✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही मोहक रानफुले

श
श्रिया यांनी
Tue, 04/02/2013 - 10:13  ·  लेख
लेख
पावसाळा सुरू झाला कि आजूबाजूचा परिसर विविध छटांचा हिरवा रंग लेवू लागतो. मग अवचित येतो श्रावण, रिमझिम पाऊस अन उन-पावसाचा लपंडाव घेऊन! विविध रंगांची रानफुले माळरानांत, पठारांवर, डोंगरांच्या कुशीत बहरून येतात आणि मन मोहरून जाते. त्यांच्या आकारांत सुद्धा किती वैविध्य! अगदी नखाएवढी छोटुकलीपण असतात काही फुलं. हा अविष्कार आणि फुलांचा रंगीबेरंगी सोहळा बघण्यासाठी भटकंती करायला मनापासून आवडतं. अगदी खूप लांबच जायला पाहिजे असेच काही नाही. सकाळी लवकर घरातून निघालं आणि एखाद्या जवळच्या घाटरस्त्याची वाट धरली तरी हा बहर बघायला मिळतो. हिरव्यागार गवताच्या पात्यांवर, वेलींवर वार्‍याबरोबर डोलणारी निळी,जांभळी,लाल,पिवळी,गुलाबी,पांढरी फुले बघताना, टिपताना अगदी दोन-तीन तास कुठे निघून जातात कळतही नाही. ह्याच मोसमात फुलणार्‍या काही रानफुलांचे हे फोटो. (बर्‍याच फुलांची नावं माहित आहेत, काही फुलांची नावं माहीत नाहीत) १.नभाळी (Cyanotis Cristata)ह्या फुलांचे ताटवे दूरवर पसरलेले असतात. Nabhali २.लाल गोधडी (Narrowleaf Indigo) indigo ३.कानपेट (Commelina) kanpet ४.चिरे हबॆअमरी (Habenaria Rariflora) chire ५.नाव माहित नाही. unknown ६.घाणेरी (Lantana) tantani ७.घाणेरी (लाल) tantani ८.घाणेरी (पिवळी) tantani ९.सोनकडी (Pentanema Indicum) sonkadi १०.नाव माहित नाही.(Anisomeles?) unknown ११.पिवळी पुंगळी (Obscure Morning glory ) yellow १२.विष्णूक्रांत (Dwarf Morning glory) dwarf १३.संकासूर (Peacock Flower / Caesalpinia Pulcherrima) peacock १४.हि फूले खूपच सुंदर दिसतात. flower १५. याचेही नाव कळले नाही. unknown
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
23166 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

वाह

स्पा
Tue, 04/02/2013 - 10:17 नवीन
अप्रतिम आलेत फटू सर्व फुल मस्तच
  • Log in or register to post comments

छान.. सकाळी सकाळी प्रसन्न

साळसकर
Tue, 04/02/2013 - 10:22 नवीन
छान.. सकाळी सकाळी प्रसन्न वाटले... संकासूर.. राक्षसासारखे नाव.. पण आवडली फुले त्याची.. यंदाच्या पावसाळ्यात देखील कोकणात एक राऊंड मारून यायला हवे... वर्षभराची प्रसन्नता चारच दिवसात जमा होते..
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Fri, 04/12/2013 - 18:03 नवीन
खरच फार प्रसन्न वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

मस्त फोटो

महेश हतोळकर
Tue, 04/02/2013 - 10:23 नवीन
नावेही दिली आहेत. खूपच छान!
  • Log in or register to post comments

मस्तच आलेत फोटो. सुंदर.

कवितानागेश
Tue, 04/02/2013 - 10:24 नवीन
मस्तच आलेत फोटो. सुंदर. :)
  • Log in or register to post comments

+१

आदूबाळ
Tue, 04/02/2013 - 11:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सुरेख

अभ्या..
Tue, 04/02/2013 - 11:02 नवीन
छान छान श्रीया. मस्त आलेत फोटो. बोके पण आलाय की काही ठिकाणी ;)
  • Log in or register to post comments

अभ्या हे "बोके पण आलाय"

श्रिया
Tue, 04/02/2013 - 21:27 नवीन
अभ्या हे "बोके पण आलाय" म्हणजे काय, मला नाही समजले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हे घ्या

अभ्या..
Tue, 04/02/2013 - 21:51 नवीन
आपल्या बाणरावानी नुकताच दिलाय हा धागा. :) http://www.misalpav.com/node/24363
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

आवडली.

सस्नेह
Tue, 04/02/2013 - 11:23 नवीन
शाळेतली कविता आठवली.. रंगरंगुल्या सनसानुल्या गवतफुला रे गवतफुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा.. (गवतफुलांचा लळा असणारी) स्नेहांकिता
  • Log in or register to post comments

काल धागा टाकला असतात तर

ऋषिकेश
Tue, 04/02/2013 - 11:35 नवीन
काल धागा टाकला असतात तर 'एप्रिल फूल' असे नाव देता आले असते ;) अओ. फटु आवडले
  • Log in or register to post comments

अप्रतिम

धनुअमिता
Tue, 04/02/2013 - 12:40 नवीन
मस्त आलेत फोटो. आवडले
  • Log in or register to post comments

मस्त आलेत क्लिक्स... १४ नं.

सौरभ उप्स
Tue, 04/02/2013 - 12:45 नवीन
मस्त आलेत क्लिक्स... १४ नं. च फुल लई भारी आहे ......
  • Log in or register to post comments

एकदम सुरेख आलेत सगळे फोटो.

अस्मी
Tue, 04/02/2013 - 13:19 नवीन
एकदम सुरेख आलेत सगळे फोटो. लाल घाणेरी, संकासूर, विष्णुकांत ही अगदी घराजवळ असलेली फुलं...अगदी ओळखीची :)
  • Log in or register to post comments

+१

अनन्न्या
Tue, 04/02/2013 - 16:45 नवीन
यातील बरीचशी फुले पाहिली आहेत पण नावे माहित नाहीत सर्वांची!!
  • Log in or register to post comments

प्रतिसादांबद्दल सर्वांचे खूप

श्रिया
Tue, 04/02/2013 - 19:55 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद! इथे फोटो डकवण्यासाठी स्पा आणि इस्पीकचा एक्का यांचे तत्पर आणि उपयुक्त मार्गदर्शन मिळाले, त्याबद्दल ह्या दोघांचे आभार मानते.
  • Log in or register to post comments

फोटो मस्त आले आहेत, धन्यवाद.

५० फक्त
Tue, 04/02/2013 - 23:49 नवीन
फोटो मस्त आले आहेत, धन्यवाद. आता मुदलाचं - आभारप्रदर्शन झालं, अल्पोपहाराची काय सोय आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

हो करु कि अल्पोपहाराची सोय

श्रिया
Wed, 04/03/2013 - 11:37 नवीन
५० फक्त यांच्या सुचनेनुसार, सर्व उपस्थित मन्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे, तरी अल्पोपहार केल्याशिवाय कोणी जाऊ नये.:-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

लिमिटेड थाळी दिसते ही!

प्यारे१
Sat, 04/13/2013 - 14:10 नवीन
लिमिटेड थाळी दिसते ही! हा अल्पोपहार नव्हे हो! अल्पोपहार वेगळा ;) -'श्रमपरिहारा'ची ओळख असलेला प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

मस्त!!!!!

जेनी...
Tue, 04/02/2013 - 19:58 नवीन
मस्त!!!!! घाणेरीचे सर्व प्रकार अमेझिंग .....!!!!
  • Log in or register to post comments

असेच म्हणते.............

निवेदिता-ताई
Tue, 04/02/2013 - 21:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

प्रसन्न वाटतात फोटो!

प्यारे१
Tue, 04/02/2013 - 20:00 नवीन
प्रसन्न वाटतात फोटो!
  • Log in or register to post comments

सुंदर फुले आणि फोटो...

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/02/2013 - 21:33 नवीन
बघून मन प्रसन्न झालं !
  • Log in or register to post comments

मस्त

आतिवास
Tue, 04/02/2013 - 21:57 नवीन
मस्त आहेत सगळेच फोटो. आवडले.
  • Log in or register to post comments

वाह

श्रीरंग_जोशी
Tue, 04/02/2013 - 23:58 नवीन
फारच मनमोहक आहेत सर्वच फोटो. आवडले. हरकत नसल्यास नेमके कुठल्या ठिकाणी काढले ते ही लिहावे हि विनंती.
  • Log in or register to post comments

ह्यातले बहुतेक फोटो सासवड व

श्रिया
Wed, 04/03/2013 - 11:04 नवीन
ह्यातले बहुतेक फोटो सासवड व पुरंदर परिसरातील आहेत. ह्या परिसरात बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत. सासवडवरून वीर (धरण) कडे जाणारा रस्ता हि खूप छान आहे. काही फोटो तिथेही टिपलेले आहेत. हा पुरंदर जवळचा एक फोटो, Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

उत्तराबद्दल धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/04/2013 - 02:35 नवीन
या परिसरात मी देखील बराच फिरलोय. पुरंदर वरून सासवडकडे जाणारा रस्ता छानच आहे. तसेच सासवडकडून पुण्याला येताना दिवेघाटाच्या अगोदर मल्हारगड किल्ल्याचा परिसरही सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

-

अमोल केळकर
Wed, 04/03/2013 - 14:15 नवीन
छान फोटो :)
  • Log in or register to post comments

मस्त आलेत फोटो

दिपक.कुवेत
Wed, 04/03/2013 - 16:23 नवीन
बघुन एकदम प्रसन्न वाटलं. खरचं निसर्ग किती रंगांची उधळण करत असतो. फोटो क्रं १३ ची फुले नेहमी दिसतात पण नाव आज कळले.....संकासूर सह्हिच!
  • Log in or register to post comments

मस्त...

सुहास झेले
Wed, 04/03/2013 - 16:44 नवीन
मस्त... :) :)
  • Log in or register to post comments

खूपच छान

अधिराज
Mon, 04/08/2013 - 17:52 नवीन
खूपच छान आहेत फुलांचे फोटो. काही ओळी आठवल्या, "मोसमात गवतावरही कसली कसली फुलं फुलतात, रंगरुपासाठी काय ती पार्लर मध्ये जातात"
  • Log in or register to post comments

सुंदर!

पैसा
Mon, 04/08/2013 - 18:10 नवीन
सगळेच फोटो अप्रतिम!
  • Log in or register to post comments

पैसा आणि अधिराज तुमचे

श्रिया
Tue, 04/09/2013 - 09:28 नवीन
पैसा आणि अधिराज तुमचे प्रोत्साहनपर प्रतिसादांसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत

शुचि
Fri, 04/12/2013 - 18:35 नवीन
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा – शांता शेळके
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा