सर्व मिपाकरांना होळीच्या अनेक शुभेच्छा :)
व्हिडियो पाककृती:
साहित्य:
१ लिटर दूध
४-५ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टेस्पून दूध मसाला ( ह्यात जायफळपूड, वेलचीपूड,थोडे केशर व सुक्या-मेव्याची पूड असते.तुम्ही हवे असल्यास सगळे वेग-वेगळे घालू शकता)
सजावटीसाठी पिस्त्याचे काप
चिमूट्भर केशर
चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
पाकृ:
एका नॉन-स्टीक भांड्यात दूध मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
दूधाला उकळी येऊन वर साय जमा व्ह्यायला लागली की , चमच्याने सायीला भांड्याच्या कडेला लावत जावे.
जेव्हा-जेव्हा साय दूधावर यायला लागेल तसे-तसे ती कडेला लावावी.
आच मंदचं असावी नाहीतर साय करपेल.
दूध बर्यापैकी आटले असे वाटले की कडेची साय हळू-हळू चमच्याने काढून दुधात मिसळावी.
त्यात दूध-मसाला घालून अजुन थोडे आटवून घ्यावे.
दूधाला दाटपणा आला की त्यात थोडी-थोडी करुन साखर मिक्स करुन घ्यावी.
गॅस बंद करून रबडी पूर्ण गार होऊ द्यावी, गार झाल्यावर रबडी जरा घट्ट वाटेल.
सर्व्हिंग बाऊलमध्ये रबडी घ्यावी व त्यावर पिस्त्याचे काप घालावे.
चिमूटभर केशर व चांदीचा वर्ख लावून घ्यावे.
ही रबडी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जिलेबी, मालपुव्याबरोबर सर्व्ह करु शकता.
ही रबडी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जिलेबी, मालपुव्याबरोबर सर्व्ह करु शकता.
वाचने
12358
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरी..........
मस्तच !!
रबडी छानच दिसतेय
ओ दिपकराव अहो अजुन रबडी चाखली
In reply to रबडी छानच दिसतेय by दिपक.कुवेत
बाणा...
In reply to ओ दिपकराव अहो अजुन रबडी चाखली by मदनबाण
घरी जाउन पहावे लागणार !
ओ मदनबाण
In reply to घरी जाउन पहावे लागणार ! by मदनबाण
पाकृंचे फोटो मीच काढते ओ आणी
In reply to ओ मदनबाण by सानिकास्वप्निल
सोपी आहे बनवायला. उद्या
अप्रतिम.....
मस्तच...!
खल्लास!
जीवघेणा
गतप्राण झालो.
वा वा वा... एकदम मस्त पाकृ
सुरेख पाकृ! आमच्या डोळ्यांवर
पुरणपोळी आणि कटाची आमटी यथेच्छ हादडल्यामुळे...
आवडता
बदाबदा लाळ गळतेय.
सहमत.
In reply to बदाबदा लाळ गळतेय. by अर्धवटराव
होली है भाइ होलि है
गोग्गोड अगदी
रबडी रबडी!!
बाऽऽऽसच!!!
काल अगदी अश्शीच रबडी झाली
मस्त..
मार डाला ! ! मस्त ग सानिके
सुपरलाईक
क्लास.
बासुंदी व रबडी
In reply to क्लास. by नि३सोलपुरकर
मस्त पाकृ.