हा पदार्थ अगदी अनवट आहे. अगदी एखद्या अनवट रागासारखा, दुर्मीळ पण अत्यंत श्रवणीय (खवणीय :)) हा काही खासाहेबांचा पदार्थ नाही. याचा शोध मला खूप नंतर म्हणजे मी स्वतंत्रपणे मैफीली करायला सुरवात केल्यानंतर. कसा लागला ते सांगेन शेवटी. पण आधी पाकृ. पाहू. पदार्थ दिसायला एवढा अॅट्रेक्टीव दिसत नाही गार्नीशिग केल्यास छान दिसेल. कसले करावे ते सुचवा.
शेंगोळे: साहित्य कुळथाचे पीठ ३ वाट्या, लाल सुक्या मिरच्या सहा सात (आवडी प्रमाणे अजूनही चालतील)., १ वाटी चिरलेली कोथिंबिर , १ चमचा जिरे पावडर, आठ दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी तेल. मीठ.
कुळथाचे ताजे पीठ घ्यावे.
सुक्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरेपुड असे एकत्र बारीक वाटून घ्या.
हा वाटलेला मसाला कुळथाच्या पिठात घाला चवीप्रमाणे मीठ घाला. पाणी घालून पीठ भाकरीच्या पिठापेक्षा जरा घट्ट मळून घ्या, त्याला तेलाचा हात लावून गोळा करून घ्या.
आता पोळपाटाला जरा तेलाचा हात लाउन लांब शेवयांप्रमाणे पण जाड अशा शेंगा करायच्या आहेत त्या वळताना जरूर पडल्यास तेलाचा हात लावत रहा.
गॅसवर एका पातेल्यात अंदाजे शेंगा बुडून दोन बोटे उरेल एवढे पाणी घेऊन आधण ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात तीन चमचे तेल घाला.उकळी येउद्या. आता वळलेल्या शेंगा त्यात हळू हळू सोडायच्या आहेत. सगळ्या शेंगा सोडल्यावर पाच ते दहा मिनिटे त्या शिजूद्या.
मस्त खमंग वास सुटलेला असेल तोंपासू. एखादी शेंग काढून शिजल्या का पहा. शिजल्यावर खाली उतरवा. गरमा गरम सर्व करा.
ह्यात अजूनही एक व्हेरिएशन करता येते.तेही अतिशय चविष्ठ लागते ते करायचे असल्यास वरीलप्रमाणे शिजलेले शेंगोळे गरम असतानाच चाळणीवर काढून पाणी असल्यास काढून टाका. मग मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट याची मस्त फोडणी करा, त्या वर हे शेंगोळे मस्त खरपूस परता. वर कोथिंबीर, अगदी बारीक चिरलेला कांदा घालून फस्त करा.
हा पदार्थ पोट भरीचा म्हणून वन आयटम मील म्हणून करता येतो. नुसताच खायचा असतो.
आता ही रेसिपी कशी मिळाली या विषयी:
गाव कुठले ते आठवत नाही पण नाशीकच्या पुढचे कुठलेतरी शुगर लॉबीचे होते. एका साखर कारखान्याच्या वार्षिक समारंभात एका दिवशी माझी मैफल ठरलेली. संध्याकाळची. मी आणि साथीदार त्या दिवशी सकाळीच पोचलो. कारण ती एकच गाडी होती. स्टेशनवर त्यांची गाडी नेण्यासाठी आलेली. दीड तासांचा प्रवास करून त्या ठिकाणी पोचलो. कारखान्याच्या रेस्ट हाउसवर सगळे उतरलो. व्यवस्था उत्तम. कार्यक्र्म छान झाला, आधी श्याम कल्याण गायलेला आठवतो.
त्यांचे साहेब म्हणजे राजकारणातले, सहकारातले मोठे प्रस्थच होते. म्हणाले बाई, आमच्या शेतावर तुम्हा सग़ळ्यांना पार्टी आहे आमच्या घरची मंडळी देखील आहेत. मी जरा घाबरलेच. पण पार्टी म्हणजे वनभोजनासारखे असे समजले. त्यांच्या घरून बायका मंडाळी येऊन बोलावू लागली. शेवटी साथीदारांसकट जायचे ठरवेले तिथे हा पदार्थ केला होता. जोडीला भुईमुगाच्या शेंगा, शेतातला गुळ असे काही पदार्थ होते. पदार्थ समोर आला तर खाण्याचे धैर्य होइना. पण माणसे निर्मळ होती. विश्वास ठेउन खाल्ला. लाजबाब चव. आणि मग कृति वगैरे विचारली. भरपूर हाणला. नंतरही अनेकदा कार्यक्रमासाठी तिथे जाणे झाले.
निघतांना कुळथाचे पिठ जवळ जवळ पाच सहा किलो असेल. दिले होते. नंतर अनेकदा केला अजूनही करते. माझा मुलगा शिकायला परगावी होता करायला सोपे, पोट भरणारे म्हणून त्यालाही देत पीठ देत असे बरोबर. त्याला आणि त्याच्या मित्रांना प्रचंड आवडायचे. आता या गोष्टीला चा़ळीस एक वर्ष झाली असतील. आमच्याकडे सगळ्यांना आवडतो. अगदी नातवंड सुध्दा खातात. पण जरा याचे रूप सुधारायचे आहे, काय करता येईल तुम्ही सांगा. चवीची मात्र गॅरेंटी आहे.
गंम्म्त म्हणजे कुळीथ कोकणात पण होतो पण हा पदार्थ मात्र कोकणात केल्या जात नाही नाशिक पासून खानदेश पर्यंत एक विशिष्ट पट्टा आहे. तिथेच हा पदार्थ माहित आहे. करुन बघा आणि सांगा.
टीप: ईथे चित्रे दिसत नसतील तर ईथे पहा: https://plus.google.com/photos/113291661719853313847/albums/58684553873…

वाचने
30035
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहा ईथेसूध्दा: https://plus
वाचला होता...
चांगली आहे पाकृ.. करुन बघायला
शेंगोळ्या तांदळ्याच्या किंवा
In reply to चांगली आहे पाकृ.. करुन बघायला by Mrunalini
शेवटी आली म्हणायची
होय एकच
In reply to शेवटी आली म्हणायची by किसन शिंदे
भारतात खान-पानाचे केवढे
माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात ,,,
In reply to भारतात खान-पानाचे केवढे by शुचि
ह्या शिंगोळ्या आम्ही
ह्या शिंगोळ्या आम्ही
In reply to ह्या शिंगोळ्या आम्ही by स्मिता चौगुले
ओह्ह! धिस्श इज पास्ता? सो
नो....
In reply to ओह्ह! धिस्श इज पास्ता? सो by स्पंदना
अरे वा!
हाहाहा दिसण्याचं राहू द्या
In reply to अरे वा! by पैसा
दिसण्याचं राहू द्या.
In reply to अरे वा! by पैसा
सुरेख आहे पदार्थ! असे पदार्थ
हो. तू म्हणतेस तसा पण एक
In reply to सुरेख आहे पदार्थ! असे पदार्थ by रेवती
ओक्के. धन्यवाद.
In reply to हो. तू म्हणतेस तसा पण एक by गौरीबाई गोवेकर
मस्तच..
माझ्या आवडीचा पदार्थ पण कधीच
मग मी ते नवर्याला सूप म्हणून
In reply to माझ्या आवडीचा पदार्थ पण कधीच by त्रिवेणी
नशीब
In reply to मग मी ते नवर्याला सूप म्हणून by शुचि
यम्मी!
आठवण झाली
.
In reply to आठवण झाली by कच्ची कैरी
छान.....
खरच खुपच छान ! आम्हाला पण खुप
पदार्थ छान दिसतोय आणि कॄतीहि सोपी दिसतेय
कुठीथ पीठ जरासे भाजून घेऊन बघा आवडते का..
In reply to पदार्थ छान दिसतोय आणि कॄतीहि सोपी दिसतेय by दिपक.कुवेत
माझी आजी करायची शेंगोळ्या आणि
मस्तं!!
हा पदार्थ माजि आई बनवते हा
मधून मधून आमच्याकडेही
समजा आपल्याला मॅगी सारख्या
कोकणात नाही केले जात शेंगोळे!
रत्नांग्री म्हटल्यावर...
In reply to कोकणात नाही केले जात शेंगोळे! by अनन्न्या
आमच्याकडे शेंगोळ्या करताना
आवडीचा पदार्थ
माझाही हा पदार्थ अगदी जीव की
In reply to आवडीचा पदार्थ by बरखा