रविवारचा दिवस आणि सकाळी ७ ची वेळ ..एरवी capacity पेक्षा हि जास्त लोकांना सामावून घेणारा रेल्वे चा डबा आज तेवढाच रिकामा होता..दररोज २ इंच सुद्धा पाय मागे पुढे करता न येणाऱ्या ठिकाणी आज चक्क कुणीही उभे नव्हते ..एरवी reservation च्या डब्यात ही Illegally चढणारे तर नाहीच पण चक्क काही seats ही रिकामे होते . दररोज up -down करणार्यांच्या सुट्टी मुळे त्या निर्जीव entity ला ही थोडा relief मिळाला असावा .. मोठ्या अथक प्रयत्नानंतर execute होणाऱ्या मुंबई प्लान चा entry point - सुटता सुटता पकडलेली Deccan Queen .. :-)
ट्रेनच्या प्रवासात काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात हा अनुभव ह्या वेळी मला आला .. जसे कि २० पानांचा newspaper आपण संपूर्ण पणे वाचून काढू शकतो अगदी worldwide news पासून तर छोट्या छोट्या sales /services च्या जाहिरातींपर्यंत ..दुसरं म्हणजे आजू बाजूच्या लोकांचं निरीक्षण ..आणि तिसरं असं कि headphones कानात टाकून निवांत झोपू शकतो ..पण सुदैवाने (for a change) तिसरा option ह्या वेळी माझ्या वाटयास आला नाही ..
Train सुरु होताच पुढच्या दहा मिनिटांत breakfast चा मेनू ओरडत , हातात कागद पेन घेऊन एक माणूस आला . समोरच्या seats वर बसलेल्या २ पुणेरी बायकांनी अगदी मेनूत असलेले सगळे options order केलेत Toast ,Bread omelet, वडा पाव etc .. ट्रेन मधील food न खायचं ठरवल्याने आम्ही काही order केली नाही .. गप्पांसोबत च newspaper वाचणं चालू होत .. अर्ध्या बातम्या तर rape cases आणि crimes वर होत्या ..पेपर बाजूला ठेवावं म्हटलं तेवढ्यात, कानातले आणि इतर बायकी छोट सामान विकणारा आला ..ताई सोबत असल्याने त्यात मला ही डोक घालणं साहजिक होतं आणि depressing news वाचण्यापेक्षा तो time pass फार better होता .."कोणताही जोड घ्या १० रुपये.." तो आम्ही किंमत न विचारताच, स्वत:हून म्हणाला .. ३-४ pair खरेदी केल्यानंतर सहजंच मी rates च comparison केलं म्हणजे same type ची कानातली मी जळगावला ५ रु जोड आणि FC रोडला २५-३५ रु जोड प्रमाणे पहिली होती .. तो salesman पुढे जाऊ लागल्यावर समोरच्या बाईंपैकी एकीने त्याला "शुक शुक.." शब्द नाही तर आवाज काढत त्याला हाक मारली ..बाहेरून सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या लोकांच्या अशा 'असभ्य ' हरकती बघितल्या वर कळून चुकतं कि 'का आपला देश manners /etiquette ह्या बाबतीत मागे असावा ? ' , 'का 'समानते' सारख्या terms फक्त पुस्तकीच वाटतात?' ..प्रसंग छोटासाच पण जसा "One cause of many problems " statement, satisfy करणारा .असो .
