Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/10/2013 - 19:07
कधी वाटतं.. नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं.. तर कधी वाटतं... भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या.. कधी वाटतं.. बाबूजींच्या पायाशी बसून 'झाला महार पंढरीनाथ..' किंवा 'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं.. तर कधी वाटतं.. थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं.. आणि तिच्या पायांना मिठी मारावी.. कधी वाटतं... हळूच, पावलांचा आवाज न करता कलाश्री बंगल्यात शिरावं... आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला पुरिया कानी पडावा.. वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन चुपचाप ऐकत बसावं.. नाहीच जर हिंमत झाली.. तर कलाश्रीच्या अंगणातली थोडी माती कपाळावर अबीरबुक्क्यासारखी लावावी आणि माघारी फिरावं...! -- तात्या.

Submitted by तर्री on Wed, 04/10/2013 - 19:21

Permalink

वेलकम तात्या.....

रायगडावर जावेसे नाही का वाटत ?
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 04/10/2013 - 19:30

Permalink

वाह

हि तुमची रचना फेसबुकावर वाचली होती.. एका वाचनातच आवडून गेली. मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Wed, 04/10/2013 - 19:53

Permalink

थोडी माती कपाळावर अबीरबुक्क्यासारखी लावावी

हे आवडलं आणि कलाश्रीची आठवण झाली .धन धन भाग सुहाग तेरो ...
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 04/10/2013 - 19:59

Permalink

तात्या

तुमची आणि तुमच्या लेखांची फार आठवण येते. असे येत जा हो परत. गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि सर्व मिपावासीयांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on गुरुवार, 04/11/2013 - 17:36

In reply to तात्या by तिमा

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Wed, 04/10/2013 - 20:04

Permalink

आधी वाचली असू दे वा नसू दे

आधी वाचली असू दे वा नसू दे तात्या, तुमचा लेख इतक्या दिवसांनी मिपा वर पाहूनच आम्हाला आनंद झाला :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 04/10/2013 - 23:40

Permalink

वा!

क्या बात है....
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 04/11/2013 - 14:18

Permalink

हे असं वाटणं अशा शब्दात न

हे असं वाटणं अशा शब्दात न पकडलं तर असंच विसरून गेलं असतं..!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 04/11/2013 - 16:43

Permalink

व्वा तात्या!

व्वा तात्या!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 04/11/2013 - 17:17

Permalink

तात्या.......आज पाडवा आहे !

तात्या आज पाडवा आहे दसरा नव्हे....सीमोल्लंघनाचा हा दिवस कसा काय निवडला राव ? की तुम्हालाही आता कुमारांसारखी बंडखोरी करावीशी वाटतेय ? बाकी तुमच्या सर्व पंक्तीना दुजोरा देत खाली काही भर टाकत आहे पहा माझ्यात आपल्याला समानधर्मा दिसतोय का ? कधी वाटतं ठाण्यातील राणी नाखवाच्या घरी जावं जिथे आता फक्त भितीवर ओ पी नय्यर यांचा फोटो असेल तेच आहेत असो समजून आपल्या प्रेमाची कबुली द्यावी बहुत शुक्रिया बडी मेहरबानी ....मेरी जिंदगीमे हुजूर आप आये मग असंच देवास गाठावं कुमारांचा कुटीत एका कोपर्‍यात बसावं शांत एकचित्त होऊन ऐकावं राजन अब तो आजाओ थिर न रहत कजरा आंखनमे नाहीतर उड जायेगा हंस अकेला जग दो क्षणका मेला ....... न्रिर्गुणी भन ऐकतच पंचत्वात विलीन व्हावं !!!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/25/2013 - 13:09

In reply to तात्या.......आज पाडवा आहे ! by चौकटराजा

Permalink

कधी वाटतं ठाण्यातील राणी

कधी वाटतं ठाण्यातील राणी नाखवाच्या घरी जावं जिथे आता फक्त भितीवर ओ पी नय्यर यांचा फोटो असेल तेच आहेत असो समजून आपल्या प्रेमाची कबुली द्यावी बहुत शुक्रिया बडी मेहरबानी ....मेरी जिंदगीमे हुजूर आप आये मस्त.:)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 04/23/2013 - 21:50

Permalink

सुरेख !

सुरेख !
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on गुरुवार, 04/25/2013 - 13:37

Permalink

वा

मस्त...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/26/2013 - 13:30

Permalink

सर्व प्रतिसादी रसिकवरांचा मी

सर्व प्रतिसादी रसिकवरांचा मी मनापासून आभारी आहे..
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 7189 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com