सानिकाताईच्या "झणझणीत सातारी कोंबडी ' या पाकृत बऱ्याच मीपाकरांनी कांदा लसुन मसाल्याची ककृती विचारली आहे
म्हणून मला माहित असलेली कांदा-लसूण मसाल्याची गावराण पाकृ (आई कदुन शिकले आहे) ती एथे देत आहे.
आम्ही तो वर्षाचा एकदाच बनवतो त्याचे प्रमाण मी देवू शकते पण फोटो वैगेरे नाहित
हा कांदा-लसूण मसाला(आम्ही त्याला मसाला तिखट/काळे तिखट असे म्हणतो) फार झणझणीत असतो, थोडासाही पुरे होतो. मस्त तर्रीवाले मटण्-चिकण होते आणि हे वापरुन भाजी केली तर इतर मसाल्याची गरज ही नसते
साहित्य -
१ किलो लाल मीरच्या , शक्यतो लवंगी घेणे नसेल तर कोणतीही तिखट असणारी
१ किलो कांदा (कापून वाळवलेला )
१/४ लसून
१/४ धने
१/४ खोबरे खिसून / पातळ काप करून
५० ग्राम हळकुंड
५० ग्राम मोहरी
५० जिरे
मुठभर धोंड्फुल आणि तमालपत्र
तेल
१/४ किलो खडा मीठ
मसाले १ किलो मिरची साठी प्रत्येकी १० ग्रॅम (प्रत्येक मसाल्याचे २ भाग करणे - ५-५ ग्रॅम )
लवंग
दालचिनी
शाहजीरे
सालीसकट वेलची
(मिरे वापरत नाही कारण त्याने खूपच तिखट आणि जळजळीत तिखट होते, हवे असल्यास वापरू शकता पण थोड्या प्रमाणात )
इतर मसालेही वापरू शकता तुमच्या आवडी प्रमाणे
असेलतर
कोथिंबीर वाळवून
सुंठ (वाळवलेले आले )
कृती-
मिरच्या १ दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवणे आणि नंतर त्याची देठे काढणे (सगळ्यात कंटाळवाणे काम आणि हात हि तिखट होतात चुकून डोळ्याला लागला कि शिमगाच )
आता साहित्य भाजायला घेणे
जाड बुडाची कढई तापत ठेवणे (आम्ही गावी हे शक्यतो बाहेर चूलीवर करतो कारण पुढे सांगते)
१) त्यात आता कांदा भाजायला घ्या. तेल न घालता कांदा खरपूस अगदी लालसर असा मंद आचेवर भाजून घ्यावा, हाताने दाबले तर तुटायला हवा. आवश्यक वाटल्यास थोडेसे मीठ घालून भाजू शकता
२) लसूण थोडासा ठेचुन ठेवावा
३) धणे कपभर तेलात परतून घ्यावेत ३-४ मिनिट
४ ) आता खोबरेही खरपूस भाजून घेणे , याला तेल लागते
५) आता हळकुंड तळून घ्यायचे, तळला कि हा छान फुगतो
६) मोहरी जिरे देखील थोड्याशा तेलात टाकून परतून घेणे , हे करताना कढईवर १ मीन झाकण ठेवावे, नाहीतर अर्धे जिरे मोहरी तडतडून कढईच्या बाहेर पडतील
७) धोंड्फुल तमालपत्र आणि वापरणार असल्यास सुंठ देखील थोड्याशा तेलात तळून घ्यावे
८) साहित्यात मसाल्याचे २ भाग करण्यास सांगितले होते (प्रत्येकी ५-५ ग्रॅम )
१ भाग मसाला तेलात तळून घेणे, करपवू नयेत लगेच काढायचे तेलातून नाहीतर तुमचे तिखट कडवट होईल
आणि १ भाग मसाला तसाच कच्चा घ्यावा (याचे कारण मला नक्की सांगता येणार नाही, कदाचित मसाल्याचा सुगंध तीखटाला यावा यासाठी असेल)
आता महत्वाचा भाग, मिरच्या भाजणे
मिरच्या भाजताना भयंकर ठसका उठतो, किचनमध्ये केले तर घरात असणाऱ्या व्यक्ती याच्या ठसक्याने खोकायला लागतात म्हणून आम्ही हा मिरची भाजणीचा कार्यक्रम बाहेरच्या चुलीवर करायचो