एक विशेष गोष्ट म्हणजे मी स्वत:हून माझं cell phone switched off केलं आणि पुन्हा पेपर वाचायला घेतला ..काही चांगले लेख हि होते.. Govt वर्षाकाठी Indian Rail वर हजारो कोटी खर्च करणार ह्या वर editorial होतं .. त्यात इंग्रजांच्या काळात अगदी राजेशाही पद्धतीने food service उपलब्ध असलेल्या Calcutta Mail आणि Deccan Queen चं फार कौतुक केलेलं होतं .आणि त्याच सोबत सध्याची परिस्थिती compare केलेली होती..महत्वाचा मुद्दा असा होता कि , जर सरकार एवढा खर्च रेल्वे वर करणार आहे तर त्याचं proper utilization व्हावं आणि प्रवाश्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दयाव्यात . त्यावर लगेच टिपणी होती की ,फक्त पैसा खर्च करून उपयोग नाही तर Administration ,Check and Quality Control असावा; अन्यथा पैसा वाया जाणार . खरंय ,According to wikipedia content दररोज जवळपास १०,००० रेल्वे देशभरात धावतात, २४ दशलक्ष लोक रोज रेल्वेचा प्रवास करतात आणि २.८ दशलक्ष टन्स मालवाहतूक होते ती वेगळी ..एवढ्या सगळ्या गोष्टीं fluently चालण्यासाठी १.४ दशलक्ष लोक Indian Railway Services मध्ये काम करतात . एवढा मोठा पसारा शिस्तीत manage करण्यासाठी कडक Administration हवंच ..
दरवर्षी हजारो candidates , MBA च्या degree सोबत लोखोंची packages घेऊन private सेक्टर मध्ये किंवा देशाबाहेर नोकरीस जातात . Indian Railway Services मध्ये उच्च पदावर नोकरी पत्करली आणि त्यांना ज्ञात असलेले Classic Management Fundas इथे apply केलेत तर आपण २४ दशलक्ष लोकांना World Class Services provide करण्यापासून वंचित राहणार नाही .जसे की Pantry प्रमाणे एक डबा shops चा असेल .. म्हणजे पुढील station ची वाट न बघता गरजेच्या वस्तू Passengers ना railway तच मिळतील . Medical Services देखील long journey च्या trains मध्ये उपलब्ध असतील.
आपल्या देशात कोणतंही Administration आणि Development क्षेत्र घेतलं तरी पहिला मुद्दा "problem " च्या रुपात येतो तो-- "Population" चा! आणि Govt. ची नोकरी रटाळ आणि पैसा कमी म्हणून 'bright students' इकडे वळत नाहीत , पण त्यांनी ह्यात शिरून तेच काम challenging आणि innovative पद्धतीने केलं तर personal आणि social दोन्ही फायदे होतील .पुढे जाऊन system मध्ये बदल आणून ते पुढील पिढी साठी हे jobs well paid आणि Interesting बनवता येतील. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे...असो,
विषय भरकटण्याच्या आत पुढे सरकते ..
थोड्या वेळाने परत एक salesman मोठ -मोठ्याने ओरडत आला ; "१० रु.मे २ , देखने के लिये पैसे नही .." . त्याचं बोलणं लक्ष वेधाण्यासारखं होतं ( पोटाची गरज भागवण्यासाठी जेव्हा एखादा 'अशिक्षित ' कोणतही छोटं - मोठं साधन अवलंबवतो तेव्हा असली वाक्य 'आतून' च येत असावी , त्यासाठी MBA च्या degree ची आवश्यकता नाही ..) तरीही मी विशेष attention दिलं नाही पण समोरची बाई माझ्यासाठी 'model under observation' बनली होती .. ह्या वेळी देखील तिने त्याला त्याच पद्धतीने हाक मारली आणि वस्तू खरेदी केली .. बायका आणि shopping वरून उगीचच नाही लिहिलं जातं .. :-D
पुढे दादर ला उतरल्यावर कांदिवली पर्यंत local चा प्रवास adventurous होता . रविवार असल्याने तशी गर्दी कमी होती . काही कारण नसताना मुंबई ची craze असणाऱ्या मला local नि pass होणारं एक एक स्टेशनचं
नाव ही fascinating वाटत होतं .. आत जागा असतांनाही hero गिरी करत मुलं दारात उभे राहतात हे थोडं वेडपट वाटलं.
'गोराई'.वरून Essel World साठी बोटी सुटतात . रस्त्यापासून बोट board करण्यासाठी १०० एक मीटर चा pathway आहे . दोन्ही बाजूंना मासे , खेकडे विकणारे बसलेले असतात . माश्यांच्या वासाने स्वत:च्या नाकाचा बचाव करत पटपट चालत असताना देखील पाण्याबाहेर वळवळ करणारा जिवंत खेकडा बघण्याचा chance मी सोडला नाही . बोटीतून जात असताना संथ पाण्यात अचानक च वर येउन परत पाण्यात शिरणाऱ्या माशांकडे लक्ष गेल्यावाचून राहत नाही.
