✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाराज

स
संजय क्षीरसागर यांनी
गुरुवार, 04/25/2013 - 07:28  ·  लेख
लेख
श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख. एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'. साधकांच्या विविध प्रश्नांना समोरासमोर दिलेल्या उत्तरांच ते संकलन आहे. महाराज महाराज कोणत्या साधनेनं सिद्धत्वाला पोहोचले हे जाणणं उपयोगी आहे. शांत बसून 'मी आहे' या जाणिवेवर स्थिर राहणं ही एकमेव साधना त्यांना बोधाप्रत घेऊन गेली. त्यांच्या शब्दात :'मी आहे' या शुद्ध असण्यावर मन एकाग्र करणे आणि त्यातच राहाणे ही गुरूंची सूचना मी पाळली. केवळ 'मी आहे' ही जाणिव मनात धरून मी तासंतास बसत असे. लवकरच शांती, आनंद आणि सखोल सर्वव्यापी प्रेम ही माझी सहजस्थिती बनली. त्या स्थितीत मी, माझे गुरू, माझे रोजचे जीवन आणि सभोवतालचे जग सारे अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन उरले.(सुखसंवाद - ५१) 'जागणे, झोपणे आणि परत जागणे सतत चालू असते पण हा अवस्था पालट मला घडत नाही. त्या अवस्था फक्त घडतात एवढेच. मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे. मी काही केले तरी ती सुमेरूवत स्थिर असते. एकदा तुम्हाला सत्यस्वरूपाची प्रचिती आली की तुम्ही त्यात स्थिर होता'. (सुखसंवाद -४२) या गृहस्थाचा आत्मविश्वास कमाल आहे आणि त्यांचे शब्द प्रत्येक साधकाला अपरिमित दिलासा आहेत. ते म्हणतात : 'मी आहे' हा साधा भाव सर्वात उत्तम. त्यावर धीमेपणानं स्थिर राहा. येथे धीमेपणा हा सुज्ञपणा आहे. अपयशाचा विचार करू नका. या कार्यात अपयश येऊच शकत नाही'. (सुखसंवाद - ५१) 'मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही सर्वव्यापी, सर्वातीत, सदवस्तू आहात - त्याप्रमाणे वागा. विचार, भावना, कृती ऐक्याने होऊ द्या. मग मी जे म्हणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. प्रयत्नाची गरज नाही. विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा'. (सुखसंवाद - ५१) 'मी सध्या चौऱ्याहत्तर वर्षांचा आहे तरी मी चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वीचे अर्भक आहे. मला स्पष्ट जाणवते की सर्व बदल होऊनही मी ते मूल आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितले, "आत्ता देखील जे मूल तू आहेस तेच तुझे स्वरूप आहे. 'मी हे आहे' किंवा 'मी ते आहे' अशा कल्पनेमुळे बिघडण्यापूर्वी 'मी आहे' हे जेथे अजून शुद्ध आहे, अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत मागे जा". तुमचे ओझे तुमच्या खोट्या तद्रूपतेमुळे आहे. त्याचा त्याग करा'. (सुखसंवाद - ५१) _______________________________ रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची उत्तरं सिद्ध कशी देतो, तो कसं जगतो हे सुखसंवादाच्या निमित्तानं आपल्याला कळू शकतं. आगदी आपल्यातलामाणूस आपल्याला सांगतोय असे हे संवाद आहेत. कोणताही सिद्ध तीन गोष्टी साधत असतो : एक, तुम्हीच सत्य आहात हे तुम्हाला सांगणं; दोन, आपण सत्य नाही असं वाटण्याला तुमच्या ज्या धारणा कारणीभूत आहेत त्या दूर करणं आणि तीन, सत्य आणि आपण यांची स्वतःच्या प्रतिभेनं सांगड घालून देणं! सत्य जरी एक असलं आणि अनेकांनी ते अनेक प्रकारे सांगितलं असलं तरी ज्या सिद्धाशी आपलं ट्युनिंग जमतं तो आपल्याला भावतो. 'स्व'चा गौरव महाराज कसा करतात ते पाहा : प्रथमच तुम्ही जाणले पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा, तुमचा स्वतःचा देखील पुरावा तुम्हीच आहात. तुमचे अस्तित्व कोणी सिद्ध करू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाला प्रथम तुम्हीच बळकटी आणली पाहिजे. तुमच्या असण्याबद्दल आणि जाणण्याबद्दल तुम्ही कोणाचे देणे लागत नाही. तुमच्या लक्षात असू द्या की तुम्ही संपूर्णपणे स्वयंसिद्ध आहात. तुम्ही कोठून येत नाही किंवा कोठे जात नाही. तुम्ही कालातीत असणे आहात, जाणिव आहात. (सुखसंवाद - ३७) सिद्धत्वाच्या स्थितीचं ते किती साधेपणानं वर्णन करतात ते पाहण्यासारखं आहे : 'मी जगाशी एकरूप आहे तरीही त्यापलिकडे आहे असे जाणल्यामुळे मी सर्व भीती आणि इच्छा यापासून मोकळा झालो. मोकळा व्हावे असे मी बुद्धिने ठरवले नाही. मला असे अढळले की मी अनपेक्षितपणे, विनासायास मोकळा आहे. तेंव्हापासूनच इच्छा आणि भिती यांचापासूनची ही मोकळीक टिकून आहे. आणखी मला असे अढळले की मी प्रयत्न करण्याची जरूरी नाही. विचारामागोमाग घटना विनाविलंब आणि अविरोधपणे घडते. विचार स्वयंपूर्ण होतात. सर्व गोष्टी योग्य रितीने आणि सहजपणे जमून जातात. मुख्य बदल मनात झाला. मन गतिहीन, मौन झाले. ते जलद प्रतिसाद देते पण प्रतिसादाला चिरस्थायी करू पाहात नाही. स्वयंस्फूर्ती हीच जीवनपद्धती झाली. खरे नैसर्गिक झाले आणि नैसर्गिक खरे झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपरंपार स्नेह, दुर्बोध आणि शांत सर्वप्रकाश, सर्वव्यापी प्रेम, स्वयंसिद्ध झाले आणि त्यामुळे सर्व चित्तवेधक, सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेम करण्याजोगे बनले. (सुखसंवाद - ५७) _______________________________ अहंकार या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल महाराज काय सांगतात ते अफलातून आहे : 'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडीतपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे. देह आणि देहाचे नांव याचा अंगीकार केला नाही, ती कल्पना सांडली तर स्वच्छ आपण, केवळ ज्ञान तेच शिल्लक राहते. अमूकतमूक म्हणून जाण नव्हे तर केवळ ज्ञान.' (सुखसंवाद - ६३) _________________________________ मला वाटतं, न्यूनगंड हा अहंकाराचा सर्वात गहन पैलू आहे. मानवी अस्वास्थ्याचं ते मूळ कारण आहे. महाराज किती सहजपणे त्याचं निराकरण करतात ते पाहण्यासारखं आहे : साधकानं विचारलंय ' मी काय शिकावे बरे? ' महाराज उत्तरतात : ' निश्चिंतपणे जगणे. ह्यासाठी तुम्ही जाणले पाहिजे की तुमचे स्वरूप अजिंक्य, निर्भय आणि सदाविजयी आहे. एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ सत्याने जीवन जगता' (सुखसंवाद - २९) _____________________ कुणालाही स्वत:प्रत आणतील अशी त्यांची ही वक्तव्यं अफलातून आहेत : 'शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वत होणे, संपूर्ण होणे, विश्वातील सर्वासहित विश्वरूप होणे. प्रत्येक घटना ही संपूर्णाचा परिणाम आणि व्यक्तता असते आणि संपूर्णाशी तिचा मूलभूत मेळ असतो. संपूर्णाचा सर्व प्रतिसाद योग्य, प्रयत्नरहित आणि तात्कालिक असतो. ' (सुखसंवाद - १७) 'आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणिवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणिव गमावून बसता.' (सुखसंवाद - २५) ' स्वतःला जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता. तुम्ही स्वतःच आहात, तुम्ही जे आहात त्या वेगळे तुम्ही असूच शकत नाही. जाणणे असण्याहून वेगळे असते काय? स्वतःची व्याख्या आणि स्वतःचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याखेरीज तुम्ही स्वतःच्या असण्यानेच स्वतःला जाणू शकता. (सुखसंवाद - ९९) ____________________________________ साधकाला निश्चित दिशा देणारं त्यांचं हे उत्तर उद्धृत करून लेख संपन्न करतो. एका साधकानं विचारलंय : 'अध्यात्मिक प्रगतीची लक्षणं कोणती? ' आणि महाराज अत्यंत सहजपणे सांगतात : ' निश्चिंतपणा, आराम, आनंदाची जाणिव, अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर भरपूर उत्साह!' (सुखसंवाद - ८९) (लेख मनोगतवर पूर्वप्रकाशित)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
30783 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

