हि १९९१-९२ ची गोष्ट आहे. मी पुण्यात एम डी करीत होतो. माझे लग्न झालेले नव्हते. सरकारी नोकरी होती. खिशात पैसे होते आणि घरची जबाबदारी हि नव्हती आई वडील आणि थोरला भाऊ नोकरी करीत होते. पुण्यात सायंकाळी वैशाली किंवा रुपाली मध्ये पुणेकर भाषेत पडीक असायचो.बरोबर अभियांत्रिकीतील मित्र जे असेच नोकरी संपल्यावर हिरवळ पाहण्यासाठी हजर असत.
एकदा एक मित्र म्हणाला कि अरे मी ज्या पंपावर पेट्रोल भरतो तिथे काम करणारा एक मुलगा जर बरा नाहीये बघतोस काय?
मग तो आणि मी कर्वे रोड वर माडीवाले कॉलनीच्या जवळपास कोणतातरी पेट्रोल पंप होता तेथे गेलो. तिथे एक राजू नावाचा किडकिडीत मुलगा (२५-२६ वयाचा) त्याने दाखवला. त्याला विचारले काय त्रास होतोय तर तो म्हणाला मला शौचाला साफ होत नाही आणि वारंवार
लघवी साठी जायला लागते. त्याला विचारले कि तुझे वजन किती कमी झाले आहे. तो म्हणाला काय १०-१२ किलो कमी झाले असेल.त्याच्याकडे पाहूनकाहीतरी फार वाईट आहे असे मला आतून वाटत होते मी त्याला तसाच माझ्या कायनेटिक होण्डा वर बसवून कमांड हॉस्पिटल ला आमच्या विभागात घेऊन गेलो. त्याची सोनोग्राफी केल्यावर मला असे जाणवले कि त्याचा शौचाचा मार्ग आणी मूत्राशय यात एक गोळा आहे आणी त्याच्या दबावामुळे त्याला वारंवार लघवी होत होती.त्याला विचारले तू राहतोस कुठे? तो मुंढवा गाव येथे राहत होता.त्याला रुबी हॉल मध्ये सी टी स्कॅन करण्यासाठी मी सांगितले तर त्याच्याकडे तेवढेहि पैसे (१३०० रुपये) नव्हते. मग मी त्याला २ दिवसांनी येण्यास सांगितले. दोन दिवसांनी
आमचा सी टी स्कॅन चे अंशान्कन recaliberation होणार होते तेंव्हा त्यात त्याचा सी टी स्कॅन मी फुकट करून दिला त्याला लागणारे औषध sampleचे दिले.दुर्दैवाने सी टी स्कॅन मध्ये त्याला गुद्द्वाराचा कर्करोग(anaplastic carcinoma rectum) असल्याचे दिसत होते (दुर्दैवाने माझी शंका खरी ठरली होती )आणि तो सर्वत्र पसरला होता. त्यने विचारले डॉक्टर काय निदान आहे.मी त्याला सांगितले कि तुला कर्करोग आहे त्यावर त्याला धक्काच बसला तो मला म्हणू लागला कि २५-२६ वयाला कसा कर्करोग होऊ शकतो.त्याला शांतपणे समजावले कि असे होते. तो म्हणाल मी दुसरीकडे दाखवून येतो. मी ठीक आहे म्हटले. आणि त्याला दोन दिवसांनी येण्यास सांगितले. तो दोन दिवसांनी परत आला तेंव्हा त्याच्या डॉक्टरनी तेच सांगितले होते.तो विचारात होता कि साहेब हा रोग बरा होईल ना? मला माहित होते कि त्याचा रोग चौथ्या टप्प्यात होता आणि त्याची सरासरी आयुर्मर्यादा २-३ वर्षे होती त्यामुळे तो रोग बरा होण्यातला नव्हता.पण मि त्याला सांगितले कि आपण शस्त्रक्रिया करून तो गोळा काढून टाकू त्यानंतर त्यावर औषधे देऊन उरलेला कर्करोग पूर्ण जाळून टाकू. तो यावर समाधानी दिसला.
आता प्रश्न हा होता कि याचे काय करायचे. कमांड हॉस्पिटल मध्ये फक्त लष्कराच्या लोकांना कर्करोगावर इलाज करण्याची परवानगी होती.सिविलिअनना नाही.पण माझ्यासारखे माझे काही मित्र होते जे अशी फुकटची समाजसेवा करण्यासाठी तयार असत.त्यातल्या माझ्या एका सर्जन मित्राला मी परिस्थिती सांगितली तर तो म्हणाला त्यात काय आहे आपण निदानात कर्करोग न म्हणता पोटात गोळा आहे असे म्हणून त्याची शस्त्रक्रिया तर करून घेऊ. केमोथेरपी चे नंतर पाहू.
त्याची शस्त्रक्रिया आम्ही प्रशिक्षणा साठी असतात त्या रुग्णात अंतर्भूत करून करवून घेतली. त्याने निदान त्याला शौचाचा त्रास आणि वारंवार लघवी होत होती तो त्रास तरी बरा झाला.शौचास साफ होऊ लागल्यामुळे त्याचा आहार हि सुधारला होता आणि रुग्णालयातून सुट्टी मिळेपर्यंत तो बर्यापैकी आनंदी दिसत होता पुण्यात तेंव्हा काही धर्मादाय गट कर्करोगाच्या रुग्णांना मदत करीत आम्ही त्याच्याशी संपर्क करायचे ठरविले होते. दुर्दैवाने राजू मला परत कधीही दिसला नाही. मी त्यानंतर त्या पेट्रोल पंपावर ३-४ वेळा गेलो देखील पण तेथे त्याचा पत्ता कोणीच सांगू शकला नाही.पुढे त्याचे काय झाले कोणास ठाऊक
कमांड हॉस्पिटल मधेच वंध्यत्व विभागात काम करीत असताना (१९९५-९६) एक दिवस माझ्या स्त्रीरोग तज्ञ मित्राचा फोन आला कि एक स्त्री आहे तिची जननेंद्रिये विचित्र आहेत जरा बघून घे. ती स्त्री आपल्या नवर्याबरोबर आली. नवर्याला बाहेर बसवून मी तिला तपासणी साठी आत घेतले. मी तिला विचारले कि तुला पाळी केंव्हा आली तर ती म्हणाली कि लग्न झाल्यापासून (२ वर्षापासून)पाळी थांबली आहे.सोनोग्राफी केली तर मला असे लक्षात आले कि तिची वरची ३/४ (तीन चतुर्थांश) योनी आणि गर्भाशय नाहीच( जन्मापासून तयारच झाले नव्हते( mullerian agenesis). मी तिला सरळ विचारले कि तुम्ही खोटे बोलता आहात तुम्हाला पाळी येणे शक्यच नाही कारण तुम्हाला गर्भाशय नाहीच. त्यावर ती म्हणाली कि होय हे खरे आहे मला पाळी कधीच आली नाही. त्यावर मी तिला विचारले कि तुम्ही तुमचा यजमानांना हि वस्तुस्थिती न सांगता ( फसवून) लग्न केले आहे. आणि तुमचे यजमान मुलासाठी इतके अधीर झाले आहेत कि त्यांना कळले कि तुम्हाला मुल होणे अत्यंत कठीण आहे तर तुमचे यजमान तुम्हाला सोडून देतील. त्यावर ती २३ वर्षाची स्त्री मला शांतपणे म्हणाली कि हे मला माहित आहे कि ते मला आज ना उद्या सोडून देणार आहेत पण माझे लग्न झाले नसते तर शेजारी पाजारी आणि नातेवाईक यांनी माझे आणि माझ्या आई वडिलांचे जिणे कठीण करून टाकले असते. आता मला यजमानांनी सोडून दिले तर सर्व लोक म्हणतील बिचारीला मूल होत नाही म्हणून नवर्याने टाकून दिले. मी माझे पोट धुणी भांडी करून आणि घरकाम करून भरीन पण चार दिवस तरी सव्वाशीण म्हणून आनंदात जगेन.असे ब्रम्हज्ञान इतक्या कमी वयाच्या बाई कडून ऐकून मी अवाक झालो.
त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती.
त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही. मी केवळ त्याला रिपोर्ट लिहिला आहे तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना दाखवा एवढेच बोलून दुसर्या रुग्णास आत घेतले.
तिसरी गोष्ट २०१२ डिसेंबर ची आहे.
एक सासू आपल्या सुनेला( वय २१ वर्षे ) ३ महिन्यापूर्वी लग्न झाले आणि तिची पाळी आली नाही म्हणून माझ्या दवाखान्यात (मुलुंड ला) घेऊन आली होती.तिच्या मुत्र तपासणीमध्ये गर्भारपण नाही असे आले होते म्हणून ते तपासण्यासाठी ती आली होती. सुनेची सोनोग्राफी केली तर असे लक्षात आले कि तिच्या बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती. याचा अर्थ तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती.मी तिला विचारले पाळी केंव्हा पासून आलेली नाही. तर ती म्हणाली कि लग्न झाले आणि पाळी बंद झाली.मी तिला म्हटले कि पण तसे वाटत नाही कि तुमची पाळी ३ महिन्यांपासून बंद झाली आहे.
