साहित्य: लाल भोपळा, कणीक, तांदूळ पिठी, गूळ, वेलदोडे, हळद, मोहनासाठी व पुर्या तळण्यासाठी तेल.
कृती: पारंपारिक पद्धतीमध्ये लाल भोपळा किसून घेत. त्यात हळद व तेल घालून मिश्रण शिजवून घेत असत.
मी मायक्रोवेव्हचा वापर केल्याने पद्धत थोडी वेगळी आहे.
लाल भोपळ्याची मोठी फोड सालासकट मायक्रोवेव्ह सुरक्षित भांड्यात ठेवून त्यावर पाणी शिंपडावे.
आता हा भोपळा पाच मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये झाकण ठेवून उकडावा.
दोन मिनिटे तसाच ठेवून नंतर भोपळ्याची वरची बाजू खाली करून पुन्हा पाच मिनिटे उकडावा.
कोमट झाल्यानंतर गर चमच्याने काढून घेता येईल. तो गर वाटीने मोजून घ्यावा.
उकडलेल्या भोपळ्याचा गर १ मोठी वाटी झाला.
त्यात एक अष्टमांश चमचा हळद व तेलाचे मोहन दोन मोठे चमचे घातले.
आता हे मिश्रण दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करावे.
बारीक तासलेला एक मोठी वाटी गूळ त्यात मिसळावा.
गूळ विरघळल्यावर त्यात सात आठ वेलदोड्यांची पूड घालावी व एक वाटी तांदूळ पिठीही मिसळावी.
या मिश्रणाचा गोळा तयार होईल इतपत म्हणजे मावेल तेवढी कणीक घालावी.
साधारण दोन ते सव्वादोन मोठ्या वाट्या कणीक लागते. हा गोळा पंधरा मिनिटे झाकून ठेवावा.
तळणी तापत घालावी. तेल तापले की भिजवलेल्या पिठाच्या दोन ते तीन पुर्या जाडसर लाटून तळणीत सोडाव्यात. मध्यम आचेवर खरपूस तळाव्यात. अश्याप्रकारे सर्व पुर्या तळून, गार झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.
हा पदार्थ पाच ते सहा दिवस टिकतो.
टिपा: १)मोहनाचे तेल गरम करण्याची गरज नाही.
२)जास्त गोड आवडत असल्यास सव्वा वाटी गूळ घेता येईल.
वरील प्रमाणाने पुर्या बेताच्या गोड होतात.
३)पुर्या देताना बरोबर ताजे लोणी, कैरीचे लोणचे द्यावे.
वाचन संख्या
75607
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम मस्त कृती दिलीत रेवतीताई
अप्रतिम...
मस्त लागतात ह्या पुर्या, बर्
पुर्या सप्ताह?
थोडे
आवडता पदार्थ.
एकदम भारी
खुप छान
पक्के कारण माहीत नाही पण
In reply to खुप छान by दिपक.कुवेत
आवडल्या.
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक !
मायक्रोव्हेव चांगले नाही?
In reply to चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ! by मदनबाण
पुर्या(घारगे) आणि वडे
मस्तच.
नाही रे
In reply to मस्तच. by प्रचेतस
ओक्के.
In reply to नाही रे by अभ्या..
प्रश्न चुकीचा वाटतोय.
In reply to मस्तच. by प्रचेतस
त्याच ना?
In reply to प्रश्न चुकीचा वाटतोय. by अन्या दातार
भोपळ्याच्या घार्या खूप
मस्त !!
मस्तच!
आवडता पदार्थ! मस्तच...
(No subject)
सही........!!
मस्त
घारगे अतिशय आवडता प्रकार
मस्त
काय रंग आलाय!
मस्त दिसतायत पुर्या..
सर्व प्रतिसादकांचे आभार.
मला खुप आवडतात. हा धागा पाहून
फोटोतल्या पुऱ्या बघून तोंडाला
धन्यवाद श्रीरंगपंत, निनाद
तांदळाच पिठ का घालायच?
हो अपर्णा, तांदळाच्या पिठीने
In reply to तांदळाच पिठ का घालायच? by स्पंदना
करुन बघते. याचं थालिपीठ
अजुन एक....याच्या तिखट
याच्या तिखटमिठाच्या पुर्या
In reply to अजुन एक....याच्या तिखट by शिल्पा ब
सही है !!! काय सुंदर दिसतायत
मस्त दिसतायत..... आवडली
थेट वाचनखुणेत!
छान
अपर्णा, शिल्पा, शुचितै, सुहास
करता येतील..
In reply to अपर्णा, शिल्पा, शुचितै, सुहास by रेवती
या गोड पुर्या आणि आंब्याचे
अत्यंत आवडता पदार्थ!
मस्त दिसतायत!
अप्रतिम..........