दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.
1. ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच.

2. रविवार स्पेशल - मटण वडे

3. बागेतील कल्पवृक्ष

4. फळांनी भरलेले हापूस आंब्याचे झाड

सुटलं ना तोंडाला पाणी?
झाडाच्या इथे असताना समोरच एक कैरी पडली, मग काय लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावेळी मीठ तिखट मिळालं तर मिळालं नाहीतर हाण तशीच.. आता मात्र मस्तपैकी कापून, तिखट मीठ लावून आस्वाद घेतला.
नारळ.

मार्च अखेर असल्यानी आंब्याची आवक कमी होती खरी पण जे काही मिळालं त्यात तृप्त झालो.

अननस

वर म्हटलेली "काजूची उसळ"

फणसाची (कुयरी) भाजी तितकी आवडत नसल्याने फणस झाडावरच होते..

शिंपल्या आणि भाकरी.. काही लिहायला शब्द नाहीत.

रत्नागिरीला गेलो आणि सुरमई नाही, कसं शक्य आहे? ताज्या सुरमईची कापं

सुरमई थाळी तयार :)

ऑल टाईम फेव्हरीट - बांगडा

फ्रीजमध्ये एक कणस मिळालं. गच्चीच्या कोप-यात कोळश्याचं पोतं होतंच. मग काय.. लागलो कामाला. कोळशे पेटवून त्यावर कणस भाजायला चांगला अर्धा तास श्रम घेतले. एक/दोनदा बोटाला चटकाही बसला पण तिखट मीठ आणि लिंबू लावलेल्या कोळश्यावर भाजलेल्या कणसाचे ४ दाणे तोंडात जाताच श्रमपरिहार झाला

थोडफार फिरणं पण झालं.
रत्नागिरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या गावखडी बीच वर जाणं झालं.

ऐन भरतीची वेळ मिळाली.

तिथेच हे महाशय.. एकटा जीव सदाशिव

तसाच पुढे २० किमी वर आडीवरे ला चक्कर मारली. तेथील प्रचि

इतक्या वर्षांत पहिल्यांदा गुरांना बीच वर फिरवताना पाहिलं

रत्नागिरी-गणपतीपुळे कोस्टल हायवे वर लागणारा आरे-वारे बीचची प्रचि

मार्च महिन्यातही सकाळी थोडी थंडी होती. एका पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर धुकं होतं..

रत्नागिरीतील भगवती किल्ला

रत्नागिरीहून अक्कलकोट ला जाणं झालं..
सोलापूर रस्त्यावर ऊसाच्या रसाच्या ब-याच टपरी दिसतात. ४२ टेंप्रेचर मध्ये गाडीतून उतरायची हिम्मत होत नव्हती, तरी एके ठिकाणी थांबलो. रस विक्रेत्याकडून कळालं की तिथं मागील ३ वर्षं पाऊस नाही पडला. तरी येणा-या जाणा-यांसाठी विक्रेत्याने पाण्याचे माठ ठेवले होते. त्याला दिलसे सलाम!! त्या गरम्यात नुसत्या माठाकडे पाहिले तरी थोडा थंडावा मिळाला.

घाटमाथ्यावरून कोकणातला सूर्यास्त..

वाचने
12941
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळेच फोटो भारी! पण ते
@सगळेच फोटो भारी!>>> +१
In reply to सगळेच फोटो भारी! पण ते by किसन शिंदे
ह्या स्मायली कुठून आणता राव?
In reply to @सगळेच फोटो भारी!>>> +१ by अत्रुप्त आत्मा
वा वा निव्वळ प्रेम !!
शिंपल्या म्हणजे तिसर्या..
In reply to वा वा निव्वळ प्रेम !! by लॉरी टांगटूंगकर
लैच भारी..
तुमचे मुळ गाव कुठले?
जबरी... सगळेच फोटो मस्त.
सोलापूर रस्त्यावर ऊसाच्या
मस्त फोटो.
धागा पहाताना फार फार त्रास
+१
In reply to धागा पहाताना फार फार त्रास by गणपा
अनिवासी लोकांना टार्गेट करून
In reply to धागा पहाताना फार फार त्रास by गणपा
सुरेख फोटो
+१
In reply to सुरेख फोटो by पैसा
+२
In reply to +१ by नन्दादीप
छान फोटो. ह्या वर्षी जायला
अतीब्येकार फोटो
मस्तं कोंकण...
स्वल्पविराम..
In reply to मस्तं कोंकण... by प्रभाकर पेठकर
अहो पेठकर काका...
चालतं हो.. काही लोकं नको
In reply to अहो पेठकर काका... by दिपक.कुवेत
हो ..नं!
In reply to चालतं हो.. काही लोकं नको by मी_देव
साहेब चुक दाखवून द्यायची पण
In reply to हो ..नं! by प्रभाकर पेठकर
अतिशय सुन्दर. माझे साडु
अरेच्चा!!!
झकास.. बरेच दिवसांनी कोकणात
अति सुंदर
वाह . अतिशय सुन्दर
तुम्ही खुप व्यवस्थित आहत का
धन्यवाद रायडर.. नीट -
In reply to तुम्ही खुप व्यवस्थित आहत का by पिलीयन रायडर
सुंदर चित्रे
हे काय? रत्नागिरीत येऊन मिपाकरांना विसरलात?
ताई, मी मार्च अखेरीस आलो होतो
In reply to हे काय? रत्नागिरीत येऊन मिपाकरांना विसरलात? by अनन्न्या
सर्व फोटू "कातिल" आहेत
+१
In reply to सर्व फोटू "कातिल" आहेत by चेतन माने
त्रिवार निषेध …
लेख
काही गरज नाही
In reply to लेख by तिमा
मस्तच......
सर्व फोटो बघून कोकणवासीयांचा
नशिबवान आहात.
फोटो लैच्च जबरी आलेत बॉ!!!!!
-
सुंदर फोटो..
मटणवड्यांचं आणि सुरमईथाळीचं
मी देखील पावसाळ्याचीच वाट