✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाची काळी बाजू!

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 03/28/2013 - 12:04  ·  लेख
लेख
काही तासांपूर्वी अग्नेयैशान्येतील कुठल्या तरी संस्थळावर संपादकीय लिहिण्यास भाग पडलेल्या निवाशावर लेख होता. आज तसाच एक लेख मिपावर सापडला. वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारे हे संस्थळ खरे तर नवोदित सदस्यांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेले आहे. ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का मिपावर उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपले संस्थळ आणि तिथली कंपुबाजी परवडली अशी त्यांची परवड होते. अगदी उच्चपदस्थ परदेशी सदस्यही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते. मात्र स्थानिक कंपूबाज लोक ऐषारामात जगत असतात. संपादकांची तंबी, संपादन, अपमान वगैरे वाईट गोष्टीची त्यांना कुठलीही झळ लागत नाही. मिपावर प्रचंड कॉपी पेस्ट, वर्तमानपत्रातल्या बातम्या घेऊन मोठमोठे काथ्याकूट, भटकंत्या आणि अन्य चमकदार लेखनप्रकल्प सुरु केले पण त्यातले कित्येक बुडवले गेले आहेत. आंतरजालीय हलकटपणा, कंपूबाजीची झळ ह्या सगळ्या लेखनप्रकल्पांना लागली आहे. आणि किंमत ही ह्या नवोदितांना चुकवावी लागत आहे. http://article.chinalawinfo.com/Article_Detail.asp?ArticleID=53426 लेखाची लांबी मोठी आहे पण अस्वस्थ करणारा लेख आहे. निदान आपल्या ओळखीच्या कुणी ह्या सापळ्यात अडकू नये. खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. खोटी आश्वासने दिली असतील तर त्या संस्थळाविरुद्ध खटले भरले पाहिजेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15836 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

आ राजकुमार भाइ

इरसाल
गुरुवार, 03/28/2013 - 12:09 नवीन
तमे केम छो? बाकी बद्धा सारु छे ? ढोकला, फाफडा, मेथीना गोटा अने दालवडा खव्डाव्शे ?
  • Log in or register to post comments

काहीही

स्पा
गुरुवार, 03/28/2013 - 12:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अभ्या..
गुरुवार, 03/28/2013 - 12:12 नवीन
अस्वस्थ करणारे आहे सारे. :( दुव्यात दिलेली माहीती झोप उडवणारी आहे. वाचनखूण केली आहे.
  • Log in or register to post comments

छ्या

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 03/28/2013 - 12:14 नवीन
पराशेठ कडून जास्त चौकार, षटकार अपेक्षित होते.. उगाच द्रविड कधी कधी मंद असल्यासारखा आलेला प्रत्येक बॉल सोडून द्यायचा तसे काहीसं झालं. सुरुवात झाली अन् संपलं..
  • Log in or register to post comments

क्षीण विडंबन

स्पा
गुरुवार, 03/28/2013 - 12:15 नवीन
क्षीण विडंबन ;)
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
गुरुवार, 03/28/2013 - 16:19 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अपेक्षाभंग

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/28/2013 - 12:17 नवीन
या लेखाखाली 'फज्जानुकर्न' अशी सही सापडेल अशी आशा वाटली होती. - बळेच कीसकाढवी
  • Log in or register to post comments

फज्जा फार साधी वाटली. मला गजा

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/28/2013 - 15:49 नवीन
फज्जा फार साधी वाटली. मला गजा अपेक्षित होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वाचले. भयानक आहे.

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 03/28/2013 - 12:24 नवीन
वाचले. भयानक आहे.
  • Log in or register to post comments

LOL!

यशोधरा
गुरुवार, 03/28/2013 - 20:21 नवीन
LOL!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

वाचले. गमतीशीर आहे.