पुढे आत गेल्यावर भन्नाट मजा आली ...३६० degree फिरणारा पाळणा जेव्हा १८० ला जाऊन काही सेकंद थांबतो तेव्हा 'आपल्याला आपला जीव किती प्यारा आहे ', जाणीव होते .
परतीच्या वेळी pathway वरचे सगळे मच्छीवाले निघून गेले होते .. खराब किंवा उरलेले garbage रस्त्याच्या कडेला कुठे कुठे फेकलेले होते .प्रचंड नाका -डोक्यात जाणारा वास त्याची साक्ष होता .
दिवसाच्या शेवटी परत निघतांना marine drive ला जाणं possible न झाल्याने थोडा मूड off होता ,fast local असल्याने अगदी लिमिटेड stations ना train थांबत होती ; तेवढ्यात मागून "परदेसी परदेसी जाना नही .." गाण्याचा आवाज आला ; आवाजावरून कुणी मुलगी असावी, कळून येत होतं., उत्सुकतेने मी वळून मागे पाहिलं तर एक १०-१२ वर्ष वयाची मुलगी होती..चेहऱ्याने दिसायला ठीक-ठाक पण ,पण केस विस्कटलेले ; अंगावर फाटके कपडे आणि हातात बरंच काही सामान..तिच्या एकंदरीत पेहराव ती भिकारी असल्याची कबुली देत होता . संगीताच्या कोणत्याही criteria satisfy न करणाऱ्या तिच्या गाण्यात "हीच माझी duty आहे आणि ती केल्यावर माझं काम पैसे गोळा करणं असं आहे ", हा attitude मात्र स्पष्टपणे दिसून येत होता . समोर कोण लोकं आहेत वगैरे गोष्टी तिच्या खिजगिणतीत हि नसाव्यात ..गाणं संपल्यावर तिने पैश्यांसाठी हात पुढे केला , मी विचारांत असल्याने हातात आलेले सुट्टेच फक्त ठेवले,त्या कोवळ्या हातावर ..! आजूबाजूच्या सर्वच लोकांनी तिला झिडकारलं .पुढच्या स्टेशनला ती उतरली तेव्हा " बड़ा है कोई छोटा, नहीं मायूस लौटा । अमीरों का सहारा, गरीबो का गुजारा ।" हे तिचे बोल कानावर आले ..त्याच station ला उतरायचं हे तिला कुणी शिकवलं होतं कि, मग इतरांच्या अशा वागणुकीमुळे ती उतरली असणार ...? ती तश्या अवस्थेत खुश होती की, इतरांचा हेवा वाटत असावा तिला..? 'चांगल्याच्या' definition पासून अगदीच अज्ञात असावी की, माहित असावं आपण काय आहोत ते...? मनात आलं , आपण नशीबवान आहोत चांगले पालक , चांगली नोकरी , चांगले कपडे , अत्याधुनिक सूखसिविधा ही हाकेच्या अंतरावर ..पण मग त्या मुलीसारख्या अनेकांचं काय ..? एवढयाशा जीवाला काय काळात असावी -- दुनियादारी..,श्रीमंती आणि गरिबी ..?? अनेक प्रश्न निरुत्तरित राहिलेत..अजूनही आहेत ..
अशा वेळी पैशाचं महत्व फार प्रकर्षाने जाणवतं. भ्रष्टाचारात गुंतलेल्या १०% रकमेत ही संपूर्ण देशातल्या भिकार्यांची पोटं भरतील आजच्या स्थितीला..हे गणित समजण्यास कठीण नाही .
"Population आणि Awareness " मुद्द्यावर येउन विचारांची गाडी थांबली आणि लोकल देखील ..!!!
