Skip to main content

भानोळी

लेखक साबुदाणा खिचडी यांनी गुरुवार, 04/04/2013 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
a बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या नारळाचे दूध - १ वाटी मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे २ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी) सोडा चिमूटभर तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार गरम मसाला - १ चमचा हळद - १ चमचा धणे-जीरे पूड - १ चमचा मीठ व साखर चवीनुसार तेल - ४ चमचे भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात. रात्रीच्या जेवणात अथवा जेवणाऐवजी हा पदार्थ खाऊ शकतो. कृती - चिरलेला कोबी, वाटण, अंडी, तिखट, मीठ, हळद, धणे-जीरे पूड, २ चमचे तेल व साखर एकत्र करुन घेऊन त्यात डाळीचे पीठ व चिमूटभर सोडा घालावा. वाटल्यास थोडे पाणी घालून भज्याच्या पीठासारखे भिजवावे.पसरट भांड्यात तेल सोडून, भांडे किंचित गरम करून त्यात मिश्रण ओतावे. गॅसवर १५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. ओव्हन असल्यास उत्तम. गरमागरम भानोळी सर्व्ह करावी.

वाचने 11579
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

पदार्थ छान दिसतोय. अंडे न घालता पदार्थ करायचा असेल तर सोड्याचे प्रमाण वाढवावे लागेल ना? (ही चेष्टा नाही). हे एक छान तोंडीलावणे वाटते आहे. हांडवो नावाच्या पदार्थाची आठवण आली.

किती तो गोंधळ... मला वाटलं की "भानोळी" ने " साबुदाणा खिचडी" बनवली आहे.. डोक्यात घोळ झालाय सगळा... अवांतर... पाककृती छान आहे!! एक्दम वेगळंच काहीतरी..!!

नाव वाचुन वाटल कि घावन वगैरे सारखा तत्सम पदार्थ असेल.

जबर्‍यादस्त एकदम !

काय मस्त फुललीये केकसारखी. मी हा पदार्थ भानोले म्हणून पाहिलाय. पण इतका फुललेला कधी पाहिला नाही. कदाचित अंड्यामुळे असेल.

कोबीचे भानोले मस्तंच हे अंडे ही घालून बनवु शकतो माहित नव्हते, आता ट्राय करुन बघीतले पाहीजे. भानोले एकदम टम्म फुगले आहे :) अवांतरः फ्रिटाटासारखे वाटत आहे ;)

आवडता पदार्थ. आजीच्या हातच्या गरमा गरम भानोळ्यांची आठवण करुन दिलीत.

पाकॄची कॄती संपवायची खूपच घाई केलीत, थोडे सविस्तर लिहायला हवे होते पसरट भांड्यात तेल सोडून, भांडे किंचित गरम करून त्यात मिश्रण ओतावे. गॅसवर १५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. ओव्हन असल्यास उत्तम बाकी पाकॄ छानच आहे

पाकृ आवडली . नुसतीच खायची की सॉस ,चटणी कश्याला लावून खायची ? की भानोळी ला लावून पोळी - चपाती - भाकरी खायची ? कशाला तरी काही तरी लावून खायला हवेच का ? >

मस्त आणि नविन ! चवीला चांगले असेल असे वाटते :)

सर्वांचे प्रतिसादांकरता आभार. आईंनी (सासूबाई= सा.खि.) काल बनवली. मी सॉसबरोबर खल्ली. अतिशय चविष्ट झाली होती. पण नुसतीही मस्त लागते.

In reply to by शुचि

"कोलंबी किंवा करंदीचीही" करता येते, "आलं+लसूण+मिरची+कोथिंबीर वाटण" वगैरे प्रकार वाचून संशय आलाच होता!!!! आयला, गेल्या पंचवीस वर्षांत आमचा अभ्यास काय सुसाट वाढलाय!!!!!!! :)

In reply to by शुचि

ओह, आत्ता लक्षात आले की तू का आभार मानते आहेस! मज्जा आहे तुझी :) साखिकाकू, इधर भी आना देव भानोली आणि काय काय पदार्थ! ;)

काय काय नवीन नवीन रेशिप्या यायलागल्यात मिपावर. एकसे बढकर एक. काय अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे की काय? शुचिमामीच्या मामींना धन्यवाद.

In reply to by शुचि

कळ लावणार्‍या नारदा
कशाला उगीच दुसर्‍याच्या पदव्या मला? :( मी तुमच्या घरातल्या स्पर्धेविषयी थोडेच म्हणले ;) मिपावरच्या सगळ्या मास्टरशेफांना उद्देशून म्हणले.

In reply to by अभ्या..

>>> मास्टरशेफांना नि शेफा''लिनापण!('र' टाकावा काय मध्ये? ) ऊत ऊत आणलाय रे नुसता! ;) पण मामीच्या मामींना सूट देऊ. रच्याकने साबुदाणा खिचडी उद्या बोंबिल फ्राय नायतर खेकड्याचं सूप करणार नाहीत ना? ;)

In reply to by शुचि

बोंबलाचं माहिती नाही कारण ते फक्त भाग्यवंतांनाच मिळतात, पण खेकडे इथे नक्की मिळतात आणि तेसुद्धा विविध प्रकारचे!!! शोधा म्हणजे सापडतील!! (या वीकेंडचा शुचिचा गृहपाठ!!!) :)

In reply to by पिवळा डांबिस

पिडां, डेलावेअरला असताना खूप म्हणजे चिक्कार चिक्कार खेकडे (चिंबोर्‍या) खाल्ले हो. पण इथे विस्कॉन्सिन ला नाही ना दिसले (सुपिरीअर मध्ये तरी) इथे तो वालाय मासा मिळतो. तो खायचाय.

माझ्याकडे "सी के पी खासीयत" असे एक पुस्तक आहे. त्यात ही पाकृ वाचली होती. पण आज फोटो पाहिल्यामुळे करू शकेन असे वाटत आहे. शुचे, तुझ्या सासूबाईंकडे अशा खूप पारंपरिक पाकृ असतील. सी के पी लोकांकडचे जेवण अतिशय टेस्टी असते असे ऐकले आहे. अधून मधून अशा पाकृ देत जा.

In reply to by पैसा

सी के पी लोकांकडचे जेवण अतिशय टेस्टी असते असे ऐकले आहे.
आजवर कधीच खायची संधी मिळाली नाही, जरा आश्चर्यच वाटले...

In reply to by पैसा

यापुढे मिळावेत यासाठी शुभेच्छा!! तुमच्या या प्रतिसादामुळे फार पूर्वी खालेल्या पदार्थांच्या चवी आठवल्या :-). आजकाल घरोघरी टिपिकल चवी असतीलच असे काही राहिले नाही.

In reply to by पैसा

आई खूप चविष्ट कोशींबीरी अन चटण्या , मसालेभात आदि करते. सासूबाई पाया, मटण, मासे, चिकन फार सुरेख बनवतात. हे सगळं शिकायचय :(

कोसळवडीची रेसिपी माहितीये का हो शुचिमामीच्या मामी? (तूरडाळीची करतात ती? इफ आयाम नॉट राँग)