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/28/2013 - 12:26 नवीन
वाचले. गमतीशीर आहे.
  • Log in or register to post comments

आजचा जमादार हा प्राचिन

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/28/2013 - 12:34 नवीन
आजचा जमादार हा प्राचिन काळातला अट्टल चोर असतो. अशी सहि घ्यावी म्हणतोय. :-b :-b :-b
  • Log in or register to post comments

खरेच भयानक. कुणाला मँडॅरीन

काळा पहाड
गुरुवार, 03/28/2013 - 12:34 नवीन
खरेच भयानक. कुणाला मँडॅरीन येत नसेल त्यांनी खालील लिंक वापरायला हरकत नाही. http://translate.google.com/translate?sl=auto&tl=en&js=n&prev=_t&hl=en&ie=UTF-8&eotf=1&u=http%3A%2F%2Farticle.chinalawinfo.com%2FArticle_Detail.asp%3FArticleID%3D53426&act=url
  • Log in or register to post comments

काय परा शेट नविन सदस्यांकडुन

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 03/28/2013 - 12:36 नवीन
काय परा शेट नविन सदस्यांकडुन होणार्या त्रासाबद्दल लिहाल अशी अपेक्षा होती अपेक्षा भंग झाला परायक पाठलाग
  • Log in or register to post comments

हीच ती काळी बाजू. (दुसर्‍या

आदूबाळ
गुरुवार, 03/28/2013 - 12:54 नवीन
हीच ती काळी बाजू. (दुसर्‍या बाजूला मिपा चालू आहे) Image removed.
  • Log in or register to post comments

आमचा मोबाईल गोरा आहे.

चैदजा
गुरुवार, 03/28/2013 - 21:17 नवीन
आमचा मोबाईल गोरा आहे. त्यामुळे आमच्या मिपाची दुसरी बाजु. गोरी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आवराआवर का?

वसईचे किल्लेदार
गुरुवार, 03/28/2013 - 13:50 नवीन
हे सगळीकडेच होते आपण नेहमीच दुर्लक्ष करतो वगैरे मला पटत नाही. .......... ......... ........ ....... ...... ..... .... ... .. हे असेच चालणार असे म्हणून चालवून का घ्यायचे बरे?
  • Log in or register to post comments

परा आंम्हाला येडा बनवतो.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/28/2013 - 14:18 नवीन
धरून ठोक :-p परा आंम्हाला येडा बनवतो. याला मिपाच्या धोरणाचे पाठबळ आहे का ? ;-) नाही म्हणजे धोरणात काय म्हटलेय ! :-p http://www.misalpav.com/comment/472412#comment-472412
  • Log in or register to post comments

मिपावर प्रोफाईलचे नाव कसे

साळसकर
गुरुवार, 03/28/2013 - 14:41 नवीन
मिपावर प्रोफाईलचे नाव कसे बदलतात?
  • Log in or register to post comments

डु आय डि बनवुन ...

वसईचे किल्लेदार
गुरुवार, 03/28/2013 - 14:46 नवीन
डु आय डि बनवुन ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

तेच केले होते पण त्याची

साळसकर
गुरुवार, 03/28/2013 - 14:57 नवीन
तेच केले होते पण त्याची रीक्वेस्ट पेंडींग आहे कित्येक दिवस.. याचे नाव बदलले आणि ती उडवली किंवा ती एक्सेप्ट केली आणि हे प्रोफाईल उडवले , दोघांपैकी काहीही केले तरी चालेल. शेवटी प्रोफाईल एकच वापरणार ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वसईचे किल्लेदार

उपाय...

