धूळवडीच्या सुट्टीच निमित्त साधून एका दिवसात करता येण्याजोगा विकटगड सर करायचे ठरले. सोबत मिपाकर किसन,सौरभ आणि अल्पेश, चिन्मय होते. भयंकर तापणार्या उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून पहाटेच निघायचे ठरले.
१. धुक्यात हरवलेले ठाकुर्ली स्टेशन
६..३० ची कर्जत पकडली , किसन अल्पेश ठाण्याहून आले, मग नेरळला उतरल्यावर आधी पोटात इडल्या ,मेदूवडे सारले (आधी पोटोबा , मग ट्रेकोबा :) ). नेरळ हून रिक्षा करून कातकर वाडीत पोचलो, खर तर आम्हाला 'वॉटर पाईप' स्टेशन मार्गे जायचे होते, पण रिक्षावाल्याने आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, कातकर वाडीत उतरवले आणि समोर उंचावर दिसणाऱ्या विकट गडाकडे बोट दाखवून ' हा इथून जा आता' सांगत पसार झाला.
२. पेब डोंगररांग
3.
सोबत ट्रेक क्षितीज ची प्रिंट आणलेली होतीच, त्यात कातकर वाडीतून जाणार्या रस्त्याबाबत माहिती दिलेली होती. तीन वाटा वर किल्ल्यावर जात होत्या म्हणे .
१. धबधब्यातून
२. मधली मुख्य वाट
३. इलेक्ट्रिक टोवर च्या बाजू बाजूने जाणारी लांबची वाट.
पण प्रत्यक्षात आमच्या समोर चारी बाजूनी डोंगर वेढलेले होते ,
४.
५.
६. आंब्याचा एक विस्तीर्ण वृक्ष
आणि मुख्य दिसेल अशी एकही वाट दिसत नव्हती , असंख्य लहान गुरवाटा होत्या, पण त्यावर पुढे जाणं शक्यच नव्हत. ( सिद्धगड ला असेच हरवून शेवटी हात हलवत घरी गेल्याची आठवण ताजी झाली ). शेवटी किसन द्येवांबरोबर सल्ला मसलत करून परत कातकर वाडीत आलो, आणि एक वाटाड्या सोबत घेतला, ५०० ,४०० अशी घासाघीस करत शेवटी २५० रुपयांवर साहेब वर पर्यंत यायला तयार झाले . १० मिनिटात येतो सांगून तो घरी पळाला तोवर सूर्य तळपायला लागलेला होता . एक पांगार्याच झाड दिमाखात फुललेलं होतं
७. पांगारा
८.
काही वेळातच तो आला,आम्हाला त्याने जी सर्वात लांब आणि कठीण आहे, अशा तिसर्या वाटेने न्यायला सुरुवात केली. सुरुवातीलाच सरळ सरळ उभे चढ लागायला लागले , आणि प्रचंड उन्ह आणि दमट वातावरणाने त्रास व्हायला लागला,
किसनद्येव डी हायड्रेट झाल्यागत झाले. पण मी सोबत द्राक्षे आणलेली होती. ती खाल्ली आणि रानात भरपूर करवंदे लागलेली होती, ती खात हळू हळू पुढे सरकायला लागलो. थोड्या वेळात वातावरणाची सवय झाली आणि आम्ही आमचा वेग वाढवला.
९. धुकट सकाळ
१०. रानमेवा
मध्ये मध्ये रॉक प्याचेस लागत होते, तापलेल्या दगडांवर हात ठेवून वर जात होतो. आजूबाजूचा निसर्ग सुरेखच होता.
११.
१२. रानफुल
१३.
१४. तीन नंबरच्या डोंगरातून आम्ही वर आलो
शेवटी एकदाचे आम्ही पेब गडाकडील गुहांपर्यंत आलो. समोर प्रचंड डोंगर रांग दिसत होती. दक्षिण बाजूला प्रबळगड उठून दिसत होता. येथील कातळात प्रचंड मोठी गुहा खोदलेली आहे. एकावेळी शे दोनशे माणसं आरामात राहतील एवढी मोठी गुहा आहे.
१५. कोरलेली गुहा
ह्या गुहेच्या आसपास अजूनही पाच,सहा भुयारी गुहा दिसतात, मात्र यात जायचे म्हणजे रांगतच जावे लागते, एका वेळी एक माणूस या प्रमाणात. शिवाय सोबत विजेरी आवश्यक. गुहा पाहून पुढे निघाल्यावर किल्ल्याची ढासळलेली तटबंदी दिसते, इथून वर जायला आता एक शिडी लावलेली आहे. तिथून वर आलो.
१६. शिडी
१७. वर आल्यावर समोरच एक लहानशी मारुतीची मूर्ती दिसते.
१८.त्याच्यावरच्या बाजूला एक पाण्याच भरलेलं टाकं आहे, पण यातल पाणी पिण्याजोग नाही.
आम्ही अजून सर्वोच्च टोकावर पोचलेलो नव्हतो. पण आजूबाजूचा भूप्रदेश सुरेखच दिसत होता.
१९.
२०.
दूरवरचा गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण दिसत होतं.
२१. गाडेश्वर तलाव
लांबवरचा धुक्यात हरवलेला चंदेरी सुद्धा डोकवत होता. उत्तरेला मलंगगडाचे सुळके दिसत होते.
२२.
२३.
उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. मस्त गरमागरम वारे वाहत होते. टोकावर कुठले तरी निसर्गमित्र गडाच्या डागडुजीच काम करत होते.
२४. 'वॉटर पाईप' स्टेशन कडून येणारी वाट
वाटाड्याने आम्हाला पिण्याच्या टाक्याजवळ नेलं. बाजूलाच एक शिवालय होतं, वर देवीची मूर्ती होती.
२५.
२६. अष्टभुजा
टाक्यातून गार पाणी काढून ढसाढसा प्यायलो. जवळजवळ अर्धी आंघोळच झाली. डोक्यावर बदाबदा पाणी ओतून जीवाला शांत केलं. आता समोरच्या बाजूने आम्हाला "वॉटर पाईप " स्टेशन बाजूने येणारी वाट दिसत होती. हि खूपच सोप्पी वाटत होती, सर्वांनी त्या रिक्षावाल्याला भरपूर श्या घातल्या.
गडाच्या सर्वोच्च टोकावर एक दत्त मंदिर आणि कुठल्यातरी बाबांचा आश्रम आहे. आम्ही आश्रमात काही गेलो नाही. मस्त एका झाडाच्या सावलीत विसावलो , आणि पोट्पुजेला सुरुवात केली. "ब्रेड, सॉस, काकडी, फोडणीचा भात, बिस्कीट, चकली,आणि उकडलेली अंडी असा झकास बेत होता. मी या सर्व पदार्थांना एकत्र करून एक जम्बो sandwich बनवलं आणि खायला सुरुवात केली :). (सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते, पण मला भूक लागलेली असल्याने मला क्क्काही क्क्काही फरक पडला नाही ;) )सर्वांनी भरपूर हादडल्यावर किसन द्येवांनी एक कोपरा पकडला आणि सुखाने निद्राधीन झाले, मग आम्ही बी त्यांचच अनुकरण करून आडवे झालो, अर्धा तास आराम केल्यावर परतीला लागलो. अर्थातच आलो त्या वाटेने उतरणार नव्हतो, जाताना आम्ही समोरची वाट पकडली, इथेही शिड्या लावलेल्या होत्या, त्या उतरून खाली आलो,
२७.
२८. गडाच्या तटबंदीचे उरलेले अवशेष
अर्धा पाउण तास चालल्यावर एक गणपतीच छोटंसं देऊळ लागलं , त्यापुढेच आम्हाला नेरळ- माथेरानचा रूट दिसला , हुश्श , पोचलो तर.
२९.
३०.
आता उतरण सोप्पी होती. पण खूपच कंटाळवाणी. जल्ला वॉटर पाईप स्टेशन येता येत नव्हत, रस्ता दिसत नव्हता, आम्ही नुसतेच चालतोय . मधेच मागून हळूहळू डुगडूगत नेरळ -माथेरान छोटी ट्रेन निघून गेली .
३१.
आजूबाजूचे सह्याद्रीचे कडे छातीत धडकी भरतील असेच होते.
३२.
३३. एक सुंदर वृक्ष
३४.
काही वेळाने खाली नेरळ दिसायला लागलं. अजून बराच वेळ चालल्यानंतर शेवटी एकदाचा रस्ता
दिसला. एक ओम्नी वाला उभा होताच. त्याने सरळ नेरळ स्टेशन ला सोडले. स्टेशन ला बाहेर मस्त चहा मारला. ३.३० वाजलेले होते. म्हणजे आम्ही एकदम टैमात होतो. थोड्याच वेळात ट्रेन आली, आणि आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो
३५.
समाप्त

वाचने
10497
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
-
भर उन्हात ट्रेक करणार्यांना
+१...असेच म्हणतो.
In reply to भर उन्हात ट्रेक करणार्यांना by सूड
छोटासाच पण सुरेख वृत्तांत.
खूप छान! फोटो मस्तच!
मला विकट गडाबद्दल काहीच
In reply to खूप छान! फोटो मस्तच! by आदूबाळ
काय
मस्तच रे स्पावड्या!
+१
In reply to मस्तच रे स्पावड्या! by प्यारे१
ए
(No subject)
In reply to ए by परिकथेतील राजकुमार
चान चान.
मजाये बॉ स्पांडूची.
लै भारी.......
सुरेख फोटोज. गडाचं वर्णन
मस्त फोटो.
+१
In reply to मस्त फोटो. by कवितानागेश
वा....
मस्त रे...
+१
In reply to मस्त रे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फटू टाकलाय बिरुटे सार्र
In reply to मस्त रे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फटू मस्त
धन्स
In reply to फटू मस्त by चौकटराजा
पुन्हा मे महिन्यामध्ये
In reply to धन्स by स्पा
लई भारी रे, आजच व्यनि केला
@तीन तासाला एक.>>> पण्णास
In reply to लई भारी रे, आजच व्यनि केला by ५० फक्त
मस्त लिहिलस रे स्पा ...
ट्रेक छान झाला, पण इथून पुढे
ट्रेक छान झाला, पण इथून पुढे
अजून एकदा म्हणाला असतास तर
In reply to ट्रेक छान झाला, पण इथून पुढे by किसन शिंदे
झकास

काय सांगता स.सं. ??
In reply to ट्रेक छान झाला, पण इथून पुढे by किसन शिंदे
(No subject)
In reply to काय सांगता स.सं. ?? by सूड
सर्व फोटो आवडले ! निवडक
तरी मी सांगीतल होत की दस्तुर
मस्त!
कॅमेरा