टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- २ (अंतिम भाग)
येथेल ब-याच मंडळींच्या आग्रहाला मान देऊन टकल्या बापटाचा दुसरा आणि अंतिम भाग येथे देत आहे.. भीमसेनजी, बाबूजी, मधुबाला इत्यादी..ही माझी श्रद्धास्थानं आहेत. त्यांच्याविषयी लिहायला मल आवडतं. ज्यांना या विषयांचा तिटकारा आहे त्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल. त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडींचा मी आदर करतो..धन्यवाद..
तसेच या लेखनाचे कुणी छानसे विडंबन केल्यास त्याचे स्वागतच आहे.. - ; )
या पूर्वी-
टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- १
>>......आता पुढची पायरी होती ती रंगमंचावर ब्यॅकष्टेज प्रवेश मिळवण्याची. आणि गाठ टकल्या बापटाशी होती..!...
मनात म्हणत होतो.. 'थांब लेका बापटा.. एकदा अण्णांशी संपर्क होऊ देत.. नाय तुला 'A रांगेत' बसून दाखवलं तर नावाचा तात्या नाय..!'
"छ्या....! अण्णांनी तुम्हाला बोलावलं..? अहो असं सांगून घुसणारे अनेक असतात.. आणि म्हणे अण्णांनी बोलावलं..! कोण तुम्ही..?? "
आता मात्र मी उखडलो..च्यामारी मी मघापासून या बापटाशी नम्रपणे बोलतोय आणि हा मात्र लेकाचा मुंबै विद्यापिठाचा तो परिसर आणि अण्णांच्या गाण्याचे जागतिक हक्क विकत घेतल्यासारखा तुसडेपणाने माझ्याशी का बोलत होता..?
"का हो? तुम्हाला तुमच्या आईबापसाने नीट बोलायला शिकवलं नाही का..? मी मघापासून तुमच्याशी नीट बोलतो आहे आणि तुम्ही मात्र, मी तुमच्या तीर्थरूपांचा नोकर असल्यासारखे माझ्यावर खेकसताय..? मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही मला वाटेल तसं बोलावं..तुम्हाला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही..?"
च्यामारी मीदेखील आता तार षड्ज लावला..
"हॅलो.. सिक्युरिटी.................! या माणसाला पहिले बाहेर हाकला..!! " -- बापटानेही आता तार तार षड्ज लावला..
लगेच तिथे एकदोघं सिक्युरिटीवाले आले.. लांबून एक कुणीसे पीएसाअय (पोलिस फौजदार) देखील येताना दिसले..
"ओ.. बाहेर काय हाकला..? या विद्यापीठाचं आवार काय तुमच्या बापाचं आहे काय..?" -- मी.
आपण तर बोलूनचालून दारूच्या धंद्यातच नौकरीला होतो.. अंगात रग होती..मारामाऱ्या, भांडणं करायचीदेखील जबर हौस..! आज भले या बापटाने अण्णांच्या गाण्याला बसू दिलं नाही तरी चालेल, पण जाता जाता अत्यंत मुजोरपणे माझ्याशी बोलल्याबद्दल याच्या किमान एक खणखणीत कानाखाली तरी खेचायचीच असंही मी मनोमन ठरवलं..भले मग मागाहून पोलिसांनी पकडलं तरी बेहत्तर..!
दोघं सिक्युरिटीवाले येऊन माझ्या दंडाला धरू लागले.. तेवढ्यात ते फौजदार तिथे पोहोचले.. त्यांच्या वर्दीवर पाताडे आडनावाची पाटी होती..
"काय रे, काय झालं? काय गडबड आहे..? " आता फौजदारांनी संभाषणात एंट्री घेतली..
"अहो बघा ना..हे भीमसेन जोशींचं नाव सांगून फुकट घुसू पहात आहेत.. " - माझ्याकडे पहात बापट फौजदारसाहेबांना म्हणाला..
"नमस्कार पाताडे साहेब..!"
'दूर से उठाना और नजदिक से नीचे लाना.. ' हा सॅल्युटचा नियम पाळत मी फौजदारसाहेबांना पहिला एक फुकटचा कडक सॅल्यूट ठोकला..त्या बरोब्बर फौजदारसाहेबांची जरा माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली...
मग मी फौजदारसाहेबांना थोडक्यात सगळी हकिगत सांगितली..
"अहो पाताडेसाहेब, या बापटसाहेबांनादेखील मी हेच सांगितलं.. तरीही हे माझ्यावर मघापासून गुरकावत आहेत..मी काय म्हणतो फौजदारसाहेब, मला फक्त एकवार भीमसेनजींना भेटू द्या.. मला गाण्याला बसू द्या असाही माझा आग्रह नाही.. खरोखरच जर सगळ्या शिटा फुल्ल असतील तर मी खुशीने घरी परत जाईन.. भीमसेनजींना केवळ भेटल्याचं समाधानदेखील माझ्याकरता खूप मोठं आहे..! "
"अरे जा रे जरा यांना आत घेऊन.. भेटवून आणा.. "
फौजदारांनी तेथील एका प्रायव्हेट सिक्युरिटीवाल्याला हुकूम सोडला..
"हुश्श..!" असं मी मनाशीच म्हणत एकदाचा ग्रीनरूमपाशी दाखल झालो. दार थोडं किलकिलं होतं.. आत अण्णांचे निषादाचे तंबोरे सुसाट लागत होते, त्याचा आवाज येत होता.. मी हळूच दार थोडं लोटून खोलीत डोकावलो. समोरच माझा देव बसला होता..झकासपणे पान जमवणं चाललं होतं.. बोरकर, नाना मुळे बसले होते.. की भरत कामत होता? ते आता आठवत नाही.. टाकळकर होते..तितक्यात अण्णांची नजर माझ्याकडे गेली..
मी पुढे होऊन पहिले त्यांच्या पायावर डोकं ठेवलं..
"या....काय म्हणता..?!"
नेहमीचंच मोजकं बोलणं. पण किती आश्वासन होतं, किती आपुलकी होती, किती साधेपणा होता त्यांच्या बोलण्यात..!
मग मीच जरा दबकत दबकत तोंड उघडलं.. "अण्णा.. मी त्या दिवशी तुम्हाला पुण्याला फोन केला होता.. तुम्ही बोलवलंत खरं.. पण मी चौकशी केली.. गाण्याला बसायला जागा नाहीये.." - मी हळूच सांगून टाकलं...
"जागा नाही.? असं कसं होईल.. त्यांना सांगा...! "
त्या ग्रीनरुममध्येच अजून दोन पाच मंडळी उभी होती त्यापैकी एकाकडे बोट दाखवत अण्णा म्हणाले..आता ते गाण्याच्या मुडात होते त्यामुळे मग मीही त्यांना फारसं डिस्टर्ब न करता तिथून उठलो आणि त्या व्यक्तिपाशी पोहोचलो..
तो जो कुणी बड्या सफारीसुटाबुटातला इसम उभा होता तो बापटाच्या अगदीच विरुद्ध होता..अगदी नम्र आणि डीसेंट..
"नमस्कार साहेब.. मी भीमसेनजींना पुण्याला फोन केला असताना त्यांनीच मला या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन दिलं होतं.. आहे का एखादी जागा शिल्लक..? "
"Yes yes.. please come this way..."
हा इसम तर साला एकदम हायफाय विंग्लिशमध्येच बोलायला लागला..परंतु एकदम नम्र.
आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वप्नवत घडल्या.. आणि त्या भल्या इसमाने खरोखरच मला पहिल्या रांगेत एका खुर्चीवर मानाने बसवला..
"One Mr Bapat is outside there.. he was so arrogant with me.."
"Not to worry Sir... I will take care of him..!"
Sir?
च्यामारी इतका वेळ राजाभाई टावरच्या प्रांगणात कसनुसा उभा असलेलो मी एकदम Sir झालो..? गंमतच वाटली मला. - : )
जरा वेळाने पुन्हा तो सुटाबुटातला नम्र इसम आणि बापट दोघं सभागृहात आले..
"He is Mr Abhyankar.. he is an invitee by Bhimsenjii himself.. we will adjust the seats.. but let him sit here..!"
वाफेचं इंजीन जसं धुसफुसतं तसं धुसफुसत बापटाने काही न बोलता होकार भरला.. :))
मग माझं मलाच मनाशी हसू आलं... बापटाचा थयथयाट.. ते सिक्युरिटीवाले.. ते फौजदार पाताडे.. ती ताणाताणी आणि वादावादी..!
आज अनेक वर्ष झाली या गोष्टीला.. पण आता आठवायला लागलो की गंमत वाटते.. - : )
कोण कुठला तो उर्मट बापट..?
अहो अण्णांच्या अवघ्या 'या.. ' आणि "जागा नाही..? असं कसं होईल..?" -- इतक्याच शब्दांनी ते बाहेरचं वादळ क्षणात मिटलं होतं..
असं वाटतं पुन्हा एकदा मुंबईत कुठेशी छानशी अण्णांची मैफल असावी..गाण्याआधी ग्रीनरुममध्ये जाऊन त्यांना भेटावं.. त्यांच्या 'या..!' तली आपुलकी अनुभवावी..
'नानजीभाई.. पान जमवा..! ' - असं नाना मुळेंना सांगताना त्यांना ऐकावं...
असो... अण्णा आता नाहीत ही वस्तुस्थिती पचवणं खूप जड जातं आहे...!
टकल्या बापटही शिंचा आता रिटायर होऊन घरी बायका-मुलांवर वसावसा ओरडत बसला असेल.. - : )
चालायचंच..!
-- तात्या अभ्यंकर.
असं वाटतं पुन्हा एकदा मुंबईत कुठेशी छानशी अण्णांची मैफल असावी..गाण्याआधी ग्रीनरुममध्ये जाऊन त्यांना भेटावं.. त्यांच्या 'या..!' तली आपुलकी अनुभवावी..
'नानजीभाई.. पान जमवा..! ' - असं नाना मुळेंना सांगताना त्यांना ऐकावं...
असो... अण्णा आता नाहीत ही वस्तुस्थिती पचवणं खूप जड जातं आहे...!
टकल्या बापटही शिंचा आता रिटायर होऊन घरी बायका-मुलांवर वसावसा ओरडत बसला असेल.. - : )
चालायचंच..!
-- तात्या अभ्यंकर.Book traversal links for टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- २ (अंतिम भाग)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एकदम दिलखुष!
तात्या..
धन्यवाद! आता रोशनी...
+१
वा तात्या
टकल्याची चांगलीच जिरली!
आयुष्यभर
नशीबवान आहात !
खल्लास अनुभव! असल्या
वाह!
छान लिहिलंय...
चपखल.
जरा वेगळे अनुभव
ह्म्म्म्म
वाह वाह !
साधा अनुभव...
गण्याबदल तर वादच नाही..गाणं
आत्ताच हाती आलेल्या
आवडला. त्या वसावस ओरडणार्या
भले!!!
बापट झाला
काय दिवस आलेत आज चक्क अॅडीशी
रोशनी ची वाट पाहणेत येतेय!!!!