Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मंदार कात्रे on Sun, 04/21/2013 - 09:17
माXXXद . . . कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . " अबे माXXXद दिखता नही क्या ?? " एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे माXXXद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला माXXXद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . . " कशाला आई घालायची रस्त्यात ? भिकारXट साला " . . माझ्या शेजारी कमनीय बांध्याच्या तरुणीसोबत फुकत थांबलेल्या कोण्या पोट्ट्याने आपली प्रतिक्रिया न मागता देऊन टाकली . हसायचे फिदी फिदी आवाज घुमत राहिले . तो माXXXद आता चेष्टेचा विषय झाला होता . काही वेळाने तो स्वतःच उठला . पिशवी हुडकू लागला . काळ्या रंगाची ती carry bag पुरती फाटली होती . आतील जिलेबी आणि बालुशाही रस्त्यावरच्या मातीत मिसळली होती . कोणासाठी घेतली असेल त्याने ? घरी दोन -चार डोळे त्याची वाट बघत असतील ? अनेक दिवस उरवून आणि पुरवून खाण्यासाठी बा काय आणतो याची वाट पहात असतील ? हो . . कदाचित . . तो बा मातीने माती पुसत होता . कळकट शर्टाच्या कोपऱ्याने जिलेबी -बालुशाही वर लागलेली माती पुसत होता . आपल्या नशिबाला दुषणे देत होता . कोपऱ्याला आणि गुढघ्याला झालेल्या जखमा विसरून मातकट अन्न गुंडाळायला नवा कोरा कागद हुडकत होता . एकटा … एकाकी … समाजाची नजर चुकवत पण हसण्याला कान देत ! कोण मदत करणार त्याला ? आपल्यावर संस्कार आहेत न ? ' रस्त्यावर पडलेले न उचलण्याचे ' ! कदाचित एखादा सुटातला साहेब किंवा लो वेस्ट मधली तरुणी पडली असती तर उचलायची इच्छा नक्कीच झाली असती . कारण त्यात मोह , स्टेट्स , संस्कार आणि कदाचित वासनाही असतात . याला उचलून काय साध्य होणार ? हा तर साला ' माXXXद ' आहे . . . माXXXद . . कधीकाळी हा शब्द उच्चारला कि भांडणे व्हायची . . आपल्या आईचा भयंकर अपमान झाला आहे असे समजून दुध का कर्ज अदा व्हायचा पण आता तो काळ गेला . शब्द आणि अपशब्द यातील पडदा विकासाच्या आणि सुधारणेच्या नावाखाली आपणच फाडून काढला . आणि " बीप ' संस्कृतीचा उदय झाला . सध्या तरुणाईचे कार्यक्रम म्हणजे दर ४ शब्दानंतर बीप असे समीकरणच झाले आहे . आपण बडी ,डूड ,स्टड आणि जे काय असेल ते सिद्ध करण्यासाठी आपल्या तीर्थारुपांपासून ते अनोळखी व्यक्तीच्या मातुश्रीपर्यंत सर्वाना शाब्दिक अलंकार देणे हा आजचा ' ट्रेंड ' आहे . अंतरवस्त्रा पासून ते डोक्याला लावायच्या जेल ( तेल आता हद्दपार झाले न ) पर्यंत ब्रांड बघणारे आपल्या शब्दांचे स्टेट्स मात्र बघत नाहीत . बघायची त्यांना गरज वाटत नाही . संस्कार आणी नितीमत्ता हे शब्द आजी आजोबांसोबत वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजत आहेत .. मिळवलेला पैसा -प्रतिष्ठा आणी बुडाखालची गाडी शिव्या द्यायचे शिकवत नाही पण शिव्या हासडायचा माज आणि अधिकार मात्र देते . आपल्या मनासारखा न वागणारा , कोणत्याही गोष्टीत आपल्यापेक्षा कमी असणारा प्रत्येक जण 'मा , बे " इत्यादी असतो . . शिकवणारा शिक्षक असो वा बौद्धिक घेणारा मित्र -मैत्रीण हे सगळे 'चू ' असतात . . आणी यात वावगे काहीच नसते ! २४ म्हणजे "आमच्या " वेळी म्हणायचं वय नाही पण खरच आमच्या वेळी 'शिंच्या ' म्हणल्या वरही गालावर ५ बोटांच्या टेटू उठायचा आणी तो बरेच दिवस टीकायचा सुद्धा . . पण आता तसे होत नाही आणी होणार सुद्धा नाही . . कारण आई -वडील मुले यात मैत्रीचे नाते असते म्हणे . . आणी मैत्रीत मा ,बे ,भो ,चू हे शब्द हॉट फेवरीट असतात . . खर न ? कोणी कोणते शब्द वापरावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न पण कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . . छत्रपती शिवाजी महाराज , स्वातंत्र्यवीर सावरकर यानंतर भाषाशुद्धी ची मोहीम हाती घेतलीच पाहिजे . कारण आपली भाषा हा आपल्या संस्कारांचा ,संस्कृतीचा आणी स्वत्वाचा आरसा असतो असे माझे मत आहे . त्याची वेळीच शुद्धी झाली पाहिजे . असे अनेक माXXXद आपल्या भोवती जगत ,वावरत असतात . प्रचंड विश्वात जग आणी जगात आपली जागा हुडकत असतात . त्यांना ती मिळालेली नसते म्हणून आपल्या तीर्थरूपाना किंवा आपल्याला मिळालेली असते . पण लक्षात कोण घेतो ? म्यानर्स हे केवळ पंचतारांकित हॉटेलात , मिटिंग टेबलावर किंवा हातात मद्याचे प्याले घेऊन हा हु करताना जपायचे असतात . . रस्त्यावर कोण पाहतो मला ? माझा खरा 'रंग ' या फडतूस लोकांना दाखवला तर काय बिघडणार आहे ? याच मनोवृत्तीने आपल्यासह अनेक रस्त्यावर उतरतात आणी शाब्दिक अत्याचार सुटतात आणी स्टेट्स च्या नावाखाली मिरवतात . मी त्या मादरचोद कडे पाहत होतो . . प्रतिष्ठीतव्यक्तीने आपल्यावर विनाकारण मारलेला शिक्का आपल्या अश्रुनी पुसत पुढे सरकत होता . . आपल्या घराकडे . . वाट पाहणाऱ्या पोरांना मळकट जिलेबी -बालुशाही घालण्यासाठी !! असे किती माXXXX तुम्हाला भेटले ? -अंकुर रविकांत देशपांडे http://spaandaan.blogspot.in/2013/04/blog-post_20.html ***PUBLISHED HERE WITH PRIOR PERMISSION OF THE AUTHOR.
  • Log in or register to post comments
  • 26043 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on Tue, 04/23/2013 - 02:01

In reply to खरंच आहे ते (राखाडी आयतातले by बॅटमॅन

Permalink

बाकी नॅगिंग करणे ही कुणाची

बाकी नॅगिंग करणे ही कुणाची मक्तेदारी आहे ते सगळ्यांना माहिती असल्यामुळे आपला तर बॉ पास.
बरं आमची बायकांची मक्तेदारी आहे बास!!!! इट हॅज बीन पेनफुल टू विट्नेस मेन्-वीमेन डिफरन्सेस ऑफ ऑल द प्लेसेस हीअर, व्हेअर वी सीक सम सोलेस फ्रॉम रीअल वल्ड!!! जाऊ दे. पुरषांना बायका कळणार नाहीत आणि व्हाइसे व्हर्सा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/23/2013 - 02:04

In reply to बाकी नॅगिंग करणे ही कुणाची by शुचि

Permalink

पुरषांना बायका कळणार नाहीत

पुरषांना बायका कळणार नाहीत आणि व्हाइसे व्हर्सा.
नाही म्हंजे चिडचीड करायचा हक्क प्रत्येकालाच आहे. पण हे दवणीय विचारमौक्तिक इथे टाकून कूल पॉइंट्स मिळणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/23/2013 - 02:14

In reply to पुरषांना बायका कळणार नाहीत by बॅटमॅन

Permalink

परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी

परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी.कॉम" वर. पुरुष हे शब्दांबद्दल जास्त संवेदनाशील असतात्.म्हणजे, स्त्री जर पुरषाला म्हणाली अरे काय बेजबाबदारसारखा मोजे इकटेतिकडे भिरकावतोस तर तो 'बेजबाबदार" हाच शब्द ऐकतो अन दुखावला जातो. याउलट पुरुष मित्र असतील तर एक पुरुष दुसर्‍याला बेजबाबदार न म्हणता ताकीद देतो की "परत मोजा दिसला तर जाळून टाकेन" अन तो नंतर जाळून टाकतोही. अन पहील्या पुरषाला ते लागत नाही जितका "बेजबाबदार" हा शब्द लागतो. माझ्या "मॅनरलेस" या शब्दाचे असेच काहीसे प्रत्यंतर आले. तो लेख आता सापडत नाहीये. अर्थात सर्व पुरषांना किंवा शिव्या देणार्‍यांनाही मला आऊट अँड आऊट "मॅनरलेस" म्हणायचे नव्हते. मेन हॅव्ह वे टू मेनी एन्डीयरींग क्वालीटीज. जाऊ दे. :(
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/23/2013 - 02:24

In reply to परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी by शुचि

Permalink

सापडला. हा तो लेख

सापडला. हा तो लेख
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/23/2013 - 03:07

In reply to परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी by शुचि

Permalink

या धाग्यावर असे बोलताहात तर

या धाग्यावर असे बोलताहात तर मग हपीसमैत्रीच्या धाग्यात सरसकटीकरण कसे केलेत याचे आश्चर्य अजूनही वाटते आहे. बाकी ते सायकॉलॉजी वैग्रे आपल्याला काही कळत नाही, पण शब्द कुणाला लागत नाहीत? बायका एखादा स्वतःला उद्देशून फाटकन बोललेला शब्द मनाला जास्त लावून घेतात हेही बर्‍याचदा पाहिले आहे. आणि तुम्हाला भलेही औट अँड औट म्यानरलेस म्हणायचे नसेल तरी ज्या पद्धतीने लिहिलेत त्यावरून तसे ते वाटणे साहजिक आहे. आणि या वाटण्यात स्त्री-पुरुष असा भेदही नाही. पण आता असोच.
मेन हॅव्ह वे टू मेनी एन्डीयरींग क्वालीटीज
या वाक्यात मेनच्या आधी "वि" घातले तरी ते वाक्य तितकेच खरे आहे. जर स्त्रियांना पुरुष आणि पुरुषांना स्त्रिया आवडल्या नसत्या तर मानव वंशच पुढे गेला नसता. तस्मात तोही वादाचा मुद्दा नाहीच.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 04/22/2013 - 12:43

In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास

Permalink

प्रतिसाद आवडला आणि संपूर्ण

प्रतिसाद आवडला आणि संपूर्ण सहमती! घटनेशी शीर्षक विसंगत वाटले. भाषेपेक्षा इथे मानसिकतेचा संबंध जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 04/22/2013 - 12:49

In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास

Permalink

पर्फेक्ट!

अजिबात अवांतर नाही. प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Mon, 04/22/2013 - 13:18

In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास

Permalink

आर्थिक सत्तेतून येणारा माज

आर्थिक सत्तेतून येणारा माज जागतिकीकरणाची देणगी आहे असं मी मानत नाही. आपल्या समाजात प्राचीन काळी असा माज मिरवणारे अनेक लोक होते हे "ज्ञात" इतिहासातूनही लक्षात येते. माज फक्त पैशाचा नसतो, अनेक गोष्टींचा असतो हे वास्तव आहे. "झोपडपट्टी भाषा वाईट" असा जो सूर मला जाणवला लेखाचा त्याच्याशी असहमत आहे पूर्णतः सहमत तुम्ही पार लेखाचा पंचनामा केला हो अनिवासी माजोरडा मुक्काम पोस्ट जर्मनी
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 04/22/2013 - 11:05

Permalink

आणि म्हणून खडेच खायचे असंही

आणि म्हणून खडेच खायचे असंही नाही. तसं प्रत्युत्तर अपेक्षित होतं म्हणून आधीच खुलासा केला.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 04/22/2013 - 11:14

Permalink

मला वाटते की आत्यंतिक राग,

मला वाटते की आत्यंतिक राग, असमाधान आणि त्यातून उद्भवणारी असंवेदनशीलता यातून बोलण्यात शिव्या बाहेर पडायला लागतात. अश्या वेळेस येणार्‍या शिव्यांचा फोर्स असा काही असतो की त्या माईंड्सेट मध्ये नसलेल्यांनापण त्या फोर्सची भुरळ पडू शकते. त्यामुळे शिव्या देत बोलणे हे 'स्मार्ट'पणाचे लक्षण वाटू शकतं. पण जवळच्या मित्रमैत्रिणींनी एकमेकांना शिव्या देत बोलणे यात विशेष काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 04/22/2013 - 11:23

Permalink

मूर्ख, बावळट, हलकट, नालायक,

मूर्ख, बावळट, हलकट, नालायक, डँबीस, विश्र्वासघातकी, पाताळयंत्री हे शब्द बोली भाषेत सहज वापरले जातात, ते समाजमान्यही आहेत. पण तरी देखील या शीव्याच आहेत. एखाद्याला मूर्ख म्हणणे आणि मादरचोत म्हणणे यात काहिही फरक नाही. कारण कोणतीही शीवी देण्याचा उद्देश दुसर्‍या व्यक्तीचा अपमान करणे हाच असतो. आणि या दोन्ही शब्दांमधे अपमान करण्याची समान ताकद आहे. एखाद्याला मूर्ख म्हटलेले जिव्हारी लागु शकत आणि एखादा मादरचोद चा स्वीकारही आनंदाने करतो. त्या मूळे शिव्यांची लेव्हल ठरवण्याचा प्रयत्न अस्थायी वाटतो. या शिवाय मूर्ख बावळट हलकट नालायक इ. शब्दांचे अर्थ सुध्दा मादरचोत इ. शब्दांइतकेच जालीम आहेत. मादरचोत म्हणणारा जर असभ्य असेल तर दुसर्‍या व्यक्तीला मूर्ख म्हणणारा तितकाच असभ्य असतो / असते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 04/22/2013 - 11:33

In reply to मूर्ख, बावळट, हलकट, नालायक, by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

आपली घट्ट मैत्री आहे हे

आपली घट्ट मैत्री आहे हे दाखवण्यासाठी कौतुकाने शेलक्या शिव्या देणारे महाभाग पण असतात. कृष्णाला माखन चोर म्हणुन कौतुकाने शिव्या देणार्‍या गौळणी होत्याच की! द्वाड लबाड नालायक हलकट अशा कौतुकाने शिव्या देणारे मध्यमवर्गात आहेतच ना! उन्मादातुन, उद्धटपणातुन, उद्विग्नतेतुन, असहायतेतुन, आक्रस्तळेपणातुन संतापातुन ... दिलेल्या शिव्याचे एकाच मापाने मोजता येईल का?
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 04/22/2013 - 12:50

In reply to आपली घट्ट मैत्री आहे हे by प्रकाश घाटपांडे

Permalink

विठ्ठलाला विठ्या, काळ्या

विठ्ठलाला विठ्या, काळ्या वगैरे संबोधनांनी संबोधणारी "आवली" उव्दीग्नतेमधुनच शीव्या द्यायची. तरीही पांडुरंग तिच्यावर देखील प्रसन्न होता.सदेह स्वर्गात जायची ऑफर तीला देखील होती. त्या मुळे शीव्या कोणत्या मनस्थीतीतुन दिल्या या पेक्षा त्या कोणी दिल्या यावर त्याचे कौतुक करणे अवलंबुन असावे. लहान मुलांना सुध्दा आपण सरसकट मुर्ख बावळट म्हणतो. पण लहानपणा पासुन ते सतत ऐकल्या मुळे किंवा त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळे त्यांना ते कौतुकाने म्हटले असे वाटत असेल. तोच नियम कृष्णाला कथाकारांनी लावला असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 04/22/2013 - 12:11

Permalink

गोष्ट शिव्यांची चालु आहे तर

गोष्ट शिव्यांची चालु आहे तर हे २ लेख आठवले. एक माझाच आहे: भाषिक संपत्ती : http://misalpav.com/node/15135 &%^$@# !!! http://www.misalpav.com/node/11148 : बिका
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 04/22/2013 - 12:15

Permalink

स्ट्रेसबस्टर

शिव्या न देता, वाईट न बोलता, ते सगळं मनात साठवून ठेवणारी माणसं नंतर भलभलत्या मार्गांनी ते बाहेर काढू शकतात; किंवा त्यांना त्यातून नाही नाही ते आजार जडू शकतात; जडतात. त्यापेक्षा ४ शिव्या हासडल्या की ताण नाहीसा होतो. सत्य आहे हे. अनुभवून बघावं. शिव्या स्ट्रेसबस्टर आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/22/2013 - 12:35

Permalink

माझ्या शिव्या

मी बहुतांश वेळा शिव्या देतो त्या रागदर्शक कमी अन विनोदकारक जास्त असतात ... बरं पडतं ... शिव्या द्यायची आपली हौस कम खाज कम राग पुर्ण होते अन समोरचा न चिडता हसत सुटतो अन वातावरण निवळते =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 12:45

Permalink

शिव्यांचा उगीच निषेध करणार्

शिव्यांचा उगीच निषेध करणार्‍यांच्या *&%%%^&$##@@))(**!!!! तबियतदार लोकाण्णी आपापल्या मगदुराप्रमाणे रिकाम्या जागा भरा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 04/22/2013 - 12:50

In reply to शिव्यांचा उगीच निषेध करणार् by बॅटमॅन

Permalink

हे चालेल

*&%%%^&$##@@))(**!!!! हे सांसदीय आहे. त्याबद्दल तुला जिलब्या बक्षीस!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 12:56

In reply to हे चालेल by पैसा

Permalink

बाकी काही द्या, पण जिलब्या

बाकी काही द्या, पण जिलब्या नको =)) =)) जिलबीपाडक असलो तरी जिलबी खात नाही मी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 04/22/2013 - 13:30

In reply to बाकी काही द्या, पण जिलब्या by बॅटमॅन

Permalink

म्हणजे हव तर शिव्या द्या पण

म्हणजे हव तर शिव्या द्या पण जिलब्या नको असच ना!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 14:10

In reply to म्हणजे हव तर शिव्या द्या पण by प्रकाश घाटपांडे

Permalink

अगदी अगदी!!

अगदी अगदी!!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 04/22/2013 - 13:20

Permalink

> 'इथे ? भर रस्त्यात?'

> 'इथे ? भर रस्त्यात?' आजोबांचा प्रतिप्रश्न. परा यांनी रंगवलेला किस्सा छान आहे. त्यावर रीअ‍ॅक्ट होण्यापूर्वी तो खरा आहे असं मानण्याची चूक करू नये. शिवराळ भाषेचे कवतिक शहरी लोकांना खेडवळ लोकांना नाही. परा यांच्या काल्पनिक किस्सा कथनानंतर एक खरा किस्सा फार वर्षापूर्वी महाराष्ट्रात निवडणूकीचा मोसम होता. युतीचे सरकार होते. बाळासाहेब ठाकरे अगदी रंगात आले होते. एके सभेत बोलताना त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली. शरद पवार यांनी या भाषेचा समाचार आपल्या भाषणात घेतला. यावर प्रति उत्तर देताना ठाकरे म्हणाले 'माझी भाषा अशीच आहे, मी ठाकरी भाषेतच बोलतो.' शरद पवार म्हणाले, ' कुणाला सांगताय कौतुक ठाकरी भाषेचं, आमच्या गावकडची एखादी इरसाल शिवी दिली तर आठवडाभर झोप येणार नाही' यावर अर्थातच ठाकरे यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. कितीही म्हटलं तरी खेडवळ बॅकग्राऊंडची बरोबरी कशी करणार. बा द वे शिव्या सुद्धा नैसर्गिक वाटल्या पाहीजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 04/22/2013 - 15:03

In reply to > 'इथे ? भर रस्त्यात?' by आशु जोग

Permalink

ऑ ?

परा यांच्या काल्पनिक किस्सा कथनानंतर एक खरा किस्सा
काय डॉक्यावर पडलात का काय ? का उगाच माझ्याकडून चार शाब्दीक झेलून मिपावर्ती फेमस व्हायची इच्छा आहे ? तिथे स्पष्ट लिहिले आहे, माझ्या समोर घडलेला किस्सा. सदर आजोबांना ओळखत नाही, पण मुलगी त्यानंतर माझ्या कॅफेत बर्‍याचदा आल्याने तिला चांगली ओळखतो. सध्या मी गुजरातेत आहे, तेव्हा आल्यावरती तिची भेट घालून देतो किंवा तिने हॉस्टेल बसलले असल्यास तिची परवानगी घेऊन मोबाईल नंबर देतो, तुमचा नंबर व्यनी करून ठेवा. पण खरेतर माझ्यामते तुम्ही प्रत्यक्ष भेटूनच खात्री करून घ्या, उद्या पुन्हा, 'फोनवर बोलणारी मुलगीच होती कशाव्रुन? असा प्रश्न तुम्हाला पडायला नको. :) आणि इच्छा असल्यास तुम्ही भेटल्या भेटल्या 'प्रेमाने' तुमची चौकशी पण करायला सांगतो. घ्या च्यायला कान तृप्त करून. आणि ह्या धाग्याची वाचनखूण साठवून ठेवा, कारण पुढे ह्या धाग्यावरती येऊन तुम्हाला घडलेल्या भेटीचा वृतांत द्यायचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 04/22/2013 - 15:23

In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

तेव्हा आल्यावरती तिची भेट

तेव्हा आल्यावरती तिची भेट घालून देतो किंवा तिने हॉस्टेल बसलले असल्यास तिची परवानगी घेऊन मोबाईल नंबर देतो, तुमचा नंबर व्यनी करून ठेवा. पण खरेतर माझ्यामते तुम्ही प्रत्यक्ष भेटूनच खात्री करून घ्या
परा मी पण मी पण, माझा पण आक्षेप आहे आता कि तू सांगितलेली गोष्ट काल्पनिकच हाय म्हणून, कृप्या माझा पण आक्षेप नोंदवून घ्यावा हि विनंती - लेडीज होस्टेलसमोरून हॉर्न वाजवत जाणारा मालोजी
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/22/2013 - 15:33

In reply to तेव्हा आल्यावरती तिची भेट by मालोजीराव

Permalink

पेहले इस्तेमाल करे फिर

पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 04/22/2013 - 19:31

In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

>का उगाच माझ्याकडून चार

>का उगाच माझ्याकडून चार शाब्दीक झेलून मिपावर्ती फेमस व्हायची इच्छा आहे ? हरकत नाही मांजरीचे दात पिलांना लागत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Mon, 04/22/2013 - 14:31

Permalink

नैसर्गिक शिव्या

शिव्या सुद्धा नैसर्गिक वाटल्या पाहीजेत
संपूर्ण चर्चेत आतिवासताईच्या प्रतिक्रियेनंतर हे एक वाक्य वाचल्याबरोबर पटल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Mon, 04/22/2013 - 14:43

Permalink

शिव्या सुद्धा नैसर्गिक वाटल्या पाहीजेत.

शिव्या देखिल नैसर्गिक वाटतात याच सगळ्यात उत्तम उदा.माझा कॉलेज चा एक कोब्रा कम सदाशिवपेठी मित्र(पितृकुल कोब्रा आणी मातृकुल सदाशिवपेठी)शिवाय रहायला नारायणपेठेत.यासगळ्यांचा जो काही संकर झाला होता तो अक्षरशः अशक्य होता.हरामखोर ज्या पद्धतीने आणी शांत्,सोज्वळपणे शिव्या द्यायचा,पार समोरच्याचा अख्या खाणदानाचा उद्धार करायचा त्याला तोड नव्हती आणी वाईट गोष्ट आशी असायची की हा स्थुलकाय प्रशांत दामलेचा डूप्लिकेट प्राणी आपल्याला शिव्या घालतोय हे त्या खाणार्‍या गाढवाला कमीत कमी पाचएक मिनिट लक्षातच येत नसे..असा नमुना परत होणे नाही.....
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 04/22/2013 - 14:52

Permalink

नारायण पेठ, पुणे

इथले एखादे काका काना मात्रा वेलांटी सांभाळत सानुनासिक शिव्या देतात तेव्हा खरंच हसायला येतं. असं वाटतं यांना शिव्यासुद्धा कशा द्यायच्या हे कुणीतरी शिकवायला हवं ! - खेडवळ जोग
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 04/22/2013 - 16:56

Permalink

आमच्या ईथल्या भाषेबद्दल ईतर

आमच्या ईथल्या भाषेबद्दल ईतर लोकांचे प्रेम पाहुन डोळे भरभरून आले ;) झोपडपट्टीवाला
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 04/23/2013 - 01:17

Permalink

कोकणात सिन्धूदुर्ग जील्ह्यात

कोकणात सिन्धूदुर्ग जील्ह्यात "मायझव" हा शव्द सर्रास उच्चारला जातो. आणी कधी कधी वडील आपल्या मुलाला या शब्दाने सम्बोधताना पाहीले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/23/2013 - 01:55

Permalink

Men socialize by insulting

Men socialize by insulting each other, but they don't really mean it. Women socialize by complimenting each other, and they don't really mean it either. हे एक सुरेख वाक्य वाचनात आलेले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 04/23/2013 - 08:55

In reply to Men socialize by insulting by शुचि

Permalink

भारी (आणि खरं) वाक्य आहे!

भारी (आणि खरं) वाक्य आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by साळसकर on Tue, 04/23/2013 - 11:34

Permalink

लेखात फुल्ल्या फुल्ल्या का

लेखात फुल्ल्या फुल्ल्या का टाकल्या?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 04/23/2013 - 13:25

Permalink

बिकाचा याच विषयावरचा एक सुंदर

बिकाचा याच विषयावरचा एक सुंदर लेख आठवला. दुर्दैवानं दुवा मिळाला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 04/24/2013 - 04:09

In reply to बिकाचा याच विषयावरचा एक सुंदर by गणपा

Permalink

हाच तो लेख. परत वाचला. मजा

हाच तो लेख. परत वाचला. मजा आली.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com