वाचत आहे..

मुक्त विहारि
गुरुवार, 04/25/2013 - 08:05 नवीन
वाचत आहे..
  • Log in or register to post comments

चांगली ओळख

पैसा
गुरुवार, 04/25/2013 - 09:57 नवीन
यांच्या संवादाबद्दल आणखी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

वाचतोय...

मोदक
गुरुवार, 04/25/2013 - 10:12 नवीन
वाचतोय... आणखी येवूद्यात.
  • Log in or register to post comments

चांगली ओळख.

कवितानागेश
गुरुवार, 04/25/2013 - 12:23 नवीन
चांगली ओळख. अजून माहिती इथे आणि इथे सापडेल.
  • Log in or register to post comments

काय की....

मन१
गुरुवार, 04/25/2013 - 13:03 नवीन
काही कळेना झालय.
  • Log in or register to post comments

लेखातल्या कोणत्याही वाक्यावर समजेलसं

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/25/2013 - 13:26 नवीन
आणि तुम्हाला उपयोगी होईल असं स्पष्टीकरण मी देईन. प्रश्न मात्र नेमका हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मन रे

चौकटराजा
गुरुवार, 04/25/2013 - 13:30 नवीन
मनरे तू काहे ना धीर धीरे ओ अधीरात्मा ग्यान पावेगा सबक सीखेगा थोडा सब्र करे चौरास्वामी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

रे मना धीर धर...लवकरच कळेल !

