लहान मूल गाढ झोपलय. कविला वाटतं त्याच्या झोपेत अजिबात व्यत्यय येऊ नये.
म्हणून तो कुणाकुणाला काय काय सांगतो पहा.
चंद्राला म्हणतो,
नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू
किंवा
यक्ष-पर्यांनो स्वप्नीं नाचून नीज नका चाळवू
म्हणजे अगदी स्वप्नात जाऊन सुद्धा कुणी त्याची झोपमोड करू नये.
किती खोलवर विचार केलाय कविने.
लहान मुलांची काळजी घेताना इतका खोलवर विचार व्हायला हवा.
पण उदाहरणे मात्र उलट दिसतात.
परवा एक प्रसंग पाहीला. एक लग्नसमारंभ होता.
एक आई आपल्या अगदी लहान रांगत्या बाळाला घेऊन आली होती.
मोठ्या शहरात काही कार्यालयात काही सुजाण केटरर्स लहान मुलांसाठी खाण्याची वेगळी व्यवस्था ठेवतात.
पाटी असते' "लहान मुलांसाठी मऊ भात"
परवाच्या लग्नात अशी व्यवस्था नव्हती. दुपारची वेळ. बाळाला भूक लागली असेल असे समजून त्या आईने
कार्यालयातच बनवलेला आमटी भात बाळासाठी कालवून आणला आणि त्याला भरवू लागली.
पहील्या घासापासूनच ते मूल मोठ्याने रडायला लागले. तोंडातून घास बाहेर फेकू लागले.
आई चिडली. म्हणू लागली, " बघा किती मस्ती आहे याला, एवढे देते आहे तर थूंकून टाकतो आहे"
काही वेळ हाच प्रकार चालू राहीला. बाळाचे रडणे थांबेना. ते पाहून एक आजी आल्या. त्या बाळाच्या आईला म्हणाल्या,
"अगं बाळाला जे भरवते आहेस ते तू खाऊन पाहीले आहेस का ?"
ती म्हणाली, "नाही"
त्या म्हणाल्या, "मग तू पहा ना"
तिने तो आमटी भात चाखून पाहीला आणि तिच्या लक्षात आले. आमटी नेहमीपेक्षा प्रचंड तिखट आहे.
तिला चूक उमगली. इतका तिखट पदार्थ बाळ कसे खाईल ?
अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला घडताना दिसतात.
मुले रडत असतात. कुरकुर करत असतात. त्यांना काही म्हणायचे असते. पण मोठ्या माणसांच्या
ते लक्षातच येत नाही.
एखादे मूल रडत असते. पालक त्याला बळे बळे काही खाऊ घालतात. पण त्याचे रडणे थांबत नाही.
पालकांच्या लक्षात येत नाही त्याला भूक लागली नसून तहान लागली आहे.
तेव्हा काही खायला नको तर प्यायला पाणी देण्याची गरज आहे.
अशावेळी पाणी दिल्यास ते मूल खरेच अगदी शांत होउन जाते.
त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत काही काळजी घ्यायला हवी, काही गोष्टी टाळायला हव्यात.
उदा: लहान मूल झोपले असेल तिथे आवाज होणार नाही, डोळ्यावर फार उजेड येणार नाही हे पाहीले पाहीजे.
तान्ही मुले ही फार सेन्सिटिव्ह असतात. अगदी खुट्ट झाले तरी ती जागी होतात.
त्यामुळे ती झोपलेली असताना मोठ्या आवाजात बोलणे, टीव्ही रेडीयोचा आवाज करणे हेही टाळावे.
विषेशतः स्वयंपाकघरात देखील काही कूटण्याचे, कूकरच्या शिट्टीचे आवाज बाळाच्या झोपेत व्यत्यय आणणार नाहीत ना याची काळजी घेतली पाहीजे.
टू व्हीलरवर नवराबायको चाललेले असतात. नवरा गाडी चालवत असतो.
बायको मागे बसलेली असते. तिच्या हातात दुपट्यात गुंडाळलेले बाळ असते.
हे चित्र कुठेही दिसते. एखाद्या छोट्या रस्त्यापासून ते अगदी हायवेवर देखील.
यामधे धोके किती आहेत. याचा विचार कोणीच करताना दिसत नाही.
लहान मुलांना टू व्हीलरवरून नेणे टाळायला हवे.
दोन मुले असतील तर दोन मुले आणि आई वडील अशीही सर्कस बाइकवर लोक करताना आढळतात.
हे झालं अगदी लहान बालकांबाबत पण याहून जरा मोठ्या मुलांच्या बाबतीत एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे.
कुणीही भेटणारे, घरी येणारे लोक मुलांना एक प्रश्न हमखास विचारतात, "तूझं नाव काय ?"
वास्तविक हा प्रश्न दिवसात मुलांना कितीवेळा विचारला जातो कुणी विचार केलाय का .
किती वैतागत असेल ते मूल या एकाच प्रश्नाने.
काही शेजारपाजारच्या लोकांना आपण कसे लहान मुलांचे मित्र आहोत किंवा मुलात मूल फूलात फूल आहोत
हे दाखवण्याची फार हौस असते. असे बालमित्र लोक मुलांच्या मनात नसले तरी त्यांना पकडून त्यांच्याशी
संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
ते मूल दूर पळत असेल तर त्याला पकडून बळेच कडेवर घेणे,
त्याची पापी घेणे असे प्रकार करताना दिसतात.
असे लोक मुलांच्या डोक्यात जातात. याबाबतही काळजी घेतली पाहीजे.
आणखी एक हौस
लहान मुलांना उंच फेकणे आणि झेलणे. या गोष्टी टाळायला हव्यात. यातले धोके सांगायला हवेत का !
अलिकडे कसे माहीत नाही पण सुंदर तरुण मुली आणि लहान मुले यांचे कौतुक करण्यासाठी
त्यांना कॅडबरी देण्याची पद्धत रुढ झाली आहे.
पण दातांचे आरोग्य बिघडू नये हा विवेक लोक विसरतात.
कधी कधी मुले एकटीच तल्लीन होउन खेळत असतात.
अशावेळी त्यांची एकाग्रता भंग करून त्यांना उचलून घेणे इ. गोष्टी टाळाव्यात.
मुलांचे एकटेच आपले आपले खेळणे हे त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असते.
अगदी लहान मुले मुठी चोखतात, पुढे बोटे तोंडात घालतात पुढे पुढे पायाचे आंगठे तोंडात घालतात.
काही जणांना मुलांची ही सवय गैर वाटते. असे लोक मुलांच्या अशा सवयीला प्रखर विरोध करतात.
मुलांनी तोंडात बोटे घातल्यास बोटे खसकन बाहेर ओढणे, मुलावर वस्सकन ओरडणे इ.
पण
मुलांच्या बौद्धिक विकासातील हे नैसर्गिक टप्पे आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. सिगारेट पिऊन आल्यास किंवा तोंडात गुटखा असताना
तोंडाला दुर्गंधी येते.
अशावेळी मुलांच्या जवळ जाणे टाळावे. अशावेळी तुम्ही कितीही प्रेमाने जवळ गेलात तरी मुले दूरच पळणार हे लक्षात ठेवा.
अनेक मोठ्या माणसांना हे भान राहात नाही.
--
काही पाहुणे घरी येतात. त्यांना एक खोड असते. मुलांना प्रश्न विचारण्याची. मुलांची परीक्षा घेण्याची.
तूझे नाव काय ? तू कितवीत जातोस ? कुठल्या शाळेत जातोस ? इथून प्रश्न सुरु होतात.
मग मुलांना जरा अवघड प्रश्न विचारायचे. मुले यांच्या परीक्षेत नापास झाली की हे खूष.
मुलांचे ऐका. प्रश्न विचारून त्यांना पिकवू नका. मुलांना असे नापास करणारे पाहुणे आवडत नाहीत...
रस्त्याने जाताना
मूल भरभर चालू शकत नसेल तर त्याला आपल्या स्पीडने चालवू नये. त्याची फरफट होते.
काही पालकांना आपल्या बाळाची प्रगती पहायची फार घाई झालेली असते.
ते आपण होऊन उभे राहत नसताना हे पालक त्याला बळे बळे उभे करतात. चालायला लावतात.
परीणामी मुलाच्या गुडघ्यावर, पाठीवर ताण येतो. कधी कधी यामुळे मुलाच्या चालण्यात जन्मभर दोष निर्माण होऊ शकतो.
तेव्हा हे टाळायला हवे.
दुसरी गोष्ट - "शेजारचा मुलगा ह्याच्या एवढाच आहे तो पळायला लागला. हा अजून उभा सुद्धा राहत नाही."
ही तुलना नको.
मुलांच्या बाबतीत सतत जागरुकता आवश्यक आहे, फक्त पालकांचीच नव्हे तर आजूबाजूला वावरणार्या लोकांचीही.
वाचने
21259
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
लहान तान्ह्या मुलांना मांडीवर
In reply to +१ by मन१
आवडले.!
'अलिकडे कसे माहीत नाही पण
सुंदर तरुण मुली हसताना
In reply to 'अलिकडे कसे माहीत नाही पण by ५० फक्त
या २ प्रतिसादामध्ये
In reply to सुंदर तरुण मुली हसताना by प्यारे१
फरक पडतो ना
In reply to 'अलिकडे कसे माहीत नाही पण by ५० फक्त
हम्म...
लेख आवडला. :)
In reply to हम्म... by दादा कोंडके
बाणा,
In reply to लेख आवडला. :) by मदनबाण
रि़क्षातुन केलेला प्रवासा
In reply to बाणा, by दादा कोंडके
स्कुटरवर बाळाला घेउन केलेला
In reply to रि़क्षातुन केलेला प्रवासा by मदनबाण
रि़क्षातुन केलेला प्रवासा
In reply to रि़क्षातुन केलेला प्रवासा by मदनबाण
कै च्या कै
In reply to रि़क्षातुन केलेला प्रवासा by मदनबाण
ह्म्म...
In reply to कै च्या कै by धन्या
हल्ली सनातन लावलाय का?
In reply to कै च्या कै by धन्या
हल्ली सनातन लावलाय का?
In reply to हल्ली सनातन लावलाय का? by शिल्पा ब
आजोबा, तुमचाच नंबर वाढला
In reply to हल्ली सनातन लावलाय का? by मदनबाण
अग्गो... खापर पणजे ! काय पण
In reply to आजोबा, तुमचाच नंबर वाढला by शिल्पा ब
या वयात आता फारसं काम होत नै
In reply to अग्गो... खापर पणजे ! काय पण by मदनबाण
एखाद-दुसरं वर्ष जाउंदे...
In reply to लेख आवडला. :) by मदनबाण
नॅनो यांच्यासाठीच काढली टाटा नी
In reply to लेख आवडला. :) by मदनबाण
गरीबांनी पोरं पैदाच करायची नाहीत काय?
घरी येणारे लोक मुलांना एक
"मस्त आहे तुझं खेळणं / दप्तर
In reply to घरी येणारे लोक मुलांना एक by रेवती
छान निरीक्षण !
In reply to "मस्त आहे तुझं खेळणं / दप्तर by इनिगोय
त्यांची आवडती वस्तू घेऊ का?
In reply to "मस्त आहे तुझं खेळणं / दप्तर by इनिगोय
घरात ३-४ वर्षाचा मुलगा/मुलगी
In reply to "मस्त आहे तुझं खेळणं / दप्तर by इनिगोय
धन्यवाद!!!
मस्तच.... सारेच मुद्दे पटले..
नक्कीच
In reply to मस्तच.... सारेच मुद्दे पटले.. by तुमचा अभिषेक
अजून एक
+१
In reply to अजून एक by आदूबाळ
बाळ साहेब,
In reply to अजून एक by आदूबाळ
लहान मुलांशी काय काय बोलू नये
काय बोलावं?
In reply to लहान मुलांशी काय काय बोलू नये by रामपुरी
+१
In reply to काय बोलावं? by उपास
+१००
In reply to काय बोलावं? by उपास
छान लेख...
लेखकाशी सहमत आहे
हम्म...
In reply to लेखकाशी सहमत आहे by पिलीयन रायडर
चांगले संकलन
अलिकडे कसे माहीत नाही पण
लेख आवडला !!
कुणासारखा दिसतो ??
:)
ए दुक्कल......
In reply to :) by ऋषिकेश
होय होत तोच तोच!
In reply to ए दुक्कल...... by मन१
तोच दिनेश आज ख्यातनाम गणितज्ञ
In reply to होय होत तोच तोच! by ऋषिकेश
छान लेख...
हम्म..
आजकाल टीव्हीवर औषधांच्या
+१
In reply to आजकाल टीव्हीवर औषधांच्या by नर्मदेतला गोटा
काळजीने लिहिल आहे, आवडले.
आणखी लक्षात आलेली गोष्ट
उत्तम. धन्यवाद.
चांगलंय...! सतत असं काट्यावर
पालकांचा स्वत:च्या मोहांवर ताबा
खरंय तुमचं,
In reply to पालकांचा स्वत:च्या मोहांवर ताबा by अत्रन्गि पाउस
छान!
दुचाकी हे फक्त दोन लोकांसाठी
http://www.esakal.com/pune