मन१
गुरुवार, 03/28/2013 - 15:07 नवीन
उपाय हाच की त्यांना म्हणावं "मी साळसकर आहे पण तुम्ही आळस-कर बनू नका.पटापटा प्रूव करुन टाका. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

धन्यवाद, फक्त त्यांना म्हणजे

साळसकर
गुरुवार, 03/28/2013 - 15:35 नवीन
धन्यवाद, फक्त त्यांना म्हणजे कोणाला एवढेच आता सांगा. म्हणजे मालक संचालक कोण असतील त्यांच्या प्रोफाईलची किंवा त्यांनी असल्या रीक्वेस्टसाठी एखादा धागा उघडला असेल तर त्या धाग्याची लिंक कृपया तेवढी द्या. या साळसकर आयडीने लिहिण्यात काही मजा नाही येणार राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

http://www.misalpav.com/user/5

मन१
गुरुवार, 03/28/2013 - 15:48 नवीन
http://www.misalpav.com/user/5 ह्यांच्या मागे लागा. खरडी करा, व्यनि करा. इतके करुनही ऐकले नाही; तर सरळ धमकी द्या. "उद्यापासून एकोळी धाग्यांचा वर्षाव सुरु करीन.", "हरेक बातमीचा धागा बनवून दाखविन" , "मयतरि कर्नर क?" अशा खरडींचा वर्षाव करीन व आतापर्यंतचे सद्वर्तन गुंडाळून ठेवीन. मुकाट्यानं ऐकतात की नाही बघा मग. ह्याही धमकी नंतर ऐकलं नाही तर मग सरळ रोमन लिपीतून मराठी टाइप करत सुटा. roman lipitun maraathi type karat sutaa. सविनय कायदेभंग करण्याचे, निषेध नोंदवण्याचे इथे अनेक प्रकार आहेत. . कायदेभंगाची भीती वाटत असेल तर कुठल्याही टुकार संपादकाचा धागा उघडावा. आपलं कुठल्याही संपादकाचा टुकार धागा उघडावा. घंटा काही कळलं नाही तरी "तुम्ही ग्रेट आहत. तुमचा व्यासंग पाहून आज सेतू माधव पगडिंची पगडीही हलली असेल" असा मस्का मारुन पहा. कुठे जातात ते बघूच मग. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

हा हा हा... राव, उपाय एकदम

साळसकर
गुरुवार, 03/28/2013 - 15:57 नवीन
हा हा हा... राव, उपाय एकदम फंडू सांगितलेत पण जिथे गरीबाला प्रवेश असेल अशी लिंक द्या.. तिथे क्लिकल्यावर हे बघा काय आलं :( Access denied You are not authorized to access this page.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

खरड टाकली तुमच्या वतीने

मन१
गुरुवार, 03/28/2013 - 16:07 नवीन
मी तुमच्या वतीने खरड टाकली आहे संपादक मंडळाला. तिकडे कुणाला फुरसत मिळाली की मग ते बघतील अशी आशा करुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

धन्यवाद, वाट पाह्तो..

साळसकर
गुरुवार, 03/28/2013 - 16:26 नवीन
धन्यवाद, वाट पाह्तो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

.

दादा कोंडके
गुरुवार, 03/28/2013 - 17:29 नवीन
धन्यवाद, वाट पाह्तो.. :)
वाट बघा. :) -(सराफ) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

दंडवत स्विकारा ...

छोटा डॉन
गुरुवार, 03/28/2013 - 15:47 नवीन
_/\_ दंडवत स्विकारा किल्लेदारसाह्येब. अशक्य उत्तर आहे, मजा आली - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वसईचे किल्लेदार

सग़ळ्यांची दुकाने

आनंद घारे
गुरुवार, 03/28/2013 - 15:24 नवीन
ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते.
आताच फेरफटका मारून पाहिला. सगळ्यांची दुकाने छान चालली आहेत. मिप्पाच्या हॉटेलातलीच मेंबरं पान खायला नाहीतर आइस्क्रीमसाठी तिकडेपन जातात.
  • Log in or register to post comments

会相同,这 能区

चौकटराजा
गुरुवार, 03/28/2013 - 15:40 नवीन
往是通过法律设置的),通俗的讲,就是权利应当在适当的时间、地点,对适当的对象行使——这是因为如果权利没有界限,那么全体权利人的权利就会相同权利就无所谓存在 将不同权利 ,这样权利就无法将不同权利人的权能区分开,也不能将不同权利人的利益分配开, 更无法将人的个性凸显出来,如此,权利就无所谓存在
  • Log in or register to post comments

不,我是反对这一点。 ,的权利

ऋषिकेश
गुरुवार, 03/28/2013 - 15:55 नवीन
不,我是反对这一点。 ,的权利,可以从不同的权利人的功能区分开,不同的权利人利益的分配开放 因此,人的个性突出,在那里,它确实很重要
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अश्लील....

