Skip to main content

चिन्यांचा उपद्व्याप

लेखक कोमल यांनी शुक्रवार, 26/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.
  • चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
  • चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे." ghusakhori आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये? १९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून. फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला. आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील? आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक?? आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का? (चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल फोटो गूगल कडून साभार

वाचने 103189
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

चीन्यांनी येउन भारत च ताब्यात घ्यावा अश्या मताचा मी झालो आहे हल्ली. नाहीतरी दिवसेंदिवस नरक च होत चालला आहे भारताचा

In reply to by प्रसाद१९७१

चीन ने येऊन भारतावर राज्य करयची वाट पहाण्यापेक्षा तुम्हीच का नाही चीन मध्ये जात..?? कशाला ह्या नरकात रहाता? उगीच लोकशाही वगैरे... मस्त पैकी चीनमध्ये जायचं न गप बसुन राहायच.. (बोलायची सोय नाही म्हणे तिथे..)

In reply to by पिलीयन रायडर

अगं त्यांनी उपरोधाने, वैतागाने म्हटले आहे. अर्थात त्यांची बाजू नाही घ्यायची. एका प्रतिसादावर त्यांनी मला "मूर्ख" म्हणून झालेले आहे. तेव्हा मला काही फार सहानुभूती नाही ;) पण वेल ..... त्रागा असावा असे नीरीक्षण मांडू इच्छिते.

In reply to by शुचि

उपरोधाने.. असेल बाई.. पण त्यांच्या १-२ ठिकाणी त्यांचे प्रतिसाद वाचुन मला असं वाटलं की भारत खरच नरक वाटत असेल त्यांना..

In reply to by शुचि

तुमचे बरोबर आहे. माझा त्रागाच आहे, ह्या देशात काही चांगले होणार नाही ह्यातुन आलेला

In reply to by पिलीयन रायडर

एका नरकातुन दुसर्यात जाण्यात काय अर्थ आहे? पण खरी गोष्ट अशी आहे की आपण सुध्धा चीनला धमकावले पाहीजे. नाहीतर हे दिवसेंदिवस वाढतच जाईल. पण आपल्या देशातील नपूंसक पुढार्यांकडुन हे अपेक्शीत नाही. आणी.... जर धमकावले व चीन ने आक्रमण केले, व अमेरीका आपल्या मदतीला नाही आला तर, आपला बँड वाजायला जास्त वेळ लागणार नाही. पण त्यानंतर.....कमीत कमी पुन्हा एक नवीन सुरवात तर करता येईल.

In reply to by पिलीयन रायडर

तुम्हाला कोणी सांगितले की भारतात खरे ते बोलता येते. माझ्या इथला ( आणि तुमच्या इथला पण ) नगरसेवक, आमदार खोर्‍यानी पैसा खातो आहे. पण हे सत्य जर मी सार्वजनिक रित्या बोललो तर माझे हात पाय एक दिवस पण जागेवर रहाणार नाहीत. ह्याला तुम्ही लोकशाही म्हणता का? अल्पवयिन मुली वर ( ५ वर्षाच्या ) बलात्कार केला म्हणुन तक्रार करायला गेलेल्या बापाला पोलिस २००० रुपये घे आणि गप्प बस असे सांगतात. ह्याला तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असे म्हणता का? त्या पेक्षा चीन काय वाईट. कष्ट केले तर नीट जगता तरी येते.

हेलिकॉप्टर्स ३०० किमी आत येऊन कोणाला कळले नाही?

असल्या बातम्या वाचुन डोक्याला शॉट लागतो. काय होणार काय माहिती. देश कसा काय चालतो असा प्रश्न मला अनेकदा पडतो. चीन समोर आपण काहीच नाही हे सत्य आहे, पण अमेरिका वगैरेला मधे आणुन काही करता आलं तर बरं.

In reply to by कोमल

अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र आहे अमेरिका हे आपले शत्रुराष्ट्र आहे. जर पाकिस्तान आपला शत्रु आहे,आणि त्याला हरप्रकारे अमेरिका मदत करतो,मग शत्रुचा मित्र आपला मित्र कसा असु शकतो ? हिंदीत याच्या उलट एक म्हण आहे,दुष्मन का दुष्मन अपना दोस्त होता है !

