गेली ३५ वर्ष ही अपराधीपणाची भावना काहीकेल्या पाठ सोडत नाही. नकळत झालेली चूक. वय पण लहान. आई मल्टीपल ऑर्गन फेल्युअरने के.ई.एम. मध्ये दाखल होती. आईचा छोटा म्हणुन माझी ड्युटी कायम हॉस्पिटलमध्ये. त्या २१ दिवसात डॉक्टर ह्या संस्थेवरचा विश्वास उडाला. शिकाउ मंड्ळीनी केलेले आईच्या देहाचे हाल याची देहा याची डोळा बघितले. आजही तो एक अविभाज्य भाग असतो डॉक्टर होण्याचा हे माहित असुन राग डोक्यातुन जात नाही.
आई जाण्यापुर्वी चार दिवस -रेसिडेन्ट डॉक्टर तपासुन गेले. एक्स-रे आणि इतर तपासणी करता आईला वॉर्डातुन हलवायचे होते.
आईला सारखी ग्लानी येत होती. तीला जागे ठेवायची जबाबदारी माझ्यावर आली.वॉर्ड्बॉयने स्ट्रेचर वर आईला दणकवल्यावर राग आवरेनासा झाला. पण त्या राक्षसा बरोबर मी झुरळ काय लढ्णार. तपासणी ला जाता जाता आई परत ग्लानीत जाउ लागली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या गालावर चापट्या मारुन तीला जागे करायचे होते. नक्की माहीत नाही पण कुठ्ली तरी चापटी स्ट्रेचर हलता असल्यामुळे जराशी जास्त लागली असणार. आई जागी झाली. "मला मारु नकोस रे विनायका" हे आईचे वाक्य आज पर्यंत विसरु शकलो नाही. हा प्रसंग मी अगदी जवळ्च्याना पण सांगितला नाही. कदाचित इथे लिहुन मुक्ति मिळेल काय?
वाचने
6610
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच ही टोचणी खुप बोचणारी आहे.
बाप्परे
नक्की मिळेल
हेच
In reply to नक्की मिळेल by प्रकाश घाटपांडे
हेच म्हणतो
In reply to हेच by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
आई ग..
+१
हेतू..
असच होत
काय बोलणार
विनायकराव,
हळवा कोपरा आणि तत्कालिन परिस्थिती
आपापला डिजायनर नरक
तुमची जबाबदारीच
टोचणी वर उपाय
तुम्हाला
छे..
कृती पेक्षा कृतीपाठचा उद्देश महत्वाचा.
कदाचित...
आपल्या
डॉक्टर विनायक..