मन१
गुरुवार, 03/28/2013 - 15:51 नवीन
अश्लील शीर्षक असणारा धागा.....
  • Log in or register to post comments

अच्रत!

पैसा
गुरुवार, 03/28/2013 - 16:03 नवीन
अच्रत, बव्लत, हल्कत! तुझा आयडी ब्लॉक झाला काय रे? (आयडी ब्लॉक करणे हे पासपोर्ट काढून घेण्याइतकेच गंभीर कृत्य आहे. =)))
  • Log in or register to post comments

भरभराट.....!

सुधीर मुतालीक
गुरुवार, 03/28/2013 - 17:12 नवीन
मराठी लेखन वाचन आणि विचार यांची भरभराट होण्यास अशा प्रकारच्या लिखाणाची आज समाजाला अतिशय आवश्यकता आहे. मराठी समाजाने आपले उपक्रुत असण्याची गरज आहे. मस्त धमाल.
  • Log in or register to post comments

"मिपाची काळी बाजू परीकथेतील

शुचि
गुरुवार, 03/28/2013 - 19:02 नवीन
"मिपाची काळी बाजू परीकथेतील राजकुमार" असं मलाच दिसतय की सर्वांना दिसतय ;)
  • Log in or register to post comments

अगागागागा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/28/2013 - 19:17 नवीन
अगागागागा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कालच आठवण आली होती तुझी.

रेवती
गुरुवार, 03/28/2013 - 20:09 नवीन
कालच आठवण आली होती तुझी. म्हटलं कुठं गेलाय कोणास ठाऊक. आता मी पोरबंदरला गेलोय असं सांगू नकोस. निमूटपणे परत ये आणि रोजच्या रोज हजेरी लावून जात जा. माझ्याशी भांडायला दुसरं कोणी मिळत नाहीये सध्या. बाकी वरील लेखाबद्दल सहमत. लोकांना कित्ती कित्ती त्रास दिलाय ना मिपाने!
  • Log in or register to post comments

.

विकास
गुरुवार, 03/28/2013 - 20:50 नवीन
આ મહત્વપૂર્ણ લેખ શેર કરવા બદલ આભાર. હું કૉપિરાઇટ મુદ્દો વિશે ચિની જોવા મળી હતી. મને લાગે છે કે જો આપણે નકલી ID ને નાબુદ પછી ઘાટા બાજુ તેજસ્વી બાજુ ભાગ બની રહેશે.
  • Log in or register to post comments

बघा ! गुजराथेत गेलं की बोलणं

शिल्पा ब
गुरुवार, 03/28/2013 - 21:14 नवीन
बघा ! गुजराथेत गेलं की बोलणं कस्सं गोग्गोड होउन जातं ते!
  • Log in or register to post comments

हो ना ! कोणी मिपावर कंपूबाज

चैदजा
गुरुवार, 03/28/2013 - 21:14 नवीन
हो ना ! कोणी मिपावर कंपूबाज असेल तर मला एकच प्रश्न पडतो, हा कुठ्च्या कंपुचा ? दिल्ली की बारामती ? काही संपादकांविषयी तर पडतोच पडतो. . . . . हक्कभंग प्रस्तावाची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

आणि सल्लागारांबद्दल काय मत ?

