मिपाच्या सर्व दालनांपैकी एक अतिशय समृद्ध दालन म्हणजे मिपाचं रसोईघर, अर्थातच मिपाचा पाककृती विभाग.. कुणाही शब्दप्रभुचे शब्द केवळ तोकडे पडावेत इतकं सुरेख, इतकं प्रेक्षणीय असं हे मिपाचं रसोईघर..नानाविध शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची अक्षरशः रेलचेल..सोबत त्या त्या पाकृंची दृष्ट लागावीत अशी एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं..!
हा विभाग चाळत असताना एक कल्पना सुचली ती येथे मांडतो..
गणपासारख्या अधिकारी व्यक्तिने अथवा अन्य कुणीतरी वेळात वेळ काढून मिपाच्या या सर्व पाककृतींचा एखादा सुरेख ब्लॉग बनवावा. मिपाव्यवस्थापनाची परवानगी, त्या त्या लेखकांच्या परवानग्या या तांत्रिक गोष्टी अर्थातच आहेत..परंतु मिपा व्यवस्थापनाने मनावर घेतल्यास त्याची पूर्तता करणे अवघड नाही..ब्लॉगमध्ये त्या त्या पाकृच्या शेवटी मिपाच्या त्या त्या लेखकाचे नाव अर्थातच देण्यात यावे..या ब्लॉगचे सर्व मालकी/व्यवस्थापन अर्थातच नीलकांत किंवा अन्य कुणा जबाबदार मिपा संपादकाकडे किंवा संयुक्तरित्या असावे..
हा सगळा खटाटोप केवळ एवढ्याचकरता की भविष्यात मराठी अनुदिनीक्षेत्रात अक्षरशः दृष्ट लागावा असा एक अतिशय म्हणजे अतिशय देखणा पाककृतींचा ब्लॉग आत्तापासूनच माझ्या नजरेला दिसतो आहे..!
हल्ली ब्लॉगक्षेत्रात खूप नवीन नवीन गॅजेट्स का काय म्हणातात ती आली आहेत, त्याचा कल्पकतेने वापर करून मिपाचा हा अत्यंत पेश्शल असा पाककृती-ब्लॉग तयार करता येईल.. त्यात शाकाहारी, मांसाहारी, न्याहरी, पेयं.. अशी सुरेख वर्गवारीही करता येईल आणि मला खात्री आहे, की marathiblogs.net वर मिपाच्या पाककृतींचा एक अतिशय देखणा ब्लॉग मिपाच्याच नावावे झळकेल..!
अर्थात, हे अत्यंत वेळखाऊ आणि कष्टाचं काम आहे..परंतु ते व्हॉलंटरीली कुणीतरी केलं पाहिजे असं मात्र मनापासून वाटतं..
असो..
जे मानात आलं ते मोकळेपणाने आपल्यासमोर मांडलं..
बहुतांशी मिपाकर माझी ही कल्पना उचलून धरतील असा अंदाज आहे..
कळावे..
तात्या,
एक सामान्य मिपाकर.
kind attn: नीलकांत, गणपा..
वाचने
15111
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाची क्षमता
>>एवढ्यात मिपाचे जूने लेख व
In reply to मिपाची क्षमता by नीलकांत
सहमत
In reply to मिपाची क्षमता by नीलकांत
मिपाला सध्या सगळ्यात गरज असेल
In reply to मिपाची क्षमता by नीलकांत
+१
In reply to मिपाला सध्या सगळ्यात गरज असेल by जयंत कुलकर्णी
+++++११११
In reply to +१ by लाल टोपी
स्वसंपादन सोय विसरला दादानु
In reply to मिपाला सध्या सगळ्यात गरज असेल by जयंत कुलकर्णी
एखाद्या विशिष्ट लेखकाचे सर्व लेख बघायचे असल्यास काय करायचे ?
In reply to मिपाची क्षमता by नीलकांत
थेट लिंक नाही
In reply to एखाद्या विशिष्ट लेखकाचे सर्व लेख बघायचे असल्यास काय करायचे ? by रॉजरमूर
लिंक ची सुविधा दिल्यास उत्तम होईल
In reply to थेट लिंक नाही by पैसा
तात्या ... रोशनी आत्ता कुठे
पुन्हा एकदा..
हे करता येईल
>>सर्व पाककृतीचा एक वेगळा
In reply to हे करता येईल by वेताळ
मग
In reply to >>सर्व पाककृतीचा एक वेगळा by विसोबा खेचर
नीलकांताशी
हिहिहि
In reply to नीलकांताशी by jaypal
पाककृतींसंबंधी
नीलकांतशी सहमत.... पाककृती
इथेच राहू देत...
इथल्या पाक्रु म्हणजे मिपाचा
मिपावरच असू दे.
टॅक्सॉनॉमी (वर्गवारी)
अगदी हेच
In reply to टॅक्सॉनॉमी (वर्गवारी) by वाचक
आभार...
खरं तर वर्गवारीची गरज हेच या
खरं तर वर्गवारीची गरज हेच या धाग्यामागचं एक महत्वाचं कारण..इतक्या सुंदर रसोईघरात शाकाहारी, मांसाहारी, न्याहरी, पेयजल इत्यादी वर्ग हवेतच हवेत असं मनापासून वाटतं...ही कल्पना खरेच उपयोगी आहे. परंतू यासाठी वेगळा ब्लॉग सुरू करणे जरूर नाही. जसे बुवांनी सुचवलेले पाककृतीचे अनेक उपप्रकार आहेत तसेच गद्य साहित्य, पद्य साहित्य (कविता), चर्चा, कलादालन, इत्यादीतही अनेक उपप्रकार आहेत. ह्या उपप्रकारांमध्ये मोडणार्या साहित्याचा संच सहजपणे उपलब्ध झाला तर ही फार चांगली सोय होईल. त्यासाठी एक सुचना खालीलप्रमाणे: 'मेन मेन्यु' ऑप्शन्सना जर 'ड्रॉप डाऊन सबमेन्यु' ची व्यवस्था करता आली तर हे काम जास्त सुटसुटीत होऊन हव्या त्या उपप्रकाराचा लेखनसंग्रह सहज उघडण्याची सोय मुख्य पानावरूनच होईल.-
जे काय करायचं ते इथंच होऊ दे,
वेगळा ब्लॉग नको
निलाकांतशी १००% टक्के सहमत..