या उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात कोकणात!! या प्रत्येक फळाला वेगळी चव असते. हे रायआवळ्याचे झाड पहा कसे बहरलेय!!
या रायआवळ्याचा चट्का फार रुचकर होतो.
साहित्यः चाळीस आवळे, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार, फोड्णीचे साहित्य.
कृती: रायआवळे धुऊन बीच्या बाजूचा भाग चिरून घ्यावा. मिरच्या धुऊन मिरच्या व चिरलेल्या आवळ्याच्या फोडी मिक्सरवर फिरवून घ्यावे. आवळ्यांच्या प्रमाणात तुम्हाला पाच सहा मिरच्या कमी वाट्तील पण मी गावठी मिरच्या वापरल्या आहेत त्या खूप तिखट असतात. नेहमीच्या लांबड्या मिरच्या कदाचित जास्त लागतील. वाटलेल्या मिश्रणात साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. वाट्ताना साखर किंवा मीठ घालू नये. आवळ्याला पाणी सुटून चट्का पातळ होतो. एक चमचा तेलाची मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. गार झाल्यावर चटक्याला द्यावी. आंबट, गोड, तिखट असा जिभेला चव आणणारा चट्का तयार!!
हा चटका फ्रिजमध्ये दोन तीन दिवस टिकतो. याशिवाय या आवळ्याचे सरबत छान होते. नेहमीच्या खोबय्राच्या चटणीत आंबटपणासाठी हा आवळा वापरला तर ती चवही वेगळी लागते.
याशिवाय रायआवळ्याचे आणखी काही प्रकार होत असतील तर जरूर शेअर करा. आमच्या बागेत खूप आवळे लागलेत. वर फोटो पाहिलात ना!

वाचने
9228
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीच! मिठाऐवजी शेंदेलोणाने
तोंपासु
सॉल्लीड
का आठवण काढलीत? आता इथे आवळे
चटकदार एकदम. तोंपासू.
नाव ऐकुनच तोपासू..
तो.पा.सु.
अहाहा!
पैसाताई, आत्ताच सुरूवात झालीय!!
In reply to अहाहा! by पैसा
चटकदार पाकृ
मस्त.
आईग्ग्ग्ग्ग....
कोंकणाची पुन्हा एकदा तीव्र
च्यायला!!!! आता हे आवळे
हम्म्म!
आईशप्पथ !
हार्दिक अभिनंदन पूजातै!
In reply to आईशप्पथ ! by जेनी...
ओ प्यारे काकु ... कै पण कै
In reply to हार्दिक अभिनंदन पूजातै! by प्यारे१
स्स्स्स्स्स!
खासंच
हटके रेसिपी
.
आई गं........कस्लं पाणी
मस्त
मस्त हं.
आता तोंपासु वाल्या सर्वाना रत्नागिरीला यावे लागेल!!
मार डाला!!!
मस्तच
आई ग्गं!
किती खायचो लहाणपणी! आता
हा...य!!!
हा...य!!!
अरे हे काय, आज पाडवा आहे...
@कोण काढून टाकिल ही पोस्ट?
In reply to अरे हे काय, आज पाडवा आहे... by अनन्न्या
खरोखरचा
आहाहा मस्तच.
अप्रतिम