नाना चेंगट
गुरुवार, 03/28/2013 - 23:35 नवीन
आणि सल्लागारांबद्दल काय मत ? ;) असो. परा परा नेहमीचा चार्म नाय रे हा... पण ठिक आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा

Ragging

रमेश आठवले
Fri, 03/29/2013 - 01:58 नवीन
मिपावरील काही सिनीअर सदस्य, नवीन आणि म्हणून जुनिअर, अशा सदस्यांचे ragging करतात असे बरेच वेळा लक्षात येते.
  • Log in or register to post comments

रॅगिंग हे ज्युनिअर नाही तर

साळसकर
Fri, 03/29/2013 - 09:37 नवीन
रॅगिंग हे ज्युनिअर नाही तर कमजोर लोकांचे होते..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

Ragging चे उदाहरण

रमेश आठवले
Fri, 03/29/2013 - 12:19 नवीन
नुकत्याच सदस्य झालेल्या सदस्याने मिपावर लेख लिहिला, तर त्या लेखावरून तो सदस्य कमजोर आहे हे कळू शकत नाही. नवीन सदस्य होणारी व्यक्ति ही मिपामध्ये जुनिअर असली तरी त्यावरून त्याची शैक्षणिक पात्रता ,कर्तृत्व,अनुभव अथवा वय व समाजातील स्थान ह्या विषयी काही कळतेच असे नाही. आपण त्या व्यक्तिला कमजोर गृहीत धरु शकत नाही. -----------------------------------------------------------. Ragging चे नुकतेच घडलेले उदाहरण म्हणजे यशोधन वाळिंबे यांनी उसाच्या रसापासून इंधन निर्माण करण्या विषयी लिहिलेला लेख. (पहा- प्रेषक, यशोधन वाळिंबे, Tue, 26/02/2013 - 18:१९ , http://www.misalpav.com/node/२४०८१) यशोधन हा मुलगा १६-१७ वर्षाचा असावा असे त्याच्या profile मध्ये दिलेल्या माहिती वरून वाटते. तो सध्या पहिले वर्ष बीकॉम शिकत आहे. त्याच्या लेखावर आलेले काही सिनिअर मंडळीनचे प्रतिसाद खाली थोडक्यात उधृत करीत आहे. ------------------------------------------------------------------------ -तुम्ही सतत तुमच्या ब्लॉगची गर्दी वाढवण्यापेक्षा सगळा लेखच इथे का टाकत नाही ? दहा ठिकाणी उगाच क्लिकक्लिकाट कशाला करायला लावता ?- -आपला माजोरीपणा अतिशय आवडला.- -१ % शास्त्र ९९ % माजोरीपणा आणि माफक विनोद ( उसाच्या रसावर चालणारी "गादी") -(भांचोत ! पुण्यात असले शिक्षण मिळते हे कळाले तर अनेक लोक इथे शिकायला येणेच बंद करतील. अर्थात हे विधान सदर लेखक हे स्वयंभू नसून शिक्षणातून शहाणे झाले आहेत, असा समज घेउन वरील वाक्य लिहिले आहे.)- -अभ्यास वैग्रे वाढवा यशोढनजी, नै तं कालिजात लोकं लाज काढतीन.- -मालक, साबण लावताय की दाढी करताय.. पोराला अजून दाढी नाहीये, म्हणून म्हटल.. -तुम्ही लोकं असे लादेन जन्माला घालणार आणि निस्तरायचे आम्ही.- -पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतल्यास बेट्याचे "ऑपरेशन" smiley केले जाईल हे त्याने लक्ष्यात घ्यावे.- ---------------------------------------------------------------------------------------- हा तरुण मुलगा पहिल्यांदाच लेख लिहीत आहे हे ध्यानात घेऊन, त्यावर शक्य असेल तर काही उत्तेज्नापूर्ण प्रतिसाद द्यावा हे राहिले,उलट त्या ऐवजी कुत्सित किंवा टिंगल असलेले प्रतिसाद टाकणे किती बरोबर आहे ? हे ragging नाही का ? --------------------------------------- आणि मिपावर शिव्यांचा वापर चालतो का हे संपादक यांनी ठरवायला हवे..
  • Log in or register to post comments

सहमत आहे !

