साहित्यः
१. तयार गुलाबजाम - १० (३ बाजुला वगळावे)
२. चक्का - १ कप
३. २०० ग्राम क्रीम चीज (मिळालं तर उत्तम नाहितर पर्याय म्हणुन आपलं पनीर आहेच :D)
४. मॅंगो पल्प - १ कप (ताजा आमरस वापरण्याआधी मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित)
५. १.५ वाटी मारी किंवा कुठल्याही डायजेस्टीव्ह बिस्किटांचा चुरा
६. २-३ टेस्पून कडेंन्स्ड मिल्क
७. साखर, मध, कडेंन्स्ड मिल्क किंवा गुलाबजामचाच पाक (रसाच्या गोडीप्रमाणे कमी-जास्त)
८. १ टेस्पून जिलेटीन पावडर (प्लेन किंवा मॅंगो फ्लेवर असलेली)
९. पिस्ता पूड - २ चमचे किंवा आपल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स
१०. वितळवलेलं बटर - पाव वाटि
पाकृ:
१. दहि रात्रभर टांगुन त्याचा चक्का तयार करावा
२. मारी किंवा डायजेस्टीव्ह बिस्किटांच्या चुर्यात वितळवलेलं बटर/गुलाबजामचाच पाक घालुन नीट एकजीव करावे
३. जर स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर त्यात ह्या चुर्याचा बेस दाबून तयार करावा. नसेल तर कुठल्याही बाऊल/भांडयात चमच्या च्या मदतीने बेस दाबून तयार करावा. तयार टीन / बाउल फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे
४. आता मिक्सींग बाऊलमध्ये क्रीमचीज, उरलेले ७ गुलाबजाम (हलकेच कुस्करुन), आंब्याचा रस, चक्का व साखर/मध, कडेंन्स्ड मिल्क किंवा गुलाबजामचा पाक घालून बीटरने फेटून घ्यावे किंवा डावेने एकजीव करावे
५. ३ टेस्पून पाणी मायक्रोव्हेवमध्ये १०-१५ सेकंद गरम करून घ्यावे व त्यात १ टेस्पून मँगो जिलेटीन पावडर घालून ती पूर्ण विरघळू द्यावी. आता हे जिलेटीन मिश्रित पाणी वरिल मिश्रणात घालून बीटरने बीट करुन घ्यावे व तयार टीन पुन्हा फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे
७. वगळलेले ३ गुलाबजाम मधुन अर्धे करावे
८. एक तासा-दिड तासाने सेट झालेल्या मिश्रणावर थोडया थोडया अंतरावर अर्धे गुलाबजाम गोलाकार लावावे व ६-७ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. आवडत असल्यास आपण पुर्ण रिंगण अर्ध्या गुलाबजामने सजवु शकता. हवं असल्यास हार्ट शेपच्या स्टेन्सीलने मधोमध पिस्ता किंवा कोको पावडरचं ह्र्दय काढावं
९. केक पुर्ण सेट झाला कि स्प्रींगफोर्म केकटीनच्या कडेने हलकेच सुरी फिरवून त्याचे रिंगण काढावे
१०. प्रत्येक भागावर अर्धा गुलाबजाम येईल ह्या हिशोबात केक कापावा/तुकडे करावे
११. सर्व्ह करण्याआधी त्यावर:
अ. १ ते १.५ चमचा थंडगार आंब्याचा रस अर्ध्या गुलाबजामवरुन हलकेच सोडावा व एक चिमुटभर पिस्ता पुड भुरभुरावी किंवा
ब. आंब्याचे तुकडे, काजु-बदाम-पिस्त्याच्या कापांनी सर्व्ह करावे किंवा
क. मिश्र फळांचे तुकडे ठेवुन त्यावर एक चमचा मध हलकेच सोडावा किंवा
ड.चेरि फळाचे दोन अर्धे भाग करुन घ्यावेत. प्रत्येक अर्धा भाग हा अर्ध्या गुलाबजामवर ठेवावा व वरुन चिमुटभर पिस्ता पुड भुरभुरावी......पर्याय बरेच आहेत आपल्याला आवडेल/रुचेल तो करावा
वाचने
12189
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम..............
अहाहा! निव्वळ अप्रतिम!!
सकाळि-सकाळि हे असले फोटो टाकत जाउ नकोस... !!!
जिलेटिन
संयम सूड संयम
In reply to जिलेटिन by सूड
हो जिलेटिन कम्पल्सरी
In reply to जिलेटिन by सूड
जिलेटिन इथे कुठे मिळेल?
In reply to हो जिलेटिन कम्पल्सरी by दिपक.कुवेत
ते जिलेटीन वगैरे समुद्र
In reply to जिलेटिन इथे कुठे मिळेल? by सूड
कसंय,
In reply to ते जिलेटीन वगैरे समुद्र by नन्दादीप
पाकृ अप्रतिम!!!
In reply to जिलेटिन इथे कुठे मिळेल? by सूड
धन्स !!
In reply to पाकृ अप्रतिम!!! by सानिकास्वप्निल
नै मिळाले तर
In reply to धन्स !! by सूड
होय होय, सुड माझ्यासाठी पण ३
In reply to नै मिळाले तर by पैसा
कित्ती दिवसांनी मोकळं मोकळ
In reply to होय होय, सुड माझ्यासाठी पण ३ by ५० फक्त
ब्रम्हास्त्र..
In reply to नै मिळाले तर by पैसा
मस्त दिसतो आहे केक.
सांभाळुन दिपक राव.
खल्ल्ल्लास...................
काय जबरा प्रेझेन्टेशन आहे राव
अप्रतिम!!! तोंपासु
जबरी केक आहे..
क ह र !!!
खुप सुंदर.. मस्त दिसतोय केक
ज ब रा ट!!
जीव गेला...हाल हाल झाले..
जीव गेला...हाल हाल झाले...ठ्ठार जाहलो
आए...हाय... एखाद्या सुंदर ललनेच्या पहाता क्षणिच प्रेमात पडावं,तसं होतय फोटु कडे पाहुन... :)जबरी
नको...नको... दीपकराव काय छळ
स्पॉईलर अलर्ट
हो....
मस्त दिसतोय!
अरे ह्या काकांना पाककृत्या
शब्दचं नाहीत...
दीपु काका डाएटिंग वर असणार्
पूजा आज्जे....
(No subject)
In reply to पूजा आज्जे.... by दिपक.कुवेत
आईग्ग! भारी!
शारिरीक, मानसिक, बौद्धिक,
मस्त झालाय केक!!
ब्येस्ट
भारी प्रकार दिसतो...
अग्ग्ग्ग्ग्गं.........
देवा! हा धम्या बॉडी शॉडी
In reply to अग्ग्ग्ग्ग्गं......... by धमाल मुलगा
ये! फोटु बघितला नाहिस काय
In reply to देवा! हा धम्या बॉडी शॉडी by स्पंदना
चल रे, येतो का कुवेतला?
In reply to अग्ग्ग्ग्ग्गं......... by धमाल मुलगा
@ए आपट्या...चल रे, येतो का
In reply to अग्ग्ग्ग्ग्गं......... by धमाल मुलगा
दिपक राव जरा जपुन मान्स गारद
आ हा हा!
खुप गोड होइल ना हा केक?
धन्यवाद खवय्ये लोक्स
जबरदस्त !!!
अरे कसले भारी पदार्थ करतोस रे
खूप भारी!!
ह्याला पाककृती म्हणता येत
हाय कॅलरी.. मस्स्स्स्त