दादर ला उतरल्यावर शिवनेरीचं स्थानक शोधून १ तास वेळ रिकामा होता , स्टेशन वर बूट पॉलिश करण्यासाठी लोक पायातून तो काढून का देत नाही ..? कुणी आपल्या हातासमोर पाय धरून उभा आहे ,किती छोटेपणाची feeling येत असावी ..? पण लगेचच बूट पॉलिश करणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून बरं वाटलं . तरीही उच्च-नीच भेद मिटवण्यासाठी आपण हून अशा लोकांना आदराने वागवणं मला अधिक महत्वाचं वाटतं ..
पुढे दादर ला करोडो किंमती असलेल्या flats पैकी आपला हि एक असावा असा हेवा वाटला ..street food पुण्यापेक्षा छान वाटलं आणि स्वस्त पण . " कोणतंही काम छोटं नसतं ", हे मुंबई च्या छोट्या व्यवसायिकांकडून शिकण्यासारखं आहे ., पुण्यातल्या लोकांप्रमाणे त्यांच्यात so-called " माज / extra चा अभिमान " दिसून येत नाही ..
शिवनेरी स्थानकावरची वातानुकुलित प्रतीक्षा घर मुंबई च्या गरमीत फार आरामदायी वाटलं ..परतीचा प्रवास सुरु झाला.. पुढील वेळी marine drive for sure म्हणत .. कानात headphones टाकले आणि "Gunjasa hai koi iktara" ऐकत बाहेरची रोषणाई बघण्यात मन गुंग झालं .. एव्हाना फोन on झालं होतं ....!
-प्राजक्ता...
वाचने
11873
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता काही खरं नाही....
+१
In reply to आता काही खरं नाही.... by पिलीयन रायडर
फन/ यु नो
In reply to आता काही खरं नाही.... by पिलीयन रायडर
आई ग..
In reply to फन/ यु नो by प्राजक्ता..
तपशीलात चूक आहे.
In reply to आई ग.. by पिलीयन रायडर
आँ... असं काय हो.. तुम्ही
In reply to तपशीलात चूक आहे. by विश्वनाथ मेहेंदळे
व्हॉट द हेल इज धिस 'तपशिल'?
In reply to आँ... असं काय हो.. तुम्ही by पिलीयन रायडर
म्हणजे
In reply to व्हॉट द हेल इज धिस 'तपशिल'? by प्यारे१
दक्खन ची राणी आणि काही न खाणे
ऐसेच बोलताय.
In reply to दक्खन ची राणी आणि काही न खाणे by निमिष ध.
बरं झाल पाजुबाई तुमी इतके
हो ना..
In reply to बरं झाल पाजुबाई तुमी इतके by जेनी...
हे बाकी खरं हो पूजातै. मिपाकर
In reply to बरं झाल पाजुबाई तुमी इतके by जेनी...
हे तर तुम्हाला दुसरया कुणाकडून लिहून घ्यायला लागले असणार नाही?:(
In reply to बरं झाल पाजुबाई तुमी इतके by जेनी...
=))
In reply to हे तर तुम्हाला दुसरया कुणाकडून लिहून घ्यायला लागले असणार नाही?:( by प्राजक्ता..
मुक्तक
धन्यवाद.. :)
In reply to मुक्तक by कपिलमुनी
आपल्याला सोयीचे ते वेचावे,
In reply to धन्यवाद.. :) by प्राजक्ता..
भाषा हे फक्त माध्यम
In reply to धन्यवाद.. :) by प्राजक्ता..
विचारांचा प्राजक्त बहरला आहे,
विचारांचा प्राजक्त बहरला आहे,
In reply to विचारांचा प्राजक्त बहरला आहे, by मनीषा
धन्यवाद.. :)
In reply to विचारांचा प्राजक्त बहरला आहे, by आदूबाळ
"नैसर्गिक" वाटण्यासाठी .....
In reply to धन्यवाद.. :) by प्राजक्ता..
_/\_
In reply to "नैसर्गिक" वाटण्यासाठी ..... by सूड
धन्यवाद.. :)
In reply to विचारांचा प्राजक्त बहरला आहे, by मनीषा
OMG! Calling परा!
जर्रा मराठी
"पी. ए" कसा इंग्रजी आहे ना.. :(
In reply to जर्रा मराठी by अभ्या..
येऊ द्या
In reply to "पी. ए" कसा इंग्रजी आहे ना.. :( by प्राजक्ता..
1. capacity
Hat's Off!
In reply to 1. capacity by मृत्युन्जय
शीर्षक र्हायलं मृत्यो!
In reply to 1. capacity by मृत्युन्जय
हा हा..
In reply to 1. capacity by मृत्युन्जय
विशेष दखल..धन्यवाद !
In reply to 1. capacity by मृत्युन्जय
"मुद्द्यावर" लक्ष घातलंत तर
In reply to विशेष दखल..धन्यवाद ! by प्राजक्ता..
"मुद्द्यावर" लक्ष घातलंत तर जरा बरं राहीलमला खरच तुमचा मुद्दा कळाला नाही. कृपया एका वाक्यात / थोडक्यात सांगता का..?....
In reply to "मुद्द्यावर" लक्ष घातलंत तर by मोदक
ओह! बट प्राज्क्ता, (हे चुकून
In reply to विशेष दखल..धन्यवाद ! by प्राजक्ता..
आपण दोघेही मुद्दा शोधत आहोत
In reply to ओह! बट प्राज्क्ता, (हे चुकून by यशोधरा
आईशपथ!
In reply to 1. capacity by मृत्युन्जय
1. capacity - क्षमता,
In reply to 1. capacity by मृत्युन्जय
हेय्य शाब्बास!
In reply to 1. capacity - क्षमता, by ज्ञानोबाचे पैजार
आभार
In reply to 1. capacity - क्षमता, by ज्ञानोबाचे पैजार
मिपाकरांना पार धन्द्यालाच
In reply to आभार by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धंद्याला का वाटेला?त्या
In reply to मिपाकरांना पार धन्द्यालाच by विश्वनाथ मेहेंदळे
आयला, शेकंड टाईम पण तेवढेच
In reply to 1. capacity - क्षमता, by ज्ञानोबाचे पैजार
भले शाब्बास.
In reply to 1. capacity - क्षमता, by ज्ञानोबाचे पैजार
अगागागा..
"http://chilmibaba.blogspot.com" "
In reply to अगागागा.. by चावटमेला
भाषा
पूर्ण वाक्य मराठीत लिहीता आलं
In reply to भाषा by प्राजक्ता..
आयला प्यारे त्यापेक्षा तुमचा
In reply to पूर्ण वाक्य मराठीत लिहीता आलं by प्यारे१
अहो प्राजक्ता बाई, मिसळपावचं
In reply to भाषा by प्राजक्ता..
जर हा लेख डु-आयडी ने लिहिला असेल तर...
वेगळा दॄष्टिकोन
तत्वतः असे म्हण्ण्यात अडचण
In reply to वेगळा दॄष्टिकोन by तुषार काळभोर
काय म्हणालात?
In reply to वेगळा दॄष्टिकोन by तुषार काळभोर
स्लीप ऑफ टोन्ग्यु....
In reply to काय म्हणालात? by अभ्या..
सुरेख रीतीने भावना व्यक्त
हम्म.. कोणतीही भाषा वापरली
आँ?
In reply to हम्म.. कोणतीही भाषा वापरली by नाना चेंगट
मिपा करांनो विंग्रजी येत नसेल तर ....
फक्त अं! (किंवा भावना दुखावू नयेत म्हणून "हे राऽऽम")
दोन्हीही बरोबर.
In reply to फक्त अं! (किंवा भावना दुखावू नयेत म्हणून "हे राऽऽम") by धमाल मुलगा
ठ्या!!!
In reply to दोन्हीही बरोबर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to ठ्या!!! by धमाल मुलगा
तुम्हा दोघांमुळेच
In reply to फक्त अं! (किंवा भावना दुखावू नयेत म्हणून "हे राऽऽम") by धमाल मुलगा
लेखापेक्षा त्यावरच्या
त्या
हो, हो प्राजू वेगळी.
In reply to त्या by तिमा
प्रांजळ मत