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/29/2013 - 12:40 नवीन
मिपावरील भिकारचोट लोकांच्या डोळ्यात अंजना घालणारा असा हा आठवले सरांचा प्रतिसाद आहे. ह्या वर्षीचा आदर्श मिपाशिक्षक पुरस्कार श्री. आठवले यांनाच द्यावा असा ठराव मी मांडतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

ए गुज्जू

अभ्या..
Fri, 03/29/2013 - 13:20 नवीन
डोळ्यात अंजना घालणारा
अंजनाला डोळे घालणारा म्हण रे. आणि निदान करीना कत्रीना तर म्हण. अंजनाला आईचे पण रोल कोण देत नाही आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

राव एवढे प्रतिसाद आले

साळसकर
Fri, 03/29/2013 - 12:49 नवीन
राव एवढे प्रतिसाद आले त्यांच्या लेखाला हे काय कमी आहे आता इथून पुढे त्या प्रतिसादांना कसे रीअ‍ॅक्ट करायचे हेच ठरवते की लेखकाचे मन कमजोर आहे की सुदृढ एवढ्या लोकांनी दखल घेऊन प्रतिसाद दिला, आपला मौल्यवान वेळ वाया घालवून टंकले, अर्थातच त्या आधी त्यांचा लेख वाचलाही असणार, प्रतिसादांमुळे तो वेळोवेळी वरही आला असणार.. अजून काय पाहिजे जर ते नवीन असतील तर, इथे मी लेख टाकून दोन तास झाले एक प्रतिसाद नाहे राव.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

आता इथून पुढे त्या

आदूबाळ
Fri, 03/29/2013 - 13:35 नवीन
आता इथून पुढे त्या प्रतिसादांना कसे रीअ‍ॅक्ट करायचे हेच ठरवते की लेखकाचे मन कमजोर आहे की सुदृढ
दॅट्स द स्पिरिट! रमेशजींच्या तक्रारीला योग्य उत्तर आहे. रमेशजी, मी आजवर पाहिलेलं आहे की सकस लेखनाला मिपाकरांनी नेहेमीच डोक्यावर घेतलेलं आहे. त्यामुळे मिपाकर कौतुक करत नाहीत, ही तक्रार बाद ठरते. आता प्रश्न रॅगिंगचा. तुम्ही दिलेल्या ८ प्रतिक्रियांपैकी ७ प्रतिक्रिया या धागाकर्त्याने दिलेल्या उद्दाम उत्तरानंतर आलेल्या आहेत. त्याच धाग्यावर इथेनॉलवर चांगली चर्चा झालेली आहे. अनेक मिपाकरांनी "अजून लिहिलं असतं तर बरं झालं असतं" वगैरे प्रतिक्रिया दिल्या आहेतच. पूर्ण लेख न देता आपल्या ब्लॉगची झैरात केली म्हणून मिपाकरांचं डोकं उठलं असावं. प्रस्तुत धागाकर्त्याच्या पुढच्या एका धाग्यावर धन्या यांनी दिलेली प्रतिक्रिया तर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमचा आजवर मी पाहिलेला सर्वोत्तम नमुना आहे. मिपावर बहुतांश लोक चांगल्या लेखनाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. जेव्हा धाग्यातल्या आशयापेक्षा धागाकर्ता मोठं व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा मिपाकर त्याला त्वरित फाट्यावर कोलतात. आता त्याला रॅगिंग म्हणायचं असेल तर म्हणा हवं तर - पण वर साळसकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या टीकेला आपण कसे तोंड देतो ते महत्त्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

-

अमोल केळकर
Fri, 03/29/2013 - 14:02 नवीन
१०० % सहमत अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा