Skip to main content

तेंव्हा एक कर! (विडंबन)

लेखक दिप्ती यांनी शुक्रवार, 05/09/2008 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा एक कर ! (विडंबन) जेंव्हा तुझा नंबर पासांच्या यादीत नसेल तेंव्हा एक कर - तू नि:शंक मनाने डोळे पूस , ठीकच आहे , चार दिवस धपापेल जीव गदगदेल! उतु जाणारे हुंदके आवर कढ आवर, नवा ऑक्टोबरचा फॉर्म भर उगीचच मार्च च्या नादी लागू नको! खुशाल , खुशाल तुला वेळ मिळेल तसा अभ्यास कर, पुढच्या मार्च ला स्मरून कर हवे तर मार्चला विस्मरून कर!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1830
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

जेंव्हा तुझा नंबर पासांच्या यादीत नसेल तेंव्हा एक कर - तू नि:शंक मनाने डोळे पूस , ठीकच आहे , चार दिवस धपापेल जीव गदगदेल!
१२वी मधे गणित हा विषय राहिल्यावर गदगद्/धपधप काहिहि झाले नाही....नापास होणार हे माहीत होते...पण तरिही बोर्डाच्या कारभारावर थोडी आशा होती...म्हणजे १७ चे ७१ वगैरे...असो...
उतु जाणारे हुंदके आवर
ते पण फक्त पालकांच्या नशिबी :(
कढ आवर, नवा ऑक्टोबरचा फॉर्म भर उगीचच मार्च च्या नादी लागू नको!
आम्ही तर १२वी चा नाद सोडून सरळ पदविकेच्या दिशेने कुच केले (बरोबर वाचलेत...'कुच'...कारण शिक्षणाचे सगळे महत्वाचे टप्पे म्हणजे संग्राम असतात...नंतर पानिपत)
खुशाल , खुशाल तुला वेळ मिळेल तसा अभ्यास कर, पुढच्या मार्च ला स्मरून कर हवे तर मार्चला विस्मरून कर!
एकदम असेच केले बुवा! (अजुनही गणिताच्या परिक्षेची स्वप्ने पडणारा) पांथस्थ...

सांत्वनपर उपदेश चांगला सांगितलाय.