने तुमची तासंपट्टी केलि असवी.
  • Log in or register to post comments

असेच कुंकू

अभिता
Fri, 05/23/2008 - 00:53 नवीन
असेच कुंकू पुसले असे म्हणत नाहित कुंकू वाढवले असे म्हणतात ऋचा शी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

आईशप्पथ! हे

धमाल मुलगा
Fri, 05/23/2008 - 11:44 नवीन
आईशप्पथ! हे असं आहे होय? बरं झालं सांगितलंत :)
  • Log in or register to post comments

मंगळ्सुत्र..

पद्मश्री चित्रे
Fri, 05/23/2008 - 12:10 नवीन
मंगळ्सुत्र पण वाढवले असेच म्हणतात.. सौभाग्याचे लक्षण म्हणुन अशुभ शब्द टाळत असावेत. >>शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात - बरोबर
  • Log in or register to post comments

पिढिजात

शैलेन्द्र
Sat, 05/24/2008 - 12:25 नवीन
पिढिजात व्यापारी, दुकान बंद केले(रात्री) अस न म्हणता दुकान वाढवले अस म्हणतात..
  • Log in or register to post comments

ढोंग

हेरंब
Sun, 05/25/2008 - 22:14 नवीन
भारतीय समाजात 'ढोंगीपणा' हा राजमान्यच आहे. म्हणूनच नागडे सत्य कोणी स्वीकारु शकत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारांना गोंडस रुप दिले जाते. निरोप घेताना 'मी जातो' न म्हणता 'मी येतो' असं म्हणतात तोही यातलाच प्रकार! जातो म्हटले की परत येणारच नाही हे कशावरुन ? त्या भीतिने उलट का बोलायचं ?
  • Log in or register to post comments

आपल्याकडे कसं धागा/ प्रतिसाद

सूड
Sat, 09/01/2012 - 18:26 नवीन
आपल्याकडे कसं धागा/ प्रतिसाद उडाले असं न म्हणता त्याला 'पंख लागले' म्हणतात तसं काहीसं असावं.
  • Log in or register to post comments

युफेमिझम !

तर्री
Sat, 09/01/2012 - 20:57 नवीन
हया प्रकाराला इंग्रजी मध्ये युफेमिझम म्हणतात. तो भाषेचा / बोली भाषेचा अलंकार आहे . ( हयाला ढोगीपणा म्हणार्याना सा. न ) अशुभ बोलणे टाळावे हा त्या मागचा भाव ! मला हया मध्ये खूप "स"कार दिसतो. आज कदाचित हे असे बोलणे (शहरात ) कालबाह्य वाटत असेलही पण हाच प्रकार इग्रंजी असता तर आपण ग्रामर चे २/५ मार्क मिळवण्यात धन्यता मानली असती.
  • Log in or register to post comments

बरोबर आहे..

अत्रन्गि पाउस
Mon, 05/06/2013 - 10:04 नवीन
अहो इंग्लंड मध्ये सुद्द्धा नॉट bad म्हणजे चांगला अमेरिकेत फिझीकाली / मेंटली chalenged असे अनुक्रमे अपंग / मतीमंद साठी वापरतात... कुठलीही नकारात्मकता टाळणे हा भंपक /ढोंगी पणा नाहीच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

सांस्कृतिक आचरटपणा

चौकटराजा
Sat, 09/01/2012 - 21:28 नवीन
आपल्याकडे काही सांस्कृतिक आचरणपणाचे नमुने आहेत त्यातीलच हे काही प्रकार आहेत. उदा. मी जातो असो म्हणायचे नाही तर बरं येतो असे म्हणायचे. किंवा नुकत्याच कोंब फुटलेल्या रोपाला सरळ तर्जनीने निर्देश न करता तर्जनीच्या मधल्या पेराच्या टोकाने निर्देशित करणे का तर ? डायरेक्ट तर्जनी दाखविली तर रोप खुजे निपजते म्हणे.
  • Log in or register to post comments

