मिपा कुटुंब सदस्यांनो,
http://www.misalpav.com/node/3405
वेंगुर्ल्याचं वर्णन वाचून तुम्हालाही तिथे जावंसं वाटलं असेल, ना? मी दस्तुरखुद्द रत्नागिरीचा असलो, तरी अजून वेंगुर्ल्याला गेलेलो नाही. बऱ्याचदा असंच होतं. एखाद्या सुंदर ठिकाणाचं वर्णन वाचून आपल्याला तिथे जावंसं वाटतं, पण जाणं जमत नाही. अनेकदा सोबत कुणी नसतं, ग्रुप जमत नाही, अनेक भानगडी.
मिपा च्या माध्यमातून हे जमवायचं? निदान पुण्यातल्या मिपा सदस्यांसाठी तरी हे करता येईल. एखादं जवळचं ठिकाण, उदा. श्री.ना. पेंडशांचं दापोली निवडायचं. तिथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणं जवळपास आहेत. आसूद, कड्यावरचा गणपती, हर्णै बंदर, वगैरे. अगदी निसर्गरम्य. दोन दिवसांची सहल आपण सगळे एकत्रितपणे काढू शकू तिथे? संयोजनाची जबाबदारी मी घेईन. त्या निमित्तानं सगळ्यांची ओळख होईल, एक छोटेखानी स्नेहसंमेलन होईल, नवी ठिकाणं नव्या मित्रांसह पाहण्याची मजा अनुभवता येईल.
कळवा, तुम्हाला काय वाटतंय, ते!
- अभिजित.
-----------
वाचने
4903
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
उत्तम
अभिजितराव...
>>फक्त
In reply to अभिजितराव... by धमाल मुलगा
धमू कोकणात जातो रे नाखवा.
आईशप्पथ्थ!!!
In reply to धमू कोकणात जातो रे नाखवा. by रामदास
बेफान
वावावा..
तलवार म्यान!
>>>त्यामुळे
मग काय तर?
फिकीर नॉट रे भाऊ...
In reply to मग काय तर? by आपला अभिजित
कधी निघायच??????