लग्नाला यायचं हं!
लेखनप्रकार
सकाळी सकाळी शेजारी राहणाऱ्या पाटीलकाकांचा फोन आला.
“अरे मुलीचे लग्न ठरलेय रे. तू पत्रिका छापतोस ना?”
“काका कामाचा ताण आहे हो खूप, वेळ लागेल.”
“ते लोकांना सांग रे. मला नको. उद्या मजकूर ऑफिसात आणून देतो. दोन दिवसात छापून दे लगेच.”
एकतर प्रिंटिंगचे कुठलेच काम टाळू वाटत नाही त्यात हे काम जवळ जवळ घरचे असल्यासारखेच, मी हो म्हणून टाकतो.
दुसरे दिवशी काका दोन फुलस्केप कागदावर लिहिलेला मजकूर घेऊन हजर होतात.
आतापर्यंत तीनचारशे पत्रिका टायपून सराईत झालेला डीटीपी आपरेटर भराभरा कीबोर्ड बडवत काकांनाच सल्ले देऊ लागतो.
“जावयांचे नांव कार्यवाहात टाका हो. ते स्वागतोत्सुक नसतात.”
“ गल्लीतल्या मंडळाचे नांव व्यवस्थापक म्हणून करतो“
“आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं, जुनं झालं आता. बालनिमंत्रक नाहीतर किलबिल टाका.”
“प्रतापरावांना दोन बायका आहेत काय़? महिरपी कंस करतो मग.”
“गं. भा. करु का श्रीमती? ते सेंटरला घ्यावे लागेल.”
“सचिन नितीनचे लग्न झाले नाही ना अजून मग श्री. नको, चि. करतो. आगामी आकर्षण आहेत ना ते.”
या लग्नपत्रिकातील मजकुरांचे इतके संकेत आणि प्रकार आहेत की त्यावरसुध्दा एखादी पीएचडी व्हावी.
एकदाचे मजकुराचे प्रुफ पाहिल्यावर काकांचे माझ्याबरोबर हिशोब चालू होतात. “आज पत्रिका छाप, उद्या पाकीट मग परवा सकाळी येतो न्यायला.”
“अहो काका असे नसते हो. मी वेगळ्या प्रकारच्या पत्रिका छापतो. आणि अजून दोन महिने आहेत की लग्नाला.”
“तुमचे छापायचे काम म्हणजे महिनाभर थांब असेच असते रे. पण वेगळ्या म्हणजे अजून कसल्या करतोस बाबा?”
“अहो मी फोर कलरचे काम करतो फक्त. तुम्ही म्हणता त्या रेडीमेड पत्रिका असतात.”
परत काकांचे प्रश्नचिन्ह. “जरा सांग तरी डिटेलमध्ये रे. काय काय करता तुम्ही लोक?”
आता बघा तुम्हीच.
आता हा मजकूर टाइप झाल्यावर एकदा वाचून बघणार, मग डिझाइनसाठी घेतली जाते
म्हणजे पीसीवरील कोरलड्रॉ फोटोशॉप हि अॅप्लिकेशन वापरून, काही स्कॅनड इमेजेस, काही फोटोग्राफ वा क्लीपआर्टस वापरून एक जशी पत्रिका दिसते त्याप्रमाणे तयार होते.
या कामात डिझाइनिंगचे आणि व्हिज्युअलायझिंगचे कौशल्य लागते तसेच कागदांच्या साइज, प्रिंटिंगचे ज्ञान, मशीनच्या साइज आणि इतर तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे देखील गरजेचे असते. हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते. आऊटपुट फाइल्स tiff, pdf किंवा cdr फॉर्मॅटमध्ये सेव्ह केल्या जातात. यांचे रेझोल्युशन उच्च असते (३०० ते ६०० डीपीआय, सेम साइज)
हे काम पूर्ण झात्यानंतर त्याचा एक कलर प्रिंट काढून तो प्रुफरिडिंगसाठी ग्राहकाला दिला जातो. शक्यतो एका ग्राहकासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी डिझाइन्स केली जातात. त्यातील मजकूरांच्या चुका, डिझाइनमधील इतर काही चुका दुरुस्त केल्या जातात. कधीकधी पूर्ण डिजाइन बदलले जाते. (माझ्यावर अशी वेळ आजपर्यंत तरी आली नाही, शक्यतो सुरुवातीला केलेलेच पसंत पडते असा अनुभव आहे.)
(कलरप्रिंटसाठी व शॉर्टरन प्रिंटिंगसाठी हा कलर प्रिंटर)
हा मसुदा एकदा पक्का झाला की ग्राहकाचे काम पैसे देऊन तयार पत्रिका ताब्यात घेणे एवढेच उरते.