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/25/2013 - 13:31 नवीन
रे मना धीर धर...लवकरच कळेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

प्रश्न सब्र करण्याचा नाहीये

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/25/2013 - 13:48 नवीन
ते तर अध्यात्मात नेहमीच सांगितलं जातं. तुम्ही आत्ता, या क्षणी सत्य आहात. सब्र म्हणजे अवधी आणि अवधी म्हंटल की काल येतो. आपण देह आणि काल जाणणारे आहोत त्यात बद्ध असलेली व्यक्ती नाही. आणि तेच तर अध्यात्माचं मूळ सूत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सुखसंवाद

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/25/2013 - 13:52 नवीन
या पुस्तकाचा `आय एम दॅट' हा मॉरिस फ्रिडमननं केलेला जगप्रसिद्ध इंग्रजी अनुवाद अध्यात्मातला मानदंड मानला गेलाय. त्याच्या आतापर्यंत त्याच्या तीस-चाळीस आवृत्या निघाल्यात आणि ते पुस्तक दोन पाश्च्यात्य युनिवर्सिटीजमधे फिलॉसॉफिला टेक्स्टबुक आहे. पण मुद्दा तो नाही. मुळात सुखसंवाद हे मराठी भाषेतलं अष्टावक्रसंहितेच्या तोडीचं सांख्ययोगावरचं महाराजांच भाष्य आहे. आतापर्यंत एकाही सिद्धानं अशी समारोसमोर आणि एकामागोमाग एक उत्तरं दिलेली नाहीत. ओशोंनी (किंवा एकहार्टनं) डायलॉग साधलेला नाही. ते साधकांच्या प्रश्नावर वन-वे बोलले आहेत किंवा बोलतात. त्यांची वक्तव्यं निरूपणासारखी आहेत. मजा म्हणजे महाराजांचे साधकही तितक्याच तोडीचे आहेत. बरेचसे साधक पाश्चात्य आहेत आणि त्यांच्याकडे कमालीची क्लॅरिटी आहे. त्यांच्या प्रश्नांना महाराजांनी दुभाषामार्फत उत्तरं दिलीयेत. आणि त्यांनी रोजच्या जगण्यातले एकसोएक प्रश्न विचारून महाराजांच्या आकलनाचा सखोल वेध घेतलाय. सगळं पुस्तक महारांनी स्वतः एडिट केलंय आणि त्यांच्या मराठीचा डौल पाहण्यासारखा आहे. लेखातल्या वाक्यातून तुम्हाला त्याची कल्पना येईल. आणि सर्वात महत्त्वाचीये ती महाराजांची भाषा. मराठीत इतका शुद्ध आणि प्रभावी सांख्ययोग (साधनारहित सत्याचा बोध) माझ्या वाचनात नाही. ते पुस्तक नुसतं वाचून त्या गृहस्थाच्या आकलनाची कमाल वाटते. तुम्ही त्यांना कसेही गुंतवा ते पुन्हा तुम्हाला स्वतःप्रत आणतात. प्रत्येक उत्तरातून तुम्हाला स्वस्थ करतात. सतीश आव्हाड, सी-११, विश्वजीत सोसायटी, वीर सावरकर मार्ग, नौपाडा, ठाणे (प) फोन्स : ५३६ ०२२३ / ५४४ ८७८७ हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत (मूल्य रू.२२०)
  • Log in or register to post comments

कहर आहे.

अग्निकोल्हा
Fri, 04/26/2013 - 00:43 नवीन
तुम्ही त्यांना कसेही गुंतवा ते पुन्हा तुम्हाला स्वतःप्रत आणतात. प्रत्येक उत्तरातून तुम्हाला स्वस्थ करतात.
अशक्य!
  • Log in or register to post comments

शु मुश्कील? काय अडचण?

प्यारे१
Fri, 04/26/2013 - 00:48 नवीन
शु मुश्कील? काय अडचण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तमे शु मुश्किल कोनी ?

अग्निकोल्हा
Fri, 04/26/2013 - 02:04 नवीन
तुम्हाला अडचण वाटत नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?