जर एखाद्याने नारळ/बांगडी

अप्पा जोगळेकर
Sun, 09/02/2012 - 12:05 नवीन
जर एखाद्याने नारळ/बांगडी फुटला/फुटली ऐवजी नारळ वाढवला/वाढली असे म्हटले किंवा जातो ऐवजी येतो असे म्हटले तर लगेचच त्याला ढोंगीपणा, सांस्कॄतिक आचरटपणा असे म्हणून हिणवण्याची काय गरज आहे ? अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनितालला गेलेत असेच वाक्प्रयोग वापरतात. यालासुद्धा सांस्कॄतिक आचरटपणा किंवा ढोंगीपणा म्हणायचे का ?
  • Log in or register to post comments

ख...प...लो...

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 09/02/2012 - 12:17 नवीन
ख...प...लो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अहो अप्पा

चौकटराजा
Sun, 09/02/2012 - 15:58 नवीन
आमचे 'वाढवला' या क्रियापदाशी वाकडे नाहीये. ते तसे कुणीही वापरावे .आम्ही नारळ फोडला असे म्हणालो की " याला संस्कृति कळत नाही" असा पवित्रा घेउ नये . अशा पवित्र्याला आम्ही आचरटपणा म्हणतो. दुसरे असे की बायकोला ***** यात ***** हे मूळ क्रियापद नाही. तसे फोडणे या क्रियापदाचे नाही. नारळ फोडणे यात वाढविणे यापेक्षा फोडणे हे जास्त वापरले जाणारे आहे. तसे **** या क्रियापदाचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

लय जोरात हाणला तेजायला, जिक

बॅटमॅन
Mon, 09/03/2012 - 18:34 नवीन
लय जोरात हाणला तेजायला, जिक तू अप्पा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

हाण्ण !! कं लिवलंय, कं

सूड
Mon, 09/03/2012 - 18:41 नवीन
हाण्ण !! :D कं लिवलंय, कं लिवलंय !! खपलो, मेलो, गचकलो....:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

खतर्नाक.

कवितानागेश
Mon, 09/03/2012 - 18:42 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

बेस्ट ! बेस्ट ! बेस्ट !!!

नाना चेंगट
Mon, 09/03/2012 - 18:43 नवीन
बेस्ट ! बेस्ट ! बेस्ट !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

बापू आडवे !

sagarpdy
Mon, 09/03/2012 - 18:50 नवीन
बापू आडवे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

तोडलं

कपिलमुनी
Mon, 09/03/2012 - 19:39 नवीन
बिनतोड युक्तीवाद ... घुमवून हाणला .. अप्पाना सा.न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

+१

मूकवाचक
Mon, 05/06/2013 - 10:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लड्बप्पू

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 04:15 नवीन
हसून मेले-खपले-वारले व परत पुनर्जन्म घेऊन पुन्हा हसत हसत खपले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

एखादा मनुष्य ज्याच्याविषयी

बाळ सप्रे
Mon, 05/06/2013 - 10:45 नवीन
एखादा मनुष्य ज्याच्याविषयी काही आपुलकी असते तो/ती गेल्यावर 'वारला/ली' वगैरे शब्दप्रयोग वापरला जातो. पण तोच रस्त्यावरील भिकारी/ दारुडा खपला/गचकला असेच म्हटले जाते. तसेच बांगडी हा नुसता अलंकार न मानता सौभाग्याचा अलंकार मानणे, नारळ हे साधे फळ न नसून पवित्र फळ असणे हा विचार सर्वसामान्यपणे फार कमी झाला असल्याने नारळ फुटणे, बांगडी फुटणे हाच शब्द्प्रयोग सामान्य जीवनात जास्त योग्य वाटतो. त्याची तुलना "बायकोला ठोकण्यासाठी " वगैरे शब्दप्रयोगाशी करणे विनोदी/ लोकप्रिय वगैरे असली फारच अतिरंजित आहे. बिनतोड युक्तिवाद नक्कीच नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अरे देवा..

चिगो
Sun, 09/02/2012 - 17:09 नवीन
अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनततालला गेलेत
अयाया... खपलो, मेलो, गचकलो.. :-) हाण्णा तिच्यायला.. :-D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा