वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका. :हाहा:
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.
साहित्यः
चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
पाककृती :
चणा डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा.
५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)
वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.
आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.
अधिक टिपा:
घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.
आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.
वाचन संख्या
11228
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
वाव... माझे फेवरेट.. आमच्या
वेलकम बॅक
माझे आवडते पण कधीतरी केले
आवडते वडे.
वेल्कम बॅक!
मस्त !
भारी दिसताहेत करुन पहायला हवे
मस्तच.
वॉव
मस्त.... मला प्रचंड आवडतात
अतिशय चविष्ट पदार्थ !!
खमंग.
+१
In reply to खमंग. by गणपा
मस्त
सगळ्यांना धन्यवाद.
डाळवडे उडप्यांचे
भारी
मस्तच दिसतायत वडे!!
हेच म्हणणार होतो.
In reply to मस्तच दिसतायत वडे!! by अनन्न्या
मस्त!
मस्त!!!! ठाण्याला खल्ला होता.
छानच लागतात हे वडे!
व्वा! वाटलं कि