संजय क्षीरसागर
Fri, 04/26/2013 - 12:03 नवीन
जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, इट इज सिंपल : खुद्द आपण कधीही कोणत्याही प्रश्नात सापडू शकत नाही कारण आपण देह आणि मन यापेक्षा वेगळे आहोत. म्हणजे आपल्याला देह आहे, देहात मन आहे पण आपण त्या वेगळे आहोत. आता प्रश्न म्हणजे काय ते पाहू. (इथे चर्चा होतात तसले) नैतिक किंवा निव्वळ बौद्धिक प्रश्न सोडा. ते सुटले काय आणि नाही काय त्यानं काही फरक पडत नाही. जो प्रश्न तुम्हाला गुंतवतो, जगणं मुश्किल करतो त्याचं रहस्य पाहू. मनाची किमया अशीये की त्या प्रश्नाविषयी ते तुमची धारणा निर्माण करतं की तो सुटला नाही तर तुमच्या अस्तित्वालाच धोकाय. प्रश्नाचं स्वरूप काहीही असो; नोकरी जाण्याची शक्यता, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, असाध्य शारिरिक आजार, सामाजिक अवहेलना, तुम्हाला सतत येणारं अपयश किंवा तत्सम काहीही. प्रश्न वास्तविक असतो पण त्याही पुढे जाऊन तो सोडवणं तुमच्या आवाक्या बाहेर असतं आणि मन तुम्हाला पूर्णपणे पटवतं की आता तुमचं अस्तित्व धोक्यात आहे. मग तुमची संपूर्ण जाणिव त्यात अडकते. तुम्ही मानसिक आणि भावनिक दृष्ट्या त्यात गुरफटून जाता. सिद्ध फक्त एकच काम करतो, मनावर किंवा शरीरावर कोणताही आघात झाला तरी तुम्हाला काहीही होणार नाही या वस्तुस्थितीची तुम्हाला नि:संशय खात्री पटवून देतो. कारण तुम्ही त्या दोहोंपेक्षा वेगळे आहात. म्हणून तर महाराजांनी म्हटलंय :
मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे.
याचा अर्थ प्रश्न सुटतो असा नाही, तुम्ही प्रश्नातून मोकळे होता. तुमचा अवरूद्ध झालेला श्वास मोकळा होतो. तुमची जाणिव जी प्रश्नाकडे असाहायपणे खेचली जात होती ती फिरून तुमच्याकडे येते. तुम्ही पुन्हा स्वतःशी कनेक्ट होता, स्वस्थ होता. आणि आता या स्वस्थचित्तदशेतून तो प्रश्न सोडवायला घेता (किंवा मग सोडून देता) कारण तुमच्या अस्तित्वाला कधीही धक्का पोहोचू शकत नाही हा उलगडा तुम्हाला झालेला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?

अग्निकोल्हा
Fri, 04/26/2013 - 16:31 नवीन
जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, इट इज सिंपल :
हिच तर खरी गंमत आहे.. दि मोमेंट यु ट्राय टु अडरस्टेंड, यु आर डेस्टिन टु बी फेल. कारण तुम्ही मनामधे "सिध्दावस्थेचे" इन्सेप्शन करता. जे अस्तित्वातच नाहीये, दुसर्‍यान ठरवलय, सांगितलय ते त्यात घुसडता. मग त्या सोबत आपलं मन जे खेळ करत त्यात समरसुन जाउन आयुष्य कंठता. नैसर्गीक सहजता हा फार महत्वाचा विषय आहे. हात आगित घेतला चटका बसला. अ‍ॅज सिंपल अ‍ॅज इट इज. उगा मी पणाच्या जाणीवमधे स्थिर झाल्यावर चटका बसतो/बसत नाही जाणवत नाही याला काही अर्थ नाही. ज्ञानाची ही नैसर्गीक सहजता फार महत्वाची, आणी म्हणुनच ती विदाउट कॉट्रिब्युशन ओफ इंडीविजुअल वा प्रयत्नरहीत असते. उदाहरणार्थ तुमचं (अथवा कोणाचही) जन्माला येणे... आता या स्थित्यंतराच्या प्रक्रियेत तुमचं वैयक्तीक कॉट्रिब्युशन काय होतं ? शुन्य. तरीही ते घडलं... अस्तित्वाला आलं... ज्ञान पावलं... म्हणुनच ते वास्तव आहे सहज आहे, प्रत्यक्ष तुमचा जन्म असुनही त्यात तुमची कोणतीही लुडबुड खपवुन घेतली गेली नाही हे फार महत्वाच आहे. ज्ञानाच्या प्रक्रियेतही हेच लागु असतं... जो पर्यंत आपली लुडबुड/कॉट्रीब्युशन शुन्य होत नाही तो पर्यंत जो चालतो तो सगळा सावळा गोंधळ होय. थोडक्यात ही अवस्था प्रयत्न, धारणा, साधना, कृती आणि सर्वात महत्वाच म्हणजे इछ्चा याशिवायच आली पहिजे, तरच ति आली. अन्यथा नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अनुभव हीच खात्री!

संजय क्षीरसागर
Fri, 04/26/2013 - 18:16 नवीन
दि मोमेंट यु ट्राय टु अडरस्टेंड, यु आर डेस्टिंड टु फेल कारण तुम्ही मनामधे "सिध्दावस्थेचे" इन्सेप्शन करता. जे अस्तित्वातच नाहीये, दुसर्‍यान ठरवलय, सांगितलय ते त्यात घुसडता. मग त्या सोबत आपलं मन जे खेळ करत त्यात समरसुन जाउन आयुष्य कंठता.
येस, सिद्धाची कॉपी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही नेहमी अपयशी व्हाल कारण ती त्यानं सांगितलेल्या लक्षणांची कल्पना असेल. पण खुद्द तुम्हाला निर्धास्त वाटायला लागेल तेव्हा तुम्ही निश्चितपणे म्हणाल की `येस, आय अ‍ॅग्री. महाराजांची आणि माझी अवस्था एक आहे.' कारण की स्थिती निर्वैयक्तिक आणि सर्वकालीन आहे. तुम्ही केवळ ती स्थिती जाणता असं नाही तर स्वतः ती स्थिती होता. आता तुम्हाला कोणत्याही गुरूची किंवा कल्पनेची आवश्यकता नाही. इट इज अ फॅक्ट फॉर यू.
नैसर्गीक सहजता हा फार महत्वाचा विषय आहे. हात आगित घेतला चटका बसला. अ‍ॅज सिंपल अ‍ॅज इट इज. उगा मी पणाच्या जाणीवमधे स्थिर झाल्यावर चटका बसतो/बसत नाही जाणवत नाही याला काही अर्थ नाही. ज्ञानाची ही नैसर्गीक सहजता फार महत्वाची, आणी म्हणुनच ती विदाउट कॉट्रिब्युशन ओफ इंडीविजुअल वा प्रयत्नरहीत असते.
मृत्यू सिद्धालाही आहे. अहंकार असला काय आणि नसला काय त्यानं काही फरक पडत नाही. फरक इतकाच आहे की सिद्धाला देह मरतोय हे कळेल आणि ज्याला स्व गवसला नाही त्याला आपण मरतोय असं वाटेल.
....थोडक्यात ही अवस्था प्रयत्न, धारणा, साधना, कृती आणि सर्वात महत्वाच म्हणजे इच्छा याशिवायच आली पहिजे, तरच ति आली. अन्यथा नाही...
अध्यात्मात हा विवाद पूर्वापार आहे. आपण व्यक्ती म्हणून जन्म घेतो, तसेच वाढवले जातो आणि जगतो. अचानक आपल्याला आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा होणं मला तरी अशक्य वाटतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जी स्थिती कल्पिलेली आहे किंवा प्रयत्न साध्य आहे ती केव्हाही भ्रम असेल पण महाराज म्हणतात तो तुमचा स्वतःचा अनुभव झाला तर तुम्ही प्रयत्नाविना त्या स्थितीत कायम राहाल. व्यक्तिमत्व ही प्रत्येकाची वैयक्तिक कल्पना आहे आणि स्थिती हे निर्वैयक्तिक वास्तव आहे. प्रयत्न व्यक्तिमत्वापासून सोडवणूकीसाठी आहे, स्थितीत राहण्यासाठी नाही. थोडक्यात, काही न करता, बाय डिफॉल्ट आपण स्थिती आहोत. हा उलगडा झाल्यासरशी, तो तुमचा अनुभव होताच सहजता येते. त्या नंतर कोणत्याही साधनेची किंवा प्रयत्नाची गरज राहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तेच तर. अनुभव हीच खात्री.. मग आता मुद्याच बोलायचं ?

अग्निकोल्हा
Sat, 04/27/2013 - 20:05 नवीन
मला इतकच जाणुन घेण्यात रस आहे की तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय की झोपेतही तसाच घेत असता ? याच उत्तर फार महत्वाच आहे बघा. नंतर उगाच जागे असणं अथवा झोपणं या स्थित्यंतराचा तुमच्या बाय डिफॉल्ट स्थितीच्या अनुभवात परिणाम घडत असेल तर त्याला बाय डिफॉल्ट का समजावे असा प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय

संजय क्षीरसागर
Sat, 04/27/2013 - 22:35 नवीन
की झोपेतही तसाच घेत असता ?
झोपेतही तसाच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मग तुम्ही महान आहात.

अग्निकोल्हा
Sat, 04/27/2013 - 22:56 नवीन
_/\_.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमचा प्रश्न उत्तम होता म्हणून सांगतो,

संजय क्षीरसागर
Sat, 04/27/2013 - 23:04 नवीन
साधकानं कधीही झोपेवर प्रयोग करू नयेत. त्यानं नेहमी दिवस स्वास्थ्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

गोंधळ होउ नये म्हणुन सांगतो...

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 00:19 नवीन
सर्वप्रथम, मी साधक नाही. प्रयोग तर अजिबात करत नाही. किम्बहुना जर का या धाग्यावरील माझे प्रतिसाद आपण खरोखरच वाचले असतील तर मुळातच माझा "डिफॉल्ट स्टेट" वगैरे वगैरे गाठण्यासाठी आपण प्रयत्न(जागे वा झोपलेले असताना) करावयाचे असतात या संकल्पनेवरच मुळात विश्वास नाही/विरोध आहे हे मी अतिशय स्पश्ट शब्दात लिहले असुनही आपण... असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ग्लिफ,

