✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन

स
सन्जोप राव यांनी
Sat, 04/06/2013 - 15:41  ·  लेख
लेख
'पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल. ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे. ज्यांना संशोधन या विषयात रस आहे त्यांना या संशोधनाचे निष्कर्ष व्यक्तिगत निरोपातून कळवण्यात येतील. 'मिसळपाव'च्या वाचकांना मी सदर संशोधनात भाग घेण्याचे आवाहन करतो आहे. ज्यांना या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटतो, त्यांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावा. सदर संशोधन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जितके अधिक स्वयंसेवक यात भाग घेतील, तितकी या संशोधनाची व्यापकता वाढेल. कृपया या उपक्रमात सहभागी होऊन या संशोधनाला हातभार लावावा. धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4969 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मी इंटरेस्टेड आहे

कापूसकोन्ड्या
Sat, 04/06/2013 - 16:08 नवीन
मी इंटरेस्टेड आहे व्य.नि.तून एमेल आयडी कळविला आहे.
  • Log in or register to post comments

उपभोक्ता ?

साती
Sun, 04/07/2013 - 16:20 नवीन
उपभोक्ता म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

चा वापर करून घेणारा.....

प्रतिज्ञा
Sun, 04/07/2013 - 16:47 नवीन
चा वापर करून घेणारा..... म्हणजेच उपभोक्ता असावा अस मला वाटत. पक्क माहित नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

संगणक साक्षर म्हणजे काय ? यात

प्रतिज्ञा
Sun, 04/07/2013 - 16:45 नवीन
संगणक साक्षर म्हणजे काय ? यात तुम्हाला डिग्री होल्डर हवे आहेत कि संगणक हाताळता येतील असेही चालतील ?
  • Log in or register to post comments

उपभोक्ता

सन्जोप राव
Sun, 04/07/2013 - 22:34 नवीन
'कन्झ्युमर' या शब्दासाठी मी 'उपभोक्ता' हा शब्द वापरला आहे. नंतर वाटले की 'ग्राहक' हा साधा शब्द आपल्याला कसा सुचला नाही? असो. संगणक साक्षर म्हणजे आपण सगळे. ई-मेल, इंटरनेट वापरता आले की झाले. संगणकाच्या वापराचे प्रशिक्षण वगैरे घेतलेले असावे अशी काही अट नाही. यात सहभागी झालेल्या आणि या प्रकल्पात रस दाखवलेल्या सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

+१

श्रीरंग_जोशी
Mon, 04/08/2013 - 23:40 नवीन
या उपक्रमाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा. मला स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायला आवडेल. माझा विपत्र पत्ता - jshrirang@gmail.com.
  • Log in or register to post comments

म्या पन ...

चौकटराजा
Tue, 04/09/2013 - 08:55 नवीन
माझा ऋणकणीय संपर्क ठावा - barvearun20@gmail.com असा आहे .निसर्ग प्रेमी असल्याने पर्यावरण हा विषय जिव्हाळ्याचा. सबब प्रतिसादास तयार आहे.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण प्रश्नावली

श्रीरंग_जोशी
Tue, 04/09/2013 - 20:36 नवीन
या प्रश्नावलीतील प्रश्न नेहमीच्याच माहितीमधले असले तरी उपलब्ध पर्यायांतून उत्तरे निवडतांना अनेकदा गोंधळ उडाला. 'सांगता येणार नाही' हाही पर्याय काही वेळा उपलब्ध असल्याने सोय झाली. उत्तरे देताना जालावरून शोध घेऊन उत्तरे दिली नाही. संयोजकंद्वारे योग्य उत्तरे जाहीर झाल्यावर पडताळून पाहीन की मी किती पाण्यात आहे?
  • Log in or register to post comments

मला या प्रकल्पात सहभागी

शुचि
Wed, 04/10/2013 - 20:09 नवीन
मला या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा आहे. माझा ईमेल आयडी व्यनि केला आहे.
  • Log in or register to post comments

प्रश्नावली चांगलीच

शुचि
गुरुवार, 04/11/2013 - 11:36 नवीन
प्रश्नावली चांगलीच कॉम्प्रिहेन्सीव्ह (सर्वसमावेशक) आहे. मला माझा स्वतःचा (जोर येण्याकरता द्विरुक्ती) पर्यावरणविषयक अवेअरनेस (जागृती)खूप कमी वाटला. जसे साधेच उदाहरण द्यायचे झाल्यास लिहीतेवेळी कागदाच्या दोन्ही बाजूंचा वापर करणे - याचा विचार मी केला नव्हता. पण कॉफीच्या प्लास्टीक वा पेपर कपऐवजी मी नेहमीच आवर्जून काचेचा (बायोडिग्रेडेबल)कप वापरते - या गोष्टीचा अभिमान वाटला. अनेक प्रश्नांनी उत्सुकता चाळवली गेली. जसे भारतातील किनारपट्टीवरील कोणता मासा एन्डेंजर्ड स्पीशीत येऊ घातला आहे वगैरे. या प्रकल्पाचे निष्कर्ष खाजगी (अभ्यासापुरता) राखण्याचा विचार आहे की येथे देता येतील?
  • Log in or register to post comments

कागद वाचवणे

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/11/2013 - 22:26 नवीन
मी तर गेल्या ६-७ वर्षांत हापिसच्या कामात स्वतःच्या सोयीसाठी एकही प्रिंट आउट घेतलेले नाही. अत्यावश्यक असेल जसे सरकारी फॉर्म वगैरे तरच स्वतःसाठी प्रिंट आउट काढतो. कधी कधी इतरांसाठी प्रिंट आउट काढावे लागते. आजकाल चतुरभ्रमणध्वनीमुळे कागदांचा वापर कमी करण्याची चांगली सोय झाली आहे. बाकी उर्जाबचतीद्वारे पर्यावरण-संवर्धनासाठी आणखी काय काय करता येईल यावर विस्ताराने येथे चर्चा झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

फारच स्तुत्य निर्णय. माझ्या

शुचि
गुरुवार, 04/11/2013 - 22:33 नवीन
फारच स्तुत्य निर्णय. माझ्या एका सहकार्‍याची कार्बन फूटप्रिंटबद्दल सहीच होती. त्यात हा मुद्दा लिहीलेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सासूबाईंना व नवर्‍याला हा

शुचि
गुरुवार, 04/11/2013 - 11:39 नवीन
सासूबाईंना व नवर्‍याला हा सर्वे पाठविला आहे. एक उत्तम, अभ्यासपूर्ण एकत्र एक्झर्साईझ वाटला.
  • Log in or register to post comments

माझा अंदाज ...

चौकटराजा
गुरुवार, 04/11/2013 - 12:42 नवीन
मी प्रश्नावली भरून पाठविली आहे. पण हा एक प्रकल्प वगैरे काही नाही असे वाटते.. एका कंपनीला काही उत्पादन आणायचे आहे. त्याचे स्वरूप त्याचे जाहिरात धोरण वितरण धोरण यासाठी त्याना फीडबॅक हवा आहे.पण असा डायरेक्ट मागितला तर कदाचित चुकीचा (misguiding ) सर्व्हे ही होउ शकतो. यासाठी आपल्याला फीडबॅक देणार्‍याची लायकी काय हे शीधण्यासाठी पात्रता निकष म्हणून पहिले अवेअरनेसचे काही प्रश्न देण्यात आले आहेत. एकच सांगतो घर घेणार्‍या ग्राहकानी दिलेली उत्तरावली व एजंटानी दिलेली उत्तरावली यात फारच फरक पडून पहाणी मधे चुकीचे निष्कर्ष येऊ शकतात. तसेच घर घेणार्‍यांच्याच एकाच उत्तरावलीत खूप अंतर्विरोध दिसून आला तर अशा गोंधळलेल्या ग्राहकाची उत्तरावली पाहणीतून रद्द करता येऊन योग्य तो निश्कर्ष काढता येउ शकतो.
  • Log in or register to post comments

प्रश्नावली

सन्जोप राव
Fri, 04/12/2013 - 04:15 नवीन
ही किचकट प्रश्नावली भरुन पाठवलेल्या सर्वांचे आभार. चौकटराजा: ही प्रश्नावली कुठल्याही कंपनीने त्यांचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी केलेला सर्व्हे नाही. हे केवळ एक उत्सुक संशोधन आहे याचा मी आपल्याला निर्वाळा देऊ इच्छितो. याचे निष्कर्ष जाणून घेण्यासाठी मी आपणा सर्वांइतकाच अधिर आहे. ते हाती येताच सर्व प्रतिसादकर्त्यांना कळवत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

.म्हणूनच अंदाज .

चौकटराजा
Fri, 04/12/2013 - 09:30 नवीन
म्हणूनच अंदाज हा शब्द वापरला.मला यातून 'पाहणी' संदर्भात नवीन विचार दिसला म्हणून तो प्रकट केला. असे पहा ना माध्यमांवर येणारे पाहाणी निष्कर्ष असे सांगतात की सध्याचे केंद्र सरकार कुचकामी आहे. हे ग्रामीण भारताचे मत आहे का? असे त्यांचे जर मत असेल तर काँग्रसला ५० जागा जेमतेम मिळतील.पण शहरी लोकांच्या भावना व ग्रामीण लोकांच्या यात फरक असल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे अंदाज साफ चुकीचे ठरण्याची शक्यता असते.
  • Log in or register to post comments

स्कोर

पुष्कर जोशी
Sat, 04/13/2013 - 09:20 नवीन
२१ पक्के ३-४ गुगल उरलेले टुक्के
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा