साहित्यः-१)दोन पेले नाचणे.
२)अर्ध्या नारळाचे दूध्.(घट्ट व पातळ.)
३)किसलेला गूळ.
४)चिमूटभर मीठ.
५)काजू किंवा भाजलेले शेंगदाणे.
६)दिड चमचा साजूक तूप.
कृती :-नाचणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे.सकाळी बारीक वाटून गाळून घ्यावे.चोथा येईल तो टाकून द्यावा.
गाळून उरलेल्या पाण्यात अजून पाणी घालून ६-७ तास ठेवावे म्हणजे नाचणीचे सत्व खाली बसेल व
पाणी वर राहिल.वरचे पाणी हळू काढून टाका.आता जे सत्व राहील त्यात नारळाचे दूध,किसलेला गूळ.
काजू व मीठ घालून ढवळून घ्या.गूळ विरघळला कि हे मिश्रण मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.सतत हलवत रहा.
जरावेळाने मिश्रण घट्ट होत येईल्.केकच्या बॅटरपेक्षा जरा घट्ट झाले की त्यात तूप घालून ढवळा. तूप
लावलेल्या भाड्यांत हे मिश्रण ओता.व थंड करत ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.
वाचने
8437
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाचणीचे सत्व खूप आवडतं
मी कधी तसे केले नाही.तू करून
In reply to नाचणीचे सत्व खूप आवडतं by सानिकास्वप्निल
छान पाकृ
In reply to नाचणीचे सत्व खूप आवडतं by सानिकास्वप्निल
हे फ्रिजमधे ठेऊन थंड झालं की
छान आणि पौष्टिक प्रकार आहे हा
वेगळीच पाकक्रुती!!
पौष्टिक पाक्रु
उन्हाळ्यासाठि...
अतिशय चांगला पदार्थ-चवीला व
पौष्टिक