In reply to by शिल्पा ब

अमेरिका हा ब्रिटनचा, इस्त्रायलचा, जपानचा, तैवानचा मित्र आहे. उद्या या देशांवर जर कुणी दुसर्‍या देशाने हल्ला केला तर अमेरिका नि:संशय आपले सैन्य तिथे उतरवेल... वरील लिस्टमध्ये भारताचा समावेश नाही याचं दु:ख्ख जरूर आहे, पण तो देश कुणाचाही मित्र नाही हे विधान पटण्यास कठीण आहे. रच्याकने: भारत वर दिलेल्या कसोटीवर कुठल्या दुसर्‍या देशाचा मित्र आहे?

In reply to by पिवळा डांबिस

मूळ विषया पासुन विषयांतर होत आहे तरी सुद्धा इथे एक संदर्भ देतो :- ndian frigate INS Khukri was sunk by the PNS Hangor (S131), while INS Kirpan (1959) was damaged on the west coast. In the Bay of Bengal, the aircraft carrier INS Vikrant (R11) was deployed to successfully enforce the naval blockade on East Pakistan. Sea Hawk and the Alizés aircraft from INS Vikrant sank numerous gunboats and Pakistani merchant marine ships.[25] To demonstrate its solidarity as an ally of Pakistan, the United States of America sent Task Force 74 centred around the aircraft carrier USS Enterprise into the Bay of Bengal. संदर्भ :-Indian Navy जो देश एखाद्या युद्धात पाकिस्तानच्या बाजुने आपले युद्ध पोत हिंदुस्थानाच्या विरोधात पाठवतो,तो हिंदुस्थाना शत्रु नाही का ?

In reply to by मदनबाण

राजकारणात आणी देश्कारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. उद्या पाकिस्तानने जर आपल्या काश्मीर वरील हक्क सोडून दिला, दहशतवाद्यांना आधार देणे सोडले आणी आपल्याशी व्यापार वाढवला तर त्यांचा फार मोठा फायदा होईल. असे झाल्यास त्यांच्याशी शत्रुत्व ठेवण्याचे आपल्या कारणच राहणार नाही. ( शक्यता >० .१ %)

In reply to by मदनबाण

निक्सनने एन्टरप्राईझ बंगालच्या उपसागरात पाठवायचं ते पाउल भारताच्या विरोधातच मानलं गेलेलं होतं. पण त्याला फक्त भारतविरोधी शतृत्व हा एकच रंग नव्हता. ती आंतरराष्ट्रिय राजकारणातली एक खेळी होती. अमेरिकेला त्यावेळी चीनशी संवाद प्रस्थापित करायचा होता आणि त्यात पाकिस्तान हा सहाय्यक होत होता. भारताच्या बांगला युद्धाने ते राजकारण बिघडत होतं. म्हणून ते तसं करण्यात आलं, उलट जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा हे एक नविन लोकशाही राष्ट्र आपलं (एका लोकशाही राष्ट्राचं)मित्र होईल अशीच अमेरिकन राज्यकर्त्यांची कल्पना होती. पण भारताच्या तत्कालीन राज्यकर्त्यांना तेंव्हा समाजवादाचे डोहाळे लागलेले होते. आणि साम्यवादी/समाजवादी युएसेसार त्यावेळेस अमेरिकेचा हाडवैरी होता. याचा फायदा पाकिस्तानने अचूक उचलला आणि स्वतःला अमेरिकेचा मित्र बनवलं. पुढे स्तालिनने आपल्या करणीने आपल्या समाजवादी राज्यकर्त्यांचे डोळे खाडकन उघडले, ते सोडा... एक सांगतो, भारत-पाकिस्तानच्या रिलेशनमध्ये जेंव्हा भारत किंवा पाकिस्तान काही करतात तेंव्हा ते त्याच संदर्भात करतात. जेंव्हा तिसरा देश काही अ‍ॅक्शन घेतो (मग ते अमेरिकेचं एन्टरप्राईझ असो की अग्नी मिसाईलच्या चाचणीनंतर ऑस्ट्रेलियाने केलेला आपला निषेध असो), त्याला आंतरराष्ट्रिय रंग असतात. प्लीज डोन्ट गेट फिक्सेटेड लोकली, ट्राय टू सी द होल बोर्ड!

In reply to by पिवळा डांबिस

अमेरिकेने पीएल४८० {पब्लीक लॉ ४८०) च्या अंतर्गत अगदी निष्कॄष्ठ दर्जाचा गहु (तिथे जनावर पण या गव्हाला तोंड लावायचे नाहीत म्हणे !) भारतात धाडला होता,१९६५ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात आपली सरशी झाली तेव्हा आपली बाजु घेण्या ऐवजी अमेरिकेने पाकिस्तानचीच बाजु उचलुन धरली आणि आपल्या व्हिक्टरी मार्चला थांबण्यास सांगितले,त्यावेळी देशात धान्याची कमी होती,मग अमेरिकेने हाच निष्कॄष्ठ दर्जाचा गहु पीएल४८० गहु तुम्हाला देणार नाही असा दबाव शास्त्रीजींवर आणला,शास्त्रीजींनी धडाक्यात सांगितले आम्हाला तुमचा गहु नको. आपल्याला "जय जवान जय किसान" ही घोषणा ठावुक असेलच... ती शास्त्रीजींनीच दिली.त्यावेळी देशात अन्नाची कमी आहे तेव्हा दर सोमवारी उपास करा असे शास्त्रीजींनी आपल्या देशातल्या लोकांना आवाहन केले,आणि लोकांनी ते आचरणात देखील आणले. अशी अनेक आणि असंख्य उदाहरणे देता येतील... असो सध्या चीन कडेच पाहुया.

In reply to by मदनबाण

पिडां काकांचा वरचा प्रतिसाद परत वाचला, हा लेख वर आला आणि त्यांच्या प्रतिसादातल्या रिचर्ड निक्सन यांचा उल्लेख वाचला...आज चीन विषक लेख शोधताना निक्सन देखील सापडले. भारत पर हमला करने की फिराक में था अमेरिका, वजह था पाकिस्तान! असो...हल्ली रशिया आणि चीनची मैत्री फार घट्ट झालेली दिसते आहे !तेल करार आणि इतर वेगवेगळे करार. बरं तो प्रिझम चे भांडाफोड करणारा स्नोडेन हॉकाँग मधुन सरळ रशियात गेला तेव्ह्या या दोघांच्या गहन मैत्रीची कल्पना आली. जाता जाता :- पाकड्यांना भारता विरुद्ध लढाईत Patton टँक देणारी अमेरिकाच होती. धन्य तो अब्दुल हमीद ज्याने खेमकरण मधे या टॅंकची कबरच बांधुन टाकली.

जाऊ द्या हो. चिनही एके काळी भारताचाच भाग होता (अगदी जपान सुद्धा) इतक्यात विसरलात काय? रच्याकने: एक संवाद भारतः ए चिन, का रे दादा आलास? चिनः काय नाय सहज फिरत फिरत आलो, कोणी दिसेना इथं, म्हटलं बघू कुठे गेलायस तू. भारतः ए असं नाय करायचं हा! मी कट्टी करीन. चिनः कशी कट्टी करशील? मी तर क्रिकेटपण खेळत नाही. पण तुझ्या क्रिकेटच्या ब्याटी मीच बनवतो! भारतः ए अमेरीका.. बघ ना कसा हा दादा! चिडवायचा हाच ह्याचा धंदा!

२०१० पासुन चीनने आपल्या देशात ६०० पेक्षा जास्तवेळा घुसखोरी केलेली आहे.चीनची वॄत्ती दुरगामी विचार करण्याची आहे.माझ्या मता नुसार चीन या घुसखोरीतुन हिंदुस्थानच्या सर्व बाबींचा अभ्यास करत असावा,म्हणजे घुसखोरी झाल्यावर आपल्या देशातुन पहिली प्रतिक्रिया काय उमटते,राजकिय हालचालींना केव्हा आणि कितपत वेग येतो,तसेच आपल्या सैंन्यांची हालचाल नेमक्या कोणत्या प्रकारे केली जाते. याचा एक पॅटर्न तयार होतो ज्याचा चीन अभ्यास करत असावा.मागच्या वेळी मिपावर जपान मधल्या अमेरिकी तळांबद्धल मी एक प्रतिसाद दिला होता,त्यावेळी चीन जपानशी आगळीक करेल असा अंदाज होता,आता तसे घडले आहे हे जगजाहिर आहे.हीच गोष्ट ग्वादार बंदराला देखील लागु होते. येत्या काही काळात चीन चे एक मोठ्ठे एअरक्राफ्ट कॅरिअर समुद्रात उतरवले जाईल ज्याची बांधणी सध्या चालु आहे,सध्या त्यांच्याकडे रशियन बनावटीचे एकच एअरक्राफ्ट कॅरिअर आहे.चीन आणि जपान यांचे संबंध तणावाचे असतानाच चीन आपल्या देशात आपल्याच जमिनीवर येउन बसला आहे आणि मागे हटण्यास तयार दिसत नाही. आपल्या देशाचे प्रंतप्रधान त्यांच्या मौना बद्धल प्रसिद्ध आहेत्,या घटने बद्धल त्यांचे मत अजुन तरी माझ्या वाचनात आलेले नाही,पण जपानचे प्रंतप्रधान चीनला काय सांगतात ते इथे वाचता येईल. आपल्या दॄष्टीने विचार करायचा झाला तर चीनची खरी ताकद ही त्यांच्या निर्यातीत आहे,त्यावर अंकुष आणायला हवा,म्हणजे आपल्या देशाशी होणार्‍या व्यापारामुळे त्यांना जो फायदा होतो आहे त्यावर अंकुष लावणे आपल्या हातात आहे,तसेच जपान आणि चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे. बाकी सध्याची आपली परिस्तिती पाहता सर्व लक्ष आर्मी चिफ विक्रम सिंग यांच्यावरच आहे...

In reply to by मदनबाण

चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे. हे चीनच्या जवळ असणार्‍या राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे असे हवे आहे.

In reply to by मदनबाण

जपान सारखे राष्ट्र एवढेसे* असुनही चिन्यांना टक्कर देतंय, आणि आपली चिन्यांनी खोडी काढली की आप्ल्याला फक्त चर्चाच कराव्याश्या वाटतात... *एवढेसे हे म्हणणे क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे टेक्नॉलॉजी बाबत नव्हे..

In reply to by कोमल

नुसती टक्कर नाही. दुसर्‍या महायुद्धाअगोदर जपानने चीनचा बराच भाग काबीज केला होता. जर दुसर्‍या महायुद्धात जपानचा पराभव झाला नसता तर कदाचित आजचा चीन आस्तित्वातच नसता.  (नकाशा आंतरजालाच्या सौजन्याने)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरच्या नकाशातला तांबड्या रंगात दाखविलेला चीनचा भाग जपानने काबीज केला होता. देशाचे कर्तृत्व त्याच्या क्षेत्रफळाच्या मोठेपणापेक्षा त्याच्या नेतृत्वात किती धमक आहे यावर अवलंबून असते... नाहीतर ब्रिटन सारख्या छोट्या बेटाचे जगभर (कधीच सूर्य न मावळण्याएवढे मोठे) साम्राज्य झाले नसते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

देशाचे कर्तृत्व त्याच्या क्षेत्रफळाच्या मोठेपणापेक्षा त्याच्या नेतृत्वात किती धमक आहे यावर अवलंबून असते
सहमत आणि हिच धमक भारताच्या नेतृत्वात प्रभावी नाहिये असं म्हणावं लागेल का??

In reply to by कोमल

>>> आणि हिच धमक भारताच्या नेतृत्वात प्रभावी नाहिये असं म्हणावं लागेल का?? भारताचे वर्तमान नेतृत्व अत्यंत दुर्बल आहे ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by मदनबाण

तसेच जपान आणि चीनच्या जवळ असणार्‍या राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे. चला मनमोहन सिंग यांना लव्ह इन टोकियोझाले तर...

इतकं होउनसुद्धा पुन्हा काँग्रेसच येणार निवडुन ! बाकी चीनने तिबेट घेतला, अरुणाचलवर हक्क सांगताहेत अन आता फौजा आत घुसायला लागल्यात तरी आपले सरकार गप्पच...अन लोकांना पडली क्रिकेटची चिंता. उत्तम.

सध्या मी म्हन्तो संरक्षण मंत्री कोण आहे ? फार पूर्वी एक होते संरक्षण मंत्री ते बारामतीतून पाकिस्तानला सज्जड दम देत असत. पाकिस्तानी कुरापती खपवून घेतल्या जाणार नाहीत. वगैरे आता असा दम देणारी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे शेजार्‍यांचं फावतय.

१९६२ च्या चीनबरोबरच्या युद्धात खरे म्हणजे भारतीयांची सरशी होत होती. एक भारतीय सैनिक पाच चीनी सैनिकांना भारी पडत होता पण त्यांची संख्याच अफाट, आपण टिकाव धरू शकलो नाही.. एक भारतीय सैनिक पाच चीनी सैनिकांना भारी इ इ अशा थापा यावेळी मारू नयेत ही विनंती.

वरील सर्वान्शी सहमत....!!
२०१० पासुन चीनने आपल्या देशात ६०० पेक्षा जास्तवेळा घुसखोरी केलेली आहे
याचा पत्ता भारतीय नागरिकाना लागण्यास ३ वर्षे लागली याला काय म्हणावे ??? ज्याना याची जाणीव होती ते यावर कसली उपाययोजना करत होते ?? याचे उत्तर मिळेल काय ?? आम्ही नेहमीच इतके गाफिल का असतो ?? विषेशता शत्रुरास्।ट्रा इतिहास आम्हाला अवगत असताना व पूर्वानुभव असताना ?? हे असे किती दिवस होत राहणार व कधी थाबणार ?? शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चेने' हा प्रश्ण सुटेल का ?? यावर कोणी जाणकार मिपाकर जरा प्रकाश टाकतील का ?? 'इन्दिराबाई असताना चीनने असे कधी केल्याचे ऐकिवात नाही..' आज बाईन्ची आठवण प्रकर्षाने येते अशावेळी, कारण त्यान्ची कारकीर्द पाहिली आहे, असा खम्बीर पन्तप्रधान या देशाला दुर्दैवाने पुन्हा लाभला नाही, निदान अशा प्रसन्गी कणखर भूमिका घेणारी व देशाला आधारभूत वाटणारी दुसरी व्यक्ती आज तरी दुर्दैवाने आजच्या आमच्या भारतीय राजकार्णात दिसत नाही. जर हे प्रकरण चिघळले तर ते आजच्या परिस्थितीत आप्ल्याला ( जनतेलाच फक्त = आजचा सरकारी आम आदमी ) केव्हढ्याला पढेल ?? हासुद्धा एक गम्भीर प्रश्णच आहे. विनोद१८

.... China has moved new advanced longer range CSS-5 missiles close to the borders with India and developed contingency plans to shift airborne forces at short notice to the region, according to Pentagon. Despite increased political and economic relationship between India and China, the Pentagon in a report to the US Congress said, tensions remain along the Sino-India borders with rising instances of border violation and aggressive border patrolling by Chinese soldiers.

ही परिस्थिती आली आहे.शेजारी लायक असेल तर त्याच्याबरोबर शांतीपुर्ण संबध ठेवा. अन्यथा नाठाळाच्या माथी काठी..... आपण जर चीनच्या त्या सैनिकाना भारतिय हद्दीत प्रवेश करुन चौकी उभी केल्याच्या आरोपाखाली अटक केली तरच ह्या ठिकाणी आपण बाजी मारु अन्यथा ती चौकी वास्तविक नियत्रंण रेषा बनेल.

२ वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी सी बी आय चे लोक अण्णांनी जिथे बालपण घालवले त्या नगर, भिंगार या भागात हिंडत होते तरुणपणी अण्णांकडून काही वावगे घडले आहे का याचा शोध घेण्यासाठी. पण ते सापडले नाही. मग हे लोक अगदी लहानपणी शाळेत असताना एखाद्या मुलीबरोबर अण्णंची मैत्री होती का याचा शोध घेऊ लागले. फार नाही पण पाटीवरच्या पेन्सिलीची देवाण घेवाण करीत असतील तर शोधावे आणि प्रसिद्ध करून टाकावे म्हणजे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची धार कमी होइल असा मनिमोहन यांचा अंदाज होता. यात अण्णांच्या संस्थेला इन्कम टॅक्स खात्याची खोटी नोटीस आणि मग माफी. हेही प्रकार झाले. (ही माफी सध्याचे मुख्यंत्री यांनी मागितली) या भंपकांनी(मनिमोहन, दिग्गी, चिदंबरम) एवढे डोके सरहद्दींच्या रक्षणासाठी लावले असते तर बरे झाले असते.

यावेळची स्थिती जराशी वेगळी वाटत आहे,कारण आत्ता पर्यंत जितके वेळा चीनने घुसखोरी केली तितके वेळा ते परत देखील गेले,जाताना सिगरेटची पाकिटे टाकुन जाणे,दगडांवर लाल रंगाने खुणा करणे इत्यादी उद्योग चीनी सैन्याने केले.पण आता मात्र ते जागेवरुन हलण्यास तयार नाहीत.काही जणांचे म्हणणे आहे,की सरकारने कठोर निर्णय घेतला नाही तर कारगिल सदॄष्य परिस्थिती सुद्धा उद्भवु शकते. आपल्या लष्कराच्या दौलत बेग ओल्डी मधे हालचाली सुरु झाल्याच्या बातम्या आहेत...भारतीय वायुसेना Mi-17-V5 या चॉपर हॅलिकॉप्टरसा वापर करुन सामुग्री पोहचवण्याचे काम करत आहे. खालच्या दुव्यात तुम्हाला सध्या ज्या क्षेत्रात जिथे या घडामोडी चालु आहेत त्याची सॅटलाईट पोझिशन कळुन येईल.(थॅक्स टू विकिमॅपिया) यात दैलत बेग ओल्डी येथील अ‍ॅडवान्स लँन्डींग ग्राउंड तसेच depsang plains पहायला मिळेल.(डाविकडे वरती) सॅटेलाईट व्ह्यू :- http://is.gd/l26qGv

In reply to by मदनबाण

यावेळची स्थिती जराशी वेगळी वाटत आहे
हे आपल्या सारख्याला पटतयं आणि भारताच्या "संयमी" धोरणाने काय धोका उद्भवू शकतो हे ही आपण ओळखू शकतो.. अजून किती दिवस आपण मनमोहन मोड वर राहणार आहोत सरकारलाच ठाउक..

वरचा भारताच्या नकाशाचा भाग म्हणजेच विनोद आहे.

चीनने वेळ अगदी अचूक साधली आहे. एक अत्यंत निष्क्रीय व्यक्ती (यशवंत सिन्हांच्या भाषेत 'निकम्मा') पंतप्रधानपदावर कळसूत्री बाहुलीसारखी बसविलेली आहे. त्या व्यक्तीच्य आडून वेगळ्याच व्यक्ती कारभार चालवितात. या व्यक्तीची व सरकारची गेली ९ वर्षे देशाला लुटण्यात गेली. कोळसा घोटाळा, २जी घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, आदर्श घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, वड्राच्या भानगडी . . . मोजदाद करता येणे अशक्य आहे. हे सरकार सर्व बाजूंनी भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. एक घोटाळा निस्तरायच्या पुढचा घोटाळा बाहेर येतो. पंतप्रधान आपल्या घोटाळेखोर मंत्र्यांना वाचविण्यात गर्क आहेत. हे सर्व सुरू असताना देश खड्ड्यात चालला आहे याचे कोणालाही भान नाही. निर्णयशक्तीचा संपूर्ण अभाव असलेले निष्क्रीय पंतप्रधान, लूटमार करून देशाची संपत्ती ओरपण्यात मग्न असलेले सरकार, याच लोकांना पुन्हापुन्हा निवडून देणारी जनता व भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देण्यात मग्न असलेली नोकरशाही या सर्वांचा पुरेपूर फायदा उठवून चीनने १९६२ नंतर पुन्हा एकदा भारताचा भूभाग बळकावला आहे. भारताचे नेतृत्व अत्यंत दुर्बल असून देशापेक्षा स्वत:ची तुंबडी भरण्यातच ते गर्क आहेत, आपल्याला कणभरही प्रतिकार होणार नाही व केवळ तोंडी निषेधाची वाफ दवडली जाईल हे ओळखण्याइतका चीन धूर्त आहे. १९६२ मध्ये चीनने बळकावलेला भूभाग आजतगायत परत मिळविता आलेला नाही. चीनने आज बळकावलेला भूभाग परत मिळविणे अत्यंत अवघड आहे. १९६२ नंतर पुन्हा एकदा भारताला एक अत्यंत दुर्बल पंतप्रधान मिळाला हे भारताचे दुर्दैव आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्णपणे सहमत. मी म्हणतो मिपाकरांना ज्या गोष्टी सहजपणे कळतात त्या गोष्टी सरकारमध्ये बसलेल्या दुढ्ढाचार्यांना कशा कळत नाहीत. इतके मूर्ख सरकार यापूर्वी कधीही मिळाले नव्हते. काँग्रेस पक्षाने चीन सरकारबरोबर संगनमत करुन त्यांना कर्नाटक मतदान होईपर्यंत तात्पुरती माघार घ्यायला लावलेली दिसते आहे. एकदा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या की पुन्हा एकदा चीनला मोकळे रान द्यायला काँग्रेजी नेते मोकळे होतील.

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळून मोदी पंतप्रधान व्हायची शक्यता असल्याची कुणकुण चीनला लागली असावी व त्यांनी घाबरुन माघार घेतली असावी असाही एक कयास करता येईल.

In reply to by शिल्पा ब

त्यांच्या मते म्हणजे मैडमच्या मते ! Sonia (चित्र जालावरुन) बाकी आता देशाचा प्रतंप्रधान सुद्धा जपान मधुन इंपोर्ट करावा म्हणतो ! बाकी सरकारची सर्व परिस्थीती येणार्‍या काही निकालां नंतर युपीए-२ चे दिवस भरले असे समजुन येईल. बाकी देशातली राजकिय तसेच सामाजिक अस्थिरता, लयाला गेलीली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था,चीनची घुसखोरी आणि सबजितल सिंगला पाकिस्तानात झालेली जिवघेणी मारहाण याचात मला एकसुत्रता दिसु लागली आहे. जाता जाता :--- स्वकीयच जर राष्ट्राची लुट करण्यात मग्न असतील,तर परकियांनी अतिक्रमण केले याचे नवल का वाटावे ?

In reply to by मदनबाण

या काही दिवसात २ पुस्तके प्रकाशित केली गेली,एक संजय बारू यांचे आणि दुसरे पी सी पारख यांचे. या दोघांनीही मौनी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावर तोफ डागली आहे,या विषयालाच अनुसरुन असणारे वरती दिलेले व्यंगचित्र परत एकदा आठवले.

In reply to by कोमल

>>> भारताच्या पं.प्र.च्या मते चीनचा मुद्दा फार गंभीर नाही... गांधी घराण्याची चमचेगिरी हे एकच काम ते गंभीरतेने करतात. बाकी सर्व म्हणजे देश, जनता, देशाची सुरक्षा, दुष्काळ इ. किरकोळ गोष्टींना ते फार महत्त्व देत नाहीत. शेवटी काही झालं तरी ते थोर अर्थतज्ज्ञ, निधर्मी, हाडाचे राजकारणी नसलेले, सभ्य, सुसंस्कृत वगैरे आहेत. त्यामुळे त्यांच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कालचे ते सांगत होते की सर्व जग भारताला हसत आहे. वयोमानानुसार त्यांच्या हे लक्षात आलेले नाही की जग भारताला हसत नसून त्यांच्यासारख्या कठपुतळ्यांना व त्यांच्या महाभ्रष्टाचारी व निष्क्रीय सरकारला हसत आहे.

आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे.
हा हा हा एक लंबर. खरं तर आता जनतेनेच तिथे आंदोलनाला गेले पाहिजे. हे राजकारणी काही हलचाल करणार नाहितच.

>>> आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे. १९६२ मध्ये चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली होती तेव्हा नेहरू असे म्हणाले होते की "तिथे गवताचे पातेही उगवत नाही" (म्हणजे तो भाग महत्त्वाचा नाही). वाचाळवीर शिंदे अगदी त्याच अर्थाचे बोलले आहेत. १९६२ ची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. तेव्हा नेहरूंसारखे भोंगळ पंतप्रधान होते, आज त्यांचीच दुसरी आवृत्ती पंतप्रधानपदावर आहे. मनमोहन सिंगांना या घुसखोरीचे काहीच महत्त्व वाटत नाही. साहजिकच आहे. ते आपल्याला व आपल्या सहकार्‍यांना कोळसा घोटाळा व २जी घोटाळ्यातून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चीनची घुसखोरी अशा किरकोळ मुद्द्यांकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नाही. एकदा त्यांनी 'Clean Chit' मिळविली की ते ताठ मानेने वावरायला लागतील. पण जनतेच्या मनात मात्र त्यांची 'Clean Cheat' अशीच प्रतिमा कायम राहील.

In reply to by मदनबाण

सत्ताधार्‍यांना कुणी तरी इतिहासाचे पुस्तक आणून द्यायला पाहीजे आणि त्यांची नंतर परिक्षा पण घ्यायला पाहीजे. केंद्रातील कुणालाच देशाची फिकीर नाहीये. काय होणार आहे भारतात देव जाणे. किंवा मैडम जाणे..

स्थानिक मुद्दा ? अहो मनमोहन सिंग तुम्ही याच देशाचे पंतप्रधान आहात ना ? मग हा स्थानिक मुद्दा कसा होउ शकतो ? चीन ने असे उद्गार काढले असते तर आम्ही समजु शकलो असतो कारण चीन चे धोरण समजणे तसेही कठीण्,पण या देशाचा भागावर अतिक्रमण झाल्यावर तो राष्ट्रीय मुद्दा झाला त्याला तुम्ही स्थानिक मुद्दा म्हणण्याची गोडचुक कशी करु शकता ?शिंदेच्या बेताल वक्तव्यांचा मक्ता आता तुम्ही घेतलात काय ?आपल्या देशाच्या आत चीन घुसखोरी करुन तंबु ठोकुन बसला हे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले सरळ सरळ आव्हान असताना मनमोहन सिंग तुम्ही याला स्थानिक मुद्दा म्हणता ? याचा अर्थ तो भाग आपल्या देशाचा नाही असे तुम्ही जनतेला आडुन सुचवु इच्छिता काय ? सरकारकडुन कठोर वक्तव्याची अपेक्षा असताना हे भलतेच वक्तव्य तुम्ही कसे काय करु शकता ? प्रतंप्रधानांच्या या वक्तव्याचा एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन मी निषेध करतो ! Chinese incursion: 'India should be ready for the worst'

In reply to by मदनबाण

तुमच्या निषेधाने काय फरक पडणार आहे? बाकी कशानेच काय फरक पडणार आहे हा सुद्धा एक मुद्दा आहेच.

In reply to by शिल्पा ब

तुमच्या निषेधाने काय फरक पडणार आहे? बाकी कशानेच काय फरक पडणार आहे हा सुद्धा एक मुद्दा आहेच. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर आपल्या प्रतंप्रधानांनी इतके बेताल विधान करावे हे अपेक्षित नाही,इतरवेळी आघाडीचे सरकार आहे अशी हतबलता हे मनमोहन सिंग सातत्याने बोलुन दाखवत आले आहे,पण देशाच्या सुरक्षतेत सुद्धा आम्ही हतबल आहोत असा संदेश एका प्रकारे त्यांनी आपल्या राष्ट्राला दिला आहे याची चीड मला आली आणि मी निषेध नोंदवला. एका निषेधाने सरकारला काही फरक पडणार नाही, परंतु या देशाचा नागरिक म्हणुन प्रत्येकाने जिथे जमेल तिथे तो योग्य वेळीच नोंदवलाच पाहिजे.

माझ्या इथला ( आणि तुमच्या इथला पण ) नगरसेवक, आमदार खोर्‍यानी पैसा खातो आहे. पण हे सत्य जर मी सार्वजनिक रित्या बोललो तर माझे हात पाय एक दिवस पण जागेवर रहाणार नाहीत. ह्याला तुम्ही लोकशाही म्हणता का? अल्पवयिन मुली वर ( ५ वर्षाच्या ) बलात्कार केला म्हणुन तक्रार करायला गेलेल्या बापाला पोलिस २००० रुपये घे आणि गप्प बस असे सांगतात. ह्याला तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असे म्हणता का? त्या पेक्षा चीन काय वाईट. कष्ट केले तर नीट जगता तरी येते.

In reply to by प्रसाद१९७१

चीन मध्ये यापेक्शा वाइट आहे...मी ३ महिने होतो तिथे ....तिथल्याच लोकांकडुन ऐकले आहे

In reply to by टवाळ कार्टा

पुढे जायचे असेल तर दुसर्‍याचे गुण घ्यावे आणि त्याच्या दुर्गुणांपासून धडा घेऊन त्यांचा उपयोग आपण ते टाळण्यासाठी करावा. दुसर्‍याच्या दुर्गुणामुळे आपले दुर्गुण झाकून जात नाहीत आणि सद्गुणही बनत नाहीत. चीनमधील राजकिय परिस्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय कम्युनिझमपेक्षा लोकशाही ही केव्हाही जास्त चांगली राजकिय व्यवस्था आहे. तेथले लोक, विशेषतः तरूण, सरकारबद्दल नाराज आहेत आणि तसे उघडपणे बोलूनही दाखवतात. पण, चीनमध्ये जी काही मूलभूत विकासाची कामे केली गेली आहेत (रस्ते, रेल्वे, विमानसेवा, स्वच्छता, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्योगधंदे, इ.) याबाबतीत भारत त्यांच्या पासंगालाही पुरत नाही हे ढळढळीत सत्य तेथल्या काही दिवसातच दिसते. अर्थात हे सगळे चीनसारख्या आवाढव्य देशात सगळिकडे आहे असे मला म्हणायचे नाही, पण निदान २०-३० टक्के (चीनच्या नागरी विभागांत) तरी नक्की आहे. त्यामानाने आपल्या येथील सार्वजनीक क्षेत्राची कामगिरी (नागरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत) कशी आहे हे सांगायला पाहिजे काकाय? विकास कामांवर कागदोपत्री खर्च भरपूर आहे पण पावसाच्या दोन थेंबांनी विरघळणारे रस्ते बनवण्याच्या पेटंटावर सर्व जगात केवळ आपलाच पहिला हक्क आहे ! थोडक्यात, भ्रष्टाचार दोन्हीकडेही आहे, पण भारत त्याबाबतीत दर क्षेत्रात आघाडी राखून आहे... ही आजचीच ताजी बातमी "CAG unearths Rs 17,000 crore scam in railways".

बिचार्‍या भारतीय सैनिकांनी का आपले जीवन धोक्यात घालावे ह्या खा खा खाणार्‍या पुढार्‍यांसाठी आणि IPL बघणार्‍या जनते साठी. आता निवड्णुक आली की राजकारणी लोकांना युद्धज्वर चढेल, तेंव्हा भारतीय सैन्यानी हात वर करावेत. सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांची मुले , भाचे , पुतणे जर सैन्यात जाउन सीमेवर लढणार असतील तर च लढावे.