त्यावर ती म्हणाली कि माझी पाळी १ वर्षापूर्वी बंद झाली मी कल्याण ला एका स्त्रीरोग तज्ञाकडे गेले होते त्यांनी माझी रक्त तपासणी केली. ते रिपोर्ट पहिले तर तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाल्याचे दिसत होते. त्यानंतर त्यांनी त्यास्त्री रोग तज्ञांकडून पाळी येण्यासाठी औषधे घेणे सुरु केले आणि पाळी येत होती तेवढ्या सहा महिन्यात लग्न उरकून घेतले. लग्न झाल्यावर सासू कडे गोळ्या घेण्याची चोरी असल्याने तिची पाळी आता बंद झाली होती.
तिची मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती हा दुर्दैवाचा भाग होता पण ते लपवून त्यांनी लग्न उरकून घेतले होते. तिची तपासणी संपल्यावर मी बाहेर आलो तेंव्हा सासुबाई नी विचारले कि निदान काय आहे. मी फक्त एवढेच बोललो कि ती गरोदर नाही.पुढे ती तिचा नवरा आणि सासू काय करणार या प्रश्नाला मी बगल दिली.
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात.
हे वचन म्हणून त्रिकालाबाधित सत्य आहे असे वाटते
वाचने
16384
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्ही अनुभव फारच विदारक आहेत
+१
In reply to दोन्ही अनुभव फारच विदारक आहेत by नगरीनिरंजन
+२
In reply to दोन्ही अनुभव फारच विदारक आहेत by नगरीनिरंजन
+१ असेच म्ह्णते
In reply to दोन्ही अनुभव फारच विदारक आहेत by नगरीनिरंजन
वाचतोय.
वाईट वाटले..
भारी अनुभव
डॉक,
+१११
In reply to डॉक, by गणपा
+२ गम्पा दा
In reply to डॉक, by गणपा
मिपाकरांना सल्ला....
विदारक
भयंकर.
माझ्या एका मित्राची आठवण झाली
असेच म्हणेन
In reply to माझ्या एका मित्राची आठवण झाली by वेताळ
रोचक
हेच म्हणतो
In reply to रोचक by ऋषिकेश
+१
In reply to रोचक by ऋषिकेश
दुसरा अनुभव मनाला अतिशय टोचला
वाचतोय!
वाईट वाटले वाचुन...
खरे आणि खोटे
तुमच्या वर्तुळ कोनाचं नि
In reply to खरे आणि खोटे by श्रावण मोडक
गरज
In reply to तुमच्या वर्तुळ कोनाचं नि by प्यारे१
+१
In reply to खरे आणि खोटे by श्रावण मोडक
तपशील
In reply to +१ by मन१
थोडे थोडे हो...थोडे थोडे नाही....
In reply to तपशील by श्रावण मोडक
अगदी अप्रामाणिक म्हणण्याइतके
In reply to खरे आणि खोटे by श्रावण मोडक
धन्यवाद
In reply to अगदी अप्रामाणिक म्हणण्याइतके by कवितानागेश
पहिल्या भागांतही डॉक्टरांनी
In reply to खरे आणि खोटे by श्रावण मोडक
तर तुमच्या अमुल्य पोक्त मताला
In reply to पहिल्या भागांतही डॉक्टरांनी by निनाद मुक्काम …
फरक आहे. इथे डॉक्टर साहेबांनी
In reply to खरे आणि खोटे by श्रावण मोडक
+१
In reply to फरक आहे. इथे डॉक्टर साहेबांनी by बंडा मामा
सत्वपरीक्षा बघणारे अनुभव
भयंकर अनुभव
एक डॉक्टर असण आणि त्याबरोबर
वेगळाच डागदर बाबू आहे हा ...
सुंदर शैलीतील उपयोगी लेखन !
नेहमीप्रमाणे लेखन विचारात
+१
In reply to नेहमीप्रमाणे लेखन विचारात by रेवती
काय म्हणायचं..
तुमचे अनुभव वाचून काय लिहावे तेच कळत नाही!!
शुभेच्छा
विचारात पाडणारे
+१
In reply to विचारात पाडणारे by जुइ
अवघड ए राव !
कोकणचो डॉक्टर!!!
In reply to अवघड ए राव ! by शिल्पा ब
मस्त..
In reply to कोकणचो डॉक्टर!!! by पिलीयन रायडर
जळजळीत पण मला आवडणारं
+१११११११११११.
In reply to जळजळीत पण मला आवडणारं by ५० फक्त
+२
In reply to +१११११११११११. by बॅटमॅन
अनुभव आवडले
जळजळीत वास्तव