पक्ष विचारधारा - साम्य आणि भेद
अन्या दातार यांनी एका धाग्यावर (http://www.misalpav.com/comment/reply/24386/475028)
"भाजप विचारसरणी व काँग्रेस विचारधारा यात नेमका काय फरक आहे?"
हा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून हा धागा केला आहे. प्रतिसाद खूप मोठा असल्याने धागा करणे योग्य वाटले. हा धागा किंवा हा विषय योग्य न वाटल्यास प्रशासकांनी धागा नष्ट करावा.
_______________________________________________________________________________
हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. याचे उत्तर खूपच अवघड आहे. काँग्रेस व भाजपची स्वतःची पक्षाची घटना आहे. इतर पक्षांची देखील स्वतःची पक्षघटना असेल.
भाजपची पक्षघटना खालील संकेतस्थळावर आहे.
http://www.bjp.org/images/pdf_2012_h/constitution_eng_jan_10_2013.pdf
त्यात खालील वाक्ये आहेत.
Objective
The party is pledged to build up India as a strong and prosperoud nation, which is modern, progressive and enlightened in outlook and which proudly draws inspiration from India's ancient culture and values and this is able to emerge as a great world power playing an effective role in the comity of nations for the establishment of world peace and a just international order.
The party aims at establishing a democratic state which guarantees to all citizens irrespective of caste, creed or sex, political, social and economic justice, equality of opportunity and liberty of faith and expression.
The party shall bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established and to the principles of socialism, secularism and democracy and would uphold the sovereignty, unity and integrity of India.
Basic Philosophy
Integral Humanism shall be the basic philosophy of the party.
Commitments
The party shall be committed to nationalism and national integration, democracy, Gandhian approach to socio-economic issues leading to the establishment of an egalitarian society free from exploitation, positive secularism, that is, 'Sarva Dharma Samabhav' and Value-based politics. The party stands for decentralisation of economic and political power.
भाजपच्या संकेतस्थळावर खालील परिच्छेद देखील आहेत.
BJP Philosophy : Hindutva (Cultural Nationalism)
Hindutva or Cultural Nationalism presents the BJP's conception of Indian nationhood, as explained in the following set of articles. It must be noted that Hindutva is a nationalist, and not a religious or theocratic, concept.
कॉंग्रेसची पक्षघटना खालील संकेतस्थळावर आहे.
http://www.aicc.org.in/Constitution%20FINAL%2012.6.08.pdf
काँग्रेसच्या पक्षघटनेत खालील वाक्ये आहेत.
Objective
The objective of the Indian National Congress is the well-being and advancement of the people of India and the establishment in India, by peaceful and constitutional means, of a Socialist State based on Parliamentary Democracy in which there is equality of opportunity and of political, economic and social rights and which aims at world peace and fellowship.
Allegiance to Constitution of India
The Indian National Congress bears true faith and allegiance to the Constitution of India as by law established and to the principles of socialism, secularism and
democracy and would uphold the sovereignty, unity and integrity of India.
पक्षघटना व पक्षाची तत्वप्रणाली हीच पक्षाची विचारधारा असे समजायला हरकत नाही. परंतु पक्षघटनेतले व तत्वप्रणालीतले हे शब्द, वाक्ये व परिच्छेद कितीही भारावून टाकणारे वाटले तरी प्रत्यक्षात पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते व नेते हे त्यानुसार वागतात का आणि पक्षाची राबविलेली धोरणे ही पक्षघटनेला व पक्षाच्या तत्वप्रणालीला अनुसरून आहेत का यावरूनच पक्षाची खरी विचारधारा दिसून येते.
भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा पक्ष १९८० साली स्थापन झाल्यावर १९८९ पर्यंत या पक्षाचे अस्तित्व नगण्य होते (भाजपचा पूर्वीचा अवतार जनसंघ याचे अस्तित्व देखील शेवटपर्यंत नगण्यच राहिले). १९८५ साली भाजपचे फक्त २ खासदार निवडून आले, तर महाराष्ट्रात २८८ पैकी १६ आमदार, हि.प्र. मध्ये ६८ पैकी ३० आमदार व म.प्र. मध्ये ३२० पैकी ६४ आमदार इतकेच भाजपचे अस्तित्व होते. पण नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपचे अस्तित्व जाणवायला लागले. १९८९ लोकसभेत भाजपचे ९० खासदार निवडून आले, तर १९९०/९१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हि.प्र., राजस्थान, उ.प्र., म.प्र. या राज्यात बहुमत मिळविले. भाजपचे महाराष्ट्रात ४२, बिहारमध्ये ३९ व गुजरातमध्ये ६७ आमदार निवडून आले होते. त्यामुळे पक्ष विचारधारेचा विचार करताना भाजपचा विचार १९८९/९० पासून केला पाहिजे.
कॉंग्रेस जरी कागदोपत्री १२७ वर्षांचा जुना पक्ष असला तरी काँग्रेसमध्ये अनेक स्थितंत्यरे झाली. सर्वात मोठे स्थित्यंतर १९९१ मध्ये नरसिंहराव सत्तेवर आल्यावर झाले. काँग्रेसच्या विचारधारेवर विचार करताना १८८५ मध्ये स्थापनेच्या वेळी कोणत्या उद्देशाने काँग्रेस स्थापन केली होती किंवा १९४७ मध्ये काँग्रेसची विचारधारा कशी होती याचा विचार करण्यापेक्षा गेल्या १५-२० वर्षात या पक्षाची वाटचाल कशी चालू आहे हे बघणे जास्त योग्य ठरेल. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही पण १९९१ पासून विचारात घेतली पाहिजे.
त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विचारधारांची तुलना करताना पक्षघटनेत काय लिहिले आहे त्यापेक्षा हे दोन्ही पक्ष १९९० ते २०१३ या कालखंडात कसे वागले/वागत आहेत याचा विचार केला पाहिजे.
(१) काँग्रेसच्या पक्षघटनेत लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद, सर्वांचे कल्याण, सर्वांना समान हक्क, भारतीय राज्यघटनेशी बांधिलकी अशा अनेक आदर्श शब्दांची पेरणी आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर आजतगायत काँग्रेसने क्वचितच या शब्दांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे. लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही व घराणेशाही, सर्वधर्मसमभावाऐवजी देशहिताची पर्वा न करता चालू असलेले एका विशिष्ट धर्माचे लांगूललाचन, समाजवाद व सर्वाचे कल्याण करण्याऐवजी फक्त पक्षनेत्यांचे कल्याण, सर्वांना समान हक्काऐवजी आमदार्/खासदार व काही विशिष्ट व्यक्तींना (उदा. रॉबर्ट वड्रा) दिलेले विशेष हक्क, राज्यघटनेशी बांधिलकी पाळण्याऐवजी जेव्हा जेव्हा राज्यघटनेमुळे पक्षस्वार्थाला बाधा आली तेव्हा तेव्हा घटना डावलून व नवीन कायदे करून केलेली घटनेची पायमल्ली, पक्षांतर करून किंवा खासदार विकत घेऊन सत्ता टिकविणे . . . अशा इतिहास व वर्तमानामुळे काँग्रेसची खरी विचारधारा ही भ्रष्टाचार, गुन्हेगारी, स्वार्थासाठी देशाच्या हिताशी तडजोड, अतिरेक्यांच्या बाबतीत मऊ धोरण, निवडणुकीच्या तोंडावर जनतेला राखीव जागा/कर्जमाफी/स्मारके/नामांतर इ. सवंग घोषणांची अफूची गोळी देणे, या व अशा अनेक कृष्णकृत्यांशी संबंधित आहे.
(२) याच मुद्द्यांवर जर भाजपचा इतिहास पाहिला तर यातले काही दुर्गुण भाजपकडे देखील आहेत. जरी यातले काही दुर्गुण कमी प्रमाणात असले तरी भाजप त्यापासून पूर्णपणे मुक्त नाही. विशेषतः पक्षांतर्/आमदार विकत घेणे हे १९९७ मध्ये उ.प्र. मध्ये प्रकर्षाने दिसून आले होते. भ्रष्टाचारापासून देखील भाजप सर्वार्थाने मुक्त नाही. येडीयुरप्पा, रेड्डी बंधू किंवा नितीन गडकरी ही भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अलिकडील उदाहरणे आहेत. पण तुलनाच करायची तर भाजपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार हा काँग्रेस नेत्यांच्या तुलनेत किस झाडकी पत्ती. हत्ती आणि मुंगी यांच्यात जितका फरक आहे तितकाच काँग्रेस व भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारात फरक आहे.
या दोन्ही पक्षांची आर्थिक धोरणे व परराष्ट्र धोरण यात फारसा फरक नाही. दोन्ही पक्षांनी मुक्त आर्थिक धोरणाचा पुरस्कार करून त्या दिशेने कमीअधिक वेगाने पावले टाकली होती. दोन्ही देशांच्या परराष्ट्र धोरणातही अमेरिकेला मह्त्त्वपूर्ण स्थान आहे.
दोन्ही पक्षातला मुख्य फरक भारतांतर्गत राजकारणात आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मुस्लिम तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारले व ते आजतगायत सुरू आहे. मुस्लिम मतांसाठी काँग्रेसने अनेक अन्यायकारक कायदे करून मुस्लिम स्त्रियांवर कायम अन्याय केला व समाजात दुही कायम राहील याचा यशस्वी प्रयोग केला. 'फोडा आणि झोडा' या ब्रिटिश नीतिचा काँग्रेसने यशस्वी प्रयोग केला. पण भाजपने मुस्लिम तुष्टीकरणाला स्थापनेपासूनच विरोध केला आहे. दुर्दैवाने समान नागरी कायदा आणणे किंवा मुस्लिम तुष्टीकरण कायद्याने थांबविणे हे भाजपला बहुमताअभावी करता आले नाही.
अतिरेक्यांविरूद्ध लढण्यासाठी भाजपने पोटासारखा कठोर कायदा करून अतिरेक्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला होता, पण काँग्रेसने आपल्या लांगूलचालनाच्या धोरणाला अनुसरून हा कायदा रद्द केला.
घराणेशाही काँग्रेसमध्ये तळागाळापासून हायकमांडपर्यंत फोफावली आहे. पण भाजपमध्ये घराणेशाही अगदी तुरळक प्रमाणात आढळते.
इन्फ्रास्ट्रक्चर विकास, रस्तेबांधणी, इ. गोष्टींकडे काँग्रेसने सातत्याने दुर्लक्ष केले कारण हे न करता सुद्धा काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर येत होती. पण भाजपने आपल्या ६ वर्षांच्या अगदी छोट्या सत्ताकाळात या रस्तेबांधणी, नदीजोड प्रकल्प, कृष्णा खोरे पाणी अडविणे प्रकल्प असे काही महत्त्वाचे प्रकल्प सुरू करून आपले वेगळेपण दाखवून दिले होते.
त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विचारधारेतील साम्य व भेद याविषयी थोडक्यात लिहायचे तर, दोन्ही पक्षांची आर्थिक व परराष्ट्र धोरणे समान आहेत, पण देशांतर्गत राजकारणात दोन्ही पक्षात जमीनअस्मानाचा फरक आहे.
वाचने
4579
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
ते राहू द्या हो पण
>>> भाजप हा पुराणमतवादी
पुरोगामीत्व म्हणजे काय रे भाउ
लेख प्रचारकी थाटाचा वाटला
In reply to लेख प्रचारकी थाटाचा वाटला by अर्धवटराव
>>काँग्रेसने कम्युनिस्टांचा
In reply to >>काँग्रेसने कम्युनिस्टांचा by नाना चेंगट
त्याने काही फारसा फायदा झाला नसावा.
In reply to त्याने काही फारसा फायदा झाला नसावा. by अर्धवटराव
हं. काही मुद्द्यांबद्दल सहमती
In reply to हं. काही मुद्द्यांबद्दल सहमती by नाना चेंगट
मिसळपाव विसरलात जणु
"त्यापेक्षा एकवेळ भाजप
In reply to "त्यापेक्षा एकवेळ भाजप by श्रीगुरुजी
काँग्रेस.
"दलीत, आदीवासी, वगैरे मागास
कोणताही पक्ष एखादी "सिस्टीम
तुलना म्हणून रोचक आहे.
>>> कम्युनीस्टांची न्युसेन्स
तसं बघतलं तर ..