लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मिसळपाववर नव्या स्त्री विभागाच्या स्थापनेची घोषणा आपण सर्वांनी वाचलीच असेल. त्याबद्दल ही माहिती.
इथे कथा, काव्य, चर्चा, पाककृती, भटकंती, कलादालन असे विभाग आहेतच. त्याशिवाय नव्यानी लिहिणार्या स्त्रियांना उत्तेजन मिळण्यासाठी व फक्त स्त्रियांचे असे जे विषय असतात त्यासाठी हे वेगळे दालन सुरु करण्यात येत आहे. यातून प्रोत्साहन मिळून मिसळपाववर स्त्री-सदस्यांचा सहभाग अधिकाधिक वाढेल अशी अपेक्षा आहे.
'लिहित्या व्हा' या कार्यशाळेची माहिती देताना काही स्त्री सदस्यांच्या चर्चेत असा एक प्रस्ताव पुढे आला की एक बंदिस्त दालन स्त्री सदस्यांसाठी सुरू व्हावे. अगदी घरगुती वस्तू असोत, खास कलागुण असोत, प्रकृतीच्या तक्रारी असोत, स्वैपाकातल्या साध्या साध्या गोष्टी असोत, किंवा इतर कुठल्या व्यावहारीक गोष्टींबद्दलची माहिती असो, यासाठी स्त्रियांना एक व्यासपीठ हवे आहे. ज्या स्त्रियांना राजकीय, आर्थिक किंवा अन्य चर्चांमधे रस नसतो पण इतर स्त्री सदस्यांशी इंटरअॅक्शन आवडेल, त्या मोकळेपणाने अशा दालनात वावरू शकतील. अश्या वेगळ्या दालनामुळे आपल्या नेहमीच्या माहितीतल्या ४ जणींऐवजी अजून १०० जणींचे मत जाणून घेता येइल. फक्त स्त्रियांना रस वाटेल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत. उदाहरणार्थ; मध्ये आलेला एक 'फ्रॉक'चा धागा. त्यावरची शिवणाची चर्चा होउच शकली नाही. त्यावरच्या थट्टा-मस्करीला विरोध नाही, पण तरीही त्यात काहीजणींचा उत्साह मावळतो आणि इतर काहीजणींची काही छोट्या गोष्टी शिकण्याची संधीही जाते. "अबोली" हे दालन अश्या सर्व गोष्टींना व्यक्त होण्यासाठी स्थापन करण्यात येत आहे.
हा विभाग केवळ स्त्रियांसाठी आहे. इथली व्यवस्था मिसळपावच्या स्त्रीसंपादिकांकडे असेल. पुरुष संपादकांना या विभागात प्रवेश नाही. अर्थातच नीलकांत व प्रशांत अपवाद आहेत. तांत्रिक बाबींसाठी त्यांना यावे लागेलच.
ज्या स्त्रियांना या दालनात येण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी काही नियम.
१. मंचाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रथम मिसळपावचे सदस्यत्व घ्यावे. नंतर सदस्येने आपली माहिती (आपला मिसळपाव आयडी, खरे नाव, फोन नंबर, इमेल, राहण्याचे गाव, देश) ही माहिती मिपावरच्या संपादिकांना पाठवावी. ही माहिती केवळ संपादिका आणि नीलकांत यांच्यापुरतीच मर्यादित राहील, व इतर कुणालाही दिली जाणार नाही. (ही माहिती इथल्या व्यक्तिगत निरोपाऐवजी कुणाला इतर इमेल-आयडीवरुन पाठवायची असेल तरीही चालेल.)
२. माहितीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्याकडून फोन केला जाईल. फोन कोण करेल याबद्दल आधी इमेलवरुन संपर्क करुन कळवले जाईल.
३. ज्या आयडींची खात्री देता येत नाही वा वाटत नाही, अशा आयडीज वा इतर कोणी स्त्रीआयडीरुपे असल्या तरी पूर्ण शहानिशा केल्याशिवाय अॅक्सेस देता येणार नाही.
४. इथे वावरताना आपण एकमेकींना मदत करण्यासाठी आलो आहोत हे लक्षात ठेउन प्रतिक्रिया द्याव्यात. साहजिकच आक्षेपार्ह विधाने, शिवराळ भाषा असणारी कुठलीही प्रतिक्रिया चालवून घेतली जाणार नाही.
५. अगदी सामान्य मानवी आयुष्याशी निगडीत असलेले साधे विषय, चर्चाप्रश्न चालतील. पण अगदीच एकोळी धागे किंवा कॉपी पेस्ट नको.
६. टोकाची वैयक्तिक टीका, जातिय / धार्मिक तेढ वाढवणारे लेखन व प्रतिसाद आणि अश्लील लेखन नको.
७. विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर न बोलणे हे पथ्य प्रत्येकीने पाळावे.
या दालनात येउ इच्छिणार्या मैत्रिणींना सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकीने कोणी आपली चेष्टा करील किंवा अशी कसलीही भीती न बाळगता, इथे व्यक्त व्हावे. तुमच्या सहभागातूनच हा उपक्रम यशस्वी होणार आहे.
स्त्री विभागात किती आणि कोण सदस्या (व त्यांचे आयडी) आहेत हे संपादिका आणि नीलकांत सोडून बाकी कुणालाही सांगितले जाणार नाहीत.
स्त्रियांसाठी नीलकांताने खास विभाग सुरू करून दिल्याबद्दल त्याला धन्यवाद आणि सहकार्याबद्दल इतर संपादक सल्लागारांचे आभार!
डिस्क्लेमरः
वेगळा विभाग हा स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास सोयीचे जावे यासाठी सुरु केला आहे. शिवाय लेखनाला प्रोत्साहन मिळून मुख्य पानावरदेखिल सहभाग वाढावा हा उद्द्येश आहे. पण वेगळा स्त्री विभाग सुरु झालयाने सर्व महिलांनी तिथेच काय ते लिहावे अशी जबरदस्ती नाही. तसा अर्थ कृपया कोणी घेउ नये. कुणाला आपली माहिती द्यायची नसेल तर त्या सदस्या मुख्य पानावर नेहमीप्रमाणे लिहित राहू शकतातच.
मिसळपावची धोरणे बाकी नेहमीप्रमाणेच राहतील. स्त्रीविभागामुळे त्यात काहीही बदल होणार नाहीत.
- 21014 views
प्रतिक्रिया
यशोधरा, अक्षया, स्पा, श्रुती कुलकर्णी, तर्री, आतिवास, लीमाउजेट, भावना कल्लोळ, पिलीयन रायडर, पैसा, तिमा यांचा प्रतिसाद अजिबात आवडला नाही.
ग्लिफ, मृत्युन्जय बॅटमॅन यांचा प्रतिसाद आर्धा आवडला.
तरी मी फक्त धन्यवाद दिले आहेत हं दा को!
अय्या ... म्हणजे माझा प्रतिसाद आवडला तं काँडु काका ...:P :D
म्हणजे पहा किती पार्शॅलिटी ते! ए नॉ चॉलबे!
तुमचा येथे प्रतिसाद मला अजिबात आवडला नाही,
उगाच एखाद्याचा प्रतिसाद का आवडला नाही हे मुद्देसूद न लिहिता .
आवडला नाही असे लिहिण्याची वाईट प्रथा मिपावर होऊ नये असे वाटते,
बाकीच्या सदस्यांनी त्यांना खटकलेल्या गोष्टी संयत पणे मांडल्या त्यावर त्यांना प्रतिसाद देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा सुद्धा प्रयत्न येथे झाला.
उगाच आवडले नाही असे दोन शब्द खरडू नये , तर अभिव्यक्त व्हावे , नाहीतर वाचनमात्र राहावे, असे माझे मत आहे.
अबोली ला शुभेच्छा ,अभिव्यक्त व्हा , मज्जा करा ,

ग्लिफ यांनी सविस्तर प्रतिसाद लिहिलेच आहेत. मला वाटतं एखाद्या संकेतस्थळावर फक्त स्त्रियांसाठी विभाग हास्यास्पद आहे. लिंगाधारीत प्रवेश नाकारायला ते काय स्वच्छताग्रहं आहे का? महिला सरपंचाप्रमाणे नाममात्र नावावर असलेल्या एखादीचं अकाउट एखादा पुरुष सभासद गंमत म्हणून चालवणार नाही याची खात्री आहे का? अगदी पाकृ पासून ते आरोग्याच्या तक्रारी वगैरे विषयावर गणपा-पेठकरजी ते सुबोध खरें सारखे दिग्गज लिहणारे असताना वेगळी चूल मांडायचं कारण काय? गॉसिप करायला का? ;)
बाकी शिवराळ भाषा वगैरे म्हणाल तर मला वाटतं शिव्यांचा आणि 'hatred' विचारांचा फारसा संबंध नाही. इथल्या म्हैला आयड्यांचे 'सभ्य भाषेतले' प्रतिसाद वाचले असतीलच. ते जास्त घातक आहे. असो.
असोच.
आता काही संबंध नाहीच त्या विभागाशी तेंव्हा कोरड्या शुभेच्छा.
कितीदा विमनस्क मनाने कोर्ड्या शुभेच्छा देणारेस? =))
आमचा विभाग चालू होईपर्यंत. ;)
आपण क्वीट बाबा :-/
या आरक्षणाची गरज फार काळ राहू नये, या 'अबोल्या' लवकरच 'बोल्या' व्हाव्यात आणि मुख्य पानावर याव्यात ही अपेक्षा. बाकी शुभेच्छा आहेतच.
स्त्रियांना मोकळेपणे बोलते करणार्या ग्रुपचे नाव 'अबोली' असावे हा विरोधाभास वाटला.. :)
पण तरीही ग्रुपला अभिनंदन आणि शुभेच्छा.. जो जे वांच्छिल तो ते लाहो !
वेगळे नाव घेतले असते तरी चालले असते...
अभिनंदन आणि शुभेच्छा!! :-)
माहेरी पुरषांची पंगत आधी व मागाहून स्त्रियांची वगैरे भानगड नव्हती. आई, मी नेहमी सर्व पाहुण्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत, एकत्र जेवलो आहोत. मला पुरषांमध्ये लुडबुडायची हौसही आहे एकमेव कारण द मोअर द मेरीयर. जितकी जास्त व वैविध्याने नटलेली माणसे तितक्या गप्पा रंगतात. "अबोली" समूहास मनापासून शुभेच्छा.
हीहीही.
अगं वेगळी पंगत नाहीये वाढणार. इथेच जेवायचंय. तिथे फक्त बायकांसाठी पौष्टिक लाडू मिळतील! :)
शुचितै डायेटवर असेल, तिला नको असतील लाडू! राहुदेत, आपल्याला जास्त मिळतील ;)
शुचि, अबोली मधे तुमच्यासारख्या व्यक्तीची खूप गरज आहे. स्त्री-विषयक प्रश्न हे फक्त स्त्रीयांचे प्रश्न नसून समाजाचे प्रश्न आहेत आणि ते समर्थपणे समाजासमोर मांडायची गरज आहे हे पटवण्यासाठी :). येताय ना मग? .
जिथे टवाळक्या, उनाडगिरी, उडाणटप्पूगिरी असेल तिथे येईनच गं आपसूकच. बाकी वैचारीक मंथन वगैरे झेपत नाही :(
तुमच्या साखिंना अबोलीचं सांगू नका :) नाहीतर लै मज्जा येइल :)
नावाबद्दल परत विचार करु. :)
अबोलीस शुभेच्छा!
अबोलीच्या संपादकांस एक विनंती करू का, कोणताही धागा 'अबोली' मधे सुरू करताना 'हे लिखाण अबोलीमध्येच का असावं' याची कारणं विचारावीत लेखिकेला. 'सगळ्यांसमोर लिहायला भीती वाटते', 'प्रतिसादांची भीती वाटते' ..फक्त अशीच कारणं नसावीत. कारण स्त्रीयाही पुरूषां इतकं कठोर्/विनोदी/टर उडवणारं/क्रिटिकल लिहू सकतात.
विभाग अत्ता तर कुठे सुरु होतोय. या सगळ्या शक्यतांचा विचार केला आहे.
खरं सांगायचं तर "भावनाकल्लोळ" यांच्या मातृत्वलाभ होण्याच्या लेखावर मी प्रतिक्रिया दिलेली नाही कारण खूप प्रायव्हेट व इन्टेन्स असा तो अनुभव पूर्ण शेअर करावासा वाटतो आहे. पण इथे पुरुष सदस्यांचा वावर असल्याने तसे करता येत नाही. मग त्या दृष्टीने वाटते स्त्री विभागात त्या लेखावर मी किती विस्तृत प्रतिक्रिया नीर्भीडपणे देऊ शकले असते.
पण मग वाटते कशावरुन स्त्री विभागातील गोष्टी बाहेर फुटणार नाहीत? त्यामुळे परत विचार येतो तिथे तरी मी प्रतिक्रिया देऊ शकेन की नाही कोणास ठाऊक.
पण तो लेख फार जिव्हाळ्याच्या विषयावरचा वाटला.
तर असे हे द्वंद्व आहे. असो.
कशावरुन स्त्री विभागातील गोष्टी बाहेर फुटणार नाहीत?>
कशावरुन फुटतील? :(
तसे तर सम्पूर्ण आन्तरजाल सुरक्षित नाही. आपण आन्तरजालाचा वापर सोडणार का?
म्हणूनच "written" गोष्टींसाठी काही एक बंधन येते ग माऊ. मी "प्रेग्नन्सी व चाइल्ड्बर्थ" या विषयावर माझ्या कित्येक मैत्रिणींशी खूप भरभरुन बोलले आहे पण लिहीता येईल की नाही माहीत नाही. :(
ही माझी मर्यादा झाली.
पुरषांना अनभिज्ञ किंवा त्यांच्या हस्तक्षेपापासून दूर एक जगाची आवश्यकता मलाही आहे फक्त माझी मर्यादा इतकीच की ते जग आंजा देऊ शकेल की नाही कोणास ठाऊक? :(
एक खूप सुंदर वाक्य वाचले होते ज्याचा आशय असा होता की "तुझ्या तुरुंगाच्या खिडकीतून जग कसे दिसते ते सांग." अर्थात तुझ्या डोळ्यांच्या गवाक्षातून जग कसे दिसते ते सांग. इतकं सख्य की कोणाच्या तरी डोळ्यातून जग पहावसं वाटावं असं आणि त्या व्यक्तीला आपलं जग शेअर करु देता यावं असं - ही ओढ ना एक व्यक्ती(स्त्री वा पुरुष) ना कोणता समूह भागवू शकतो. केवळ तुम्ही तुमच्याशी (अंतरातील परमेश्वराशी) ते गूज साधू शकता.
हे इथे लिहीण्याचं प्रयोजन एवढच की प्रत्येक सगुण,साकार व्यक्ती/समूहास मर्यादा आहेत. तादात्म्याची, तितक्या घट्ट सख्याची खोल गरज या जन्मी पुरी होईलसं वाटत नाही, ना पुरषांकडून ना सख्यांकडून. मग आहे ते काय वाईट आहे?
अति भावविवश वा अवांतर लिहीले असेन तर माफ करा.इन शॉर्ट मुलभूत गरजच वेगळी आहे. तेव्हा माझा मा सपोर्ट आहे ना विरोध. फर्क क्या पडता है!!!
कशावरुन फुटतील?पैज घेताय का ??? किती वेळ लागणार अशी सिस्टीम भेदायला. या पेक्षा sophisticated सिस्टीम्स पण invasion न होण्याची खात्री देत नाहीत आणि तुम्ही इतक्या खात्रीने कशा काय बोलता?? मी hacking बद्दल बोलत नाही आहे. राजरोस मार्गाने अबोलीचा प्रवेश कुणाही पुरुषाला मिळू शकतो, मिळवायचा असेल तर. सिद्ध करू का ते सांगा :-) शुचीतैंचा प्रश्न परफेक्ट आहे. आणि माझा सल्ला असा आहे की वेगळा आयडी घेऊन असे अनुभव मांडता येतील. कधी कधी मला निनावी धागा टाकण्याची सोय हवी असे वाटते.
कधी कधी मला निनावी धागा टाकण्याची सोय हवी असे वाटते.
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११इथे पैजेचा आणि सिद्ध करण्याचा प्रश्न नाहीये.
कशावरुन फुटतील? चा अर्थ कशासाठी बायका इथे काय चालतय ते बाहेर बोलतील? असा आहे.
टोपणनावानी ( आयडीनी) लिहायची सोय आहेच.
स्त्री विभागात किती आणि कोण सदस्या (व त्यांचे आयडी) आहेत हे संपादिका आणि नीलकांत सोडून बाकी कुणालाही सांगितले जाणार नाहीत. त्यामुळे तिथे वावरणार्या स्त्रियादेखिल एकमेकींना टोपणनावानीच ओळखतील. हे निनावी राहणेच आहे.
हॅकिम्गबद्दल मला माहित नाही. "हॅकिन्ग करता येते" इतकच माहित आहे.
"कशावरुन फुटतील?" हा प्रश्न rhetorical आहे ना? म्हणजे फुटणार नाही हे त्या मागचे विधान. ते चुकीचे आहे. आणि तिथले content बाहेर येणे सहज शक्य आहे हे लक्षात घेऊन तिथे लिखाण व्हावे ही इच्छा. False sense of security is very dangerous.
मी "मी hacking बद्दल बोलत नाही आहे" असे स्पष्ट लिहून पण त्याचा उल्लेख का व्हावा हे कळले नाही.
त्याची स्पष्ट कल्पना जुन्या मंडळींना आहे. कोणतीही व्यवस्था फुलप्रुफ नसते आणि नव्या मंडळींनाही ही कल्पना दिली जाईल. मिसळपावतर्फे शक्य तेवढी काळजी घेतली जाईलच पण तिथे वावरणार्यांनी स्वतःची फार पर्सनल डिटेल्स उच्चारू नयेत आणि आंतरजालावर वावरताना तारतम्य बाळगावे हे प्रवेश देताना पुन्हा एकदा सांगितले जाईलच. कुठेही आवश्यक तेवढी जनरल काळजी अपेक्षित आहेच. मग ते आंतरजाल असो की रोजचे आयुष्य.
अगदी सहमत .... शुचि सारखाच प्रॉब्लेम माझाहि आहे . आयुष्यात बर्याच शारिरिक मानसिक उलाढाली आहेत ...
पण कुठेना कुठेतरी मनावर लज्जेची म्हणा किंवा साशंक म्हणा पण स्त्रीमनावर मर्यादा ही येतेच ....
त्याबाबतीत एक स्त्री जेवढं शांतपणे समोरच्या स्त्रीला समजुन घेऊ शकते तेवढी अपेक्षा पूरुषाकडुन करणं शक्य होत नाहि ..
मी असं नाहि म्हणत कि पूरुष कमी पडतो ... पण पून्हा मर्यादा आड येते .....
म्हणुन तर स्त्रीला वेळोवेळी तिच्या ' आई ' नावाच्या सखीची नितांत गरज असते ....
थोड्याफार फरकाने ... ह्या विभागात सर्व वयोगटातल्या स्त्रीया असतिल ... जिथे लहानाना मोठ्यांचे अनुभव आणि
मोठ्यांना लहानांचं आयुष्य नव्याने जगता येईल ....
सो क्रुपया पूरुषांनी स्त्रीयांच्या या इच्छेचा मोठ्या मनाने सन्मान करावा .. मोडता पाया घालु नये हि विनंती ..
प्रतिसाद अजिबात आवडला नाही.
काँडु काका बदलाहो हे वाक्य ....
कॉपी पेश्टवताय काय ...:-/
जरा हिरवुन फीरवुन लिवावो :-/
आपल्या खफवरच्या भांडणाचा बदला असा बोर्डावर नै घ्यायचा बै :-/ :-/
ग्लिफ यांनी 'ओपननेस फार महत्वाचा आहे' हे मत नक्की कुठल्या विचारामुळे मांडलय हे मला माहित नाही. पण हे फारच टोकाचे इनोसन्ट मत आहे. :)
असं या क्षणी कुठेच शक्य नाही. आन्तरजालावर तर नाहीच.
मला Neal Donald Walsh च्या Conversations with God मधला एक संवाद आठवला.
'eliminate money from your life'
what???
'at least eliminate it's invisibility'
तसच स्वतंत्र विभागालाही हरकत नाहीये. हरकत आहे ती अवाजवी गोपनीयता ठेवायला. करा सुरु महिला विभाग सेपरेट लिंक देउन, माझा वैयक्तिक स्तरावर विषेश पाठिंबाच आहे, पण इतरांना मात्र त्यात वाचनमात्र प्रवेश हवाच, इतकच. अभिमान बाळगा स्त्रि असल्याचा. अतिशय धिटपणे मनमोकळ्या चर्चा करा हव्या त्या विषयांवर. जर तुम्हाला मिपाच्या महिला विभागातही सार्वजनीक होऊ नयेत अशा गोष्टी बोलायच्या असतील तर मात्र इतर जास्त चांगल्या संपर्क साधनांचा वापर करावा, मिपा परिपुर्ण नाहीये, पण जे आहे ते असं आहे, खुप चांगल आहे...
अर्थात तुम्ही सांगितल्या प्रमाणे तसही स्त्रिया अन थोरामोठ्यांची याबाबात आधिच बोलणी व निर्णय झालेला आहे, या पलिकडे आता या विषयाबद्दल काहीही नवीन चर्चा करण्यासारखं दिसत नाही. माझ्याकडुन मी उणिवा दाखवल्या, त्या गाळुन हा विभाग यशस्वी करणे आपल्याच हाती आहे माझ्या त्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.
जाताजाता :- संपादक मंडळाने धमाल कथांचा, एक धमाल विभाग केवळ मिपाकर पुरुष सदस्यांसाठी उघडावा (तशी नोटीस तर फ्रंटपेजला त्वरीत द्यावी)व या निर्णयाच्या कृती व अंमलबजावणीबाबत कृपया शक्यतो स्त्रि सदस्यांना विश्वासात घेतले जाउ नये. त्यांना तिथे प्रवेश नाही व मिपाचे ट्राफिकही वाढेल.
आपल्या सूचनांबद्दल आणि उणीवा दाखवल्याबद्दल धन्यवाद. उणीवा राहणार नाहीत याची काळजी घेउ. :)
नव्या उपक्रमाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन व मनापासून शुभेच्छा!!
+१
नवीन विभागासाठी शुभेच्छा !!
गंमत अशी आहे की विभाग सुरु होणे बाबत घोषणाही झाली, पण किती % पुरुषांना मनापासुन वाटलं की स्त्रियांसाठी असा विभाग सुरु केला पाहिजे व त्याची त्यांनी कारणमिमासा काय केली ?>>> माझ्या शुभेच्छा अगदी मनापासुन आहेत ! आताशा हळुहळु लक्षात यायला लागले आहे की ... स्त्रीयांची मानसिकता बरीच वेगळी असते पुरुषांपेक्षा ... एखादा विषय ज्यावर कोणी पुरुष सहज चेछ्टे वारी हसुन नेईल किंव्वा रागाच्याभरात सणसणीत शिवी हासडुन मोकळा होईल.... त्यावर एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात टचकन पाणी येवु शकते किंवा ज्या विषयावर काय फालतु चर्चा चालु आहे असे म्हणुन एखादा पुरुष इग्नोर मारेल किंव्वा क्वचित एखादा विनोद करुन हसण्यावारी उडवुन लावेल तो विषय एखाद्या स्त्रीसाठी अत्यंत आनंदाचा थ्रीलिंगचा क्षण असु शकतो.. असो. त्यामुळे असे काही त्यांचे हळवे विषय हाताळायला त्यांना स्वतंत्र दालन असावे ह्यात काहीच हरकत नाही ...! - गिरीजा-प्रसाद अवांतर : पन पुलुषांच्या श्वतंत्ल विभागाला स्ल्तीया हलकत का घेत आहेत हे चमजलेच नाही . पुलुषांनाही काहीगोष्ती मोकले पनाने बोलन्याची शवलत अचायला काय हलकत आहे ? इतलत्ल कोणीतली म्हनल्या प्लमाने " ही फालनी नै , फक्त आता शाध्या मिशल शोबत थोदी कमी तिखत मिशल मिलणाल आहे इतकेच " तल मग पक्की कोल्हापुली झनझनीत मिसलही का बले मिलु नये ? अतिअवांतर : वरील प्रश्न नवर्याने बायकोल्या विचारल्याच्या थाटात विचारला नसुन लहान बाळाने आईला विचारल्याच्या थाटात विचारला आहे असे नमजुन उत्तर मिळावे ही अपेक्षा .
पन पुलुषांच्या श्वतंत्ल विभागाला स्ल्तीया हलकत का घेत आहेत हे चमजलेच नाही .>
मलापन शमजले नाई कदी घेतली हलकत..
अले पन कुथे म्हतलय कोनी की नक्को पुलुशांशाथी वेगला विबाग म्हनून? आश आपल्याच मनानेच नाई लिहायचं हां कायतलीच! लदीचा दाव नश्शे!
म्हनजे आमाला पोलापोलांन्ना पन नवीन ग्लूप मिलनाल तर :)
थांकु थांकु !!
आता कोणीतरी धागा काढा बुवा स्त्रियांना पुरषांबद्दल काय आवडते अन पुरषांना स्त्रियांबद्दल काय आवडते.
आत्ताच सायकॉलॉजी.कॉम वर दोन्ही धागे वाचून आले.
प्रसन्न वाटतय :)
दिलेल्या माहितीच्या इथल्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन काही शंका उपस्थित होत आहेत. त्या फोल आहेत, तरीही काळजी घेण्यासाठी, ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्या महिलांना विनंती की आमच्या चौघींपैकी कुणाच्याही इमेल आयडीवर इमेल करावी. तिथेच माहिती घेतली जाईल. शाहनिशा केल्यावर प्रवेश दिला जाईल.
छान कल्पना आणि तिला साजेसेच नाव.. अबोली..
मात्र अबोली या नावाच्या आड भारी कल्ला होणार तिथे हे नक्कीच..
अवांतर - फेक स्त्री आयडी घेऊन घुसायचा काही स्कोप आहे का याबाबत जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्षित. ;)
नविन विभागाला शुभेच्छा, अबोली हे नाव या विभागाच्या उद्देशाशी फारकत घेणारे आहे असे वाटते. त्या ऐवजी
मंगळागौर किंवा हळदीकुंकु असे काहीतरी असावे. जरा मॉर्डन हवे असेल तर लेडिज स्पेशल...किंवा स्त्री राज्य.
या विभागात सामील होणार्या सगळ्या पणज्या, अज्या, काकवा व माम्यांना ऑल द बेस्ट.
तेजायला किती ते चर्चा चर्वण
निघून दे वेगळा विभाग, एवढं इस्श्यु करण्यासारखं काय आहे यात ?
काय एवढा मोठा फरक पडणारे ?
इथे फुटून वेगळी संस्थळ निघाली तरी मिपाला काही फरक पडला नाही , तर हा विभाग कीस झाड कि पत्ती.
महिलांना त्या विभागात सुरक्षित वाटत असेल तर ठीके आह.. एवढं गहजब कशाला ?
वेगळ्या संस्थळाशी मिपाच्याच ह्या विभागाची चुकूनसुद्धा तुलना नको. :) हा मिपाचाच विभाग आहे. मिपापासून फारकत घेतलेला विभाग नाहीये आणि मिपावरच राहणार आहोत आम्ही. मिपापासून वेगळं होऊन पुन्हा इथे यायची इच्छाच नाही म्हणत इथल्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून, इथेच धागे पेटवायचे,असं काही करणार नाहीयोत! समझा करो :)
स्वामिनीकस आहे.. चालेल का या