मिरच्या मोठ्या लोखंडी पाटीत किंवा कढईत भाजाव्यात, थोडेसे कोरडे भाजून झाले कि त्यात पळीभर तेल घालावे आणि २-३ मिनिट पर्यंत चांगले भाजत राहणे (मिरची भाजताना सतत हलवत राहणे नाहीतर करपेल )
आता हे सर्व साहित्य आम्ही गावी मिरची कांडपात नेत असू पावडर करायला, मिरची कांडपाची सोय नसेल तर तुम्ही घरी मिकसर मध्ये करू शकता फक्त प्रमाण कमी हवे
एक एक करून सर्व साहित्य बारीक करून घ्यावे आणि चांगले मिसळावे
नंतर हि पावडर बारीक चाळणीतून चाळून घ्यावी आणि शक्यतो आपण लोणची वैगेरे ठेवतो तश्या चीनी मातीच्या बरणीत भरून घट्ट झाकून ठेवावे जेणेकरून मसाल्याचा वास टिकून राहील
टिप - १) भाजलेले खोबरे,कांदा आणि ठेचलेला लसुन हे तिन्ही वेगवेगळया भांड्यात ठेवावे , कांद्याचा कडकपणा टिकून राहायला हवा ना म्हणून
२) तळून राहिलेले तेल नंतर आम्ही तिखटाच्या पावडरीत मिसळतो पण जर तिखट खुप दिवस म्हणजे ६ महिने वैगेरे टिकवायचे असेल तर तेल घालू नये, कुबट वास येवू शकतो तेलाचा
वाचने
19182
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
धन्यवाद!
कॄती छान..
वेळखाउ तर आहेच, म्हणूनच तो ६
In reply to कॄती छान.. by दिपक.कुवेत
धन्यवाद!
कांद्यातील पाण्याचा अंश निघून
In reply to धन्यवाद! by पैसा
आमच्याकडे यात तीळ, त्रिफळं
हो यात तुम्ही अजून बरेच मसाले
In reply to आमच्याकडे यात तीळ, त्रिफळं by मस्त कलंदर
धन्यवाद..
!!!!!!
In reply to धन्यवाद.. by मुक्त विहारि
(No subject)
In reply to धन्यवाद.. by मुक्त विहारि
छान.
हो या मसाल्यात बरेच
In reply to छान. by सस्नेह
अच्छा मिसळलेल्या तिखटाला
या तिखटात शेंगदाणा तेल मिसळुन
In reply to अच्छा मिसळलेल्या तिखटाला by स्पंदना
नवीन तिखट बनवले की आमच्याकडे
In reply to अच्छा मिसळलेल्या तिखटाला by स्पंदना
अहाहा
मेतकुट
In reply to अहाहा by प्रसाद गोडबोले
स्वातीताईंची आहे मिपावर. देते
In reply to मेतकुट by कपिलमुनी
धन्यु
In reply to स्वातीताईंची आहे मिपावर. देते by शुचि
पूडचटणी काय?
In reply to धन्यु by कपिलमुनी
रेसिपी
In reply to पूडचटणी काय? by अभ्या..
च्यायला!
In reply to पूडचटणी काय? by अभ्या..
डांगर उडदाच्या डाळीचा करतात.
In reply to धन्यु by कपिलमुनी
धन्यवाद
In reply to डांगर उडदाच्या डाळीचा करतात. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to अहाहा by प्रसाद गोडबोले
आम्ही लहानपणी हा मसाला ,
In reply to अहाहा by प्रसाद गोडबोले
वा. फोटो नसले तरी मसाल्याचे
तुम्ही अम्बारीचा कांदा-लसूण
In reply to वा. फोटो नसले तरी मसाल्याचे by बंडा मामा
मस्त कलंदरताईनी खाली दिलेले
In reply to वा. फोटो नसले तरी मसाल्याचे by बंडा मामा
वाह.. वाचूनच मसाला करावा आणि
मस्तं
धन्यवाद सानिकाताई..
In reply to मस्तं by सानिकास्वप्निल
सांगली परिसरात अशी तयार चटणी