प्यारे१
Sat, 04/27/2013 - 23:53 नवीन
ग्लिफ, याचं उत्तर मला असं वाटतं की तू म्हणतो आहेस त्या प्रकारेच असावं. ह्यात एक अ‍ॅडीशन मात्र घ्यावी वाटते ती म्हणजे >>>थोडक्यात ही अवस्था प्रयत्न, धारणा, साधना, कृती आणि सर्वात महत्वाच म्हणजे इछ्चा याशिवायच आली पहिजे, तरच ति आली. ह्या मध्ये सिद्धावस्था येण्यापूर्वीची साधनावस्था तू टाळत आहेस अथवा नाकारत आहेस. दासबोधात दिलेला बद्ध, मुमुक्षू, साधक नि सिद्ध हा क्रम सर्वसाधारणपणे असतो तो इथे नाकारला जातोय. प्रयत्न, साधना, धारणा अथवा कुठलीही कृती ह्या सगळ्या सहकारी साधना आहेत. सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे असा विचार आहे. मी ध्यान करतो ही देखील कृत्रिम साधना आहे, पण इथे ह्या सगळ्याची गरज आहे. लक्षावधी लोकांमध्ये एखादाच रमण महर्षी असतो ज्यांना काहीही न करता म्हणजे (काहीही न करण्याची 'कृती' करुन) ज्ञान झालं. इथं लक्षात घ्यायला हवं की सिद्धावस्था म्हणजे आत्यंतिक शांतीची, सुखाची नि आनंदाची स्थिती ही अशीच मिळत नसते, ती कमवावी लागते मात्र त्या साठीच्या आधीच्या साधना कराव्याच लागतात. न करता अशी स्थिती येत असेल तर त्याला आत्ता न दिसणारं मात्र पूर्वी कधीतरी केलेलं पूर्वसंचित फळाला येण्याची वेळ यावी लागते. मूळातच 'येकांती नाजूक कारभार' असल्यानं शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणं वस्तुसिद्धी विचारेण न कस्चित कर्मकोटीभि हा विचार महत्वाचा आहे. मनाची चंचलता, बुद्धीची निर्णय क्षमता, चित्ताची अवधारणता शांत झाली की अहंकार देखील गप्प बसतो. त्यासाठी सर्वसामान्यांना साधना लागते. झाडावरचे फळ खाण्यासाठी मुंगीचा मार्ग देखील आहे नि पक्ष्याचा देखील. ह्यात आपापल्या क्षमतेनुसार मार्ग निवडून त्यावर मार्गक्रमणा करत फळाची प्राप्ती करणं महत्त्वाचं. इत्यलम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

याचं उत्तर मला असं वाटतं की

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 01:18 नवीन
याचं उत्तर मला असं वाटतं की तू म्हणतो आहेस त्या प्रकारेच असावं. डु यु रिअली थिंक माय नॉनसेन्स रिअली मेड इवन अ टिनी बिट ऑफ सेन्स ? माझ्याकडे कसलच उत्तर नाही कारण एखाद्या प्रश्नालाच मी अवास्तव महत्व देत नाही. ह्या मध्ये सिद्धावस्था येण्यापूर्वीची साधनावस्था तू टाळत आहेस अथवा नाकारत आहेस. दासबोधात दिलेला बद्ध, मुमुक्षू, साधक नि सिद्ध हा क्रम सर्वसाधारणपणे असतो तो इथे नाकारला जातोय. मुळात सिध्दावस्थेचीच अपेक्षा नाहिये तर साधनावस्था वा इतर फाफटपसारा विचारात घ्यायला हवाच कशाला ? आत्ता न दिसणारं मात्र पूर्वी कधीतरी केलेलं पूर्वसंचित फळाला येण्याची वेळ यावी लागते. तुम्हाला खरच वाटतं आकाशातला देव जन्मो जन्मिचे आकांटीग ठेवतो ? बिग ब्रदर इज नॉट वॉचिंग यु अ‍ॅट ऑल.. सिंपली बिकॉज हि डाँट नीड टु डु सो. पुर्वसंचित म्हणजे काय बुआ ? कर्माशी रिलेटेड आहे काय ? मला तर कोणतेही कर्म ना वाइट दिसतय ना चांगले सर्व काही एकच भासतय ? केवळ माणुसकी म्हणुन ज्या लोकांशी आपला संबध जितका जास्तिजास्त येत असतो त्यांना कमीकमी दुखावणे व ज्यांच्याशी कमीत कमी येत असतो त्याना जमेल तस फाट्यावर मारत राहणे यापलिकडे कोणत्याही मानवी कर्माचा आणखी कोणता नियम अथवा कल अस्तित्वात नाही. उदाहरणार्थ पैशासाठी भावाचा मुडदा पाडु नका पण पैशासाठीच पल्याडल्या देशाच्या सापडेल त्याचे शिर उडवा.. तो पराक्रम, यात मेलात तर स्वर्ग, जगलात तर ऐशोआराम व सन्मान...चायला डोके ठिकाणावर आहे काय ? खर तर सरळ सोट नियम पाहिजे ना की जो खुन करेल तो गुन्हेगारच. मग युध्दात करा वा संसारात. पण नाही तेथे आपल्या हिसेंला/कृतिला समर्थन द्यायला पाप-पुण्याची शिदोरी लागते. म्हणे देशासाठी मुडदे पाडलेत ? सगळा भौतिक सुख व सुरक्षेशी निगडीत मामला आहे पण त्यातही आधिभौतिक प्रलोभनांची घुसड.. वरुन म्हणे कर्मफळ भोगावच लागतं... कोणत्याही कर्माचिच मुळात शाश्वत पाप-पुण्य अशी विभागणी मोजणी होउ शकत नसताना त्याच (जन्मो जन्मी) फल काय घंटा मिळणार ? ह्यात आपापल्या क्षमतेनुसार मार्ग निवडून त्यावर मार्गक्रमणा करत फळाची प्राप्ती करणं महत्त्वाचं. फळ मिळवायच असतं हाच भ्रम आहे. जे आहे ते सहज स्विकारा बस. भौतिक मोजमापात न सामावणार नाही असं काही ना मिळवायचय ना गमवायचय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तथास्तु!

प्यारे१
Sun, 04/28/2013 - 01:20 नवीन
तथास्तु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सविनय नकार.

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 01:33 नवीन
तुम्ही मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तथास्तु चा अर्थ आपल्या

प्यारे१
Sun, 04/28/2013 - 01:38 नवीन
तथास्तु चा अर्थ आपल्या इच्छेनुसार होवो. पुन्हा एकदा तथास्तु म्हणून पूर्णविराम घेतो. तथास्तु चा वेगळा अर्थ निघत असल्यास मराठी अर्थाचा विचार व्हावा. स्वगतः शैली ओळखीची वाटत असली तरी जास्तीच्या शुद्ध लेखनामुळे व अधिक क्लॅरिटीमुळे कौतुक वाटत आहे. पू र्ण वि रा म !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तथास्तु चा अर्थ आपल्या

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 01:53 नवीन
तथास्तु चा अर्थ आपल्या इच्छेनुसार होवो.
अस्स है काय ? हे कंदी मैयतच न्हवतं.
पुन्हा एकदा तथास्तु म्हणून पूर्णविराम घेतो.
पुन्हा सविनय नकार.
तथास्तु चा वेगळा अर्थ निघत असल्यास मराठी अर्थाचा विचार व्हावा.
सविनय नकारचा अर्थ कळाला नसल्यास हिब्रुचा रेफरन्स घ्यावा.. तरीही लक्षात आलं नाही तर ? क्लॅरिटी एक्सपर्टला गाठा.
स्वगतः शैली ओळखीची वाटत असली तरी जास्तीच्या शुद्ध लेखनामुळे व अधिक क्लॅरिटीमुळे कौतुक वाटत आहे.
प्रगटः- मन फसवं आहे. त्यावर इतकं विसंबुन राहु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खिक्क्क!

प्यारे१
Sun, 04/28/2013 - 02:20 नवीन
खिक्क्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा.................

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/28/2013 - 15:15 नवीन
@तुम्ही मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल ?>>>Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अ. आ.

प्यारे१
Sun, 04/28/2013 - 19:02 नवीन
अ. आ. जे म्हणायचंय ते लगेच, आता, इथेच म्हणा. उद्या माझ्या आयडीवर मेगाब्ळॉक होणार आहे. :) बाकी अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा................. हे नक्कीच एक क्रियाविशेषण असलं पाहिजे. हे मला समज लंय पण तुम्हाला ग सोडल्याशिवाय समजणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कर्मयोग...

सामान्य वाचक
Mon, 04/29/2013 - 11:53 नवीन
या मध्ये , निष्काम कर्मयोग हा मुद्दा आहे. कर्माची गती लॉजीकल असली तरी अतिगहन असते. वर वर चे वाचन किंवा विचार करून त्याचा मूळ गाभा लक्ष्यात येणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

गीता रहस्य मधील "कर्मविपाक"

शुचि
Tue, 04/30/2013 - 05:37 नवीन
गीता रहस्य मधील "कर्मविपाक" धडा (चॅप्टर ला काय म्हणतात?) सुंदरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

खरय.

अर्धवटराव
Tue, 04/30/2013 - 08:34 नवीन
गीतारहस्यातला कर्मविपाक हे टिळकांचं जीवनसार आहे. वैचारीक तत्वांना नित्यव्यवहारात जगुन दाखवल्यामुळेच या ग्रंथाला इतकी उभारी आलेली आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

''कर्माणू सिद्धांत''

सामान्य वाचक
Tue, 04/30/2013 - 12:21 नवीन
श्री . हिराभाई ठक्कर यांचे ''कर्माणू सिद्धांत'' वाचले नसेल तर जरूर वाचा. अतिशय सोप्या अणि सुंदर रीतीने कर्मयोग स्पष्ट केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

संजय क्षीरसागर,

अग्निकोल्हा
Tue, 04/30/2013 - 13:15 नवीन
कर्मयोगावर संजय क्षीरसागरचे प्रांजळ मत काय आहे हे वाचुन घ्यायला मला नक्किच आवडेल. संजय क्षीरसागर, यावर लिखाण हवच हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

कर्मयोगावर मनोगतवर लिहीलंय

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 14:18 नवीन
तो विषय आणि त्यातले मुद्दे मात्र कृपया इथे आणू नका. या लेखाचा विषय वेगळा आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मी मनोगत वाचत नाही. कधिच वाचलं नाही.

अग्निकोल्हा
Tue, 04/30/2013 - 14:46 नवीन
पण तुझ लिखाणमात्र मनाला खुप स्पर्शुन जातं, आणी त्यातही जास्त आवडते ति तुझी सर्वांना आनंद वाटत रहायची व्रुत्ति. माझं ते माझं, तसच माझं ते तुमचही म्हणन खरच इतक सोप नसतं रे. तुला ते उत्तम साधलय याच फारफार कौतुक आहे. तुझ्या लेखनातली जादु मोहिनी पाडते, अतिशय आनंद मिळतो तु लिहलेलं वाचायला. फारच रिफ्रेशिंग. म्हणूनच जेंव्हा सदस्यांनी इथे विषयांतर करुन कर्मयोगावर (श्री़कृष्ण सोडुन) इतर लेखकांचे विवेचन वाचायचा मुद्दा उपस्थित केला तेव्हां सर्वप्रथम तुझच नाव डोळ्यासमोर आलं. त्यातले मुद्दे इथे आणनार नाहिच, उलट यावर एखादा स्वतंत्र लेखच लिही ही प्रेमाची विनंती केलि होती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रतिसादाबद्दल अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद!

