साहित्य :- सुरमई माश्याचे तुकडे, वाफवलेल्या बटाट्याचा लगदा, तिखट, मीठ, मिरपूड, मोहरी पेस्ट (बाजारात मिळते ती ), टोमाटो केचअप, बटर, अद्रक लसून पेस्ट, मैदा, लीम्बुरस, केळीच पान, सिझलर प्लेट, तेल, विविध भाज्या (गाजर, फरसबी, बेबीकॉर्न, पत्ताकोबी, मशरुम्स ई.)
कृती:- प्रथम माशे भरपूर पाण्याने साफ करून त्यावर लीम्बुरस, मीठ, मिरपूड, अद्रक लसून पेस्ट, टोमाटो केचअप, मोहरी पेस्ट व थोड तेल घालून १० मिनिट मेरीनेट करायला ठेवा. इकडे बटाट्याचा लगद्यात तिखट, मीठ, मिरपूड घालून चपटे गोळे बनवून या टिक्क्या मैद्यात घोळवून तेलावर खरपूस तळून घ्या. नॉनस्टिक तव्यावर थोड्या तेलावर गाजर, फरसबी, बेबीकॉर्न, पत्ताकोबी, मशरुम्स ह्या भाज्या परतून शिजवून घ्या. नंतर मीठ व मिरपूड घाला. माश्यांचे तुकडे देखील मैद्यात घोळवून खरपूस तळून घ्या. सिझलर प्लेट खूप गरम करून ती ग्यासवर असतानाच त्यावर पत्ताकोबीचा कीस पसरवून केळीच पान ठेवा. या केळीच्या पानावर एका बाजूस टिक्क्या, दुसर्या बाजूस माश्यांचे तुकडे, तिसर्या बाजूस परतलेल्या भाज्या व वरून थोड बटर घालून गरमगरम खायला घ्या.
वाचने
6220
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पा.क्रु छान आहे वाचायला
छान !
अजून तरी फोटो चढवायला जमल
फोटो काढला आहे का?
In reply to अजून तरी फोटो चढवायला जमल by प्रतिज्ञा
या सिजलर बरोबर
जल्लं मेलं लक्षाण ते
In reply to या सिजलर बरोबर by jaypal
@जल्लं मेलं लक्षाण ते>>>
In reply to जल्लं मेलं लक्षाण ते by जेनी...
कालच जर्मनीत इस्टर साजरा झाला
हाच तो मासा ,
In reply to कालच जर्मनीत इस्टर साजरा झाला by निनाद मुक्काम …
चुकून किंगफिशर सिझलर वाचले :
मी पण...
In reply to चुकून किंगफिशर सिझलर वाचले : by खबो जाप