आता आमचे खरे काम सुरु होते.
ग्राहकाच्या अपरोक्ष कामाच्या सुरुवातीलाच बराच विचार केलेला असतो, जसे की पेपर साईज, कटींग, लॅमिनेशन, एन्हवलप आदी.
कारण कागद आणि कार्ड ठराविक साईजमध्येच बाजारात उपलब्ध असतात.
उदा. कार्ड २२x२८, कागद १८x२३, १५x२०, १७x२७ ह्या इतर आकारात पण काही खास पेपर्स उपलब्ध असतात. १८x२३ इंच ह्या आकारालाच डेमी म्हणले जाते. सर्वांना माहीत असलेला ए४ हा १८x२३ चा साधारणपणे एक चतुर्थांश असतो. त्यामुळे हा विचार करुनच पत्रिकेची साईज ठरवली जाते. पत्रिकेसाठी किंवा ब्रोशर्ससाठी २५० जीएसएम(ग्रॅम/स्क्वेअर मीटर) आर्टकार्ड म्हणजे दोन्ही बाजूने चमक असणारा जाड कागद वापरला जातो.
कमीत कमी कागदात, कमीत कमी प्रिंटींग मध्ये आणि कमीत कमी कागदाचा तुकडा वाया घालवून अपेक्षित काम करणे हेच यशस्वी प्रिंटरचे ध्येय असते.
पीसीवर केलेले डिझाइन सीटीपी (कम्प्युटर टू प्लेट) यंत्रावर घेतले जाते. मूळ डिझाइनचे चार रंगात (स्यान, मॅजेण्टा, यलो, ब्लॅक) विभाजन केले जाते. पाचसहा वर्षापूर्वी हेच काम इमेजसेटरने फिल्म काढून त्या फोटोसेन्सिटिव्ह केमिकलने पत्र्याच्या प्लेट बनवून केले जाई. आता सीटीपी ने आपल्या लेसर प्रिंटरसारख्या डायरेक्ट चार प्लेटस मिळतात. इथपर्यंतच्या प्रक्रीयेला प्रीप्रेस म्हणले जाते.
(सीटीपी : कम्प्युटर टू प्लेट)
आता ह्या चार प्लेटस ऑफसेट मशीनच्या सिलिंडर्सवर चढविल्या जातात. हि भलीमोठी मशीन्स एकाच वेळी चार रंगी छपाई करणारी असतात. शक्यतो जर्मन, झेक अथवा जापनीज मेकची हि मशीन्स ताशी १०००ते ३००० प्रति छापू शकतात. या क्षेत्रात हायडेलबर्ग, अॅडॅस्ट, रोलंड, कोमोरी लिथ्रॉन, मित्सुबिशी हि विदेशी मशीन्स जास्त आहेत. ऑटोप्रिंट सारख्या भारतीय कंपन्या कमी आहेत. एकरंगी छपाईत मल्टिलिथ आणि फरिदाबादच्या मशीन्स बर्याच ठिकाणी आहेत. मोठ्या मशीनवर एका वेळी तीन चार ऑपरेटर्स आणि हेल्पर्स काम करतात.
(कोमोरी ४ रंगी ऑफसेट मशीन)
आता वेळ येते पोस्टप्रेसची. एकदा प्रिंटिंग झाले की त्यावर लॅमिनेशन (प्लास्टिकच्या पातळ फिल्म चा थर) केले जाते. हे थर्मल अथवा गमिंग अशा दोन प्रकारे वेगळ्या मशीनवर केले जाते. यात सुध्दा मॅट अथवा ग्लॉस फिनीश असे पर्याय असतात.
(लॅमिनेशन मशीन)
काही वेळा स्पॉट लमिनेशन (डिझाइनचा विवक्षित भाग लॅमिनेशन) केले जाते. हि प्रक्रिया रासायनिक थर चढवून वेगळ्या मशीनवर अथवा स्क्रीन प्रिंटिंग पध्दतीने केली जाते. कधी कधी सोनेरी, चंदेरी, मोतिया रंगाची छपाई जी ऑफसेटवर होत नाही तीपण स्क्रीन प्रिंटिंग ने अथवा मेटॅलिक फिल्म वापरुन केली जाते. एम्बॉसिंग असेल तर त्याचा पण वेगळा डाय व मशीन असते.
नंतर वेळ येते कटिंगची. सरळ रेषेत कटिंग असेल तर ते गिलोटीनने केले जाते. या मशीनला धारदार ब्लेड असते. हे मशीन मोटर पावरने, हायड्रॉलिक अथवा न्यूमॅटिक पावरने कागद कापते. आता कम्प्युटराइज्ड कंट्रोल्ड मशीनमुळे या कामातील धोके बरेच कमी झाले आहेत अन्यथा प्रत्येक प्रेसमध्ये एखादी दुर्दैवी कहाणी ऐकावयास मिळते. अजूनही येथे कटरशिवाय दुसर्या माणसाने येऊ नये असा संकेत आहे.
(गिलोटीन: पेपर कटिंग मशीन)
डिझाइननुसार जर गोल, कर्व असेल तर डाय तयार करावा लागतो. हे डाय पंच एका पंचिंग मशीनवर चढवून असे कटिंग होते. कार्डला घडी घालण्याचे काम (क्रिजिंग) पण याच वेळी होते. काही ठिकाणी जुन्या ट्रेडल मशीनमध्ये पण थोडे फेरफार करून पंचिंग मशीन म्हणून वापरले जाते.
(हा कर्व्ह कटिंगचा व दोन घड्यांचा डायपंच, जो मशीनवर बसवून काम केले जाते.)
पत्रिकेची पाकीटे एका डायमध्ये कापून ती हाताने बनवली जातात. सराईत माणसे ताशी २००० पाकीटे सुध्दा घड्या घालून व चिकटवून तयार करतात. कोर्या पाकीटावर छापून अथवा आधी कागदावर छापून त्याची पाकीटे तयार करतात.
नंतर हे पत्रिका, पाकीटे गठ्ठे बांधून ग्राहकांसाठी तयार असतात.
“आता सांगा काका, कधी येता डिझाइन बघायला आणि त्यानंतर पत्रिका न्यायला?”
“तूच हे सगळं झाल्यावर फोन करून सांग बाबा आणि हे घे अॅडव्हान्स.”
....................................................................................................................
(ह्यात रंगीबेरंगी दोरे, गोंडे, मणी, छोट्या मूर्ती, हातकागद, कापड वगैरे वापरून केलेल्या पत्रिका समाविष्ट नाहीत. तो एक स्वतंत्र उद्योग आहे. अशा रेडीमेड पत्रिका घेऊन त्यावर एकरंगी अथवा दुरंगी छपाई करणे हा पण आता सर्वमान्य प्रकार आहे. या प्रकारात बराचशी बंधने असतात. उदा. बहुरंगी छपाई वा फोटोग्राफ्स छापता येत नाहीत. तयार अल्बममधील डिझाइन निवडावे लागते, किंमतीत फरक आदि. सर्वसामान्यपणे प्रिटिंग तंत्राचा हा अगदी छोटासा उपयोग आहे. पुण्यामुंबईसारख्या शहरात हा उद्योग बराचसा प्रगत आहे. सोलापूरमध्ये उपलब्ध तंत्राने सर्वांच्या बघण्यातली लग्नपत्रिका प्रत्यक्षात कशी तयार होते हे सांगायचा माझ्या अल्पमतीने हा छोटासा प्रयत्न. बरेचसे शब्द प्रचलित असल्याने वापरले आहेत, तांत्रिक नांव कदाचित वेगळे असू शकते. काही चित्रे जालावरून साभार. पर्यावरणरक्षकांनो मला माफ करा.)

वाचने
69550
वाचनखूण
प्रतिक्रिया
119
आयला भारी बे अभ्या. मस्तच
हात्तिच्या! अपेक्षाभंग झाला
In reply to हात्तिच्या! अपेक्षाभंग झाला by इनिगोय
अस्सच म्हणतो.
In reply to अस्सच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by शुचि
माझ्याच लग्नाची चर्चा
In reply to माझ्याच लग्नाची चर्चा by अभ्या..
केल्यावर अवश्य सांगतो.
मस्त!!
मस्त..
मस्त रे मित्रा.. एकदम
In reply to मस्त रे मित्रा.. एकदम by गवि
अजून हे पण गविराज
In reply to अजून हे पण गविराज by अभ्या..
पैसे कोण देणारे? मग त्यांचे
मस्त रे अभ्या.
बाकी शेजारी राहणार्या
In reply to बाकी शेजारी राहणार्या by प्रचेतस
..
In reply to .. by गवि
(No subject)
In reply to .. by गवि
एक शंका आहे.
In reply to एक शंका आहे. by बॅटमॅन
कोकणी भाषेतला शब्द आहे.
In reply to कोकणी भाषेतला शब्द आहे. by प्रचेतस
धन्यवाद.
In reply to एक शंका आहे. by बॅटमॅन
वशाड हा 'ओसाड'चा अपभ्रंश आहे.
In reply to वशाड हा 'ओसाड'चा अपभ्रंश आहे. by बाळ सप्रे
साशंक
In reply to साशंक by बॅटमॅन
वशाड मेलो ला शिवीचा दर्जा
In reply to वशाड मेलो ला शिवीचा दर्जा by बाळ सप्रे
अगदी अगदी !!
In reply to अगदी अगदी !! by सूड
शिवी
In reply to शिवी by पिवळा डांबिस
असं पण आहे का!!
In reply to वशाड मेलो ला शिवीचा दर्जा by बाळ सप्रे
हम्म ओक्के...इंट्रेस्टिंग!!!
In reply to हम्म ओक्के...इंट्रेस्टिंग!!! by बॅटमॅन
वशाडी
In reply to वशाडी by नंदन
धन्यवाद णंदणभौ या माहितीबद्दल
In reply to धन्यवाद णंदणभौ या माहितीबद्दल by बॅटमॅन
बास बे
In reply to बास बे by अभ्या..
(वशाडमेला) बॅटमॅन.
In reply to बाकी शेजारी राहणार्या by प्रचेतस
हीहीही
लका लै भारीये बे हे सगळं मजा
In reply to लका लै भारीये बे हे सगळं मजा by मालोजीराव
नाही राजे
अभ्या तेरे धागे का टायटल
In reply to अभ्या तेरे धागे का टायटल by पियुशा
+१
पुण्यात (मुंबईची उपनगरं असतात
In reply to पुण्यात (मुंबईची उपनगरं असतात by प्यारे१
सगळीकडे
-
अगदीच
भारी
In reply to भारी by स्पा
कसं उत्तर द्यायचे राव?
महिती आवडली.
मस्त माहिती रे!
ताईच्या लग्नात तिच्या सासरेबुवांचे नाव चुकवुन
लै भारी रे!!
In reply to लै भारी रे!! by धमाल मुलगा
हीहीही
In reply to हीहीही by अभ्या..
तुमी लिवा धम्या हाय तुमाला
In reply to तुमी लिवा धम्या हाय तुमाला by घाशीराम कोतवाल १.२
:) बोल्लंच मेलं लगेच!
In reply to :) बोल्लंच मेलं लगेच! by धमाल मुलगा
आस्सं आसतय काय? मंग आमालाबी
'अभ्या'सपूर्ण लेख !
In reply to 'अभ्या'सपूर्ण लेख ! by सस्नेह
ऑ?????????
In reply to ऑ????????? by प्यारे१
दुसरा कसला ?
In reply to दुसरा कसला ? by सस्नेह
हायेस तिथं लै सुखी हायेस
In reply to दुसरा कसला ? by सस्नेह
मी पण मी पण
बापरे एवढे झेंगाट असते का
In reply to बापरे एवढे झेंगाट असते का by तुमचा अभिषेक
गणित भारीच असते
In reply to गणित भारीच असते by अभ्या..
बाब्ब्बौ!!
In reply to गणित भारीच असते by अभ्या..
हा हा हा.
नारायणातल्या गोणेश्वराची
हायला, मला वाटलं तुम्ही
हि
मला काय वाटले..
In reply to मला काय वाटले.. by चौकटराजा
नको ती चैन, नको तो भाव
मस्त
In reply to मस्त by नंदन
ओ दादा
In reply to ओ दादा by रमताराम
अर्रर्रर्रर्र
छान
मस्त हो पत्रिकावाले.
व्वा व्वा.... एकदम भारी. आधी
माहितीपूर्ण लेखन आवडले. मला
वेगळ्या विषयावरचं माहितीपूर्ण
>> . हे सर्व सीएमवायके
In reply to >> . हे सर्व सीएमवायके by मराठे
रंगांची अनेक मॉडेल्स आहेत..
भारी रे अभ्या
In reply to भारी रे अभ्या by श्रीरंग_जोशी
थोडीशी गफलत
In reply to थोडीशी गफलत by अभ्या..
बरोबर
उत्तम लेख
अभ्या, सगळ्यांना तुझ्या
माहीतीपुर्ण लेख
मस्त
छान छान. टेक्नीकल काही समजत
भारी रे!!!! फ्लेक्स च्या मजा
व्वा....!
पत्रिका चांगल्या प्रिंटर कडे
In reply to पत्रिका चांगल्या प्रिंटर कडे by प्रकाश घाटपांडे
गफलतींचा जमाना गेला आता
In reply to गफलतींचा जमाना गेला आता by अभ्या..
हो ना!
छान माहीती
In reply to छान माहीती by आप्पा
हीहीही
पाहिलत
In reply to पाहिलत by जेनी...
हीहीही
In reply to हीहीही by अभ्या..
(No subject)