पोटॅटो स्ट्यू अँड रोटी जाला
ही पाककृती मास्टरशेफ इंडिया किचन के सूपरस्टार्स मध्ये पाहीली आणी बनवून बघीतल्याशिवाय राहवले नाही :)
सिंगापूर , मलेशियाची खास पाककृती आहे.
स्ट्यूमध्ये फरसबी, मटार मी घातले आहे मूळ पाककृतीत बटाटा, गाजर होते (त्यात शेफने सांगितले होते इतर भाज्या घालू शकता म्हणून :) )
पोटॅटो स्ट्यूची पाककृती खादाडा अमिताने दिलेल्या व्हेजिटेबल स्ट्यूसारखीच आहे, किरकोळ बदल आहेत तरीही देत आहे कृती.
साहित्य पोटॅटो स्ट्यू :
७-८ छोटे बटाटे सालं काढून घेणे
एका गाजराचे तुकडे
१/४ वाटी बारीक चिरलेली फरसबी
१/४ वाटी मटार
२ कांदे पातळ, उभे चिरलेले
२ हिरव्या मिरच्या मधून उभ्या चिरलेल्या
२ लाल सुक्या मिरच्या तोडून घेणे
१ टेस्पून बारीक चिरलेले लसूण
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
५-६ कढीपत्ता
१ वाटी नारळाचे दूध
१/२ लिंबाचा रस (चिंचेचा कोळ ही वापरु शकता)
१ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टीस्पून धणेपूड
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्यांची फोडणी करून घ्यावी.
त्यात बारीक चिरलेले आले +लसूण घालून परतून घ्यावे.
आले +लसूण चांगले परतले की त्यात हळद व चिरलेला कांदा घालून तो हलक्या गुलाबी रंगावर परतावा.
आता त्यात बारीक चिरलेली फरसबी, मटार, बटाटे व मीठ, मसाले घालून एकत्र करावे.
थोडे पाणी व २ टेस्पून नारळाचे दूध घालून , झाकून पाच मिनिटे शिजवावे.
आता त्यात उरलेले नारळाचे दूध घालावे, लागलेच तर थोडे मीठ घालावे.
पुन्हा झाकून बटाटे मऊ होईपर्यंत शिजवावे.
बटाटे शिजले की त्यात तुकडे केलेले गाजर घालून एक - दोन वाफा काढाव्यात.
शेवटी थोडा लिंबाचा रस घालून, एकत्र करुन गॅस बंद करावा.
साहित्य रोटी जाला:
प्रमाण दोन माणसाच्या हिशोबाने दिले आहे.
१ अंडे
१ वाटी नारळाचे दूध (साधे दूध वापरले तरी चालेल)
२-३ चमचे मैदा
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
पाकृ:
एका भांड्यात अंडे फेटून घ्यावे. त्यात नारळचे दूध,हळद व मीठ घालून पुन्हा फेटावे.
थोडा-थोडा करून मैदा घालून फेटावे.
मिश्रण पॅनकेकच्या मिश्रणाइतपत पातळ हवे.
नॉन-स्टीक तवा मध्यम आचेवर तापवायला ठेवावा.
त्यावर थोडे तेल पसरवून घ्यावे.
खरे तर रोटी जाला बनवण्यासाठी खास साचा मिळतो पण तो माझ्याकडे नाही, त्यामुळे मी टीन कॅनलाच चार भोकं पाडून घेतली. (पर्फेक्ट जमले नाही पण कसे-बसे जमवले :) )
टीन कॅनमध्ये हे मिश्रण ओतावे व लगेच गरम तव्यावर गोलाकार फिरवावे.
कडेने रोटी सुटू लागली की उलटवून दुसरी बाजू शेकावी.
गरमा-गरम पोटॅटो स्ट्यू रोटी जालाबरोबर सर्व्ह करा.
थोडे पाणी व २ टेस्पून नारळाचे दूध घालून , झाकून पाच मिनिटे शिजवावे.
आता त्यात उरलेले नारळाचे दूध घालावे, लागलेच तर थोडे मीठ घालावे.
पुन्हा झाकून बटाटे मऊ होईपर्यंत शिजवावे.
बटाटे शिजले की त्यात तुकडे केलेले गाजर घालून एक - दोन वाफा काढाव्यात.
शेवटी थोडा लिंबाचा रस घालून, एकत्र करुन गॅस बंद करावा.
साहित्य रोटी जाला:
प्रमाण दोन माणसाच्या हिशोबाने दिले आहे.
१ अंडे
१ वाटी नारळाचे दूध (साधे दूध वापरले तरी चालेल)
२-३ चमचे मैदा
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
गरमा-गरम पोटॅटो स्ट्यू रोटी जालाबरोबर सर्व्ह करा.
वाचने
9929
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
मस्त!
जबरदस्त पेशकश
कडक !
तुझ्या टिव्हिवर....
लै नामी कलाकार हैस
In reply to लै नामी कलाकार हैस by अभ्या..
तिला अॅवार्ड देणं बंद करा
मस्त, प्रसन्न सादरीकरण! जाला
सुन्दर
फार छान
प्रचंड भारी....
क्या बात है!
अण्ड्याशिवाय जाला रोटी
In reply to अण्ड्याशिवाय जाला रोटी by वामन देशमुख
+ ११११११११११११
मस्तच गं... माझा २ आठवड्या
In reply to मस्तच गं... माझा २ आठवड्या by Mrunalini
हो क्रेपसारखेच साहित्य आहे
जाला रोटी भारी दिसत आहे.
In reply to जाला रोटी भारी दिसत आहे. by सस्नेह
उपाय आहे.
जबरा...!
रोटी जाला पाहून मला एकच शब्द
एक बात बताओ यारों...
In reply to एक बात बताओ यारों... by अर्धवटराव
आयला... पुन्हा चुक झाली
भारी!!!!
लै भारी!
In reply to लै भारी! by पैसा
अगदी अगदी! तरण्या मुलांचे
भन्नाट.
In reply to भन्नाट. by चिंतामणी
राईसचे माहित नाही
मस्त दिसतेय हे स्ट्यू. खूप
ट्राय नाही केले