संजय क्षीरसागर
Wed, 05/01/2013 - 23:37 नवीन
कधी मूड आला तर कर्मयोगावर नक्की लिहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सुपर्ब.

अर्धवटराव
Fri, 04/26/2013 - 21:55 नवीन
+१ अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आय अ‍ॅम दॅट चे काही

शुचि
Fri, 04/26/2013 - 04:48 नवीन
आय अ‍ॅम दॅट चे काही एक्स्पर्ट्स वाचले होते.
  • Log in or register to post comments

आय एम दॅट आणि सुखसंवाद

संजय क्षीरसागर
Fri, 04/26/2013 - 12:51 नवीन
मॉरिसनं आय एम दॅट मधे महाराजांच्या मराठीचा रंग उतरवण्याचा एकदम प्रामाणिक प्रयत्न केलाय पण मराठी ती मराठीच. निदान महाराजांसाठी तरी. ते ओशोंच्या हिंदी सारखं आहे. त्यांचं दोन्ही भाषांवर कमालीचं प्रभुत्त्व होतं पण त्यांच्या हिंदीतल्या अष्टावक्र महागीतेचा इंग्रजी अनुवाद असंभव आहे. ते सहाही वॉल्यूम्स निव्वळ कहर आहेत. जनका सारखा बुद्धिमान राजा, अष्टावक्रासारखा महान सांख्ययोगी आणि ओशोंच्या अभिव्यक्तीची कमाल! महाराजांचं मला तितकंच कौतुक आहे. मराठी शिवाय दुसरी भाषा येत नाही पण जे सांगायला ओशो तीस मिनीटं घेतील, एकहार्ट दहा मिनीटं घेईल ते महाराज दोन वाक्यात सांगून मोकळे! थोडक्यात काय तर आय एम दॅट ला सुखसंवादाची सर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कुठे मिळेल हे पुस्तक?

यशोधरा
Fri, 04/26/2013 - 13:33 नवीन
कुठे मिळेल हे पुस्तक?
  • Log in or register to post comments

मुंबईत असाल तर वर दिलेल्या फोनवर चवकशी करा

संजय क्षीरसागर
Fri, 04/26/2013 - 17:30 नवीन
पुण्यात अनमोल पुस्तक भांडार, बुधवार चौक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

शब्दांचे पोकळ बुडबुडे

स्पा
Fri, 04/26/2013 - 16:35 नवीन
शब्दांचे पोकळ बुडबुडे
  • Log in or register to post comments

प्रसन्न, मन लावून वाच

संजय क्षीरसागर
Fri, 04/26/2013 - 18:35 नवीन
जे लिहीलय तो माझा अनुभव आहे. नुसते उतारे कॉपी-पेस्ट केलेले नाहीत. माझा आयडी केव्हाही ब्लॉक होऊ शकतो. तो अजून चालू कसाये हेच आश्चर्य आहे. आणि मजा म्हणजे इतक्या अनिश्चिततेत मी शांतपणे लिहीतोय. वॉट एल्स कॅन बी अ प्रूफ ऑफ द स्टेट दॅट आय एम टॉकिंग अबाऊट? यू मे लूज अ लव्हली अपरच्युनिटी दॅट हॅज कम योर वे, अँड दॅट टू जस्ट फॉर फ्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्रसन्न, मन लावून वाच

पिलीयन रायडर
Fri, 04/26/2013 - 18:48 नवीन
प्रसन्न, मन लावून वाच
कुणाची तरी आठवण आली..!! असो.. तर तुमचा मि.पा चा आयडी कधीही बॅन होऊ शकतो आणि तरी तुम्ही शांत आहात हे प्रुफ आहे असं म्हणताय.. मि.पा इतकं महत्वाचं आहे तुमच्यासाठी? उत्तर नाही दिलत तरि चालेल.. मी आपलं टईमपास म्हणुन विचारलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

खतरनाक कॉमेंट

अमोल खरे
Fri, 04/26/2013 - 19:13 नवीन
>>उत्तर नाही दिलत तरि चालेल.. मी आपलं टईमपास म्हणुन विचारलं.. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मि.पा इतकं महत्वाचं आहे तुमच्यासाठी?

संजय क्षीरसागर
Fri, 04/26/2013 - 20:02 नवीन
माझ्यासाठी नाही. केव्हाही काहीही होऊ शकतं ही अस्तित्वाची अनिश्चितता मला मंजूर आहे आणि त्यामुळे मी निर्धास्त आहे. स्वतःला अशा पोजिशनमधे इमॅजिन करून पाहा. तुम्हाला वास्तविकतेचं भान येईल आणि प्रतिसादातला उपहास निघून जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

हम्म्म...

सामान्य वाचक
Sat, 04/27/2013 - 19:48 नवीन
एकदा आपल्याशी या विषयावर चर्चा करायची आहे...
  • Log in or register to post comments

एकदा असं काही नाही

संजय क्षीरसागर
Sat, 04/27/2013 - 22:40 नवीन
जे विचारायचंय ते लगेच, आता, इथेच विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा