✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाते देवाशी...

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Mon, 04/15/2013 - 10:12  ·  लेख
लेख
एक प्रश्न परमेश्वर / देव ह्याच्याशी द्वैत भावात मानवी नाते संबंधातील अनेक (किंवा बहुतेक सर्व) नाती जोडली आहेत. पिता / माता / बंधू / सखा / पुत्र / कन्या /मालक / नोकर / राजा इत्यादी इत्यादी.. एवढेच काय पण पती सुद्धा परंतु कुणीही परमेश्वराला 'पत्नी' नात्यात मानलेले/उल्लेखिलेले नाही... काय कारण असू शकेल???
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5123 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

भवानी, कडकलक्ष्मी

आनंद घारे
Mon, 04/15/2013 - 10:34 नवीन
पत्नीला मात्र भवानी, कडकलक्ष्मी अशी संबोधने काही लोक करतांना दिसतात.
  • Log in or register to post comments

प्वॉईंटाचा मुद्दा आहे

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/15/2013 - 10:44 नवीन
प्वॉईंटाचा मुद्दा आहे
  • Log in or register to post comments

येकझ्यॅक्टली

प्रसाद गोडबोले
Mon, 04/15/2013 - 12:31 नवीन
मागे आमच्या एका मित्राने हाच पॉईंट मांडला होता , की सखी / पत्नि ह्या रुपातही देवी कधीच का असत नाही ?? "नवरात्रीत आजकाल ज्या देवीच्या मुर्ती बनवतात त्यात भारी भारी साड्या (काधी कधी ट्रान्स्परंटही ) , कमनीय बांधा , चकचकीत मेकप , इतक्या कलाकुसरीने बनवलेले असते की देवी कोणत्याच अँगलने "आई" वाटत नाही ." अन ह्यावर जोरदार राडा झाला होता
  • Log in or register to post comments

पॉइंट आहे. सेम असे निरीक्षण

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 19:02 नवीन
पॉइंट आहे. सेम असे निरीक्षण मांडणार्‍या एका मित्राला तेव्हा आम्हीही पर्व्हर्ट म्हणाल्याचे आठवतेय. पण आता इतके असहमत नाही त्याशी. अर्थात मूळ पॉइंटही रोचक आहे. हिंदू संस्कृती पुरुषप्रधान असल्याने असे काही असेल म्हटले तर स्त्रीप्रधान संस्कृतीत सखी/पत्नी रूपात असे काही आहे किंवा नाही ते पाहिले पाहिजे. मग जनरलायझेशन करणे जमू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कुठेतरी यबद्दल वाचले होते की

शुचि
Mon, 04/15/2013 - 18:55 नवीन
कुठेतरी यबद्दल वाचले होते की परमेश्वर हा सर्वोच्च "धन = दाता" आहे आपण सारे त्याच्यापुढे ऋण शक्तीचे आहोत. आणि नंतर लिहीले होते की पुरुष हा "धन" असतो तर स्त्री ही ऋण म्हणून आपण सर्व देवापुढे स्त्री आहोत. तसेच, ज्योतीषात सर्व विषम राशी या पुरुष राशी आहेत, दिवस हा काळाचे त्या प्रतिनिधीत्व करतात तर सर्व सम राशी या स्त्री राशी असून, रात्र हा समय दर्शवितात. नक्की पुरुष=विषम=धन , तर स्त्री=सम=ऋण का ते माहीत नाही.
  • Log in or register to post comments

>>> परमेश्वराला 'पत्नी'

प्यारे१
Mon, 04/15/2013 - 22:29 नवीन
>>> परमेश्वराला 'पत्नी' नात्यात मानलेले/उल्लेखिलेले नाही... 'पत्नी हाच परमेश्वर' हे नि हेच खरं आहे त्यामुळे खर्‍या गोष्टी मानायच्या कशाला ? दुसरं म्हणजे खरं बोलायला लोक घाबरतात हो! त्यामुळे उल्लेखत नाहीत.
  • Log in or register to post comments

सही जबाब..

मुक्त विहारि
Mon, 04/15/2013 - 22:58 नवीन
बिलकूल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वाहवा!

अग्निकोल्हा
Mon, 04/15/2013 - 23:44 नवीन
पत्नी हाच परमेश्वर' हे नि हेच खरं आहे त्यामुळे खर्‍या गोष्टी मानायच्या कशाला ? पुरुष लोक मुळातच समजुतदार, प्रेमळ व हुशार असतात. त्यांना स्त्रियांचा मोठेपणा नेहमीच मान्य असतो. पण स्त्रिया मात्र पुरुषांना पदोपदी कस्पट समजतात व फाजील अहंकाराला बळी पडतात म्हणुन त्यांना पदोपदी या गोश्टिची सातत्याने जाणिव करुन देणे आवश्यक असते की पुरुष म्हणजे तुच्छ गोश्ट न्हवे तर प्रत्यक्ष परमेश्वराचेच अवतार होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कंदी नाई त्ये ड्वाले पानाव्ले

स्पंदना
Fri, 04/19/2013 - 12:47 नवीन
कंदी नाई त्ये ड्वाले पानाव्ले बगा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

यातली मेख संबंधितांना कळेल तो

बॅटमॅन
Fri, 04/19/2013 - 12:52 नवीन
यातली मेख संबंधितांना कळेल तो सुदिन!! पण कधी कळणार नाही हेही खरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

भक्त आणि परमेश्वर

नीलकांत
Fri, 04/19/2013 - 13:13 नवीन
पिता / माता / बंधू / सखा /मालक / राजा - हे सर्वमान्य आहे... पुत्र / कन्या / नोकर - हे फारच क्वचित दिसतं.. नोकर मानल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही. जाणकार उदाहरणे देतील. खरं तर त्या परम तत्वाला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. हिंदू धर्मात देव प्राप्तीसाठी वेगवेगळे मार्ग सांगीतले आहेत त्यांना आपण 'योग' असे म्हणतो... हटयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, प्रेमयोग असे अनेक आहेत. त्यामुळे या वेगवेगळ्या मार्गाने त्या ईश्वराला संबोधण्याचा प्रकार होतो. यात सामान्य तत्व असे असते की परमेश्वर हा भक्ताच्या पेक्षा मोठा मानतात, जेणे करून 'भक्त म्हणजे लहान हा परमेश्वर म्हणजे मोठ्या' तत्वात विलीन होईल. यावरून वरील पहिल्या ओळीतील संबोधने येतात. ज्या काळात ह्या भक्तीसंबोधनाच्या कल्पना आल्या त्यावेळी भारतीय समाजात पत्नी लहान असायची आणि पती मोठा.. पत्नी पतीला समर्पीत असायची. त्यामुळे देवाला पती मानल्या जायचं पत्नी नाही.
  • Log in or register to post comments

+१..

गुलाम
Fri, 04/19/2013 - 15:01 नवीन
+१.. 'देऊळ' मधील कुलकर्णी अण्णा म्हणतात तसं - "ज्याला जसा देव पहायचा आहे त्याने तो तसा पहावा, ज्याला नको आहे त्याने पाहू नये. हे स्वातंत्र्य सर्वांना आहे." अर्थात हे जेव्हा सगळ्यांना पटेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

नॉट एक्झॅक्ट्ली !!

अर्धवटराव
Sat, 04/20/2013 - 02:18 नवीन
स्त्रीच्याठिकाणि असलेल्या सृजनशक्तीमुळे तिला प्रकृतीरूप मिळाले. व हि प्रकृती ज्याच्याठिकाणि विलय पावते तो पुरुष. हे विश्रांतीस्थान स्थलकाल अबाधीत आहे अशी संकल्पना. म्हणुन पुरुषदेहधारी भक्त सुद्धा स्वतःला परमेश्वराची पत्नि म्हणवतो . हा भेद स्त्री दुय्यम व पुरुष श्रेष्ठ असा नसुन प्रवासी व गंतव्य असा आहे. अर्थात, हि टेक्नीकल व्याख्या झाली. समाजात अ‍ॅक्चुअल व्यवहारात श्रेष्ठ-कनिष्ठ भेदाभेद पाळल्या जातोच. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

सांख्य योगातील..

लाल टोपी
Sat, 04/20/2013 - 02:55 नवीन
प्रकृती आणि पुरुष या वेगळ्या संकल्पना आहेत. स्त्री आणि पुरुष यांचा येथे संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बरं.

अर्धवटराव
Sat, 04/20/2013 - 03:09 नवीन
अवांतरः मीराबाई एकदा गौरांग संप्रदायाच्या एका अधीकारी पीठाधीशाच्या (श्रीनीवास ठाकुर??) दर्शनाला गेली. पीठाधीश स्त्रीयांना भेटत नसत. त्यांनी तसा मीरेला निरोप पाठवला. त्यावर मीरेने उत्तर दिले कि आपण सर्व जीव त्या श्रीकृष्णाच्या स्त्रीयाच नाहित काय? मीरेची उत्तर ऐकुन पीठाधीशांना आपली चुक उमगली व त्यांनी मीरेची भेट घेतली. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

पुत्र कन्या नोकर..

अत्रन्गि पाउस
Fri, 04/19/2013 - 13:41 नवीन
दगडूशेठ हलवायाच्या पत्नीने गणपतीला पुत्र मानले होते.. श्रीखंड्या एकनाथ महाराजांच्या घरी राबला होता.. कन्येचे उदाहरण मात्र माहित नाही..लिहिण्याच्या ओघात ( व ज्ञानेश्वरकन्या - गुलाबराव महाराज ह्या संदर्भामुळे) लिहिले गेले भक्त लहान व परमेश्वर मोठा हे सामान्य तत्व असले तरी.. निदान भक्तोत्तम परमेश्वराशी ज्या पातळीवर एकरूप होतात तिथे हे घडायला हरकत नाही.. नाही म्हणायला माधवनाथ महाराज एका शिष्याशी बोलतांना 'तुझे पत्नीपद घेतले'असे म्हटल्याचे उल्लेख ..माधवनाथ दीप प्रकाश ह्या पोथीत आहे ..
  • Log in or register to post comments

पत्नीला गृहलक्ष्मी म्हणायची

मृत्युन्जय
Fri, 04/19/2013 - 15:37 नवीन
पत्नीला गृहलक्ष्मी म्हणायची पद्धत आहे. म्हणजे देवीच ना?
  • Log in or register to post comments

!

अन्या दातार
Fri, 04/19/2013 - 15:45 नवीन
पत्नीला गृहलक्ष्मी म्हणायची पद्धत आहे.
फक्त अधोरेखित करतो. जास्त बोलत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पत्नीला देवी मानणे वेगळे व

शुचि
Fri, 04/19/2013 - 19:26 नवीन
पत्नीला देवी मानणे वेगळे व देवीला पत्नी रुपात पाहणे वेगळे. वरती पती व देव याबाबतीच्या वादात तोच घोळ झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मानवयोनीतील स्त्री पत्नी

पाषाणभेद
Sat, 04/20/2013 - 03:27 नवीन
मानवयोनीतील स्त्री पत्नी मानल्याने/होण्याने काय काय परिणाम होतो हे समस्त पुरूषवर्ग चांगलेच जाणून असतो. तशात देव/देवी सारख्या पावरबाजाला पत्नी मानल्याने काय काय परिणाम होतील हेदेखील समस्त पुरूषवर्गाला वरील वाक्यातील अनुभवामुळे आधीच समजू शकते. त्यामुळे परमेश्वराला 'पत्नी' नात्यात मानलेले/उल्लेखिलेले नाही.
  • Log in or register to post comments

काय कारण असू शकेल???

अग्निकोल्हा
Sat, 04/20/2013 - 03:45 नवीन
काय कारण असू शकेल???
अर्थातच शारीरीक लिंगभेद आणखि काय कारण ? पुरुष शरीराने शक्तिशाली, स्त्रि अबला. तसच परमेश्वर हे सामर्थ्याच प्रतिक म्हणून पुरुष तर भक्त हे लिनता, समर्पण व अवलंबीत्वाच प्रतीक म्हणून स्त्रि. कारण लिनता, समर्पण व अवलंबित्वाची भावना पोसल्याशिवाय परमेश्वराशी भक्त एकरुप कसा बरे होउ शकणार, भक्त कसा ठरणार ? तसेच जर सामर्थ्यवान नसेल तर भक्त अशा कोणत्या देवाला शरण जाणार ? समस्त श्रध्दावान भक्तगणांमधे असा कोण बरे महात्मा आहे जो (सैतानाकडुन) पराभुत झालेल्या देवाला पुजतो ? जो सर्वशक्तीशाली नाही त्याला फार प्रेमाने शरण जातो ?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा